Advertisement

Vakprachar In Marathi PDF Download | मराठी वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ संपूर्ण माहिती जाणून घ्या

Vakprachar In Marathi PDF Download:- One of the major languages ​​of India, Marathi has a rich cultural heritage and rich literary tradition. Vakprachar, meaning in Marathi “The new formation of some word groups with different meanings is called Vakprachar” Phrases help to create different meanings in a sentence. In this article, we will study the phrase in depth and we will know its use in Marathi language and society in this article.

Vakprachar In Marathi

भारतातील प्रमुख भाषांपैकी एक असलेल्या मराठीला समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि विपुल साहित्यिक परंपरा आहे. वाक्प्रचार, म्हणजे मराठीतील “काही शब्द समूहांचे नव्याने तयार होणारे वेग वेगळे अर्थ म्हणजे वाक्प्रचार असे म्हणतात” वाक्प्रचार हे वाक्या मध्ये वेग वेगळे अर्थ तयार करण्यास मदत करतात. या आर्टिकल मध्ये आपण वाक्प्रचार चा सखोल अभ्यास करू आणि त्याचा मराठी भाषामधील आणि समाजा मध्ये होणारा उपयोग आपण ह्या आर्टिकल मध्ये जाणून घेणार आहोत.

Read More:- Jodakshar In Marathi PDF Download | जोडाक्षरे आणि त्याची संपूर्ण माहिती जाणून घ्या

What Is Vakprachar In Marathi | मराठीत वाक्प्रचार म्हणजे काय?

शब्दसमूहांचा वाक्यामध्ये उपयोग करत असतांना वाक्प्रचार हा त्यांच्या नेहमीच्या अर्थापेक्षा दुसऱ्या वेग वेगळ्या व विशिष्ट अर्थाने भाषेमध्ये तयार झालेल्या शब्द समूहास वाक्प्रचार असे म्हणतात. वाक्प्रचार हा नेहमी वाक्यामध्ये वापर करतांना त्याचा शब्दशाह अर्थ न घेता तो आणखी वेग वेगळे अर्थ तयार करतो.

खालील प्रमाणे आपण वाक्प्रचार चे संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

Read More:- MPSC Information In Marathi PDF Download | MPSC बद्दल ची संपूर्ण माहीती जाणून घ्या मराठी माहिती

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ वाक्यात उपयोग | Vakprachar In Marathi With Meaning And Sentence

आपण खालील प्रमाणे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ वाक्यात उपयोग कसा करतात हे बघणार आहोत.

  1. आगीत तेल ओतणे – एखादे अपकृत्य घडत असताना त्यात भर टाकणे

वाक्यात उपयोग :- तुझ्या मित्राने भांडणे सोडवण्याच्या ऐवजी त्याने आगीत तेल ओतले.

2. उचल बांगडी करणे – हाकलून देणे

वाक्यात उपयोग :- एका राजकीय पक्षाने त्यांच्या कार्यकर्त्यांची उचल बांगडी केली.

3. कानाला खडा लावणे – एखादी चूक पुन्हा न करण्याचे ठरविणे

वाक्यात उपयोग :- वर्गातील काही विद्यार्थ्यानी खडू चोरल्या नंतर शिक्षकांने मारल्याने विद्यार्थ्यानी कानाला खडा लावला.

4. कंठस्नान घालणे – ठार मारणे

वाक्यात उपयोग:- पोलिसांने एका आतंगवाद्याला कंठस्नान घातले.

5. कान फुंकणे – एखादयाच्या विरुद्ध दुसऱ्याच्या मनात भरविणे

वाक्यात उपयोग:- माझा मित्राचे कोणत्या तरी व्यक्तीने माझा विरुद्ध कान फुंकले.

Read More:- All Marathi Mhani With Meaning List PDF Download । मराठीतील सर्व म्हणी आणि त्यांचा अर्थ संपूर्ण माहिती जाणून घ्या

10 Vakprachar In Marathi

10 वाक्प्रचार आणि त्याचे अर्थ आपण खालील प्रमाणे बघणार आहोत.

Sr.Noवाक्प्रचार अर्थ
1अकलेचा खंदक / अकलेचा कांदामुर्ख मनुष्य
2अर्धचंद्रहकालपट्टी करणे
3अटकेवर झेंडा लावणेमोठा पराक्रम गाजविणे
4अंगाचा तीळ पापड होणेखूप राग येणे
5अळमटळम करणेटाळाटाळ करणे
6अठरा विश्वे दारिद्र्य असणेअतिशय गरीब असणे
7अठरा गुणांचा खंडोबालबाड माणूस
8अत्तराचे दिवे लावणेपैशाची उधळपट्टी करणे
9अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणेथोड्याशा यशाने हुरळून जाणे
10अन्नाला मोताद होणेउपाशी राहणे

Read More:- 250+ Jod Shabd In Marathi PDF Download | जोड शब्द म्हणजे काय आणि त्याची संपूर्ण माहीती जाणून घ्या

20 Vakprachar In Marathi

20 वाक्प्रचार आणि त्याचे अर्थ आपण खालील प्रमाणे बघणार आहोत.

Sr.Noवाक्प्रचार अर्थ
1अवदसा आठवणेवाईट बुद्धी सुच
2अव्वाच्या सव्वाखूप जास्त वाढवून सांगणे
3अमरपट्टा घेवून येणेकायमस्वरुपी जिवंत राहणे
4अंग धरणेबाळशेदार होणे, लठ्ठ होणे
5अंग झाडणेनाकबूल करणे
6आक्काबाईचा फेरा येणेअत्यंत गरीबी येणे
7आंगवणेनवस करणे
8आभाळ ठेंगणे होणेखूप आनंद होणे
9आडरानात शिरणेमुद्दयाला सोडून जाणे
10आकाशाला गवसणी घालणेशक्तीबाहेरची गोष्ट करू पाहणे
11आगीत तेल ओतणेएखादे अपकृत्य घडत असताना त्यात भर टाकणे
12आतड्याला पीळ पडणेकाळजाला पाझर फुटणे
13आकाश पाताळ एक करणेखूप प्रयत्न करणे, खूप आरडाओरडा करणे
14आगीतून निघून फुफाट्यात पडणेएका संकटातून निघून दुसऱ्या संकटात सापडणे
15आभाळ / आकाश फाटणेसर्व बाजूंनी संकट येणे/चारी बाजूंनी संकट येणे
16आभाळ कोसळणेएकाएकी फार मोठे संकट येणे
17इतिश्री होणेशेवट होणे
18इरेला पेटणेचूरस वाढणे
19उपसर्ग होणेत्रास होणे
20उखळ पांढरे होणेखूप पैसा मिळणे

25 Vakprachar In Marathi

25 वाक्प्रचार आणि त्याचे अर्थ आपण खालील प्रमाणे बघणार आहोत.

Sr.Noवाक्प्रचार अर्थ
1उचल बांगडी करणेहाकलून देणे
2उन्हाच्या झळा सोसणेदुःख सहन होणे
3उपरती होणेपश्चात्ताप होणे
4उदक सोडणेत्याग करणे
5उलटी अंबारी हाती येणेभीक मागण्याची वेळ येणे
6उदरी शनी येणेभरभराट होणे
7उष्ट्या हाताने कावळा न हाकलणेकधीही कोणाला मदत न करणे
8ऊर फोडून येणेफार श्रम करणे
9ऊर भरून येणेअंत:करणात भावना दाटून येणे
10उंटावरून शेळ्या हाकणेस्वत: काही न करता दुसऱ्याला केवळ उपदेश करणे
11कच खाणेमाघार घेणे
12कपाळमोक्ष होणेमरण पावणे
13कंठस्नान घालणेठार मारणे
14कणिक तिंबणेभरपूर मार देणे
15कढी पातळ होणेआजारामुळे अंगात त्राण न उरणे
16कपाळ पांढरे होणेवैधव्य प्राप्त होणे
17कपाळ फुटणेवैधव्य प्राप्त होणे/दुर्दैव ओढवणे
18कान फुंकणेएखादयाच्या विरुद्ध दुसऱ्याच्या मनात भरविणे
19कानावर हात ठेवणेआयत्यावेळी जबाबदारी टाळणे
20काकदृष्टीने पाहणेबारकाईने न्याहाळणे
21कानाने हलका असणेकशावरही पटकन विश्वास ठेवणे
22कानाला खडा लावणेएखादी चूक पुन्हा न करण्याचे ठरविणे
23काथ्याकूट करणेनिरर्थक वादविवाद करणे
24काट्याचा नायटा होणेशुल्लक कारणावरून मोठे संकट ओढवणे
25काट्याने काटा काढणेदुष्टाचा दुष्टाकडूनच नाश करणे

Read More:- Marathi Mahine PDF Download | 12 Marathi Months Name | मराठी माहिण्याची नावे, दिवस आणि माहिती संपूर्ण माहिती

50 वाक्प्रचार | 50 Vakprachar In Marathi

50 वाक्प्रचार आणि त्याचे अर्थ आपण खालील प्रमाणे बघणार आहोत.

Sr.Noवाक्प्रचार अर्थ
1काळ्या पाण्याची शिक्षामरेपर्यंत कैद होणे
2कानोसा घेणेअंदाज घेणे
3काखा वर करणेजवळ काही नाही असे दाखविणे, ऐनवेळी बाजूला होणे
4कोंड्याचा मांडा करणेकाटकसरीने व समाधानाने राहणे
5कोंबडे झुंजविणेभांडण लावून मजा पाहणे
6कागदी घोडे नाचविणेफक्त लेखनात शूरपणा दाखविणे
7काडीमोड करणे/घेणेघटस्फोट घेणे, संबंध तोडणे
8कुभांड रचणेदुसऱ्यावर खोटे आरोप करणे
9कुंपणाने शेत खाणेविश्वासू माणसानेच घात करणे
10कच्छपी लागणेएखाद्याच्या नादी लागणे
11कुत्रा हाल न खाणेअतिशय वाईट स्थिती येणे
12केसाने गळा कापणेविश्वासघात करणे
13कोड पुरविणेहौस पुरविणे
14कोंडमारा होणेनिरुपाय होणे, सर्व बाजूंनी त्रास होणे
15कंबखती भरणेमार खाण्याची वेळ येणे, दुर्देव येणे
16काची पडणेधास्ती धरणे
17खलबत करणेगुप्त विचार विनिमय करणे, चर्चा करणे
18खसखस पिकणेमोठ्याने हसणे
19खडा टाकणेअंदाज घेणे
20खडे फोडणेदोष देणे
21खापर फोडणेदुसऱ्यावर दोष ठेवणे
22खडे चारणेपराभूत करणे
23खोगीर भरती करणेनिरूपयोगी व्यक्तीची भरती करणे
24खाजवून खरूज काढणेमिटलेले भांडण मुद्दाम उकरून काढणे
25खाल्ल्या घरचे वासे मोजणेकेलेले उपकार विसरणे
26खाल्ल्या अन्नास जागणेउपकाराची जाणीव ठेवणे
27खार लागणेझीज सोसावी लागणे
28गंगेत घोडे न्हाणेएखादे काम कसेबसे पार पडणे
29गर्भगळीत होणेखूप घाबरणे
30गंडांतर येणेसंकट येणे
31ग्रहण सुटणेसंकटातून सुटका होणे
32गळ्याला तात लागणेमोठ्या संकटात सापडणे
33गळ्यातील ताईत होणेअतिशय प्रिय होणे
34ग’ ची बाधा होणेगर्व होणे, घमेंड होणे
35गाशा गुंडाळणेएकदम पसार होणे, निघून जाणे, पोबारा करणे
36गळ्यात घोरपड बांधणेफक्त जबाबदारी लादणे
37गळ्याशी येणेअंगलट येणे
38गळ घालणेफार आग्रह करणे
39घोडे पेंड खाणेअडचण निर्माण होणे, काम अडणे
40घोडे मारणेनुकसान करणे
41घर डोक्यावर घेणेखूप आरडाओरडा करणे
42घरावर तुळशीपत्र ठेवणेघरादाराची आशा सोडणे
43घागरगडचा सुभेदारपाणक्या (पाणी भरण्याचे काम करणारा)
44घडा फोडणेरहस्य उघडकीस आणणे
45धूळ चारणेपराभव करणे
46चतुर्भूज होणे/चार हात होणेलग्न होणे, मारामारी होणे, कैद होणे
47चहाट वळणेकंटाळवाणे बडबड करणे
48चाह करणेस्तुती करणे, वाहवा करणे, वाखाणणी करणे
49चाहुल लागणेकुणकुण लागणे
50चुलीला अक्षता देणेचूलबंद आमंत्रण देणे

Read More:- Alankarik Shabd In Marathi PDF Download | अलंकारिक शब्द आणि त्याचे अर्थ संपूर्ण माहिती

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ मराठी | Marathi Language Vakprachar In Marathi List

Sr.Noवाक्प्रचार अर्थ
1चौदावे रत्न दाखविणेखूप मार देणे
2चंदन करणेनाश करणे
3चांदीचा चमचा तोंडात घेवून जन्मणेगर्भश्रीमंत असणे
4चांदी उडणेनाश होणे
5छक्केपंजे करणेलबाडी करणे
6छातीचा कोट करणेधैर्याने तोंड देणे
7जीभेस हाड नसणेवाटेल ते बोलणे
8जीव भांड्यात पडणेकाळजी दूर होणे फार त्रास होणे
9जीव मेटाकुटीस येणेखूप उत्सुकतेने ऐकणे
10जीव कानात गोळा होणेचिंता वाटणे
11जीव टांगणीस लागणेमन घट्ट करणे
12जीव मुठीत धरणेनाहक ये-जा करणे, खेटे घालणे
13जोडे फाटणेप्रसिध्दीस न आलेली पण अत्यंत गुणी व्यक्ती
14झाकले माणिकदिमाख दाखविणे, तोरा दाखविणे
15टेंभा मिरविणे.टाळाटाळ करणे, हयगय करणे
16टंगळमंगळ करणेविचार करणे
17डोके खर्च करणे डांगोरा पिटणेसगळ्यांना सांगत सुटणे
18डोळे झाक करणेलक्ष न देणे
19डोळ्यात धूळ फेकणेक्षणार्धात फसवणे
20डोळ्यात तेल घालणेखूप दक्ष राहणे
21डोळे निवणेपाहून तृप्त होणे
22डोळ्यात अंजन घालणेचूक लक्षात आणून देणे
23डोळे पांढरे होणेअतिशय घाबरणे
24डोक्यावर मिरे वाटणेवरचढ होणे
25डोक्यावर खापर फोडणेनिर्दोष माणसाला दोष देणे
26डोळ्यावर कातडे ओढणेजाणुनबुजून दुर्लक्ष करणे, कानाडोळा करणे
27डोळ्यात प्राण आणणेखूप आतूर होणे
28डोळ्यांचे पारणे फिटणेपाहून समाधान होणे
29डोळ्यातील काजळ चोरणेखूप ‘कौशल्याने चोरी करणे
30डोंगर कोसळणेअतिशय दुःख होणे
31डोळ्यावर धुंदी चढणेगर्वाने न दिसणे
32तारे तोडणेमुर्खपणाची बडबड, वेड्यासारखे बोलणे
33तुणतुणे वाजविणेएखादी शुल्लक गोष्ट पुन्हा पुन्हा सांगणे
34तेरड्याचे फूलचंचल स्वभावाची व्यक्ती
35तळहातावर शीर घेणेजीवावर उदार होणे
36तमा नसणेपर्वा न करणे
37तळहाताचा फोडअतिशय काळजीने केलेली जपणूक
38तडीस नेणेएखादे काम पुर्ण करणे, फत्ते करणे
39ताकास तूर लागू न देणेकोणत्याही गोष्टीचा थांगपत्ता लागू न देणे
40तादात्म्य पावणेएकरूप होणे
41तोंड पाटीलकी करणेरिकामी बडबड करणे
42तोंडाला पाने पुसणेफसवणे
43तोंडचे पाणी पळणेघाबरून जाणे
44तोंडात तीळ न भिजणेकोणतीही गुप्त गोष्ट प्रकट करणे, गुप्त गोष्ट मनात न राहणे
45तिलांजली देणेहक्क सोडणे, त्याग करणे
46तोंडाला कुलुप लावणेगप्प बसणे
47तोंडपुजा करणेनिरर्थक स्तुती करणे
48तोंडात बोट घालणेआश्चर्यचकित होणे
49तोफेच्या तोंडी देणेसंकटात लोटणे
50तांडव नृत्य करणेथयथयाट करणे
51थुंकी झेलणेहांजी हांजी करणे, भलती खुशामत करणे
52थंडा फराळ करणेउपाशी राहणे, काहीही खाण्यास न मिळणे
53दाती तृण धरणेशरण येणे
54दाढी धरणेआळवणी करणे
55द्राविडी प्राणायाम करणेसोपा मार्ग सोडून कठीण मार्गाने जाणे
56द्रौपदीची थाळीनेहमी गरज भागविणारी व्यक्ती
57दातांच्या कण्या करणेवारंवार विनंती करणे
58दातास दात लावून बसणेउपाशी राहणे
59दुःख वेशीवर टांगणेसंकटे लोकांपुढे मांडणे
60दुःखावर डागण्या देणेदुःखी माणसाला टोचून बोलणे
61दुधात मीठ कालवणेएखाद्याच्या बसलेल्या घडीचा विचका करणे
62दात कोरून पोट भरणेभलतीच काटकसर करणे
63दात विचकणेयाचना करणे, एखादयाला वेडावणे
64दात दाखविणेएखादयाची टिंगल करुन हसणे
65दात पडणेफजिती होणे
66देवाज्ञा होणेमृत्यु पावणे
67दृष्ट लागणेपाहिल्यामुळे नुकसान होणे
68दादापुता करणेगोड बोलून मन वळविणे
69धर्मावर सोमवार सोडणेएखादे काम दुसऱ्याकडून करवून आपण मोठेपणा मिळविणे.
70धाबे दणाणणेअतिशय घाबरणे
71धारण करणेअंगीकारणे
72धर्माआड कुत्रे येणेचांगल्या कामात विघ्न येणे
73नक्राश्रू ढाळणेखोटे दुःख दाखविणे
74नमनालाच घडाभर तेल जाळणेसुरूवात करण्यास विलंब करणे
75नाकाने कांदे सोलणेज्यादा शहाणपणा दाखविणे, उगाच बडाया मारणे
76नाकाला मिरच्या झोंबणेखूप राग येणे
77नाकातला बालअतिशय प्रिय व्यक्ती
78नांगी टाकणेहातपाय गाळणे, पडते घेणे
79नाक मुठीत धरणेशरण जाणे
80नाकी नऊ येणेअत्यंत त्रासून जाणे
81न भुतो न भविष्यती होणेपूर्वी न झालेली व पुढे न होणारी गोष्ट घडणे
82निजकवेत घेणेस्वत:च्या मिठीत घेणे
83पराचा कावळा करणेअतिशयोक्ती करणे
84पाण्यावरची रेघक्षणभंगुरता
85पाणी पडणेव्यर्थ होणे, फुकट जाणे
86पाणी पाजणेएखाद्याची क्षमता आजमावणे
87पराभव करणेत्याग करणे
88पाणी जोखणेएखादी गोष्ट नेहमीच करावी लागणे
89पाणी सोडणेयोग्यतेने वागविणे
90पाचवीला पुजणेपाचावर धारणा बसणे
91पायरीने ठेवणेखूप भयभीत होणे
92पाण्यात पाहणेद्वेष करणे
93पोटाची दामटी वळणेखूप भूक लागणे, खायला न मिळणे
94पाणउतारा करणेअपमान करणे
95पालथ्या घागरीवर पाणीनिष्फळ श्रम
96पोबारा करणेपळून जाणे
97पाठीचे धिरडे करणेखूप मारणे
98पांघरून घालणेचूक झाकणे
99पाठ चोरणेकुचरपणा करणे
100पित्त उसळणे / खवळणेसंताप होणे, खूप राग येणे
101पेल्यातील वादळतात्पुरता वाद
102पदराला गाठ मारणेकामाचा अनुभव घेऊन सुधारणा करणे
103पायमल्ली करणेअवमान करणे
104फुटका डोळा काजळाने साजरा करणेकाही युक्तींनी अवगुण (दोष) झाकणे
105बत्तीशी रंगविणेथोबाडीत मारणे
106बार उडविणेकार्य पुर्ण करणे
107बाळकडू मिळणेलहानपणापासून शिकवण मिळणे
108बभ्रा करणेबोभाटा करणे
109बांगडी फुटणेविधवा होणे
110बेला फुलाला गाठ पडणेसहजासहजी योग जमून येणे
111बोचणी लागणेमनास लागून राहणे
112बोल लावणेदोष देणे
113बिब्बा घालणेअडथळा आणणे; काम बिघडविणे.
114बेल भंडारा उचलणेशपथ घेणे
115बोटे मोडणेचरफड
116भ्रमांड आठवणे/कोसळणेभिती वाटणे, खूप दुःख होणे
117भिजत घोंगडेरेंगाळलेले काम
118भिकेचे डोहाळे लागणेदरिद्रीपणाने वागणे
119मनात मांडे खाणेव्यर्थ मनोराज्य करणे
120मधुन विस्तव न जाणेअतिशय वैर असणे
121मेतकूट जमणेघनिष्ट मैत्री होणे
122माशी शिंकणेकामात अडचण येणे
123मात्र चालणेयोग्य परिणाम होणे, इलाज चालणे
124मान तुकविणेशरण जाणे
125मिशीवर ताव मारणेफुशारकी मारणे
126मिशांना तूप लावणेउगीच ऐट करणे
127मूग गिळून बसणेमुकाट्याने गप्प बसणे, मौन धारण करणे
128मुसळास अंकुर फूटणेअशक्यप्राय वाटणारी गोष्ट घडून येणे
129मांडीवर घेणेदत्तक घेणे
130मधाचे बोट लावणेखोटी आशा लावणे
131मक्ता असणेएकाधिकार असणे
132मुळावर येणेनाशास कारणीभूत होणे
133योगक्षेम चालविणेउदरनिर्वाहाची तजवीज करणे
134रामराम ठोकणेकायमचा निरोप घेणे
135राम म्हणणेमरणे
136राशीस लागणेपिच्छा पुरविणे, पाठीस लागणे
137राशीस बसणेछळणे, सतावणे
138रेवडी उडविणेफजिती करणे, चेष्टा करणे
139राबता असणेलोकांची सतत ये- जा असणे
140राम नसणेअर्थ नसणे
141रक्ताचे पाणी करणेजास्त मेहनत करणे
142लाखोली वाहणेशिव्या देणे
143लोटांगण घालणेशरण जाणे
144लोखंडाचे चणे खाणेभरपूर परिश्रम घेणे
145वाकडे पाऊल पडणेदुर्वर्तन घडणे
146वाऱ्याची मोट बांधणेअशक्य गोष्ट करू पाहणे
147वैकुंठवासी होणेमरण पावणे
148विडा उचलणेप्रतिज्ञा करणे
149विधीनिषेध नसणेकाय करावे व काय करु नये याचा अजिबात विचार नसणे
150वड्याचे तेल वांग्यावर काढणेएकाचा राग दुसऱ्यावर काढणे
151वडाची साल पिंपळाला लावणेचुकीचा संबंध जोडणे, एकाचे दोष दुसऱ्यावर ढकलणे
152वाटाण्याच्या अक्षता लावणेस्पष्टपणे नाकारणे, स्पष्ट शब्दात नकार देणे
153वाट लावणेनाश करणे
154वाटेला जाणेखोडी काढ
155वेड पांघरून पेडगावी जाणेएखादी गोष्ट समजूनसुध्दा न समजल्याचे ढोंग करणे
156विरजण घालणेनिरुत्साही करणे
157शाल जोडीतून देणेशब्द प्रहार करणे
158शास्त्रार्थ करणेयोग्य-अयोग्य काय याचा विचार करणे
159शिकस्त करणेनिकराणे प्रयत्न करणे
160शूचिर्भूत होणेशुद्ध होणे
161शेणाचे दिवे लावणेदिवाळे निघणे, कर्जबाजारी होणे
162शेणसडा होणेपरिस्थिती वाईट होणे
163शब्द लावणेदोष देणे
164शंभर वर्षे भरणेअंत होण्याची वेळ जवळ येणे, विनाशकाल येणे
165शास्त्रार्थ करणेयोग्य-अयोग्य काय त्याचा विचार करणे
166शंख करणेओरडणे, बोंबलणे
167षट्कर्णी होणेगुप्त गोष्ट तिसऱ्यास कळणे
168षष्ठी करणेझालेल्या चुकांबद्दल रागावणे
169सव्यापसव्य करणेयातायात करणे
170ससेमिरा लावणेतगादा लावणे
171संक्रात गुदरणेसंकट येणे
172सळो की पळो करून सोडणेअतिशय त्रास देणे
173साखरेची साल काढणेअतिशय सूक्ष्म छाननी करणे
174सुप वाजणे (सुप फडफडणे)यशस्वीरित्या पार पडणे
175सुतोवाच करणेप्रारंभ करणे, ओनाम करणे
176सुंबाल्या करणेपळून जाणे, पोबारा करणे
177स्वाहा करणेखाऊन टाकणे
178स्वर्ग दोन बोटे उरणेअतिशय हुरळून जाणे, अतिशय गर्व होणे
179सुंठेवाचून खोकला जाणेउपाय न करताही संकट टळणे
180सोक्षमोक्ष करणेशेवट करणे
181सांगावा फोडणेबिंग फोडणे
182सदगदित होणेगहिवरणे
183सर्द होणेवरमणे, दबले जाणे
184सोने होणेसार्थक होणे
185हळद लागणेविवाह होणे
186हतबल होणेअसमर्थ ठरणे
187हुलकावणी देणेचकवणे
188हात टेकणेपराभव मान्य करणे, नाइलाजाने शरण येणे
189हात ओला होणेफायदा होणे, पैसा मिळणे
190हातात कंकण बांधणेप्रतिज्ञा करणे
191हातावर शीर घेणेप्राणाचीही पर्वा न करणे किंवा जीवावर उदार होणे
192हाडाची काडे करणेखूप कष्ट करणे
193हातचा मळसहज साध्य गोष्ट
194हात तोकडे पडणेमदत करण्यास क्षमता कमी पडणे
195हात दाखविणेचोप देणे
196हंसक्षीर न्यायएखाद्या कृतीतील दोषांकडे दुर्लक्ष करून त्यातील गुणांचे ग्रहण करणे
197हातातोंडाशी गाठ पडणेजेमतेम खाण्यास मिळणे
198हातावर तुरी देणेफसवून पळून जाणे
199हात तोकडे पडणेमदत करण्यास क्षमता कमी पडणे
200हात हलवत परत येणेकाम न होणे
201हरभऱ्याच्या झाडावर चढणेखोट्या स्तुतीला भुलणे
202क्षमा करणेपोटात घालणे

Read More:- Alankarik Shabd In Marathi PDF Download | अलंकारिक शब्द आणि त्याचे अर्थ संपूर्ण माहिती

मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ PDF | Vakprachar In Marathi PDF Download

Vakprachar In Marathi PDF Download:- आपण ह्या आर्टिकल मध्ये वाक्यप्राचार आणि त्याचे अर्थ ची संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. अनेक विद्यार्थ्याना अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यांच्यासाठी आम्ही विद्यार्थ्याना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही PDF Download करण्यासाठी PDF देत आहोत. तुम्ही वाक्यप्राचार आणि त्याचे अर्थ आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

Conclusion

आपण या पोस्ट मध्ये आपण वाक्यप्राचार आणि त्याचे अर्थ ची संपूर्ण माहिती सविस्तर पहिली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण Vakprachar In Marathi हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना उपयुक्त ठरेल.

FAQ Frequently Asked Question

Q1. वाक्यप्रचार म्हणजे काय?

Ans:- शब्दसमूहांचा वाक्यामध्ये उपयोग करत असतांना वाक्प्रचार हा त्यांच्या नेहमीच्या अर्थापेक्षा दुसऱ्या वेग वेगळ्या व विशिष्ट अर्थाने भाषेमध्ये तयार झालेल्या शब्द समूहास वाक्प्रचार असे म्हणतात. वाक्प्रचार हा नेहमी वाक्यामध्ये वापर करतांना त्याचा शब्दशाह अर्थ न घेता तो आणखी वेग वेगळे अर्थ तयार करतो.

Q2. वाक्यप्राचार उदाहरण कसे सांगाल?

Ans:- आगीत तेल ओतणे हा एक वाक्प्राचार आहे. त्याचे वाक्यात उपयोग किंवा उदाहरण बघू. आगीत तेल ओतणे – एखादे अपकृत्य घडत असताना त्यात भर टाकणे. वाक्यात उपयोग :- तुझ्या मित्राने भांडणे सोडवण्याच्या ऐवजी त्याने आगीत तेल ओतले. A

Q3. वंदन करणे म्हणजे काय?

Ans:- वंदन म्हणजे अभिवादन होय. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने किंवा व्यक्तिसमुदायाने गांधीच्या जयंती निमित्ताने त्यांचा फोटो ला वंदन/अभिवादन केले.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages