Advertisement

Biology In Marathi PDF Download | जीवशास्त्राची महत्वाची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Biology In Marathi | Biology Meaning In Marathi

Biology In Marathi | Biology Meaning In Marathi:- Biology-based questions are asked in competitive exams, especially in Health Sector Recruitment, and Health Mission Recruitment. To prepare for such questions, it is necessary to look at important information from the health sciences. That is why in today’s post we are going to look at the biology topics that are likely to be asked in the exam.v

Biology In Marathi | Biology Meaning In Marathi

जीवशास्त्र महत्वाची माहिती-आरोग्यशास्त्र म्हणजेच BIOLOGY यावर आधारित प्रश्न स्पर्धा परीक्षांमध्ये विशेषतः आरोग्य विभाग भरती ,आरोग्य अभियान भरती या परीक्षांमध्ये विचारले जातात. अशा प्रश्नांची तयारी करण्यासाठी आरोग्य शास्त्र मधील महत्वाची माहिती पाहणे आवश्यक असते. या साठीच आजच्या या पोस्ट मध्ये आपण जीवशास्त्र विषयाची माहिती पाहुयात ज्यावर आधारित प्रश्न परीक्षे मध्ये विचारले जाण्याची शक्यता असते.

Read More:- Arogya Shastra PDF Download | आरोग्यशास्त्राची महत्वाची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Biology In Marathi | Biology Meaning In Marathi

जीवशास्त्र BIOLOGY  मध्ये संभाव्य प्रश्न विचारले जाणारे 30 टॉपिक

  1.  यिस्टचा उपयोग किण्वन प्रक्रीयेसाठी होतो.
  2. नत्र, स्फुरद, पालाश ही वनस्पतींची प्रमुख अन्नद्रव्ये आहेत.
  3. जलवाहिन्या व रसवाहिन्या असणाऱ्या वनस्पतींना संवहनी वनस्पती असे म्हणतात.
  4.  गाजर, बीट, रताळे ही मुळे आहेत.
  5. झाडांचे वय खोडांवरील वर्तुळाच्या साहयाने ठरवले जाते.
  6.  शॅमेलिऑन सरडा परिसरामप्रमाणे रंग बदलतो.
  7.  नेचे ही मुळ, खोड, पाने, फुले हे अवयव असलेली सपुष्प वनस्पती आहे.
  8. खोडावर जेथे पाने फुटतात त्या भागाला पेरे असे म्हणतात.
  9.  कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, गंधक ही वनस्पतींची दुय्यम अन्नद्रव्ये आहेत.
  10. पक्षांची हाडे पोकळ असतात.
  11. अपुष्प वनस्पतींना मुळ, खोड, पाने, फुले हे अवयव नसतात.
  12.  एकबीजपत्री (एकदलिकित) वनस्पतीला आगंतुक व तंतुमय मुळे असतात. उदा. गवत.
  13. प्रकाश संश्लेषणात हरित द्रव्यामुळे प्रकाश ऊर्जा ग्रहण केली जाते. रासायनिक उर्जेच्या स्वरूपात ही अँडिनोसिन ट्राय फॉस्फेट रेणूत साठवली जाते.
  14. दोन पेऱ्यांमधील खोडाच्या भागाला कांडे असे म्हणतात.
  15. वनस्पती कार्बन हवेतील कार्बनडाय ऑक्साईडमधून घेतात.
  16. बियांकुरणासाठी ओलावा, हवा आणि ऊबेची गरज असते.
  17. सपुष्प वनस्पतींना मुळ, खोड, पाने, फुले हे अवयव असतात.
  18.  वडाच्या पारंब्या ही आधार देणारी मुळे आहेत.
  19. हरितद्रव्य, प्रकाश, पाणी आणि कार्बनडाय ऑक्साईड हे प्रकाश संश्लेषणास आवश्यक घटक आहेत.
  20.  पारमेलीया म्हणजे मसाल्याचे दगडफुल होय.
  21.  हालचाल, श्वसन, वाढ, चेतनाक्षमता, प्रजनन, उत्सर्जन ही सजीवांची वैशिष्टये आहेत.
  22. मासे कल्ल्यांच्या साहयाने श्वसन करतात.
  23. जलवाहिन्या व रसवाहिन्या नसणाऱ्या वनस्पतींना असंवहनी वनस्पती असे म्हणतात.
  24. पावावरची बुरशी म्हणजे म्युकर, भुछत्र, पेनिसिलीयम, किण्व म्हणजे यिस्ट, गव्हावरचा तांबेरा ही कवकाची उदाहरणे आहेत.
  25. दल, आदिमुळ आणि कोंब यांना एकत्रितपणे गर्भ असे म्हणतात.
  26. पंख हे रुपांतर झालेले पक्षांचे पुढचे पाय आहेत.
  27. कॅल्शिअम, पालाश, गंधक, स्फुरद ही द्रव्ये वनस्पती जमिनीतूनच मिळवतात.
  28. मासे कल्ल्यांच्या साहयाने पाण्यात विरघळलेला ऑक्सीजन शरीरामध्ये घेतात.
  29. वनस्पतींचे वर्गीकरण सपुष्प आणि अपुष्प वनस्पती या दोन गटात केले जाते.
  30. कवक, भुछत्र, स्पायरोगायरा इ. मुळ, खोड आणि पान नसलेल्या अपुष्प वनस्पती आहेत.

Read More:- Adivasi Vikas Vibhag Bharti Syllabus And Exam Pattern PDF |आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप

जीवशास्त्र मध्ये विचारले जाणारा संभाव्य प्रश्न आणि त्याची उत्तरे | Biology Questions And Thier Answers

१.‘चेतनाक्षमता’ म्हणजे काय?

उत्तर : घडणाऱ्या घटनांना योग्य प्रतिसाद देणे याला ‘चेतनाक्षमता’ असे म्हणतात.

२. बीजांकुरणाची प्रक्रिया काय आहे ?

उत्तर :बीजांकुरणात आदिमुळापासून मुळ आणि कोंबापासून खोड तयार होते.

३.  ‘अपुष्प वनस्पती ची उदाहरणे कोणती आहेत?

उत्तर : ‘ कवक, भुछत्र, स्पायरोगायरा इ. मुळ, खोड आणि पान नसलेल्या अपुष्प वनस्पती आहेत.

४. संअन्नसाठा करणाऱ्या खोडांची उदाहरणे कोणती आहेत?

उत्तर :  बटाटा, आले ही अन्नसाठा करणाऱ्या खोडांची उदाहरणे आहेत.

५. दगडफुल कसे तयार होते?

उत्तर :दगडफुल ही कवक आणि शैवालाच्या एकत्रित वाढण्याचे तयार होते.

६. वनस्पतींना नत्र कुठून प्राप्त होते?

उत्तर 🙂 वनस्पती नत्र जमिनीतून घेतात.

७. प्रजनन किंवा पुनरूत्पादन कशास म्हणतात?

उत्तर स्वतः सारख्याच दुसऱ्या सजीवाला जन्म देणे, याला सजीवांचे प्रजनन किंवा पुनरूत्पादन असे म्हणतात.

८.  उत्सर्जन हि सजीवांची कशाशी संबंधित प्रक्रिया आहे?

उत्तर :शरीरात तयार झालेले निरुपयोगी आणि घातक ठरणारे पदार्थ सजीव उत्सर्जन क्रियेवाटे शरीराबाहेर टाकून देतात.

९.अनुकूलन कशास म्हणतात?

उत्तर : जगण्यासाठी परिसराशी मिळते जुळते होण्याच्या सजीवांच्या क्षमतेला अनुकूलन असे म्हणतात.

१०. वनस्पती त्यांना लागणारी मुलद्रव्ये कुठून प्राप्त करतात?

उत्तर : वनस्पती त्यांना लागणारी मुलद्रव्ये हवा, पाणी व जमीन यांच्या माध्यमातून घेत असतात.

Read More:- Best Books For MPSC Engineering Services Mains Examination PDF | MPSC अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेसाठी पुस्तके

११.वनस्पतींच्या शिरांचे कार्य कोणते?

उत्तर शिरांमुळे पानांना आधारे मिळतो. शिरांमधून पाण्याचे व अन्नाचे वहन होते.

१२.  प्रकाश संश्लेषण कशास म्हणतात?

उत्तर :हरीत वनस्पती कार्बनडाय ऑक्साईड व पाणी वापरुन सुर्यप्रकाश आणि हरीत द्रव्यांच्या साहयाने स्वतःचे अन्न तयार करतात. या क्रियेला प्रकाश संश्लेषण असे म्हणतात.

१३. वनस्पतीच्या फांद्या कशा तयार होतात?

उत्तर :मुकूलापासून फांद्या फुटतात.

१४.  भारतातील सर्वात जुने वडाचे झाड कुठे आहे?

उत्तर : कोलकाता येथील बोटॅनिकल गार्डनमध्ये भारतातील सर्वात जुने वडाचे झाड आहे.

१५. कोणत्या वनस्पतीला सोटमुळ असतात?

उत्तर : द्विबीजपत्री (द्विदलिकित) वनस्पतीला सोटमुळ असतात. उदा. गाजर सोटमूळ आहे.

Read More:- National Civilian Awards List PDF Download | भारतातील सर्व राष्ट्रीय पुरस्कार आणि त्यांची संपूर्ण माहिती आणि यादी जाणून घ्या

१६. मुळांचे कार्य काय आहे?

उत्तर :वनस्पतींना आधार देणे तसेच जमिनीतील क्षार आणि पाणी शोषून घेणे हे मुळांचे कार्य आहे.

१७.  खोडाचे कार्य काय आहे?

उत्तर :मुळांनी शोषलेले क्षारयुक्त पाणी पानांना पुरविणे आणि तयार झालेले अन्न वनस्पतींच्या सर्व भागांना पुरविणे हे खोडाचे कार्य आ तसेच वनस्पतींना आधार देणे हेही खोडाचे कार्य आहे.

१८. अन्नघटकांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या विकारांना काय म्हणतात?

उत्तर :अन्नघटकांच्या कमतरतेमुळे काही विकार होतात, त्यांना त्रुटीजन्य विकार म्हणतात.

१९. ——–हे नुक्लिक आम्लाच्या घडणीमध्ये महतवाचे मूलद्रव्य आहे?

उत्तर :फॉस्फरस हे नुक्लिक आम्लाच्या घडणीमध्ये महतवाचे मूलद्रव्य आहे.

२०. द्राक्षांमधील आद्रता शोषण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो?

उत्तर :‘द्राक्षांमधील आद्रता शोषण्यासाठी सौर शुष्कक चा वापर केला जातो.

Read More:- MIDC Full Information In Marathi | महाराष्ट्रातील औद्योगिक संस्था संपूर्ण माहिती जाणून घ्या

२१. एल. पी .जी मध्ये कोणते घटक असतात?

उत्तर : एल. पी .जी मध्ये ब्युटेन आणि आयसोब्युटेन हे घटक असतात.

२२.सूर्यापासून पृथ्वीला किती मेगावॅट ऊर्जा मिळते?

उत्तर : सूर्यापासून पृथ्वीला 1.8 x 1011 मेगावॅट ऊर्जा मिळते.

२३.कुष्ठरोगाच्या जीवाणूंचा शोध कोणी लावला?

उत्तर :डॉ.हन्सन यांनी कुष्ठरोगाच्या जीवाणूंचा शोध लावला.

२४. प्रतिरोध संस्थेच्या कार्यामध्ये काय मदत करते ?

उत्तर : प्रतिरोध संस्थेच्या कार्यामध्ये लोह मदत करते.

२५. कापलेल्या मासाच्या तुकड्यात त्यातील मांसपेशीत असलेल्या विकारामुळे कोणती प्रक्रिया होते?

उत्तर :कापलेल्या मासाच्या तुकड्यात त्यातील मांसपेशीत असलेल्या विकारामुळे लॅक्टिक आम्ल प्रक्रिया होते.

२६. सूक्ष्मजीव अन्नातील कशाचे विघटन करून ग्लासेराल आणि मेदाम्ले तयार करतात?

उत्तर :सूक्ष्मजीव अन्नातील कर्बोदकांचे विघटन करून ग्लासेराल आणि मेदाम्ले तयार करतात.

Read More:- All Mpsc History Questions And Answers In Marathi PDF Download | MPSC इतिहास वर आधारित सर्व प्रश्नांची आणि उत्तर माहिती जाणून घ्या

All Important BIOLOGY Questions And Answers PDF Download

All Important BIOLOGY Questions And Answers PDF Download:- आपण या पोस्ट मध्येजीवशास्त्र BIOLOGY  वर आधारीत भरती परीक्षे यामध्ये विचारले जाणार महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरांची माहीती सविस्तर पणे बघितली आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

Read More:- All MPSC Buddhimatta Chachani Questions PDF Download | MPSC बुद्धिमत्ता चाचणी वर आधारित सर्व प्रश्नांची आणि उत्तर माहिती जाणून घ्या

Conclusions

All Important BIOLOGY Questions And Answers PDF Download:- आपण ह्या आर्टिकल मध्ये जीवशास्त्र BIOLOGY  भरती महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरांची माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना जीवशास्त्र मधले महत्वाचे भरती महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरांची माहिती यांची अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता येणार आहे.

FAQ Frequently Asked Questions For Biology In Marathi |

Q.1 जीवशास्त्र म्हणजे काय?

Ans:- निसर्गातील सजीवांचा अभ्यास करणारी विज्ञानाची शाखा म्हणजे जीवशास्त्र होय.


Q2. जीवशास्त्राचे किती प्रकार आहेत?

Ans:जीवशास्त्राच्या तीन प्रमुख शाखा म्हणजे सूक्ष्मजीवशास्त्र, प्राणीशास्त्र आणि वनस्पतिशास्त्र असे प्रकार आहेत.


Q3. जीवशास्त्राचे जनक कोण?

Ans:– जीवशास्त्राचे जनक कोण हे ॲरिस्टॉटल आहेत.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages