Advertisement

Alankar In Marathi PDF Download | अलंकार त्याचे प्रकार आणि उदाहरण ह्याची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Alankar In Marathi PDF Download

Alankar In Marathi:- Alankar means ornaments used for a beautiful appearance. Women use good hairstyles, costumes, and ornaments to look beautiful, in the same way, attractive words are used to make language writing beautiful and interesting to read, which is called ornamentation in Marathi grammar. Ornamentation is the most important part of Marathi Vyakar. Based on which the questions are in competitive exams as well as in school exams and marks are also important.

Alankar In Marathi

Alankar In Marathi:- अलंकार म्हणजेच सुंदर दिसण्या साठी वापरलेलं दागिने भूषण होय. स्त्रिया सुंदर दिसण्या साठी चांगली केशभूषा वेशभूषा तसेच दागिने वापरतात त्याच प्रमाणे भाषा लेखन सुंदर आणि वाचण्या साठी रंजक बनवण्यासाठी सुद्धा आकर्षक शब्दरचना केली जाते त्यालाच मराठी व्याकरण च्या भाषेमध्ये अलंकार असे म्हंटले जाते. मराठी व्याकरमध्ये अलंकार हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. ज्यावर आधारित प्रश्न स्पर्धा परीक्षा तसेच शालेय परीक्षांमध्ये असतोच आणि त्यावर गुण सुद्धा महत्तवाचे असतात.

आपण आजच्या ह्या आर्टिकल मध्ये आपण अलंकार म्हणजे काय आणि त्याचे प्रकार याची सविस्तर माहिती घेऊन हे गुण पक्के करून घेऊयात.

अलंकार म्हणजे काय ? | What is Alankar In Marathi ?

 • अलंकार म्हणजेच लेखन तसेच भाषा सुंदर बनवण्यासाठी वापरली गेलेली सुंदर अशी शब्दरचना होय .
 • कविते मध्ये तसेच कादंबरी किंवा एखाद गद्य वाचताना तुम्हाला अशी कितीतरी अलंकारिक शब्दरचना पाहायला मिळतील

अलंकाराचे प्रकार | Types Of Alankar In Marathi

अलंकारांचे मुख्य 2 प्रकार शब्दालंकार आणि अर्थालंकार आहेत हे प्रकार भाषेच्या गुणधर्म मुळे तयार होतात. तसेच मुख्य अलंकारमध्ये परत उपप्रकार सुद्धा आहेत.

1. शब्दालंकार:- हे अलंकार शब्दाच्या चमत्कृतीजनक रचनेमुळे निर्माण होतात. शब्दालंकार एकूण ३ आहेत :-

 1. अनुप्रास
 2. यमक
 3. श्लेष

(टीप : श्लेष हा अलंकार शब्दालंकार व अर्थालंकार या दोन्ही प्रकारात मोडतो.)

2. अर्थालंकार :- हे अलंकार शब्दातून व्यक्त होणाऱ्या अर्थावर आधारित असतात. अर्थालंकार एकूण 22 आहेत. उदा. उपमा, उत्प्रेक्षा, रुपक, अपन्हुती, व्यतिरेक इ.

अर्थालंकारातील काही महत्त्वाच्या संकल्पना :-

1.उपमेय :- ज्याची तुलना करायची आहे ते म्हणजे उपमेय होय.

2. उपमान :- ज्याच्याशी तुलना करायची आहे ते म्हणजे उपमान होय. किंवा ज्याची उपमा दिली जाते तो घटक म्हणजे उपमान होय.

उदा. हा आंबा साखरेसारखा गोड आहे. यात आंबा हे उपमेय आहे, तर साखर हे उपमान आहे.

Read More:- Vakprachar In Marathi PDF Download | मराठी वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ संपूर्ण माहिती जाणून घ्या

1. शब्दालंकार | Shabdalankar | Alankar In Marathi

जेव्हा विशिष्ट शब्द रचने मुळे साहित्य रचनेला (गद्य किंवा पद्म) ला अधिक सौंदर्य प्राप्त होते शब्दालंकार असे म्हणतात .

या शब्दालंकार चे परत पुढे ३ उपप्रकार आहेत.

A) अनुप्रास अलंकार | Anupras Alankar | Alankar In Marathi

व्याख्या:-

 • जेव्हा एखाद्या साहित्य रचने मध्ये एकाच शब्दाची पुनरावर्ती होते त्यास अनुप्रास अलंकार असे म्हणतात.
 • या अलंकारांचा उपयोग सगल्यात जास्त कविता पद्य मध्ये केला जातो.

उदाहरणार्थ :-

1.गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले I शीतलतनु चपलचरण अनिल गण निघाले.

2. आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझा घरी

या उदाहरणामध्ये तुम्ही पाहू शकता हरी घरी मध्ये री ची पुनरावृत्ती झाली आहे जी गाण्याला शोभा आणते.

B) यमक अलंकार | Yamak Alankar | Alankar In Marathi

व्याख्या:-

 • यमक अलंकार मध्ये कवितेच्या चरणाच्या शेवटी ठरलेल्या जागी मध्ये किंवा एक किंवा त्यापेक्षा जास्त अक्षरे दुसऱ्या चरणात त्याच क्रमाने परंतु वेगळ्या अर्थाने वापरली कि यमक अलंकार होतो.
 • यमक अलंकार सुद्धा कविते मध्ये सगळ्यात जास्त वापरले जातात .

उदाहरणार्थ :-

मना चंदनाचे परी त्वा झिजावे |
परी अंतरी सज्जना नीववावे ||
या वैभवाला तुझ्या पाहुनिया, मला स्फूर्ति नृत्यार्थ होते जरी |
सामर्थ्य नामी तुझ्या जन्मभूमी, तसे पहिले मी न कोठे तरी |

या उदाहरणामध्ये झिजावे नीववावे तसेच जरी री हे शब्द शेवटी त्याच क्रमाने वेगळ्या अर्थाने आले आहेत ज्या मुले यमक अलंकार तयार झाला आहे.

C) श्लेष अलंकार | Shlesh Alankar

व्याख्या:-

 • श्लेष अलंकारामध्ये एकाच शब्द वाक्यात दोन अर्थानी वापरला जातो आणि त्या मधून चमत्कृती साधली जाते.

उदाहरणार्थ :-

मित्राच्या उदयाने सर्वानाच आनंद होतो.

हे मेघा, तू सर्वाना जीवन देतोस

या वाक्यामध्ये जीवन हा शब्द पाणी आणि आयुष्य या 2 अर्थानी आला आहे. तसेच मित्र हा शब्द सखा तसेच सूर्य या अर्थानी आला आहे.

Read More:- Vakprachar In Marathi PDF Download | मराठी वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ संपूर्ण माहिती जाणून घ्या

2. अर्थालंकार | Arthalankar | Alankar In Marathi

व्याख्या:- जेव्हा एका विशिष्ट शब्दरचने मुळे वाक्याला अर्थपूर्ण सौंदर्य प्राप्त होते शोभा येते तेव्हा त्याला अर्थालंकार असे म्हणतात.

अर्थालंकाराचे एकूण 22 प्रकार आहेत.

 1. उपमा अलंकार
 2. रूपक अलंकार 
 3. अतिशयोक्ती
 4. स्वभावोक्ती अलंकार
 5. अन्योक्ती अलंकार
 6. उत्प्रेक्षा अलंकार
 7. अपन्हुती अलंकार
 8. अनन्वय अलंकार,
 9. व्यतिरेक अलंकार,
 10. अर्थान्तरन्यास अलंकार,
 11. चेतन गुणोक्ती अलंकार,
 12. दृष्टांत अलंकार
 13. सार अलंकार 
 14. व्याजोक्ती अलंकार
 15. व्याजस्तुती अलंकार
 16. असंगती अलंकार,
 17. ससंदेह अलंकार,
 18. विभावना अलंकार,
 19. विरोधाभास अलंकार,
 20. भ्रांतीमान अलंकार.
 21. विशेषोक्ती अलंकार,
 22. पर्यायोक्ती अलंकार.

Read More:- MPSC Information In Marathi PDF Download | MPSC बद्दल ची संपूर्ण माहीती जाणून घ्या मराठी माहिती

अर्थालंकार महत्वाची माहिती

उपमानज्याच्याशी कवी एखाद्या गोष्टीची तुलना करतो ती गोष्ट. म्हणजेच चंद्र
उपमेय ज्याची कवी तुलना करतो तो म्हणजेच मुख
साधर्म्य दोन गोष्टीतील सारखेपणा चंद्र आणि मुख
साम्यवाचक शब्द (साधर्म्यसूचक’शब्द) दोन गोष्टीतील सारखेपणा दाखविणारा शब्द म्हणजेच सारखे 
उदाहरण मुख कमलासारखे सुंदर आहे

1. उपमा अलंकार

व्याख्या:-

 • उपमा अलंकारामध्ये उपमेय हे उपमानासारखेच आहे असे दाखवले जाते.
 • म्हणजेच वाक्यामध्ये ज्या वस्तू बाबत बोलले जाते तीच आणि दुसऱ्या गोष्टींचं तुलना करून साम्य दर्शवले जाते.
 • या मध्ये साम्य दर्शवण्यासाठी सम, समान, सारखे, वाणी, जसे, तसे, प्रमाण, सदृश, परी, तुल्य  असे साम्यवाचक शब्द वापरले जातात.

उदाहरणार्थ :-

 सावळाच रंग तुझा पावसाळि नभापरी

आभाळागत माया तुझी आम्हांवरी राहू दे

दिलेल्या उदाहरणामध्ये सावल्या रंगाचं साधर्म्य पावसाळी नाभाभारोबर केले आहे तसेच मायेचं ची तुलना आभाळाएवढी केली आहे.

2. रूपक अलंकार 

व्याख्या:-

 • रूपक अलंकारामध्ये उपमय हे उपमान आहे ते वेगळे नाही असे वर्णन केले जाते .

उदाहरणार्थ :

बाई काय सांगो। स्वामींची ती दृष्टी । अमृताची वृष्टी । मज होय ॥

देह देवाचे मंदिर आत्मा परमेश्वर

या उदाहरणामध्ये स्वामींची दृष्टी जणू काही अमृतच म्हणजे उपमय आणि उपमान एकरूप असल्याचं दर्शवला आहे.

Read More:- Jodakshar In Marathi PDF Download | जोडाक्षरे आणि त्याची संपूर्ण माहिती जाणून घ्या

3. अतिशयोक्ती अलंकार

व्याख्या:-

 • अतिशयोक्ती अलंकारामध्ये असलेली गोष्ट आहे त्या पेक्षा जास्त फुगवून सांगितली जाते .
 • जास्त चढवून सांगितल्या मुळे वाक्यात मनोरंजकता तयार होते

उदाहरणार्थ :

 1. जो अंबरी उफळता खुर लागलाहे…
 2. मुंगी उडाली आकाशी। तीने गिळले सूर्याशी 

वरील दोन्ही उदाहरणामध्ये अशक्य अशा गोष्टी जास्त फुगून सांगितल्या आहेत.

4. स्वभावोक्ती अलंकार

व्याख्या:-

 • या अलंकारामध्ये एखाद्या व्यक्तीचे, वस्तूचे, स्थळाचे कृतीचे जसेच्या तसे पण वैशिष्टपूर्ण वर्णन केले जाते .

उदाहरणार्थ : –

 1. गणपत वाणी विडी पिताना….चावायची नुसतीच कडी अन म्हणायचा मनाशीच की या जागेवर बांधीन माडी.
 2. मातीत ते पसरले अतिरम्य पंख ।
 • केले वरी उदर पांडुर निष्कलंक । ।
 • चंचू तशीच उघडी पद लांबविले ।
 • निष्प्राण देह पडला श्रमही निमाले । ।

या उदाहरणमध्ये गणपत वाणी चा स्वभाव विशेष गुण रेखाटले गेले आहेत.

5. अन्योक्ती अलंकार

व्याख्या:-

 • अन्योक्ती अलंकार मध्ये आपल्या ला एवढ्या व्यक्तीला बोलायचे असते पण त्याला सरळ ना बोलता त्या व्यक्तीविषयी दुसऱ्याला उद्देशून बोलून बोलणारा आपले मनोगत व्यक्त करतो.
 • म्हणजे सरळ त्या व्यक्ती ला ना बोलता मार्मिकपणे त्याला उद्देशून बोलणे.

उदाहरणार्थ :-

 1. येथे समस्थ बहीरे बसतात लोक । का भाषणे मधुर तू करशी अनेक II
 2. सरड्याची धाव कुंपणापर्यंत.

या उदाहरणमध्ये व्यक्ती हा समोरच्याला बोलत आहे पण सरळ त्याचा उल्लेख ना करता सरडा म्हणून केली आहे.

6. उत्प्रेक्षा अलंकार

व्याख्या:-

उपमेय हे जणू काही उपमानच आहे अशी कल्पना केलेली असते.अशी कल्पना जेव्हा वाक्यात होते तेव्हा त्या अलंकारास ‘उत्प्रेक्षा अलंकार’ असे म्हणतात.

उदाहरणार्थ :-

 1. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू.
 2. बलाकमाला उडता भासे कल्प सुमनांची माळची ते

ह्या उदाहरणामध्ये जणू, वाटे, गमे, भासे हे सर्व शब्द उत्प्रेक्षा अलंकारात मध्ये येतात.

Read More:- All Marathi Mhani With Meaning List PDF Download । मराठीतील सर्व म्हणी आणि त्यांचा अर्थ संपूर्ण माहिती जाणून घ्या

7. अपन्हुती अलंकार

व्याख्या:- या अपन्हुती अलंकार मध्ये उपमेयाचा विरोध करून ते उपमानच आहे असे वर्णन अपन्हुती अलंकारा मध्ये करतात.

उदाहरणार्थ :- हे हृदय नसे परी स्थंडिल धगधगलेले ।।

ह्या उदाहरणातील पहिल्या चरणात नकारदर्शक शब्द किंवा प्रश्नचिन्ह असते.

8. व्यतिरेक अलंकार

व्याख्या:- व्यतिरेक उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखविले जाते तेव्हा त्याला व्यतिरेक अलंकार असे म्हणतात.

उदाहरणार्थ :- १) अमृताहूनी गोड । नाम तुझे देवा ।। २) सांज खुले, सोन्याहून पिवळे हे ऊन पडे।

ह्या उदाहरणामध्ये हून, हूनी हे शब्द व्यतिरेक अलंकार दर्शवतात.

9. अनन्वय अलंकार

व्याख्या:- जेव्हा उपमेयाला दुसरी कशाचीच उपमा देता येत नाही. तेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते. तेव्हा अनन्वय अलंकार म्हणतात.

उदाहरणार्थ :-

 1. आहे ताजमहाल एक जगती तो तोच त्याच्या परी।
 2. झाले बहु, होतिल बहु, आहेतही बहु, परंतु यासम हा ।

वरील दिलेल्या दोन्ही उदाहरणामध्ये लक्षात येते की उपमान आणि उपमेय एक आणि एकच आहे. त्यांची कोणाशीही तुलना न करता त्याची स्वतःच तुलना केली आहे.

10. ससंदेह अलंकार

व्याख्या:- उपमेय कोणते व उपमान कोणते असा संभ्रम निर्माण होवून मनाची द्विधा अवस्था होते तेव्हा त्यास ससंदेह अलंकार असे म्हणतात.

उदाहरणार्थ :-

 1. कोणता मानू चंद्रमा ? भूवरीचा की नभीचा?
 2. काळोखातच पाय पडे, दोरखंड की सर्प पुढे?

वर दिलेल्या उदाहरणांमध्ये कोणता मानू चंद्रमा ? भूवरीचा की नभीचा? हे स्पष्ट न समजता 2 पैकी १ उपमान आणि १ उपमेय आहे.वरील दिलेल्या वाक्यामध्ये संभ्रम निर्माण झाला त्या मुळे हे हे वाक्य ससंदेह अलंकार मध्ये आले.

Read More:- 250+ Jod Shabd In Marathi PDF Download | जोड शब्द म्हणजे काय आणि त्याची संपूर्ण माहीती जाणून घ्या

11. भ्रांतीमान अलंकार

व्याख्या:- जेव्हा उपमानाच्या जागी उपमेय आहे असा भ्रम तयार होवून त्यानुसार कृती घडते तेव्हा भ्रांतीमान अलंकार तयार होतो.

उदाहरणार्थ :-

 1. पलाशपुष्प मानोनि शूकचंचू मध्ये अली तोही जांभूळ मानोनी त्यास चोचीमध्ये धरी
 2. काळोखात दोरीलाच साप समजणे.

वरील उदाहरणामध्ये काळोखात दोरीलाच साप समजले त्या मुले उपमानाच्या जागी उपमेय आहे असा भ्रम तयार झाला म्हणून हे वाक्य भ्रांतीमान अलंकार मध्ये तयार झाले.

12. दृष्टांत अलंकार

व्याख्या:- एखादा विषय पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा दाखला देण्याला दृष्टांत अलंकार असे म्हणतात.

उदाहरणार्थ :-

 1. लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा….
 2. नीचपणा बरवे देवा । न चले कोणाचाही हेवा ।। महापुरे झाडे जाती । तेथे लव्हाळे वाचती ।।

वर दिलेल्या उदाहरणामध्ये नीचपणा कसा चांगला असतो हे पटवून देताना कोणाचाही हेवा नसावा हे उदाहरण देऊन नीचपणाचे श्रेष्ठत्व सांगितले आहे. त्यामुळे हे वाक्य दृष्टांत अलंकारा मध्ये तयार झाले आहे.

13. अर्थांतरन्यास अलंकार

व्याख्या:- एखाद्या विशिष्ट गोष्टीवर सर्वसामान्य सिद्धांत सांगितला जातो तेव्हा अर्थांतरन्यास अलंकार असे म्हणतात.

उदाहरणार्थ :-

 1. बोध खलास न रुचे अहिमुखी दुग्ध होय गरल । श्वानपुच्छ नलिकेत घातले होईना सरळ।।
 2. एका हाती कधीतरी मुली वाजते काय टाळी ?

Read More:- Marathi Mahine PDF Download | 12 Marathi Months Name | मराठी माहिण्याची नावे, दिवस आणि माहिती संपूर्ण माहिती

14. विरोधाभास (विरोध) अलंकार

व्याख्या:- वरवर दिसायला विरोध आहे असे वाटते पण तसा तो नसतो. तेव्हा त्या त्याला विरोधाभास (विरोध) अलंकार असे म्हणतात. (दोन विरुद्ध अर्थाचे शब्द एकाच वाक्यात येतात)

उदाहरणार्थ :-

 1. जरी आंधळी मी तुला पाहते.
 2. वियोगार्थ मिलन होते. नेम हा जगाचा
 3. मऊ मेणाहून आम्ही विष्णूदास । कठीण वज्राहुनी भेदू ऐसे ।
 4. जो पडेल तोच चढेल.

वर दिलेल्या उदाहरणामध्ये आंधळी पाहते हा विरोधाभास तयार झाला. त्यामुळे हे वाक्य विरोधाभास (विरोध) अलंकार मध्ये तयार झाले आहे.

15. सार अलंकार

व्याख्या:- कल्पना चढत्या क्रमाने मांडणे किंवा उतरत्या क्रमाने मांडणे तेव्हा त्याला सार अलंकार असे म्हणतात.

उदाहरणार्थ :-

 • विद्येविना मती गेली । मती विना निती गेली। नितीविना गती गेली । …

16. चेतनगुणोक्ती अलंकार | Alankar In Marathi

व्याख्या:- निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहेत अशी कल्पना करणे तेव्हा त्याला चेतनगुणोक्ती अलंकार असे म्हणतात.

उदाहरणार्थ :-

 • चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी, काही केल्या फुलेना ।।

या वरील उदाहरणा मध्ये चाफा हे फूल आहे कवी ने त्या निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहेत अशी कल्पना देतांना चाफा चालेना, चाफा खंत करी, काही केल्या फुलेना असे म्हंटले आहे. त्या मुळे हे वाक्य चेतनगुणोक्ती अलंकार तयार झाले आहे.

Read More:- Alankarik Shabd In Marathi PDF Download | अलंकारिक शब्द आणि त्याचे अर्थ संपूर्ण माहिती

17. पर्यायोक्ती अलंकार

व्याख्या:- एखादी गोष्ट सरळ न सांगता आडवळणाने सांगते तेव्हा त्यास पर्यायोक्ती अलंकार असे म्हणतात.

उदाहरणार्थ :- सद्या तो सरकारचा पाहुणचार घेत आहे. (तुरुंगात आहे.)

या वरील उदाहरणा मध्ये सद्या तो सरकारचा पाहुणचार घेत आहे. (तुरुंगात आहे.) हे वाक्य सरळ न सांगता आडवळणाने सांगितले आहे. त्या मुळे हे वाक्य पर्यायोक्ती अलंकार मध्ये तयार झाले आहे.

18. व्याजोक्ती अलंकार

व्याख्या:- खरे कारण लपवुन दुसरेच कारण देणे. तेव्हा त्याला व्याजोक्ती अलंकार असे म्हणतात.

उदाहरणार्थ :- येता क्षण वियोगाचा पाणी नेत्रामध्ये दिसे । ‘डोळ्यात काय गेले हे?’ म्हणूनी नयन पुसे ।

या वरील उदाहरणा मध्ये कवी ने डोळ्यामध्ये पाणी का आले आहे. ह्याचे खरे कारण लपवुन दुसरेच कारण दिले आहे. त्या मुळे हे वाक्य व्याजोक्ती अलंकार मध्ये तयार झाले आहे.

19. व्याजस्तुती अलंकार | Alankar In Marathi

व्याख्या:- वर वर स्तुती पण आतुन निंदा किंवा वरवर निंदा पण आतुन स्तुती तेव्हा व्याजस्तुती अलंकार असे म्हणतात.

उदाहरणार्थ :-

 1. केवढा उदार रे तू!
 2. होती वदनचंद्राच्या दर्शनाचीच आस ती। अर्धचंद्रच तू द्यावा, कृपा याहून कोणती?

या वरील उदाहरणा च्या व्याक्यामध्ये काही प्रमाणात स्तुती तर काही प्रमाणात निदा झाल्यासारखी वाटते म्हणून हे उदाहरण व्याजस्तुती अलंकारा मध्ये तयार झाले आहे.

Read More:- Shabdanchya Jati PDF Download | मराठी व्याकरण | शब्दांच्या जातीं आणि त्यांचे प्रकारांची संपूर्ण माहिती

20. असंगती अलंकार

व्याख्या:- जेव्हा वाक्यात कारण एका ठिकाणी आणि त्याचे कार्य दुसऱ्या ठिकाणी तेव्हा त्यास असंगती अलंकार असे म्हणतात.

उदाहरणार्थ :- गुलाब माझ्या हृदयी फुलला। रंग तुझ्या गालावर खुलला

या वरील उदाहरणा मध्ये गुलाब हा एकाच्या हृदयाशी फुललेला असताना मात्र त्याचा रंग हा दुसऱ्याच्याच गालावर उमटलेला दिसतो आहे. म्हणून हे वाक्य असंगती अलंकारामध्ये तयार झाले आहे.

21. विशेषोक्ती अलंकार

व्याख्या:- एखादे कार्य घडण्यासाठी आवश्यक ते कारण उपलब्ध असूनही कार्य घडत नाही असे वर्णन जेथे होते तेव्हा त्यास ‘विशेषोक्ती अलंकार’ असे म्हणतात.

उदाहरणार्थ :- अहो नयन चांगले असूनही दिसे ना मला मुका नसूनही तोतरा सहज बोलवेना मला.

या वरील उदाहरणा मध्ये डोळे चांगले असताना गोष्टी बघण्याच्या बाकी राहिलेल्या आहेत. मुका नसतांना तोतरा झाल्याचे जाणवते म्हणून हे वाक्य विशेषोक्ती अलंकारा मध्ये तयार झाले आहे.

22. विभावना अलंकार | Alankar In Marathi

व्याख्या:- जेव्हा योग्य कारणा वाचून कर्त्याची जन्म/उत्पत्ती झाली असे दिसते किंवा असे वर्णन केले जाते तेव्हा त्यास ‘विभावना अलंकार’ असे म्हणतात.

उदाहरणार्थ :- न ताप निवला, तृष्णा न शमली, रजे माखले शरीर, अजुनी नसे कमळ एकही चाखले.

या वरील उदाहरणा मध्ये वेगवेगळ्या वर्णानातून किंवा कारणातून कर्त्याची भूमिका उत्पत्ती झाली आहे. म्हणून हे वाक्य विभावना अलंकार मध्ये तयार झाले आहे.

Read More:- Aupcharik Patra Format And Example | औपचारिक पत्र प्रारूप और उदाहरण

Alankar In Marathi PDF Download

Alankar In Marathi PDF Download :- आपण ह्या आर्टिकल मध्ये अलंकार त्याचे प्रकार आणि त्याचे उदाहरणे ची संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. अनेक विद्यार्थ्याना अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यांच्यासाठी आम्ही विद्यार्थ्याना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही PDF Download करण्यासाठी PDF देत आहोत. तुम्ही अलंकार त्याचे प्रकार आणि त्याचे उदाहरणे आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

Conclusion Of Alankar In Marathi

आपण या पोस्ट मध्ये आपण अलंकार त्याचे प्रकार आणि त्याचे उदाहरणे ची संपूर्ण माहिती सविस्तर पहिली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण alankar in marathi, alankar in marathi grammar, utpreksha alankar in marathi examples, rupak alankar in marathi हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना उपयुक्त ठरेल.

FAQ Frequently Asked Questions For Alankar In Marathi

Q1. अलंकाराचे प्रकार किती व कोणते?

Ans:- अलंकारांचे मुख्य 2 प्रकार शब्दालंकार आणि अर्थालंकार आहेत हे प्रकार भाषेच्या गुणधर्म मुळे तयार होतात. तसेच मुख्य अलंकारमध्ये परत उपप्रकार सुद्धा आहेत.

Q2. अर्थ अलंकार म्हणजे काय?

Ans:- जेव्हा एका विशिष्ट शब्दरचने मुळे वाक्याला अर्थपूर्ण सौंदर्य प्राप्त होते/शोभा येते तेव्हा त्याला अर्थालंकार असे म्हणतात.

Q3. उपमेय आणि उपमान म्हणजे काय?

Ans:- उपमेय म्हणजे ज्याच्याशी कवी एखाद्या गोष्टीची तुलना करतो ती गोष्ट होय. उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची आहे ते म्हणजे उपमान होय. किंवा ज्याची उपमा दिली जाते तो घटक म्हणजे उपमान होय. उदा. हा आंबा साखरेसारखा गोड आहे. यात आंबा हे उपमेय आहे, तर साखर हे उपमान आहे.

Q4. मराठीत एकूण किती अलंकार आहेत?

Ans:- मराठी मध्ये एकूण 6 शब्दालंकार आणि 61 अर्थालंकार असे एकूण 67अलंकार सांगितले आहे. पण महामहोपाध्याय पां. वा. काणे ह्यांच्या मते ही संख्या 115 आहे. सामन्यात 3 शब्दालंकार आणि 22 अर्थालंकार असे एकूण 25 अलंकार जास्त वापरत किंवा प्रचलित आहे.

Q5. अन्योक्ती अलंकार म्हणजे काय?

Ans:- अन्योक्ती अलंकार म्हणजे आपल्या ला एवढ्या व्यक्तीला बोलायचे असते पण त्याला सरळ ना बोलता त्या व्यक्तीविषयी दुसऱ्याला उद्देशून बोलून बोलणारा आपले मनोगत व्यक्त करणे. म्हणजेच सरळ त्या व्यक्ती ला ना बोलता मार्मिकपणे त्याला उद्देशू बोलणे होय.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages