Arogya Shastra PDF Download:- Health Science Key Information-Questions based on Health Science are asked in competitive exams especially in Health Sector Recruitment and Arogya Mission Recruitment. To prepare for such questions, it is necessary to look at important information from the health sciences. Therefore, in today’s post, we will be discussing the health science topics that are likely to be asked in the exam.
Arogya Shastra PDF Download
Arogya Shastra PDF Download:- आरोग्यशास्त्र महत्वाची माहिती-आरोग्यशास्त्र म्हणजेच Health Science यावर आधारित प्रश्न स्पर्धा परीक्षांमध्ये विशेषतः आरोग्य विभाग भरती ,आरोग्य अभियान भरती या परीक्षांमध्ये विचारले जातात. अशा प्रश्नांची तयारी करण्यासाठी आरोग्य शास्त्र मधील महत्वाची माहिती पाहणे आवश्यक असते. या साठीच आजच्या या पोस्ट मध्ये आपण आरोग्यशास्त्र विषयाची माहिती पाहुयात ज्यावर आधारित प्रश्न परीक्षे मध्ये विचारले जाण्याची शक्यता असते.
Arogya Shastra PDF Download
आरोग्यशास्त्र Health Science मध्ये संभाव्य प्रश्न विचारले जाणारे 30 टॉपिक
- देवीच्या लसीचा शोध एडवर्ड जेन्नर यांनी लावला.
- रातांधळेपणा ‘ए’ जीवसत्वाच्या कमतरतेमुळे होतो.
- मेनिंगोकोकस गोलाणूंमुळे (जीवाणू) मेनिंजायटिस रोग होतो.
- कुत्र्याला होणारा रेबीज रोग विषाणूजन्य आहे.
- कुष्ठरोग हा रोग मायक्रोबॅक्टेरिअम लेप्री या जीवाणूंपासून होतो.
- एकाच वेळी अनेकांना लागण होणाऱ्या रोगांना साथीचे रोग म्हणतात.
- घटसर्प हा घशाचा रोग आहे.
- घटसर्प रोग कोरिनेबॅक्टेरिअम दंडाणूमुळे (जीवाणू) होतो.
- अमांश आणि मलेरिया हे रोग आदिजीवजन्य आहेत.
- उंदरावरील पिसा प्लेग हा रोग मानवात पसरवतात.
- डाळी, मांस, यांमध्ये प्रथिने असतात.
- सामान्यतः स्कहीं हा रोग अर्भकांमध्ये आढळतो.
- मीठ आणि साखर हे खाद्यपदार्थ टिकवणारे पदार्थ आहेत.
- कावीळ, हगवण, कॉलरा, टायफॉईड, पोलिओ इ. रोगांचा प्रसार पाण्याच्या माध्यमातून होतो.
- अमांश रोग एन्टमिबा हिस्टोलिटिका आदिजीवांमुळे होतो.
- मलेरिया रोगाचा प्रसार अॅनॉफिलिस जातीच्या मादी डासातून होतो.
- तंबाखुमध्ये निकोटिन हे उत्तेजक द्रव्य असते.
- तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी यामध्ये पिष्टमय पदार्थांचे प्रमाण अधिक असते.
- मधुमेह या रोगामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढते.
- खरूज, नायटा यासारखे त्वचेचे रोग स्पर्शामुळे होतात. त्यांना संपर्कजन्य रोग म्हणतात.
- स्टेप्टोमायसिन प्रतिजैविकांमुळे क्षय रोगांचे रोगजंतू नाहिसे होतात.
- बी.सी.जी लस घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात या रोगांसाठी दिली जाते.
- फुफ्फुसाच्या व घशाच्या रोगाचा प्रसार हवेच्या माध्यमातून होतो.
- क्लोरोमायसेटिन प्रतिजैविकांमुळे विषमज्वराचे रोगजंतू नाहीसे होतात.
- रक्त-ग्लुकोज पातळी ‘इन्सुलिन’ या संप्रेरकामुळे नियंत्रित केली जाते.
- भुईमूग, करडई यासारख्या तेलबियांत स्निग्ध पदार्थाचे प्रमाण अधिक असते.
- ‘अ’ जीवनसत्वाच्या अभावामुळे त्वचा कोरडी व खवलेयुक्त होते. त्याला ‘झिरोडर्मा’ म्हणतात.
- टायफॉईड, कॉलरा, जुलाब हे आतडयाचे रोग आहेत.
- ‘ड’ जीवसत्वाच्या अभावामुळे ‘मुडदूस’ रोग होतो.
- रोगी व्यक्तीच्या सहवासामुळे होणाऱ्या रोगांना साथीचे रोग म्हणतात.
आरोग्यशास्त्र मध्ये विचारले जाणारा संभाव्य प्रश्न आणि त्याची उत्तरे
१. कोणत्या आदिजीवांमुळे मलेरिया हा रोग होतो?
उत्तर :मलेरिया रोग प्लासमोडिअम या आदिजीवांमुळे होतो.
२. पालेभाज्यांपासून आपल्याला काय मिळते ?
उत्तर :पालेभाज्यांपासून क्षार व जीवनसत्वे मिळतात.
३. ‘ई’ जीवसत्वाच्या अभावामुळे काय होते?
उत्तर : ‘ई’ जीवसत्वाच्या अभावामुळे वांझपणा येतो.
४. संतृप्त स्निग्ध पदार्थांचे अधिक सेवन केल्याने काय होते?
उत्तर : संतृप्त स्निग्ध पदार्थांचे अधिक सेवन केल्याने मधुमेह, धमनीकाठिण्य, उच्च रक्तदाब इ.रोग होतात.
५. अन्नपदार्थ जास्त काल टिकवण्यासाठी काय करावे?
उत्तर :वाळवणे, थंड जागी ठेवणे, आरवणे अशा पध्दतींनी अन्नपदार्थ टिकवतात.
६. रोगांना कारणीभूत ठरणाऱ्या सूक्ष्मजीवांना काय म्हणतात?
उत्तर :रोगांना कारणीभूत ठरणाऱ्या सूक्ष्मजीवांना रोगजंतू म्हणतात.
७. कोणत्या तेलबियांत स्निग्ध पदार्थाचे प्रमाण अधिक असते?
उत्तर :भुईमूग, करडई यासारख्या तेलबियांत स्निग्ध पदार्थाचे प्रमाण अधिक असते.
८. थायमिन (ब-१) च्या अभावामुळे कोणता रोग होतो?
उत्तर :थायमिन (ब-१) च्या अभावामुळे बेरी-बेरी नावाचा रोग होतो.
९.कीटकांच्या माध्यमातूनही रोगप्रसार होण्याची शक्यता असते?
उत्तर : डास, पिसू व काही कीटकांच्या माध्यमातूनही रोगप्रसार होतो.
१०. कोणत्या प्रतिजैविकांमुळे घटसर्प, न्युमोनिया इ.रोगजंतू मरतात?
उत्तर : पेनिलिसीन प्रतिजैविकांमुळे घटसर्प, न्युमोनिया इ.रोगजंतू मरतात
११. जिभेच्या विविध भागांच्या चवी काय आहेत?
उत्तर :जिभेचा शेंडा – गोड चव. ओळखतो तर जिभेच्या कडा – खारट व आंबट चव समजतात तसेच जिभेच्या पाठीमागील भाग – कडू चव. ओळखतो.
१२. कोणता डास चावल्याने हत्तीरोग होतो?
उत्तर :हत्तीरोग क्युलेक्स नावाचा डास चावल्याने होतो.
१३. व्यक्तींच्या आहाराचे प्रमाण कशावर अवलंबून असते?
उत्तर :व्यक्तींच्या आहाराचे प्रमाण तिच्या कामाच्या स्वरूपावर अवलंबून असते.
१४. पेलाग्रा हा रोग कशाच्या अभावामुळे उद्भवतो?
उत्तर :पेलाग्रा हा रोग नायसीन (ब-३) च्या अभावामुळे उद्भवतो.
१५. जीवाणूंमुळे होणारे रोग कोणते आहेत.?
उत्तर :घटसर्प, मेनिंजायटिस, कॉलरा, क्षय, विषमज्वर इ. जीवाणूंमुळे होणारे रोग आहेत.
१६. विषाणूंमुळे होणारे रोग कोणते आहेत?
उत्तर :पोलिओमायेलायटिस, गोवर, कांजिण्या, हगवण, सर्दी इ. विषाणूंमुळे होणारे रोग आहेत.
१७. कर्करोगात कोणत्या पेशींची अमर्यादित वाढ होते?
उत्तर :कर्करोगात पांढऱ्या पेशींची अमर्यादित वाढ होते.
१८. अन्नघटकांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या विकारांना काय म्हणतात?
उत्तर :अन्नघटकांच्या कमतरतेमुळे काही विकार होतात, त्यांना त्रुटीजन्य विकार म्हणतात.
१९. गाजर, पपई, हिरव्या पालेभाज्या, दूध यांमध्ये कोणते जीवनसत्व अधिक असते?
उत्तर :गाजर, पपई, हिरव्या पालेभाज्या, दूध यांमध्ये ‘ए’ जीवनसत्वाचे प्रमाण जास्त असते.
२०. डी’ जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे होणारे आजार कोणते?
उत्तर :‘डी’ जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे पायाची हाडे वाकणे, पाठीचा बाक येणे इ.आजार होतात.
Read More:- MIDC Full Information In Marathi | महाराष्ट्रातील औद्योगिक संस्था संपूर्ण माहिती जाणून घ्या
२१. ‘क’ जीवसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो?
उत्तर :‘क’ जीवसत्वाच्या अभावामुळे ‘स्कर्ही’ हा रोग होतो.
२२. लोहाच्या अभवामुळे कोणता रोग होतो?
उत्तर : लोहाच्या अभवामुळे रक्तक्षय (अॅनिमिया) होतो.
२३.कुष्ठरोगाच्या जीवाणूंचा शोध कोणी लावला?
उत्तर :डॉ.हन्सन यांनी कुष्ठरोगाच्या जीवाणूंचा शोध लावला.
२४. पांढऱ्या पेशी चे काय काय असते?
उत्तर :पांढऱ्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करतात.
२५. ‘बी’ जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे कोणते रोग होतात?
उत्तर :बी’ जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे जीभ लाल होणे, त्वचा खरखरीत होणे इ. आजार होतात.
२६. सी ’ जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे कोणते रोग होतात?
उत्तर :सी’ जीवनसत्वांच्या कमतरतमुळे हिरडयांतून रक्त जाणे इ. आजार होतात.
All Important Arogyashastra Questions And Answers PDF Download | Arogya Shastra PDF
All Important Arogyashastra Questions And Answers PDF Download:- आपण या पोस्ट मध्ये Arogyashastra Health Science वर आधारीत भरती परीक्षे यामध्ये विचारले जाणार महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरांची माहीती सविस्तर पणे बघितली आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.
Conclusions
Arogya Shastra PDF, All Important Arogyashastra Questions And Answers PDF Download:- आपण ह्या आर्टिकल मध्ये Arogyashastra Health Science भरती महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरांची माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांनाArogyashastra मधले महत्वाचे भरती महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरांची माहिती यांची अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता
FAQ Frequently Asked Questions For Arogya Shastra In Marathi
Ans:शारीरिक, मानसिक, सामाजिक दृष्टिने व्यवस्थित आणि रोगमुक्त असण्याची अवस्था म्हणजेच आरोग्य होय आणि ह्या बद्दल शास्त्रोक्त माहिति म्हणजेच आरोग्यशास्त्र होय.
Q.2 आरोग्य शिक्षण कसे द्यावे?
Ans:आरोग्य शिक्षण हे शालेय जीवनामध्ये अभ्यासक्रम मध्ये असतेच तसे तुम्ही चांगल्या सवयी लावून आरोग्य शिक्षण देऊ शकता.
Q.3 आपण निरोगी व्यक्तीची व्याख्या कशी करू शकता?
Ans:संपूर्ण शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कल्याणाची स्थिती म्हणजेच निरोगी व्यक्ती होय.
Related Posts:
- Arogya Vibhag Bharti 2024 | महाराष्ट्र आरोग्य विभागा…
- Vitamin Chart in Marathi PDF Download | विटामीन ची…
- New Barakhadi Marathi PDF Download 2023 | मराठी…
- All MPSC Buddhimatta Chachani Questions PDF Download…
- Indian Army B.Sc Nursing 2024 | भारतीय सैन्यामध्ये…
- Panchvarshiya Yojana |Five Year Plans of India (From…