Home » शब्दसिद्धी व त्याच्या प्रकारांची संपूर्ण सविस्तर माहिती | Shabsiddhi And Their Types PDF
शब्दसिद्धी व त्याच्या प्रकारांची संपूर्ण सविस्तर माहिती | Shabsiddhi And Their Types PDF
Shabsiddhi:- Marathi Grammar is the most important subject of language study in which different important subject sections one of Shabsiddhi Our teachers always tell us that language should be pure and know-how which word is formed at the same time important in the competitive exam as well as school exam. You can benefit from this to get marks, that’s why in today’s post we will see Shabsiddhi and its types – Marathi grammar complete information.
Advertisement
Shabsiddhi
Shabsiddhi:- मराठी व्याकरण हा भाषा अभ्यासाचा सगळ्यात महत्वाचा विषय आहे ह्या मध्ये वेगवेगळे महत्वाचे विषय सेकशन या मधलाच एक आहे शब्दसिद्धी आपले शिक्षक आपल्याला नेहमी सांगतात कि भाषा शुद्ध असावी तसेच कोणता शब्द कसा बनतो याची माहिती असली पाहिजे याच वेळी स्पर्धा परीक्षा तसेच शालेय परीक्षा मध्ये महत्वाचे गुण मिळवण्या साठी तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो , यासाठीच आजच्या पोस्ट मध्ये पाहुयात शब्दसिद्धी व त्याचे प्रकार – मराठी व्याकरण सम्पूर्ण माहिती.
आपल्याला माहित असेलच कि मराठी भाषेमध्ये अरबी ,संस्कृत , प्राकृत ,फारसी ,हिंदी ,कन्नड ,पोर्तुगाल ,इंग्रजी .तामिळ या भाषेतील शब्दांचा समावेश आहे.
म्हणजेच मराठी भाषेमध्ये असंख्य शब्द आहेत ज्यांचा स्वतःचा असा अर्थ आहे ते शब्द अक्षरांनी बनलेलं असतात ते कसे तयार होतात हे सिद्ध करणे म्हणजेच शब्दसिद्धी होय.
एका शब्दापासून किंवा धातूपासून अन्य शब्द तयार करणे म्हणजे शब्दसिद्धी होय. थोडक्यात शब्द कसा बनतो म्हणजेच सिद्ध होतो याला शब्दसिद्धी म्हणतात.
शब्दसिद्धी चे एकूण 6 मुख्य प्रकार आहेत आणि त्या मध्ये परत उपप्रकार सुद्धा आहेत.
सिद्ध शब्दांच्या मागे उपसर्ग किंवा पुढे प्रत्यय लागून जे शब्द तयार होतात. त्यांना साधित शब्द म्हणतात. उदा. कर या शब्दापासून करून, करिता, करीत, करणारा इ.
साधित शब्दाचे 3 प्रकार
उपसर्ग घटित
प्रत्यय घटित
सामासिक शब्द
1. उपसर्ग घटित शब्द
उपसर्गघटीत शब्द :- शब्दाच्या आधी लागलेल्या अक्षरांना उपसर्ग म्हणतात व त्यापासून बनलेल्या शब्दाला उपसर्गघटीत शब्द म्हणतात. उदा. प्रतिकार, भरजरी, अत्यंत, भरदिवसा, निकामी, अधिपती
2. प्रत्ययघटित शब्द
प्रत्ययघटीत शब्द :- शब्दाच्या नंतर लागलेल्या अक्षरांना प्रत्यय म्हणतात व त्यापासून बनलेल्या शब्दाला प्रत्ययघटीत शब्द म्हणतात.
उदाहरणार्थ
तोफखाना
पाळीव
रसिक
पथिक
बंधुता
3. सामासिक शब्द
सामासिक शब्द म्हणजे दोन किंवा त्या पेक्षा अधिक शब्द एकत्र येऊन तयार झालेल्या नवीन शब्दास सामासिक शब्द असे म्हणतात.
उदाहरणार्थ
पोळपाट
ताटवाटी
नीळकंठ
श्यामवर्ण
दारोदार
सिद्ध शब्द
जा, ए, दे, घे, कर, बस, बोल, खा, पी, या सारख्या मूळ धातू किंवा शब्दांना सिद्ध शब्द म्हणतात. तसेच तत्सम तद्भव व देशी या शब्दांनाही सिद्धशब्द म्हणतात.
Shabsiddhi PDF Download :- आपण ह्या आर्टिकल मध्ये Shabsiddhi ची संपूर्ण माहिती आणि त्याची प्रकार ह्याची संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. अनेक विद्यार्थ्याना अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यांच्यासाठी आम्ही विद्यार्थ्याना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही PDF Download करण्यासाठी PDF देत आहोत. तुम्ही Shabsiddhi आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.
आपण या पोस्ट मध्ये आपण Shabsiddhi ची संपूर्ण माहिती आणि त्यांचे प्रकार ह्यांची सविस्तर पहिली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण Shabsiddhi हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना उपयुक्त ठरेल.