Advertisement

Dvandva Samas In Marathi PDF Download | द्वंद समास आणि त्याचे प्रकारांची संपूर्ण माहीती जाणून घ्या

Dvandva Samas in Marathi pdf Download

Dvandva Samas In Marathi PDF Download:- Dvandva Samas In Marathi PDF Download:- In this post, we will learn about Dvandva Samas and its types, while there are many important topics in Marathi grammar, one of them is Samas and this Samas is a type of Dvandva Samas competitive exam as well as school exam MPSC, In many exams such as CATET exams there are questions based on this and due to lack of preparation you lose easy marks, in today’s post we will see detailed information about Dvandva Samas In Marathi.

Dvandva Samas In Marathi

ह्या Dvandva Samas In Marathi PDF Download:- द्वंद समास आणि त्याचे प्रकार या विषयी आपण या पोस्ट मध्ये जाणून घेऊयात तर मराठी व्याकरण मध्ये अनेक महतवाचे विषय आहेत त्या मधील एक आहे समास आणि ह्या समास चा एक प्रकार आहे द्वंद समास स्पर्धा परीक्षा तसेच शालेय परीक्षा MPSC ,कॅटेत परीक्षा अशा अनेक परीक्षा मध्ये या वर आधारीत प्रश्न असतोच आणि तयारी ना केल्याने सोपे गुण गमावून बसतो या साठीच आजच्या या पोस्ट मध्ये आपण Dvandva Samas In Marathi बद्दल विस्तारित माहिती पाहुयात.

Read More:- MPSC Exam Information In Marathi | MPSC एक्झॅम ची संपूर्ण माहिती सविस्तर मध्ये जाणून घ्या

समास म्हणजे काय ? | What Is Samas?

 • जेव्हा २ किंवा त्या पेक्षा जास्त शब्दांमध्ये संबंध दर्शवणारे प्रत्येय किंवा शब्द काढून त्याचा एकाच शब्द तयार होतो या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात.
 • त्याचवेळी या तयार झालेल्या जोड शब्दाला सामासिक शब्द असे म्हणतात .

उदाहरणार्थ :-

 • राजपुत्र -राजाचा पुत्र , राम व लक्ष्मण -राम लक्ष्मण , वनभोजन -वनातील भोजन

द्वंद्व समास म्हणजे काय ? | What Is Dwandva Samas?

 • द्वंद्व समास हा मराठी व्याकरणाचा समास चा एक प्रकार आहे.
 • ज्या समास मध्ये दोन्ही पद हे अर्थ च्या दृष्टीने प्रधान असतात त्यास द्वंद्व समास असे म्हणतात.
 • या समसला उभय [पद प्रधान समास असे सुद्धा म्हंटले जाते.
 • या समासाचा विग्रह करताना दोन पदांचा संबंध आणि ,व ,अथवा किंवा अशा उभयान्वयी अव्ययांनी स्पष्ट करावा लागतो.

Read More:- Success Suvichar Marathi | यश आणि अपयशाचे मराठी सुविचार तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी

द्वंद्व समास उदाहरणे | Dvandva Samas In Marathi Examples

सामासिक शब्द विग्रह
रामलक्ष्मण राम व लक्ष्मण
ताटवाटी ताट आणि वाटी
घरदार घर आणि दार
भाऊबहीण भाऊ आणि बहीण
न्यायअन्याय न्याय अथवा अन्याय (वा सुद्धा वापरले जाऊ शकते )
दक्षिणोत्तर दक्षिण आणि उत्तर
चहापाणी चहा आणि पाणी
तीनचार तीन किंवा चार
बरेवाईट बरे किंवा वाईट
नेआण ने आणि आन
मामामामी मामा व मामी
काकाकाकी काका व काकी
सत्यासत्य सत्य वा असत्य
भाजीपाला भाजी आणि इतर प्रकारच्या भाज्या
चूकभूल चूक अथवा भूल
भेदाभेद भेद अथवा अभेद

Read More:- Alankar In Marathi PDF Download | अलंकार त्याचे प्रकार आणि उदाहरण ह्याची संपूर्ण माहिती जाणून घ्या

द्वंद्व समासाचे प्रकार | Types Of Dwandva Samas

द्वंद्व समासाचे एकूण ३ प्रकार आहेत इतरेतर व्दंव्द समास, वैकल्पिक व्दंव्द समास,समहार व्दंव्द समास

अ) इतरेतर व्दंव्द समास

 • या प्रकारामध्ये विग्रह करताना आणि आणि व या शब्दांचा उपयोग करावा लागतो .
 • म्हणजेच आणि व अशा समुच्चय दर्शक उभयान्वयी अव्ययांचा वापर करून सामासिक शब्दांचा विग्रह केला जातो ,

उदाहरणार्थ :

सामासिक शब्द विग्रह (आणि व या शब्दांचा उपयोग )
काकाकाकी काका व काकी
कृष्णअर्जुन कृष्ण आणि अर्जुन
पतीपत्नी पती आणि पत्नी
हळदकुंकू हळद आणि कुंकू
डोंगरदऱ्या डोंगर आणि दर्या
हरिहर हरी आणि हर
आईवडील आई आणि वडील
मातापिता माता आणि पिता
भीमार्जुन भीम आणि अर्जुन
विटीदांडू विटी व दांडू
सासूसासरे सासू आणि सासरे
चराचर चार आणि आचार
पशुपक्षी पशु आणि पक्षी
एकवीस एक आणि वीस
कौरवपांडव कौरव आणि पांडव
बहीणभाऊ बहीण आणि भाऊ

Read More:- Vakprachar In Marathi PDF Download | मराठी वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ संपूर्ण माहिती जाणून घ्या

(ब) वैकल्पिक व्दंव्द समास

 • या समास प्रकारांमध्ये विग्रह करताना अथवा किंवा वा यांचा वापर केला जातो .
 • म्हणजेच अथवा किंवा वा हि वैकल्पिक उभयान्वयी अव्यय वापरली जातात म्हणजेच  ‘वैकल्पिक व्दंव्द समास होय .

उदाहरणार्थ :

सामासिक शब्द विग्रह (अथवा किंवा वा यांचा वापर)
न्यायान्याय न्याय अथवा अन्याय
बरेवाईट बरे अथवा वाईट
लहानमोठा लहान किंवा मोठा
चूकभूल चूक अथवा भूल
खरेखोटे खरे किंवा खोटे
दहापंधरा दहा किंवा पंधरा
पापपुण्य पाप अथवा पुण्य
कमीजास्त कमी किंवा जास्त
सत्यासत्य सत्य किंवा असत्य

Read More:- MPSC Information In Marathi PDF Download | MPSC बद्दल ची संपूर्ण माहीती जाणून घ्या मराठी माहिती

(क) समहार व्दंव्द समास

 • या सामासिक प्रकारांमध्ये शब्दांचा विग्रह करताना समासातील पदांशिवाय त्याच प्रकारच्या आणखी काही गोष्टींचा समावेश होतो .
 • म्हणजेच इतर जातींच्या पदार्थांचा समावेश केला जातो त्यास समहार व्दंव्द समास असे म्हणतात .

उदाहरणार्थ :

सामासिक शब्द विग्रह (समासातील पदांशिवाय त्याच प्रकारच्या आणखी काही गोष्टीं)
भाजीपाला भाजी आणि इतर तत्सम भाज्या
शेतीवाडी शेती वाडी व इतर सगळी सापंत्ति
अथंरूणापांघरून अंथरून पांघरून तसेच इतर कपडे
केरकचरा केर कचरा आणि इतर टाकाऊ पदार्थ
घरदार घर दार आणि इतर मालमत्ता
जीवजंतू जीव जंतू वगैरे
नदीनाले नदी नाले वगैरे
मीठमिरची मीठ मिरची व इतर स्वप्नांकामधील पदार्थ
चहापाणीचहा पाणी व इतर फराळ
पानसुपारी पण सुपारी आणि इतर पदार्थ

Read More:- Jodakshar In Marathi PDF Download | जोडाक्षरे आणि त्याची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Dvandva Samas In Marathi PDF Download

Dvandva Samas In Marathi PDF Download:- आपण ह्या आर्टिकल मध्ये Dvandva Samas ची संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. अनेक विद्यार्थ्याना अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यांच्यासाठी आम्ही विद्यार्थ्याना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही PDF Download करण्यासाठी PDF देत आहोत. तुम्ही Dvandva Samas PDF आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

Conclusion

आपण या पोस्ट मध्ये आपण Dvandva Samas ची संपूर्ण माहिती सविस्तर पहिली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण Dvandva Samas In Marathi, Dvandva Samas In Marathi Examples, Dvandva Samas Examples हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना उपयुक्त ठरेल.

FAQ Frequently Asked Question for Dvandva Samas

Q1. What is the meaning of Dvand Samas?

Ans:- ज्या समास मध्ये दोन्ही पद हे अर्थ च्या दृष्टीने प्रधान असतात त्यास द्वंद्व समास असे म्हणतात. या समासाला उभय [पद प्रधान समास असे सुद्धा म्हंटले जाते.

Q2. समास म्हणजे काय समासाचे प्रकार?

Ans:- जेव्हा २ किंवा त्या पेक्षा जास्त शब्दांमध्ये संबंध दर्शवणारे प्रत्येय किंवा शब्द काढून त्याचा एकाच शब्द तयार होतो या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. आणि 1.अव्ययीभाव समास 2. तत्पुरुष समास 3.व्दंव्द समास, 4.बहुव्रीही समास हे समासाचे प्रकार आहे.

Q3. द्वंद्व समास म्हणजे काय?

Ans:- ज्या समास मध्ये दोन्ही पद हे अर्थ च्या दृष्टीने प्रधान असतात त्यास द्वंद्व समास असे म्हणतात.

Q4. बहुव्रीही समास म्हणजे काय?

Ans:- या समासातील दोन्ही पदे गौण असून या दोन पदांशिवाय तिसऱ्याच एका विशेषनामाचा बोध होतो. या समासाचा विग्रह करताना शेवटी ज्याला, ज्याची, ज्याने असे संबंधी सर्वनाम येते तेव्हा त्याला बहुव्रीही समास असे म्हणतात.

Q5. विविध प्रकारचे समास काय आहेत?

Ans:- जेव्हा २ किंवा त्या पेक्षा जास्त शब्दांमध्ये संबंध दर्शवणारे प्रत्येय किंवा शब्द काढून त्याचा एकाच शब्द तयार होतो या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. आणि 1.अव्ययीभाव समास 2. तत्पुरुष समास 3.व्दंव्द समास, 4.बहुव्रीही समास हे विविध प्रकारचे समास आहे.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages