Advertisement

प्रयोग व त्याचे प्रकार मराठी व्याकरण ची संपूर्ण माहीती जाणून घ्या | Voice And It’s Types In Marathi

Voice And It's Types In Marathi

Voice And It’s Types In Marathi:- Experiments and its Types in Marathi Grammar- Experiments in Marathi Grammar means Voice in English. In exams like MPSC, baking exams, and teacher recruitment, questions are asked based on experiments and their types, also in school exams, there will be questions on this for 1 to 2 marks. Extended information about Voice And Its Types In Marathi.

Voice And It’s Types In Marathi | Prayog in marathi

Voice And It’s Types In Marathi:- प्रयोग व त्याचे प्रकार मराठी व्याकरण-मराठी व्याक्रणामधील प्रयोग म्हणजेच इंग्लिश मध्ये Voice असे म्हंटले जाते. MPSC,बेकिंग परीक्षा ,शिक्षक भरती अशा परीक्षांमध्ये प्रयोग आणि त्यांचे प्रकार या यावर आधारित प्रश्न विचारले जातात,तसेच शालेय परीक्षा मध्ये सुद्धा ह्यावर १ ते २ गुणांसाठी प्रश्न येऊ अशक्तता याची तयारी करण्यासाठी आजच्या या विडिओ मध्ये आपण पाहुयात प्रयोग व त्याचे प्रकार मराठी व्याकरण | Voice And It’s Types In Marathi या बद्दल विस्तारित माहिती.

प्रयोग म्हणजे काय ? | What Is Pryog In Marathi

  • प्रयोग म्हणजेच कर्त्यांची किंवा कर्माची क्रियापदाशी होणारी जुळणी , ठेवणं किंवा रचना होय .
  • म्हणजेच वाक्यात कर्ता व कर्म यांचे लिंग वचन व पुरुष याना अनुसरून जी व्यवस्था असते त्याला प्रयोग असे म्हणतात .
  • या मध्ये कर्ता म्हणजेच वाक्यामध्ये दाखवलेली क्रिया करणारा
  • आणि हि क्रिया ज्यावर घडते त्यास कर्म असे म्हणतात.

Read More:- Samas In Marathi PDF Download | समास व त्याचे प्रकार ह्यांची संपूर्ण माहिती जाणून घेऊया

प्रयोग चे प्रकार | Types Of Prayog In Marathi

प्रयोग चे एकूण ४ प्रमुख प्रकार आहेत. त्याची माहिती आपण खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.

  1. कर्तरी प्रयोग
  2. कर्मणी प्रयोग
  3. भावे प्रयोग
  4. मिश्र किंवा संकर प्रयोग

1. कर्तरी प्रयोग | Voice And It’s Types In Marathi

  • कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याच्या लिंग , वचन व पुरुषानुसार क्रियापद बदलते तेव्हा कर्तरी प्रयोग होतो .
  • कर्तरी प्रयोग हा नेहमी प्रथमा विभक्ती मध्ये असतो म्हणजेच कर्त्याला कोणताही विभक्ती प्रत्येय नसतो .
  • याचवेळी वाक्यामध्ये कर्ता नसेल तर कर्तरी प्रयोग होत नाही .
  • याचवेळी कर्तरी प्रयोगाचे २ प्रकार आहेत .(अ) सकर्मक कर्तरी प्रयोग आणि (ब) अकर्मक कर्तरी प्रयोग

Read More:- शब्दसिद्धी व त्याच्या प्रकारांची संपूर्ण सविस्तर माहिती | Shabsiddhi And Their Types PDF

उदाहरणार्थ :-

मूळ वाक्य :- राम पुस्तक वाचतो .

१) गीता पुस्तक वाचते (कर्त्याच्या लिंगानुसार बदल)

२) मुले पुस्तक वाचतात (कर्त्याचे वचन बदल)

३) तू पुस्तक वाचतोस (कर्त्याचा पुरुष बदल )

कर्ता कर्म क्रियापद
राम (तो)पुस्तक वाचतो
गीता (ती)पुस्तक वाचते
मुले (ते)पुस्तक वाचतात
तू (तु)पुस्तक वाचतोस

Read More:- Kriyapad In Marathi PDF Download | क्रियापद, त्यांचे प्रकार आणि त्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

1. सकर्मक कर्तरी प्रयोग

  • सकर्मक कर्तरी प्रयोग मध्ये कर्म असते.

उदाहरणार्थ :-

  • राम आंबा खातो.
  • माधव क्रिकेट खेळतो.
  • लोक मला नेहमीच आंबे देतात.

Read More:- Dvandva Samas In Marathi PDF Download | द्वंद समास आणि त्याचे प्रकारांची संपूर्ण माहीती जाणून घ्या

2. अकर्मक कर्तरी प्रयोग

अकर्मक कर्तरी प्रयोग’ म्हणजे त्या मध्ये कर्म उपस्थित नसते.

उदाहरणार्थ :-

  • राम घरी जातो.
  • सारे पोपट उडाले.
  • प्रत्येक कुत्रा स्वभावाने प्रामाणिक असतो.

Read More:- MPSC Exam Information In Marathi | MPSC एक्झॅम ची संपूर्ण माहिती सविस्तर मध्ये जाणून घ्या

2. कर्मणी प्रयोग | Voice And It’s Types In Marathi

कर्मणी प्रयोग मध्ये क्रियापद हे कर्माचे लिंगावचं पुरुषाप्रमाणे बदलते. कर्माच्या लिंग व वाचन यानुसार क्रियापद बदलते तेव्हा कर्मणी प्रयोग होतो. या प्रयोग प्रकारामध्ये कर्ता नेहमी तृतीयेचा अथवा चतुर्थीचा असतो त्याचवेळी कर्म नेहमी प्रथमच असते. तसेच वाक्यात कर्म असल्या शिवाय हा प्रयोग होऊ शकत नाही.

कर्मणी प्रयोगाचे एकूण 5 प्रकार आहेत. त्याची माहिती खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.

  1. प्रधान कर्तुक कर्मणी
  2. शक्य कर्मण
  3. प्राचीन किंवा पुराण कर्मणी,
  4. समापन कर्मणी
  5. कर्म कर्तरी किवा नवीन कर्मणी

उदाहरणार्थ :-

  • श्यामने पुस्तक वाचले.
  • श्यामने पोथी वाचली.
  • श्यामने पुस्तके वाचली.
  • मुलाने खडू फेकला.

Read More:- Success Suvichar Marathi | यश आणि अपयशाचे मराठी सुविचार तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी

1. प्रधान कर्तुक कर्मणी

  • या प्रयोग प्रकारामध्ये कर्ता हा प्रधान किंवा महत्वाचा असतो तसेच क्रियापद कर्माच्या लिंगवाचनानुसार बदलत असते .

उदाहरणार्थ : –

  • रामने काम केले.
  • माधुरीने नृत्य केले.

2. शक्य कर्मणी 

ज्या वाक्यामध्ये क्रियापदाच्या शक्यता सुचवलेली असते तेव्हा शक्य कर्मणी प्रयोग’ होतो. म्हणजेच या कर्मणी प्रयोगामध्ये क्रियेची शक्यता दर्शवलेली असते.

उदाहरणार्थ :-

  • त्यांना खारीक चाववते.
  • मला जिना चढवतो.
  • रामच्याने काम करवते.

3. प्राचीन कर्मणी

या कर्मणी प्रयोगात क्रियापदाची पुर्वीची (प्राचीन) कीजे, करिजे, देखिजे, म्हणीजेलो, बोलिजेलें इ. रुपे दिसून येतात.

उदा.

  • त्वां काय कर्म करिजे लघु लेकराने.
  • नळे इंद्रासी ऐसे बोलीलेजे.

4. समापन कर्मणी

या कर्मणी प्रयोगात कर्ता षष्ठी विभक्तीत असतो व संयुक्त क्रियापद असते. संयुक्त क्रियापदामध्ये लिहून झाला, वाचून झाली, देवून झाली, खाऊन झाला, पिऊन झाला, अशाप्रकारची रचना असते. (यामध्ये अनुक्रमे लिहणे, वाचणे, देणे, खाणे, पिणे ही क्रियापदे मानून कर्ता-कर्म शोधावे. अन्यथा उत्तर चुकू शकते.)
उदा. १) त्याचे पुस्तक वाचून झाले. (वाचणारा कोण ‘त्याचे’ हा कर्ता)

5. नवीन कर्मणी ( कर्म कर्तरी)

नवीन कर्मणी (कर्म कर्तरी) हा प्रयोग इंग्रजीतून मराठीत (Active to Passive) आला आहे. या कर्मणी प्रयोगात कर्त्याला ‘कडून’ हा प्रत्यय लावलेला असतो. किंवा काही वेळा वाक्यामध्ये कर्ता नसतो. (कर्ता वगळलेला असतो.)

उदा.

  • शिपायाकडून चोर पकडला गेला.
  • सभेत पत्रके वाटली गेली.

(पहिल्या उदाहरणात ‘पकडला’ हे क्रियापद मानावे. म्हणून पकडणारा कोण ? – ‘शिपाई’ या कर्त्याला ‘कडून’ हा प्रत्यय लागला आहे. दुसऱ्या उदाहरणात वाटली हे क्रियापद मानावे. म्हणून वाटणारा कोण ? या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. म्हणजेच या वाक्यात कर्ता नाही.)

3. भावे प्रयोग

जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग, वचन, पुरुषाप्रमाणे ते नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी, एकवचनी असे स्वतंत्र असते, तेव्हा ते वाक्य भावे प्रयोगाचे असते.

उदा. वडिलांनी बैलास मारले. यात कर्त्याचे किंवा कर्माचे लिंग, वचन बदलले तरी क्रियापद न बदलता ‘मारले’ असेच राहते. म्हणून हे वाक्य भावे प्रयोगाचे आहे.

भावेप्रयोग ओळखण्याची पध्दत :- भावे प्रयोगात कर्त्याला विभक्ती प्रत्यय असतो व कर्म असल्यास त्या लाही विभक्ती प्रत्यय असतो..

भावे प्रयोगाचे प्रकार :-

1. सकर्मक भावे प्रयोग :- यात कर्म उपस्थित असते.

उदा. कृष्णाने कंसाला मारले.

2. अकर्मक भावे प्रयोग :- यात कर्म उपस्थित नसते.

उदा. अ) त्याने आता घरी जावे. ब) सर्वांनी मनसोक्त हसावे. क) रामला घरी जाववते. ड) मुलांनी शाळेत यावे.

3. भावकर्तरी प्रयोग (अकर्तृक भावे) :- हा भावे प्रयोगाचाच एक प्रकार आहे. यामध्ये कर्ता नसतो व क्रियापद हे सांजावले, गडगडते, मळमळते, उजाडले, ढवळते इ. प्रकारचे असते.

उदा.

  • सहलीला जाताना साताऱ्याजवळ उजाडले.
  • त्याला घरी यायला ‘सांजावले.

4. मिश्र किंवा संकर प्रयोग

मराठीत प्रयोगाचे मुख्य प्रकार ३ आहेत पण काही वेळा एकाच वाक्यात दोन प्रयोगाचे मिश्रण आढळल्यास त्यास संकर प्रयोग म्हणतात. संकर प्रयोगाचे ३ उपप्रकार:-

1. कर्तृ – कर्म संकर प्रयोग

1. कर्तृ-कर्म संकर प्रयोग :- या प्रयोगात कर्ता नेहमी द्वितीय पुरुषी म्हणजेच ‘तू/तुम्ही’ असा असतो व कर्माला प्रत्यय नसतो. तसेच क्रियापदाच्या शेवटी स/त प्रत्यय असतो.

उदा.

  • अ) तुम्ही फार छान काम केलेत.
  • ब) तू मला पुस्तक दिलेस.

2. कर्तृ – भाव संकर प्रयोग

कर्तृ-भाव संकर प्रयोग या प्रयोगात कर्ता नेहमी द्वितीय पुरुषी म्हणजेच ‘तू/तुम्ही’ असा असतो व कर्म नसते किंवा असल्यास त्यास प्रत्यय असतो. तसेच क्रियापदाच्या शेवटी स/त प्रत्यय असतो.

उदा.

  1. तू त्याला नाटकाला न्यायचे होतेस.
  2. तू घरी जायचे होतेस.

3. कर्म- भाव संकर प्रयोग

या प्रयोगात कर्त्याला व कर्मालाही प्रत्यय असतो.

उदा.

  1. वडीलांनी मुलाला शाळेत घातले.
  2. नानामामांनी आपल्या मुलीला शाळेत घातली.

Read More:- Alankar In Marathi PDF Download | अलंकार त्याचे प्रकार आणि उदाहरण ह्याची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Conclusion of Voice And It’s Types In Marathi

Voice And Its Types In Marathi:- आपण ह्या आर्टिकल मध्ये प्रयोग आणि त्याचा प्रकरांची ची संपूर्ण माहिती सविस्तर पणे जाणून घेतली आहे. अनेक विद्यार्थ्याना अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यांच्यासाठी आम्ही विद्यार्थ्याना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही PDF Download करण्यासाठी PDF देत आहोत. तुम्ही Voice And Its Types In Marathi आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

FAQ Frequently Asked Questions For Voice And Its Types In Marathi

Q1. What is the active voice in Marathi?

Ans:- In Marathi, the active voice is called कर्तरी प्रयोग. It is a type of sentence in which the कर्ता, or the doer of the action, comes first in the sentence, followed by the क्रिया, or the verb, and then the कर्म, or the object of the verb. For example, the sentence “The cat catches the mouse” would be in the active voice in Marathi as मांजर उंदीर पकडते. In this sentence, the कर्ता is मांजर or the cat, the क्रिया is पकडते, or the verb “catches”, and the कर्म is उंदीर or the mouse.

Q2. What is mean by passive voice in Marathi?

Ans:- The passive voice in Marathi is called कर्मणी प्रयोग. It is a type of sentence in which the कर्म, or the object of the verb, comes first in the sentence, followed by the क्रिया, or the verb, and then the कर्ता, or the doer of the action. The कर्ता is usually in the ablative case.

Q4. कर्मनी प्रयोग म्हणजे काय?

Ans:- कर्मणी प्रयोग मध्ये क्रियापद हे कर्माचे लिंगावचं पुरुषाप्रमाणे बदलते. कर्माच्या लिंग व वाचन यानुसार क्रियापद बदलते तेव्हा कर्मणी प्रयोग होतो. या प्रयोग प्रकारामध्ये कर्ता नेहमी तृतीयेचा अथवा चतुर्थीचा असतो त्याचवेळी कर्म नेहमी प्रथमच असते. तसेच वाक्यात कर्म असल्या शिवाय हा प्रयोग होऊ शकत नाही.

Q5. मराठी व्याकरणातील प्रयोगाचे मुख्य प्रकार किती?

Ans:- प्रयोग चे एकूण ४ प्रमुख प्रकार आहेत. त्याची माहिती आपण खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग, मिश्र किंवा संकर प्रयोग

Q6. भावे प्रयोग म्हणजे काय?

Ans:- जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग, वचन, पुरुषाप्रमाणे ते नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी, एकवचनी असे स्वतंत्र असते, तेव्हा ते वाक्य भावे प्रयोगाचे असते.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages