Kriyapad In Marathi PDF Download:- Marathi grammar is a very important subject for students studying for competitive exams or other exams. While studying Marathi grammar, they have to study verbs. For them, we have brought detailed information about verbs and their types in this article.
Kriyapad In Marathi
Kriyapad In Marathi PDF Download:- स्पर्धा परीक्षेसाठी किंवा इतर परीक्षेसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मराठी व्याकरण हा त्यांच्या साठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. मराठी व्याकरणाचा अभ्यास करतांना त्या मध्ये त्यांना क्रियापदाचा अभ्यास करावा लागतो. त्यांचा साठी आम्ही ह्या आर्टिकल मध्ये क्रियापद आणि त्यांची प्रकारांची सविस्तर माहिती ह्या आर्टिकल मध्ये घेऊन आलो आहे.
Read More:- Dvandva Samas In Marathi PDF Download | द्वंद समास आणि त्याचे प्रकारांची संपूर्ण माहीती जाणून घ्या
मराठीत क्रियापद म्हणजे काय? | What Is Kriyapad In Marathi
मराठी व्याकरणा मध्ये वाक्यातील क्रिया दर्शविणाऱ्या ज्या विशिष्ट शब्दामुळे वाक्यामधील क्रिया दर्शविली जातो आणि त्या वाक्याचा अर्थ जेव्हा पूर्ण होतो तेव्हा त्या वाक्यातील अशा क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात.
उदाहरणार्थ.
- माणूस काम करतो.
- शाळेतील मुले देवाची प्रार्थना करता.
- लहान मुले खेळतात.
- आमच्या टीम ने बक्षीस जिंकले.
क्रियापद ही संज्ञा वेग वेगळ्या अर्थांनी वापरण्यात येते. मराठी व्याकरणरचनेच्या विविध प्रक्रिये मध्ये क्रियापद ह्या संज्ञेची वेग वेगळे लक्षणे दिलेली आढळतात. ह्यांपैकी काही लक्षणे लोकव्यवहारात मध्ये ही रुळलेली आहेत. एका प्रकारच्या व्याकरणाच्या नियमानुसार क्रियापद म्हणजे भाषेतील क्रियावाचक शब्द होय. “अक्षय खातो” यामध्ये खातो हे क्रियापद आहे. त्यामधील मूळ धातू खा हा आहे. मराठीमधील सर्व धातू ’णे’ लिहिण्याची पद्धत आहे, त्यामुळे खा हा धातू डिक्शनरी मध्ये खाणे असा दाखविला जातो.
कृदंते म्हणजे काय? | What is a Krudante ?
कृदंते/धातुसाधीते म्हणजे धातुला वेग वेगळे प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखविणाऱ्या शब्दांना ‘कृंदते’ किंवा ‘धातुसाधीत’ असे म्हणतात.
Read More:- MPSC Exam Information In Marathi | MPSC एक्झॅम ची संपूर्ण माहिती सविस्तर मध्ये जाणून घ्या
क्रियापदांचे प्रकार | Types Of Kriyapad In Marathi
क्रियापदाचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात 1) सकर्मक क्रियापद 2)अकर्मक क्रियापद. त्या मध्ये इतर ही प्रकारचे प्रकार पडतात त्याची माहिती आपण खालील प्रमाणे घेणार आहोत.
- सकर्मक क्रियापद
- अकर्मक क्रियापद
इतर प्रकार
- संयुक्त क्रियापद
- साहाय्यक क्रियापद
- द्विकर्मक क्रियापद
- उभयविध क्रियापद
- सिद्ध क्रियापद
ह्या प्रकारांची संपूर्ण माहिती ही आपण खालील प्रमाणे घेणार आहोत.
Read More:- Success Suvichar Marathi | यश आणि अपयशाचे मराठी सुविचार तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी
सकर्मक क्रियापद
मराठी व्याकरणा मध्ये ज्या वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी जेव्हा कर्माची गरज असते, त्या क्रियापदाला त्या वाक्यातील “सकर्मक क्रियापद” असे म्हणतात.
उदाहराणार्थ.
- म्हीस दूध देते.
- कोळी मासे पकडतो.
- श्याम आंबा खातो.
- अक्षय ग्रहपाठ लिहितो.
- आकाश लाडू खाते.
Read More:- Alankar In Marathi PDF Download | अलंकार त्याचे प्रकार आणि उदाहरण ह्याची संपूर्ण माहिती जाणून घ्या
अकर्मक क्रियापद
व्याकरणा मध्ये ज्या क्रियापदांचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्मांची आवश्यकता नसते तेव्हा त्याला “अकर्मक क्रियापद” असे म्हणतात.
उदाहराणार्थ.
- मी रस्त्यात पडलो.
- तो बसला.
- आज भाऊबीज आहे.
- तो दररोज शाळेत जातो.
जेव्हा क्रिया कोणावर होते व क्रिया करणारा/करणारी कोण असे प्रश्न विचारले असता दोन्ही प्रश्नांचे उत्तर हे एकच सारखीच मिळतात त्याला ‘अकर्मक क्रियापद’ असे म्हणतात.
Read More:- Vakprachar In Marathi PDF Download | मराठी वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ संपूर्ण माहिती जाणून घ्या
संयुक्त क्रियापद
सहाय्यक क्रियापद व धातुसाधीत यांनी मिळून बनलेल्या क्रियापदास ‘संयुक्त क्रियापद’ असे म्हणतात. मात्र या दोन्ही शब्दांमधून कोणत्याही एकच क्रियेचा बोध होणे आवश्यक आहे. ह्या मध्ये (धातुसाधीत+सहाय्यक क्रियापद= संयुक्त क्रियापद) असते.
उदा. शाळे मध्ये मुले येऊ लागली.
(येऊ=धातुसाधीत, लागली=सहाय्यक क्रियापद) एक नवीन पुस्तक घेऊन टाक (घेऊन=धातुसाधीत, टाक=सहाय्यक क्रियापद)
सहाय्यक क्रियापद ची माहिती आपण खालील प्रमाणे बघू या.
साहाय्यक क्रियापद
साहाय्यक क्रियापद मध्ये जेव्हा क्रियापद व धातुसाधीत हे दोन्ही मिळून एकाच वाक्यात क्रियेचा बोध होतो तेव्हा धातुसाधीताला मदत करणाऱ्यार क्रियापदाला ‘सहाय्यक क्रियापद’ असे म्हणतात.
उदा.
- क्रीडांगणावर मुले खेळू लागली.
- बाळ एवढा लाडू खाऊन टाक.
सिद्ध क्रियापद
सिद्ध क्रियापद मध्ये ऊठ, बस, जा, ये, कर, असे जे मूळचे धातू आहेत त्यांना सिद्ध धातू म्हणतात व या सिद्ध धातूंना प्रत्यय लागून तयार होणाऱ्या, क्रियापदाला ‘सिद्ध क्रियापद’ असे म्हणतात.
उदाहरणार्थ.
- तो दररोज जीमला जातो.
- ती खूप मेहनत करते.
- आम्ही रनिंग ला जातो.
द्विकर्मक क्रियापद
द्विकर्मक क्रियापद ज्या क्रियापदास दोन कर्म लागतात तेव्हा त्यास ‘व्दिकर्मक’ असे म्हणतात.
उदा.
- आईने मूलाला गोष्ट सांगितली.
(आई – कर्ता, मूलाला – अप्रत्यक्ष कर्म, गोष्ट- प्रत्यक्ष कर्म, सांगितले- व्दिकर्मक क्रियापद)
उभयविध क्रियापद
उभयविध क्रियापद मध्ये जेव्हा एकच क्रियापद हे दोन वेगवेगळ्या वाक्यामध्ये सकर्मक व अकर्मक अशे दोन्ही प्रकारे वापरता येते तेव्हा त्यास ‘उभयविध क्रियापद’ असे म्हणतात.
उदा. त्याने घराचा दारवाजा उघडले.
- (सकर्मक क्रियापद) त्यांच्या घराचे दार उघडले.
- (अकर्मक क्रियापद) रामाने रावणाला बाण मारले.
- (सकर्मक क्रियापद) ते लाकडी धनुष्य मोडले.
Read More:- MPSC Information In Marathi PDF Download | MPSC बद्दल ची संपूर्ण माहीती जाणून घ्या मराठी माहिती
प्रयोजक क्रियापदे
प्रयोजक क्रियापदे म्हणजे मूळ धातूच्या क्रियेचा कर्ता, ती क्रिया स्वतः करत नसून, ती क्रिया तो दुसऱ्या कोणाला तरी करण्यास लावत आहे, असा अर्थ व्यक्त होत असेल तर त्या क्रियापदाला ‘तेव्हा प्रयोजक क्रियापद‘ असे म्हणतात.
Kriyapad In Marathi PDF Download
Dvandva Samas In Marathi PDF Download:- आपण ह्या आर्टिकल मध्ये Dvandva Samas ची संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. अनेक विद्यार्थ्याना अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यांच्यासाठी आम्ही विद्यार्थ्याना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही PDF Download करण्यासाठी PDF देत आहोत. तुम्ही Dvandva Samas PDF आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.
Conclusion
आपण या पोस्ट मध्ये आपण Dvandva Samas ची संपूर्ण माहिती सविस्तर पहिली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण Dvandva Samas In Marathi, Dvandva Samas In Marathi Examples, Dvandva Samas Examples हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना उपयुक्त ठरेल.
FAQ Frequently Asked Questions For Kriyapad In Marathi
Ans:- मराठी व्याकरणा मध्ये वाक्यातील क्रिया दर्शविणाऱ्या ज्या विशिष्ट शब्दामुळे वाक्यामधील क्रिया दर्शविली जातो आणि त्या वाक्याचा अर्थ जेव्हा पूर्ण होतो तेव्हा त्या वाक्यातील अशा क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात.
Ans:- क्रियापदाचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात 1) सकर्मक क्रियापद 2)अकर्मक क्रियापद. त्या मध्ये संयुक्त क्रियापद, साहाय्यक क्रियापद, द्विकर्मक क्रियापद, उभयविध क्रियापद, सिद्ध क्रियापद हे इतर प्रकारचे क्रियापद आहेत.
Ans:- कृदंते/धातुसाधीते म्हणजे धातुला वेग वेगळे प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखविणाऱ्या शब्दांना ‘कृंदते’ किंवा ‘धातुसाधीत’ असे म्हणतात.
Ans:- प्रयोजक क्रियापदे म्हणजे मूळ धातूच्या क्रियेचा कर्ता, ती क्रिया स्वतः करत नसून, ती क्रिया तो दुसऱ्या कोणाला तरी करण्यास लावत आहे, असा अर्थ व्यक्त होत असेल तर त्या क्रियापदाला ‘तेव्हा प्रयोजक क्रियापद‘ असे म्हणतात.
Ans:- क्रियापदाचे ३ प्रकार हे सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद आणि संयुक्त क्रियापद हे आहे
Related Posts:
- Alankar In Marathi PDF Download | अलंकार त्याचे…
- Samas In Marathi PDF Download | समास व त्याचे प्रकार…
- प्रयोग व त्याचे प्रकार मराठी व्याकरण ची संपूर्ण…
- Marathi varnmala - मराठी वर्णमाला स्वरादी, स्वर आणि…
- Vitamin Chart in Marathi PDF Download | विटामीन ची…
- Sandhi In Marathi PDF Download | संधी आणि संधीचे…