Advertisement

Swami Vivekananda Information In Marathi PDF | स्वामी विवेकानंद च्या आयुष्याबद्दल सर्व माहिती जाणून घ्या

swami vivekananda information in marathi

Swami Vivekananda Information In Marathi:- Swami Vivekananda was a great personality and philosopher thinker. Also, his work was huge so it is necessary to see extended information about his education, social work, and introduction of Hindu culture to the western world. While preparing for a competitive exam. It is important to see their data. In this article, we will see detailed information about Swami Vivekanand Information in Marathi (Swami Vivekanand Quotes in Marathi).

Swami Vivekananda Information In Marathi

Swami Vivekananda Information In Marathi :- स्वामी विवेकानंद हे एक महान व्यक्तिमत्व आणि तत्वज्ञ विचारवंत होते .तसेच त्यांचे कार्य खूप मोठे होते त्यामुळे त्यांचे शिक्षण ,सामाजिक कार्य ,पाश्चत्य जगाला हिंदू संस्कृती ची करून दिलेली ओळख यांची विस्तारित माहिती पाहणे आवश्यक ठरते .स्पर्धा परीक्षा तयारी करताना यांची माहिती पाहणे महत्वाचे आहे .आमच्या या लेखामध्ये स्वामी विवेकानंद मराठी माहिती (Swami Vivekanand Information in Marathi) या बद्दल विस्तारित माहिती आपण पाहुयात.

Read More:- Marathi Leave Application Letter Example And Format PDF – शाळेच्या, कंपनी रजेचा अर्ज कसा लिहायचा

स्वामी विवेकानंद यांच्या जीवना विषयी माहिती – Swami Vivekananda Details

  • नाव :- स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव नरेंद्र विश्वनाथ दत्त असे होते.
  • जन्म :- त्यांचा जन्म  १२ जानेवारी १८६३ रोजी झाला.
  • मूळ गाव :- ते मूळचे पश्चिम बंगाल चे रहिवासी असून जन्म कोलकाता येथील सिमलापल्ली मध्ये झाला.
  • वडिलांचे नाव :- वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त असे होते ते कोलकाता उच्च न्यायालयामध्ये वकील म्हणून काम पाहत होते.
  • छंद :- स्वामी विवेकानंदाना साहित्य, संगीत कला आणि तत्त्वज्ञान या क्षेत्रांत विशेष रस होता.
  • निधन :- ४ जुलै १९०२

Read More:- All Arj In Marathi With Format & Example | सर्व अर्जांची सविस्तर माहिती नमुने आणि उदाहरणे

बालपण – Swami Vivekanand Early Life

  • स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी १८६३ रोजी कोलकाता मधल्या सिमलापल्ली येथे झाला .
  • त्याच नाव नरेंद्र असे ठेवण्यात आले सुरवाती पासूनच त्यांच्या साहित्य ,धर्म आणि तत्वज्ञान यांच्याशी जवळचा संबंध आला
  • लहान असताना त्यांनी बेनी गुप्ता आणि अहमद खान यांच्या कडून शास्त्रीय संगीत शिकले .
  • इतकाच नव्हे तर शारीरिक व्यायाम प्रकार आणि इतर स्पर्धा प्रकारांमध्ये ते निपूण होते .
  • स्वामी विवेकानंदाना लहान पानापासून वाचनाची खूपच आवड होती .

शिक्षण – Swami Vivekananda Education

  • त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण  ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूशनमध्ये घेतले .
  • पुढच्या शिक्षणासाठी त्यांनी  प्रेसिडेन्सी कॉलेजला प्रवेश घेतला .
  • पुढे तर्कशास्त्र, इतिहास, पाश्चात्त्य तत्त्वज्ञान या विषयांसाठी जनरल असेम्ब्लीज इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला
  • १८८१ मध्ये ते फाइन आर्टची परीक्षा उत्तीर्ण झाले. तसेच त्यांनी बी.ए. चे शिक्षण १८८४ साली पूर्ण केले.
  • शिक्षण चालू असताना त्यांनी बारूच स्पिनोझा, इमॅन्युएल कान्ट, डेव्हिड ह्यूम, गोत्तिलेब फित्शे, जॉर्ज हेगेल, आर्थर शोपेनहायर, ऑगस्ट कोम्ट, जॉन स्टुअर्ट मिल, चार्ल्स डार्विन, स्पेन्सर इ. विचारवंत आणि तत्वज्ञानी  यांचा सुद्धा अभ्यास केला .
  • तसेच त्यांनी बंगाली आणि प्राचीन संस्कृत साहित्य सुद्धा अभ्यास केला होता.

Read More:- Vibhakti In Marathi PDF Download | विभक्ती आणि त्याच्या प्रकाराची संपूर्ण माहिती

रामकृष्ण परमहंस यांच्याशी भेट

  • स्वामी विवेकानंदाचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांचं अध्यात्मिक ज्ञान खूपच जास्त होत त्यांना देव आहे का या प्रश्नाचं उत्तर हवं होत .
  • या प्रश्नच उत्तर मिळवण्यासाठी गुरु च्या शोधात ते होते महर्षि देवेंद्रनाथ ठाकूर यांच्यासमवेत काही काळ होते .
  • यानंतर ते रामकृष्ण परमहंस याना भेटले आणि इथून पुढे धर्म प्रसाराला सुरवात झाली .
  • त्यांनी रामकृष्ण परमहंस यासमवेत काशीपूरच्या उद्यानात साधना केली आणि आत्मिक अनुभव प्राप्त केला.
  • त्यांच्या अफाट बुद्धिमत्ते मुले त्यांना श्रुतीधर या नावाने सुद्धा ओळखले जाऊ लागले .

अध्यात्मिक कार्य – Spritual Work

  • स्वामी विवेकानंदानी अध्यंत्मिक क्षेत्रामध्ये खूप मोठे योगदान दिले आहे रामकृष्ण परमहंस यांच्या समाधी नंतर त्यांनी रामकृष्ण मठाची स्थापना केली.
  • या मठाची स्थापना त्यांनी कोलकाता मध्ये गुरुबंधू तारकानाथ यांच्या मदतीने केली तसेच मठ मध्ये रामकृष्ण परमहंस ययांनी वापरारलेलं वस्तू तसेच अस्थी कलश ठेवले.
  • यानंतर रामकृष्ण मिशन चे कार्य आणि धर्मप्रसार करण्यासाठी त्यांनी भारत भ्रमण केले .
  • देश मध्ये अध्यात्मिक बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन, देशसेवा, धर्म जागृती अशी अनेक कार्ये त्यांनी केली .
  • अद्वैत ब्रम्हज्ञान हेच मानवी जीवनाचे अत्युच्च शिखर आहे असा संदेश त्यांनी सर्वात पोहोचवला.

Read More:- All Marathi Letter Writing With Format & Example | सर्व मराठी पत्र लेखन माहिती

स्वामी विवेकानंद ह्यांचा शिकागो चा प्रवास – Swami Vivekananda’s Journey to Chicago

1893 मध्ये स्वामी विवेकानंदांचा शिकागोला झालेला प्रवास ही भारतीय आणि जागतिक धर्माच्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना आहे. त्या वेळी, विवेकानंद एक तरुण भिक्षू आणि प्रसिद्ध भारतीय गूढवादी, श्री रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य होते.

विवेकानंदांना भारतातील अध्यात्मिक आणि तात्विक परंपरांमध्ये खोल रस होता आणि ते या अंतर्दृष्टी जगाशी शेअर करण्यास उत्सुक होते. त्यांनी यापूर्वीच भारतातील एक उत्कृष्ट वक्ता आणि शिक्षक म्हणून नावलौकिक मिळवला होता आणि त्यांना शिकागो येथील जागतिक धर्म संसदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते, जे जागतिक कोलंबियन प्रदर्शनाचा भाग होते.

विवेकानंद ३० जुलै १८९३ रोजी शिकागोला पोहोचले, त्यांनी युरोप आणि युनायटेड स्टेट्समधून लांब आणि कठीण प्रवास करून. सुरुवातीला काय अपेक्षा करावी याबद्दल तो अनिश्चित होता, कारण त्याने यापूर्वी कधीही भारताबाहेर प्रवास केला नव्हता आणि पाश्चात्य संस्कृतीशी परिचित नव्हता.

तथापि, विवेकानंदांनी लवकरच धर्म संसदेतील प्रतिनिधी आणि उपस्थितांवर जोरदार छाप पाडली. आपल्या सुरुवातीच्या भाषणात, त्यांनी “अमेरिकेच्या बहिणी आणि बंधू” या शब्दांनी उपस्थितांना अभिवादन केले, ज्याने लगेचच त्यांचे हृदय आणि मन जिंकले. संसदेदरम्यान, विवेकानंदांनी हिंदू धर्म आणि त्याच्या तात्विक शिकवणींवर अनेक व्याख्याने दिली, ज्यात धर्माच्या सार्वत्रिकतेवर आणि विविध धर्मांमधील सहिष्णुता आणि परस्पर आदराची आवश्यकता यावर जोर दिला.

विवेकानंदांची भाषणे मोठ्या प्रमाणावर प्रशंसनीय झाली आणि त्यांना प्रतिनिधी आणि उपस्थितांकडून तसेच मोठ्या प्रमाणात अमेरिकन जनतेकडून खूप आदर आणि प्रशंसा मिळाली. ते एक लोकप्रिय वक्ता आणि शिक्षक बनले, त्यांनी देशभर प्रवास केला आणि न्यूयॉर्कच्या वेदांत सोसायटीची स्थापना केली, ज्याने युनायटेड स्टेट्समध्ये वेदांत तत्त्वज्ञानाचा अभ्यास आणि अभ्यासाला प्रोत्साहन दिले.

विवेकानंदांचा शिकागोचा प्रवास हा आंतरधर्मीय संवाद आणि समजूतदारपणाच्या इतिहासात तसेच पूर्वेकडील तत्त्वज्ञान आणि पश्चिमेकडील अध्यात्माचा प्रसार यातील एक महत्त्वाचा क्षण होता. त्यांची शिकवण आजही जगभरातील लोकांना प्रेरणा देत आहे.

Read More:- 1600+ Samanarthi Shabd Marathi PDF Download | मराठी समानार्थी शब्द

जगभरामध्ये धर्मप्रसार – Swami Vivekananda Information In Marathi

  • त्यांनी संपूर्ण जगभरमध्ये धर्म प्रसार करण्यासाठी विदेश भ्रमण केले या मध्ये शिकागो येथील सभा प्रसिद्ध आहे .
  •  ११ सप्टेंबर १८९३ रोजी शिकागो आर्ट इन्स्टिट्यूट मध्ये सर्व धर्मीय परिषद भरली होती या सभेमध्ये विवेकानंद हे हिंदू वेदिक धर्माचे ते प्रतिनिधित्व करीत होते..
  • सभेमध्ये भाषण देताना स्वामी विवेकानंद यांनी अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो अशी सुरवात केली ज्या मुळे सभागृहमध्ये सगळे जण जवळ जवळ २ मिनिट टाळ्या वाजवत होते .
  • त्यांची हि सभा खूपच लोकप्रिय झाली त्या मुले अमेरिकेतील पत्रकार आणि जाणकार  यांनी त्यांचे भारतातून आलेला एक वादळी व्यक्तिमत्त्वाचा संन्यासी”(Cyclonic Monk From India) असे वर्णन केले होते.
  • स्वामी विवेकानंद ची भगिनी निवेदिता यांच्याशी याच दरम्यान भेट झाली आणि शिष्य झाली .

मृत्यू – Swami Vivekananda Death

  • स्वामी विवेकानंदानी खूपच कमी वयात म्हणजे वयाच्या ३९व्य वर्षी मृत्यूने गाठले.
  • त्यांचा मृत्यू ४ जुलै १९०२ रोजी रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी झाला म्हणजेच त्यांनी समाधी घेतली.
  • त्यांच्या आठ्वणीउसाठी कन्याकुमारी येथे समुद्र मध्ये त्यांचे स्मारक उभारण्यात आलेले आहे.

Read More:-

Swami Vivekananda Life Journey – जीवन प्रवास

Swami Vivekananda Life Journey (जीवन प्रवास):- स्वामी विवेकानंदाची जीवन शैली ही चांगली होती. त्यांनी देश विदेशात जाऊन धर्माचा प्रसार केला. त्यांच्या जीवनाची माहिती ही खालील अत्यंत संक्षिप्त स्वरूपात दिलेली आहे. त्यांचा जन्मापासून ते मृत्यू पर्यन्त संपूर्ण महत्त्वाचे तारीख आणि प्रसंग दिलेले आहे.

  • 12 मध्ये जानेवारी 1863 कलकत्ता येथे जन्म झाला.
  • 1879 मध्ये प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्रवेश झाला.
  • 1880 मध्ये महासभा संस्थेत प्रवेश केला होता.
  • नोव्हेंबर 1881 श्रीरामकृष्णासोबत पहिली भेट झाली.
  • 1882-86 मध्ये श्री रामकृष्णाशी संबंधित आला.
  • 1884 मध्ये पदवीधर परीक्षा उत्तीर्ण; वडिलांचा मृत्यू झाला.
  • 1885 मध्ये श्री रामकृष्ण यांचा शेवटचा आजार झाला.
  • 16 ऑगस्ट 1886 रोजी श्री रामकृष्ण यांचे निधन झाले.
  • 1886 मध्ये राह नगर मठाची स्थापना केली.
  • जानेवारी 1887 मध्ये वराह नगर मठात संन्यासाचे औपचारिक व्रत केले.
  • 1890-93 मध्ये परिव्राजक म्हणून भारत दौरा केला होता.
  • 25 डिसेंबर 1892 रोजी कन्याकुमारी येथे होते.
  • 13 फेब्रुवारी 1893 रोजी सिकंदराबाद येथे पहिले जाहीर व्याख्यान झाले.
  • 31 मे 1893 रोजी मुंबई सोडून अमेरिकेला गेले.
  • 25 जुलै 1893 रोजी कॅनडातील व्हँकुव्हर येथे आगमन झाले.
  • 30 जुलै 1893 रोजी शिकागो येथे आगमन झाले.
  • ऑगस्ट 1893 हार्वर्ड विद्यापीठाचे प्रा. जॉन राइटशी भेट
  • 11 सप्टेंबर 1893 रोजी, जागतिक धर्म परिषदेत पहिले व्याख्यान, शिकागो
  • 27 सप्टेंबर 1893 रोजी, जागतिक धर्म परिषदेत अंतिम व्याख्यान, शिकागो
  • 16 मे 1894 मध्ये हार्वर्ड विद्यापीठात भाषण0
  • नोव्हेंबर 1894 मध्ये न्यूयॉर्कमध्ये वेदांत समितीची स्थापना.
  • जानेवारी 1895 मध्ये न्यूयॉर्कमध्ये धार्मिक वर्ग सुरू झाले.
  • ऑगस्ट 1895 मध्ये पॅरिसमध्ये गेले होते.
  • ऑक्टोबर 1895 मध्ये लंडनमध्ये व्याख्यान दिले.
  • 6 डिसेंबर 1895 मध्ये न्यूयॉर्कला परत गेले.
  • मार्च 22-25, 1896 मध्ये लंडनला परत गेले.
  • मे-जुलै 1896 मध्ये हार्वर्ड विद्यापीठात व्याख्यान दिले.
  • 15 एप्रिल 1896 मध्ये लंडनला परत आले.
  • मे-जुलै 1896 मध्ये लंडनमधील धार्मिक वर्ग भरला.
  • मे 28, 1896 मध्ये ऑक्सफर्ड येथे मॅक्स म्युलरशी भेट झाली
  • डिसेंबर 30, 1896 मध्ये नेपल्स ते भारत भ्रमण झाले.
  • 15 जानेवारी 1897 मध्ये कोलंबो, श्रीलंकेत आगमन झाले.
  • 6-15 फेब्रुवारी 1897 मध्ये मद्रासमध्ये गेले होते.
  • 19 फेब्रुवारी 1897 मध्ये कलकत्ता येथे आगमन झाले.
  • 1 मे 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना झाली.
  • मे-डिसेंबर 1897 मध्ये उत्तर भारताला भेट दिली.
  • जानेवारी 1897 मध्ये कलकत्त्याला परत आले.
  • 19 मार्च 1899 मध्ये मायावतींच्या अद्वैत आश्रमाची स्थापना झाली.
  • 20 जून 1899 मध्ये पश्चिमेला दुसरी भेट झाली.
  • 31 जुलै 1899 मध्ये न्यूयॉर्कमध्ये आगमन झाले.
  • 22 फेब्रुवारी 1900 मध्ये सॅन फ्रान्सिस्को येथे वेदांत समितीची स्थापना झाली.
  • जून 1900 मध्ये न्यूयॉर्कमधील शेवटचा वर्ग झाला.
  • 26 जुलै 1900 मध्ये रोप सोडला.
  • 24 ऑक्टोबर 1900 मध्ये व्हिएन्ना, हंगेरी, कुस्तुनतुनिया, ग्रीस, इजिप्त इत्यादी देशांना भेट दिली.
  • 26 नोव्हेंबर 1900 मध्ये भारतासाठी रवाना झाले.
  • 9 डिसेंबर 1900 मध्ये त्यांचे बेलूर मठ येथे आगमन झाले.
  • जानेवारी 1901 मध्ये मायावतींची भेट दिली.
  • मार्च-मे 1901 मध्ये त्यांनी पूर्व बंगाल आणि आसामची तीर्थयात्रा केली
  • जानेवारी-फेब्रुवारी 1902 मध्ये बोधगया आणि वाराणसीला भेट दिली.
  • मार्च 1902 मध्ये ते बेलूर मधील मठात परत आले.
  • 4 जुलै 1902 मध्ये त्यांनी महासमाधी म्हणजे त्यांचे निधन झाले.

Read More:- Gram Sevak Information In Marathi PDF Download | ग्रामसेवकाची संपूर्ण माहिती मराठी मध्ये

Swami Vivekanand Quotes in Marathi – स्वामी विवेकानदांचे संदेश/ विचार

Swami Vivekanand Quotes in Marathi:- स्वामी विवेकानद हे थोर विचारवंत आणि अत्यंत हुशार असे व्यक्तिमहत्तव होते. त्याने अनेक वेळा त्यांनी महत्तवाचे म्हत्तावाचे संदेश आणि विचार प्रकट केले आहेत. ते विचार/ संदेश हे आज च्या पिढीतील तरुणांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. त्या पैकी खाली काही त्यांचे संदेश देण्यात आलेले आहे.

  1. “जे कोणत्याही पार्थिव वस्तूमुळे विचलित होत नाही, त्या व्यक्तीला अमरत्व प्राप्त झाले आहे.”
  2. “हृदयाचे आणि मनाच्या संघर्षात हृदय ऐका.”
  3. “आग आपल्याला उष्णता देते, आपला नाश देखील करते, हा अग्निचा दोष नाही.”
  4. “जेव्हा तुम्ही व्यस्त असता तेव्हा सगळं सोपं वाटतं. पण जेव्हा तुम्ही आळशी असता तेव्हा काहीच सोपं वाटत नाही.”
  5. “आकांक्षा, अज्ञान आणि असमानता – हे गुलामांचे त्रिमूर्ती आहेत.”
  6. “कोणीही तुम्हाला शिकवू शकत नाही, कोणीही तुम्हाला आध्यात्मिक बनवू शकत नाही.”

हे काही त्यांनी दिलेले विचार आणि संदेश होते.

Read More:- Samuh Darshak Shabd PDF Download | सर्व समूहदर्शक शब्दांची माहिती (Collective Words)

Swami Vivekananda Information In Marathi PDF

Pandita Ramabai Information In Marathi PDF Download :- स्वामी विवेकानंद आत्मचरित्र pdf मराठी बहुतेक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विध्यार्थीयांना करताना किंवा इतर मित्रसोबत शेअर करण्यासाठी PDF File Download करण्यासाठी पाहिजे असते. त्यांच्यासाठी आम्ही फाइल डाउनलोड करता यावी म्हणून खाली फाइल दिली आहे. त्या साथी तुम्ही खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

Conclusion For Swami Vivekananda Information In Marathi

Conclusion:- ह्या आर्टिकल मध्ये आपण सर्वानी बघितले की स्वामी विवेकानंदा त्यांच्या आयुष्यात केलेले सामाजिक कार्य, आणि Swami Vivekanand Biography In Marathi, Swami Vivekanand Early Life,Swami Vivekanand Education, Swami Vivekanand Philosophy, Swami Vivekanand and Ramkrushna Paramhans, Swami Vivekanand Spiritual Work, Swami Vivekananda Death, Swami Vivekanand Ashram हे सर्व आपण ह्या आर्टिकल मध्ये बघितले आहे. त्यांची Swami Vivekanand Bharat Bhraman हे पण आपण बघितले आहे. ह्या सर्व महत्वाचे मुद्दे सर्व एका एकत्र पीडीएफ मध्ये Swami Vivekananda Information In Marathi PDF Download मध्ये आपण बघितले आहे.

Frequently Asked Questions For Swami Vivekananda Information In Marathi

Q1. स्वामी विवेकानंद यांनी कशाची स्थापना केली ?

स्वामी विवेकानंद यांनी 1 मे 1897 रोजी रामकृष्ण मिशनची स्थापना झाली. आणि नोव्हेंबर 1894 मध्ये न्यूयॉर्कमध्ये वेदांत समितीची स्थापना केली.

Q2. स्वामी विवेकानंद यांचे योगदान ?

स्वामी विवेकानंदानी अध्यंत्मिक क्षेत्रामध्ये खूप मोठे योगदान दिले आहे रामकृष्ण परमहंस यांच्या समाधी नंतर त्यांनी रामकृष्ण मठाची स्थापना केली .

Q3. स्वामी विवेकानंद यांचा मृत्यू कधी झाला?

स्वामी विवेकानंद यांचा मृत्यू ४ जुलै १९०२ रोजी रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी झाला म्हणजेच त्यांनी समाधी घेतली.

Q4. स्वामी विवेकानंद यांनी कोणते पुस्तक लिहिले ?

स्वामी विवेकानंद यांनी राजयोग, जनयोग. मनाची शक्ति, टिचींग ऑफ स्वामी विवेकानंद, ध्यान आणि त्याच्या पद्धती इत्यादि पुस्तके लिहलेले आहेत.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages