Advertisement

Samas In Marathi PDF Download | समास व त्याचे प्रकार ह्यांची संपूर्ण माहिती जाणून घेऊया

Samas In Marathi: – Samas part of Marathi Grammar is very important for competitive exams as well as for 5th to 10th based on which important marks can be obtained by answering the questions asked, it is necessary to study Samas and its types in detail. In today’s post, we will see what are margins and detailed information about their types.

Samas In Marathi

Samas And Its Types :- मराठी व्याकरण मधील समास हा भाग स्पर्धा परीक्षा तसेच ५ वि ते १० वि साठी सुद्धा खूपच महत्वाचा असतो यावर आधारित विचारले जाणारे प्रश्नांची उत्तरे देऊन महत्वपूर्ण असे गुण प्राप्त केले जाऊ शकतात या साठी समास आणि त्यांचे प्रकार याचा विस्तारित अभ्यास करणे आवश्यक आहे आजच्या या पोस्ट मध्ये आपण पाहुयात समास म्हणजे काय आणि त्यांच्या प्रकाराबद्दल सविस्तर माहिती .

समास म्हणजे काय ? | What Is Samas In Marathi

 • जेव्हा २ किंवा त्या पेक्षा जास्त शब्दांमध्ये संबंध दर्शवणारे प्रत्येय किंवा शब्द काढून त्याचा एकाच शब्द तयार होतो या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात.
 • त्याचवेळी या तयार झालेल्या जोड शब्दाला सामासिक शब्द असे म्हणतात .

उदाहरणार्थ :-

 • राजपुत्र -राजाचा पुत्र , राम व लक्ष्मण -राम लक्ष्मण , वनभोजन -वनातील भोजन

समास चे प्रकार | Types Of Samas In Marathi

 • समास चे एकूण ४ प्रमुख प्रकार आहेत. १) अव्यायी भाव समास २)तत्पुरुष समास ३) व्दंव्द समास ४) बहुव्रीही समास
 • या प्रमुख प्रकारांमध्ये परत काही उपप्रकार सुद्धा आहेत.

Read More:- शब्दसिद्धी व त्याच्या प्रकारांची संपूर्ण सविस्तर माहिती | Shabsiddhi And Their Types PDF

1. अव्यायी भाव समास | Avyayibhav Samas In Marathi

 • ज्या वेळेस समास मधील पहिले पद हे अव्यव असते आणि तोच शब्द असतो किंवा मग संपूर्ण शब्द क्रियाविशेषण अव्यव असते तेव्हा त्यास ‘अव्ययीभाव समास’ असे म्हणतात.
 • म्हणजेच या मधले पहिले पद हे अव्यव असून प्रमुख असते आणि त्याच सामासीक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेलं असतो
 • शब्दाची सुरवात आ , यथा , प्रति अशाने होते.

Avyayibhav Samas In Marathi Example

सामासिक शब्द विग्रह
गैरहजर  – हजर नसलेला
आजन्मजन्मापासून 
प्रतिवर्ष – प्रत्येक वर्ष 
प्रतिदिन –प्रत्येक दिवशी
यथाशक्ती शक्ती प्रमाणे
 घरोघरी  –प्रत्येक घरी 

2. तत्पुरुष समास

 • ह्या समास प्रकारांमध्ये दुसरे पद महत्वाचे असते व दोन शब्दांमध्ये असणाऱ्या विभक्ती प्रत्ययाचा किंवा अन्य शब्दांचा लोप झालेले असतो .
 • म्हणजेच अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो त्यास  ‘तत्पुरुष समास’ असे म्हणतात.
 • तत्पुरुष समासाचे काही उपप्रकार आहेत (अ) विभक्ती तत्पुरुष समास (ब) कर्मधारय तत्पुरुष समास (क) व्दिगु समास (ड) अलुप्त तत्पुरुष समास (इ) उपपद तत्पुरुष समास (फ) नत्र तत्पुरुष समास (ग) मध्यम पदलोपी समास

उदाहरणार्थ :

तोंडपाठतोंडाने पाठ 
देवपूजा – देवाची पूजा
ऋणमुक्तऋणातून मुक्त
कंबरपट्टा कमरे साठी पट्टा
ईश्वरनिर्मित ईश्वराने निर्मिलेले

तत्पुरुष समासाचे उपप्रकार

तत्पुरुष समासाचे काही उपप्रकार aहे त्याची माहिती आपण खालील प्रमाणे घेणार आहोत.

1. विभक्ती तत्पुरुष समास

 • विभक्ती तत्पुरुष समास मध्ये एखाद्या विभक्तीचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्यय काढून दोन्ही पडे जोडली जातात .
 • म्हणजेच २ संबंध दर्शवणाऱ्या विभक्ती प्रत्यंचा लोप होऊन समास तयार होतो ,
 • पहिल्या पदाच्या विभक्तीचा लोप केलेलं असतो .

उदाहरणार्थ :

राजकन्या राजाची कन्या 
 गर्भश्रीमंतगर्भापासून श्रीमंत
 गाईरान गाईचे रान
 वनदेवतावनातील देवता
घरफोड्या घराला फोडणारा
क्रीडांगण क्रीडेसाठी अंगण
चोरभय चोरांपासून भय
ऋणमुक्त ऋणांपासून मुक्त

2. कर्मधारय तत्पुरुष समास

 • या समास मध्ये दोन्ही पदे हि प्रथमा विभक्ती मध असतात व यातील एक पद विशेषणाचा कार्य करते किंवा दोन्ही पदे विशेषण असतात .
 • म्हणजेच तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत किंवा समासात दोन्ही पदे प्रथम विभक्ती मध्ये असतात त्यास कर्मधारय तत्पुरुष समास’ असे म्हणतात

उदाहरणार्थ :

घनश्याम घनासारखा श्याम
 पितांबर पीत असे अंबर 
 महादेव महान असा देव
चंद्रवदनचंद्रासारखे वदन
निलकमल निळे असे कमल
चंद्रमुख चंद्र सारखे मुख
पांढराशुभ्र खूप शुभ्र असा
विद्याधन विद्या हेच धन
तांबडीमती तांबडी अशी माती
महादेव महान असा देव
भाषांतर अन्य अशी भाषा
काव्यामृत काव्य रुपी अमृत

3. व्दिगु समास | Dvigu Samas In Marathi

 • द्विगु समासामध्ये पहिले पद हे संख्या विशेषण असते आणि त्या सामासिक शब्दावरून समुदायाचा बोध होतो ,

उदाहरणार्थ :

 पंचवटीपाच वाडांचा समूह
 नवरात्रनऊ रात्रींचा समूह
त्रिभुवन तिनं भुवन
चार्तुमास चार महिने
पंचारती पाच आरती
त्रिकाळ तिन्ही काळ

4. अलुप्त तत्पुरुष समास 

 • या समास प्रकारांमध्ये पहिल्या पदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही त्यामुळे यास ‘अलुप्त तत्पुरुष समास’ असे म्हणतात.
 • लोप होणे म्हणजे काढून टाकणे इथे दोन पडतील संबंध दाखवणाऱ्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही .
 • या समासामध्ये पहिल्या पदानंतर ई किंवा ए यापैकी एका वर्णाचा ऊच्चर होतो .

उदाहरणार्थ :

पंके (ए)पंकेरूह
कर्तरी ( ई )कर्तरिप्रयोग
कर्मणी ( ई )कर्मनियप्रयोग
अग्रे (ए) अग्रेसर
युधी ( ई )युधिष्टिर
तोंडी ( ई )तोंडी लावणे

5. उपपद तत्पुरुष समास

 • उपपद तत्पुरुष समास मध्ये दुसरे पद प्रधान असते आणि ते धातू साधित असते .
 • धातुसाधित अथवा कृदन्त असते असे म्हंटले जाते

उदाहरणार्थ :

देशस्थ राहणारा
विहंग जाणारा
वंशज जन्मणारा
ग्रंथकार करणारा
शेतकरी करणारा

6. नत्र तत्पुरुष समास

 • या समास प्रकारांमध्ये पहिले पद हे नकारार्थी म्हणून त्यास नत्र तत्पुरुष समास म्हणतात .
 • अशा समासात पहिले पद हे अ, अन, न, ना, बे, नी, गैर या सारखी असतात .

उदाहरणार्थ :

अनावधान नास्तिक
अनाचार अयोग्य
अपुरा अज्ञान
अनादर नापसंत
अधर्म निरोगी
निर्दोष अनिष्ट
बेडर गैरहजर

(ग) मध्यम पदलोपी समास 

 • या समास प्रकारामध्ये २ शब्दातील विभक्ती प्रत्याशिवाय संबंध दाखवणाऱ्या शब्दाचा लोप झालेला असतो त्या मुले यास ‘मध्यम पदलोपी समास’ असे म्हणतात.
 • या समासाला लुप्तपद कर्मधाराय समास असे सुद्धा म्हटले जाते .
 • या मध्ये २ पदांमधील संबंध दर्शवणाऱ्या शब्दांचा लोप झालेलं असतो .

उदाहरणार्थ :

साखरभात साखर युक्त भात
डाळवांगे वांगेयुक्त डाळ
बालमित्र बालपंपासूनच मित्र
कांदेपोहे कांदा घालून केलेले पोहे
चुलतभाऊ चुलत्याचा मुलगा या नात्याने भाऊ
भोजनभाऊ भोजनापुरता भाऊ
पुरणपोळी पुरण घालून तयार केलेली पोळी
घोडेस्वार घोड्यावर स्वर होणार

Read More:- Kriyapad In Marathi PDF Download | क्रियापद, त्यांचे प्रकार आणि त्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

3. व्दंव्द समास | Dvandva Samas In Marathi

 • या समास प्रकारामध्ये दोन्ही हा पदे सारखीच असतात त्यामुळे यास व्दंव्द समास असे म्हणतात .

द्वंद्व समासाचे प्रकार | Types Of Dwandva Samas

द्वंद्व समासाचे एकूण ३ प्रकार आहेत इतरेतर व्दंव्द समास, वैकल्पिक व्दंव्द समास,समहार व्दंव्द समास

अ) इतरेतर व्दंव्द समास

 • या प्रकारामध्ये विग्रह करताना आणि आणि व या शब्दांचा उपयोग करावा लागतो .
 • म्हणजेच आणि व अशा समुच्चय दर्शक उभयान्वयी अव्ययांचा वापर करून सामासिक शब्दांचा विग्रह केला जातो ,

उदाहरणार्थ :

सामासिक शब्दविग्रह (आणि व या शब्दांचा उपयोग )
काकाकाकीकाका व काकी
कृष्णअर्जुनकृष्ण आणि अर्जुन
पतीपत्नीपती आणि पत्नी
हळदकुंकूहळद आणि कुंकू
डोंगरदऱ्याडोंगर आणि दर्या
हरिहरहरी आणि हर
आईवडीलआई आणि वडील
मातापितामाता आणि पिता
भीमार्जुनभीम आणि अर्जुन
विटीदांडूविटी व दांडू
सासूसासरेसासू आणि सासरे
चराचरचार आणि आचार
पशुपक्षीपशु आणि पक्षी
एकवीसएक आणि वीस
कौरवपांडवकौरव आणि पांडव
बहीणभाऊबहीण आणि भाऊ

Read More:- Vakprachar In Marathi PDF Download | मराठी वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ संपूर्ण माहिती जाणून घ्या

(ब) वैकल्पिक व्दंव्द समास

 • या समास प्रकारांमध्ये विग्रह करताना अथवा किंवा वा यांचा वापर केला जातो .
 • म्हणजेच अथवा किंवा वा हि वैकल्पिक उभयान्वयी अव्यय वापरली जातात म्हणजेच  ‘वैकल्पिक व्दंव्द समास होय .

उदाहरणार्थ :

सामासिक शब्दविग्रह (अथवा किंवा वा यांचा वापर)
न्यायान्यायन्याय अथवा अन्याय
बरेवाईटबरे अथवा वाईट
लहानमोठालहान किंवा मोठा
चूकभूलचूक अथवा भूल
खरेखोटेखरे किंवा खोटे
दहापंधरादहा किंवा पंधरा
पापपुण्यपाप अथवा पुण्य
कमीजास्तकमी किंवा जास्त
सत्यासत्यसत्य किंवा असत्य

Read More:- MPSC Information In Marathi PDF Download | MPSC बद्दल ची संपूर्ण माहीती जाणून घ्या मराठी माहिती

(क) समहार व्दंव्द समास

 • या सामासिक प्रकारांमध्ये शब्दांचा विग्रह करताना समासातील पदांशिवाय त्याच प्रकारच्या आणखी काही गोष्टींचा समावेश होतो .
 • म्हणजेच इतर जातींच्या पदार्थांचा समावेश केला जातो त्यास समहार व्दंव्द समास असे म्हणतात .

उदाहरणार्थ :

सामासिक शब्दविग्रह (समासातील पदांशिवाय त्याच प्रकारच्या आणखी काही गोष्टीं)
भाजीपालाभाजी आणि इतर तत्सम भाज्या
शेतीवाडीशेती वाडी व इतर सगळी सापंत्ति
अथंरूणापांघरूनअंथरून पांघरून तसेच इतर कपडे
केरकचराकेर कचरा आणि इतर टाकाऊ पदार्थ
घरदारघर दार आणि इतर मालमत्ता
जीवजंतूजीव जंतू वगैरे
नदीनालेनदी नाले वगैरे
मीठमिरचीमीठ मिरची व इतर स्वप्नांकामधील पदार्थ
चहापाणीचहा पाणी व इतर फराळ
पानसुपारीपण सुपारी आणि इतर पदार्थ

4. बहुव्रीही समास

बहुव्रीही समास म्हणजे ज्या समासातील कोणतेच पद प्रमुख नसते त्या पदाच्या अर्थापेक्षा वेगळ्या अशा वस्तूंचा किंवा व्यक्तींचा त्यामधून बोध होत असतो तेव्हा त्या समासाला बहुव्रिही समास असे म्हणतात.

उदाहरणार्थ . उदा. चक्रपाणी चक्र आहे पाणीत ज्याच्या तो,

बहुव्रीही समासाचे चार उपप्रकार पडतात त्याची माहिती आपण खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.

1. विभक्ती बहुव्रीही समास

विभक्ती बहुव्रीही समास म्हणजे ज्या समासाचा विग्रह करतांना शेवटी एक संबंधी सर्वनाम येते. अशा सर्वनामाची जी विभक्ती असेल त्या विभक्तीचे नाव समासाला दिले जाते त्याला विभक्ती बहुव्रिही समास असे म्हणतात.

उदा.

प्राप्तधन – प्राप्त आहे धन ज्याला तो – व्दितीया विभक्ती
जितशत्रू – जित आहे शत्रू ज्याने तो – तृतीया विभक्ती
त्रिकोण – तीन आहेत कोन ज्याला तो – चतुर्थी विभक्ती

2. नत्र बहुब्रिही समास

नत्र बहुब्रिही समास म्हणजे ज्या समासाचे पहिले पद नकारदर्शक असते त्याला नत्र बहुव्रिही समास असे म्हणतात. या समासातील पहिल्या पदात अ, न, अन,नी अशा नकारदर्शक शब्दांचा वापर केला जातो.

उदाहरणार्थ:-

 • अनंत – (नाही अंत ज्याला तो),
 • नीरस – (नाही रस ज्यात तो)
 • अव्यय – (नाही व्यय ज्याला तो)

3. सह बहुब्रिही समास

सह बहुब्रिही समास म्हणजे ज्या बहुव्रिही समासाचे पहिले पद सह किंवा स अशी अव्यये असून हा सामासिक शब्द एखादा विशेषणाचे कार्य करतो त्यास सहबहुव्रिही समास म्हणतात.

उदा.

 • सुवर्ण,
 • सादर
 • सहकुटुंब

4. प्रादीबहुब्रिही समास

प्रादीबहुब्रिही समास मध्ये ज्या बहुव्रिही समासाचे पहिले पद प्र, परा, अप, दूर, सु, वि अशा उपसर्गानी युक्त असेल तर त्याला प्रादिबहुव्रिही समास असे म्हणतात. 

उदाहरणार्थ:-

 • प्रबळ -अधिक शक्ती शाली असा तो.
 • सुमंगल – अत्यंत पवित्र आहे असे ते

Read More:- Jodakshar In Marathi PDF Download | जोडाक्षरे आणि त्याची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Samas In Marathi PDF Download

Samas In Marathi PDF Download:- आपण ह्या आर्टिकल मध्ये Samas आणि त्याचा प्रकरांची ची संपूर्ण माहिती सविस्तर पणे जाणून घेतली आहे. अनेक विद्यार्थ्याना अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यांच्यासाठी आम्ही विद्यार्थ्याना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही PDF Download करण्यासाठी PDF देत आहोत. तुम्ही Samas In Marathi PDF आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

Conclusion

आपण या पोस्ट मध्ये आपण Samas In Marathi ची संपूर्ण माहिती सविस्तर पहिली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण Samas In Marathi, Samas In Marathi Examples, Dvigu Samas In Marathi, Dvandva Samas In Marathi, Samas In Marathi Grammar, Dwandwa Samas In Marathi हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना उपयुक्त ठरेल.

FAQ Frequently Asked Questions for Samas In Marathi

Q1. समास किती आहे?

Ans:- समास चे एकूण ४ प्रमुख प्रकार आहेत. १) अव्यायी भाव समास २)तत्पुरुष समास ३) व्दंव्द समास ४) बहुव्रीही समास. ह्या मध्ये त्या त्या समासाचे उपप्रकार आहेत.

Q2. तत्पुरुष म्हणजे काय?

Ans:- ह्या समास प्रकारांमध्ये दुसरे पद महत्वाचे असते व दोन शब्दांमध्ये असणाऱ्या विभक्ती प्रत्ययाचा किंवा अन्य शब्दांचा लोप झालेले असतो .म्हणजेच अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो त्यास  ‘तत्पुरुष समास’ असे म्हणतात.

Q3. अव्ययीभाव समास म्हणजे काय?

Ans:- ज्या वेळेस समास मधील पहिले पद हे अव्यव असते आणि तोच शब्द असतो किंवा मग संपूर्ण शब्द क्रियाविशेषण अव्यव असते तेव्हा त्यास ‘अव्ययीभाव समास’ असे म्हणतात.

Q4. बहुव्रीही समास म्हणजे काय?

Ans:- बहुव्रीही समास म्हणजे ज्या समासातील कोणतेच पद प्रमुख नसते त्या पदाच्या अर्थापेक्षा वेगळ्या अशा वस्तूंचा किंवा व्यक्तींचा त्यामधून बोध होत असतो तेव्हा त्या समासाला बहुव्रिही समास असे म्हणतात.

Q5. समास म्हणजे काय आणि समासाचे प्रकार?

Ans:- जेव्हा २ किंवा त्या पेक्षा जास्त शब्दांमध्ये संबंध दर्शवणारे प्रत्येय किंवा शब्द काढून त्याचा एकाच शब्द तयार होतो या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. आणि समास चे एकूण ४ प्रमुख प्रकार आहेत. १) अव्यायी भाव समास २)तत्पुरुष समास ३) व्दंव्द समास ४) बहुव्रीही समास

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages