Advertisement

All 1600+ Samanarthi Shabd Marathi PDF Download | मराठी समानार्थी शब्द

Samanarthi Shabd Marathi

Samanarthi Shabd Marathi:- SYNONYMS in English means the SYNONYMS word of the word we use. Questions on Marathi Samanarthi Shabd PDF Download are asked in almost all exams while preparing for competitive exams. For this reason, it is very important to understand the information without just reading it. It is necessary to understand the different types of words in it.

Samanarthi Shabd Marathi

समानार्थी शब्द म्हणजेच इंग्लिश मध्ये Synonyms  हे शब्द आपण वापरलेल्या शब्दाच्या समान अर्थाचा शब्द दर्शवतात. स्पर्धा परीक्षा तयारी करताना जवळ जवळ सर्वच परीक्षांमध्ये यावर प्रश्न विचारले जातात. याच कारणामुळे ह्याची माहिती नुसती वाचून न काढता ती समजून घेणे खूपच महतवाचा ठरत या मध्ये असलेले शब्दांचे विविध प्रकार समजून घेणे गरजेचं आहे.

Read More :-2000+ Virudharthi Shabd In Marathi PDF Download – मराठी विरुद्धार्थी शब्द

Meaning Of Marathi Samanarthi Shabd | समानार्थी शब्द म्हणजे काय ?

Meaning Of Marathi Samanarthi Shabd:- एकाच भाषेतील दोन किंवा अधिक शब्द किंवा अभिव्यक्तींपैकी एक ज्याचा काही किंवा सर्व अर्थांमध्ये समान किंवा जवळजवळ समान अर्थ आहे अशा शब्दांना समानार्थी शब्द म्हणतात.

उदारणार्थ :- अग्नी = आग , अनल , विस्तव , वन्ही , अंगार , पावक , हुताशन , शिखी

समानार्थी शब्द – Samanarthi Shabd In Marathi

Samanarthi Shabd Marathi :- मराठी शब्दकोशातील सर्व शब्दांचे समानार्थी शब्द शिकणे एखाद्या व्यक्तीसाठी कठीण जाते किंवा हा विषय विस्तृत आहे. तसेच, असे अनेक समानार्थी शब्द आहेत जे आपण आपल्या दैनंदिन जीवनात वापरतो परंतु आपल्यापैकी काहींना इतर अनेक शब्दांचे समानार्थी शब्द माहित नसतील. तुमच्या संदर्भासाठी, आम्ही या लेखात 1500+ समानार्थी शब्द तयार केले आहेत, वाचा आणि काही नवीन शब्द त्यांच्या समान अर्थांसह समजून घेण्याचा प्रयत्न करा.

या लेखाद्वारे, तुम्ही मराठी व्याकरणात वापरलेले अनेक समानार्थी शब्द शिकू शकाल आणि यामुळे तुमचा शब्दसंग्रह निश्चितपणे वाढेल, विशेषत: जेव्हा तुम्ही बँक परीक्षा, एसएससी परीक्षा, यूपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल जिथे तुम्हाला मराठी विषयाची तयारी करावी लागेल.आणि हिथे तुम्हाला महत्वाचे गुण मिळवण्यास मदत होईल .

Read More:- Vasudev Balwant Phadke Information In Marathi PDF Download। वासुदेव बळवंत फडके बद्दल सर्व माहिती

1600+ Samanarthi Shabd in Marathi List | 1600+ समानार्थी शब्दांची यादी

Samanarthi Shabd Marathi List :- ह्या 1600+ समानार्थी शब्दांच्या यादी मध्ये तुम्हाला सर्व मुळाक्षरांचे समानार्थी शब्दांची ह्या यादी मध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्या नुसार तुम्हाला प्रत्येक शब्दाचे समानार्थी शब्द बघता येतील. ह्या सर्व Marathi samanarthi shabd ची यादी तुम्हाला हि pdf मध्ये खालील प्रमाणे आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. ती तुम्ही डाउनलोड करून तुम्ही तुमचा अभ्यास नीट पणे करता येणार आहे.

 • अंक = आकडा
 • अकल्पित = एकाएकी घडणारे
 • अक्षय = नाश न पावणारे
 • अखंडित = सतत चालणारे
 • अंग = शरीर
 • अंगण = आवार
 • अगणित = असंख्य , अमर्याद
 • अगत्य = आस्था
 • अगम्य = न समजू शकणारे
 • अंगार = निखारा
 • अग्नी = आग , अनल , विस्तव , वन्ही , अंगार , पावक , हुताशन , शिखी
 • अग्र = टोक
 • अग्रज = आधी जन्मलेला
 • अग्रपूजा = पहिली पूजा
 • अंघोळ = स्नान
 • अचंबा = आश्चर्य , नवल
 • अचल = स्थिर, शांत, पर्वत
 • अडचण = समस्या
 • अंडज = पक्षी
 • अंत = शेवट
 • अंतरिक्ष = अवकाश
 • अतिथी = पाहुणा
 • अंतिम = शेवटचे
 • अत्याचार = अन्याय, जुलूम
 • अधनय्य = अजाण
 • अधर = ओठ, ओष्ट
 • अंधार = काळोख , तिमीर , तम
 • अध्ययन = शिकणे
 • अध्यापन = शिकवणे
 • अनरुत = खोटे
 • अनर्थ = संकट
 • अनल = अग्नी, विस्तव: पावक, वन्ही
 • अना = आणि
 • अनाथ = पोरका
 • अनुग्रह = कृपा
 • अनुज = नंतर जन्मलेला
 • अन्न = आहार , खाद्य
 • अपघात = दुर्घटना
 • अपमान = मानभंग
 • अपराध = गुन्हा , दोष
 • अपाय = इजा
 • अपाय = त्रास, इजा
 • अपेक्षाभंग = हिरमोड
 • अंबर = वस्त्र
 • अभिनंदन = गौरव
 • अभिनय = हावभाव, अंगविक्षेप
 • अभिनेता = नट
 • अभिमान = गर्व
 • अभियान = मोहीम
 • अभिवादन = नमस्कार , वंदन , प्रणाम
 • अभ्यास = सराव , परिपाठ , व्यासंग
 • अभ्युदय = भरभराट
 • अमित = असंख्य, अगणित, अपार
 • अमृत = पियुष, सुधा, संजीवनी, अपार
 • अरण्य = वन , जंगल , कानन , विपिन
 • अर्जुन = पार्थ, धनंजय, फाल्गुन
 • अवघड = कठीण
 • अवचित = एकदम, अचानक
 • अवतरण = खाली येणे
 • अवर्षण = दुष्काळ
 • अविरत = सतत , अखंड
 • अश्रू = आसू
 • अश्व = घोडा, हय, तुरग, वारू, वाजी
 • अस्थीपंजर = हाडांचा सापळा
 • अहंकार = गर्व
 • अहर्निश = रात्रंदिवस
 • अही = साप , भुजंग , सर्प , व्याळ , पन्नग , फनी
 • आई = माता, जननी, माऊली, माय, मातोश्री, जन्मदात्र, जन्मदा ,
 • आकालीन = अयोग्य वेळचे
 • आकाश = आभाळ , गगन , नभ , अंबर , आवकाश , अंतरीक्ष , व्योम , ख , अंतराळ , वियत , वितान
 • आगमन = येणे
 • आगामी = येणारे
 • आजारी = पीडित , रोगी
 • आज्ञा = आदेश , हुकूम
 • आठवडा = सप्ताह
 • आठवण = स्मरण , स्मृती , सय
 • आतुरता = उत्सुकता
 • आदर = मान
 • आंदोलन = चळवळ
 • आनंद = हर्ष , तोष , मोद , संतोष , प्रमोद , उल्हास , उद्धव
 • आपत्ती = संकट
 • आपुलकी = जवळीकता
 • आभाळ = आकाश
 • आयुध = शस्त्र
 • आयुष्य = जीवन , हयात
 • आरंभ = सुरवात
 • आरसा = दर्पण , मुकुर , आदर्श
 • आराधना = प्रार्थना
 • आरोपी = गुन्हेगार , अपराधी
 • आरोहण = वर चढणे
 • आला = निरबंध
 • आळशी = कुजर , निरुद्योगी , ऐदी , आळसट
 • आवाज = ध्वनी , रव
 • आवाजमां = आवाजात
 • आवाहन = विनंती
 • आशा = इच्छा, आस, मनीषा,
 • आशीर्वाद = शुभचिंतन
 • आश्चर्य = नवल , अचंबा , विस्मय , अचरथ , आचोज
 • आस = ओढ
 • आसक्ती = लोभ
 • आसन = बैठक
 • आहार = भोजन, खाद्य
 • इच्छा = आकांक्षा , आस , मनीषा , स्पृहा , लिप्सा , अपेक्षा
 • इडपीडा = सर्व प्रकारचा त्रास
 • इतराजी = गैरमर्जी
 • इंद्र = देवेंद्र, नाकेश, शक्र, सुरेंद्र, पुरंदर, वज्रपाणी, वासव, सहस्रक्ष
 • इलाज = उपाय
 • इशारा = सूचना, खून
 • इष्ट = इच्छित
 • इहलोक = मृत्युलोक
 • ईर्षा = चुरस
 • ईश्वर = देव , ईश , निर्जर , परमेश्वर , अलक्ष , सूर , विभूध , अलख , प्रभू , त्रिदश
 • उक्ती = वचन
 • उणीव = कमतरता, न्यून, न्यूनता
 • उत्कर्ष = भरभराट
 • उत्सव = समारंभ , सण , सोहळा
 • उदर = पोट
 • उदरनिर्वाह = चरितार्थ
 • उद्यम = उद्योग
 • उद्युक्त = तयार
 • उपजत = जन्मापासून
 • उपद्रव = त्रास
 • उपद्व्याप =नखटाटोप
 • उपवन = बगीचा, बाग, उद्यान, वाटिका
 • उपांत्य = शेवटच्याच्या आधीचा
 • उपासक=भक्ती करणारा
 • उपासना = भक्ती
 • उपेक्षा = हेळसांड, दुर्लक्ष
 • उबग = वीट
 • उशीर = विलंब
 • उसंत = विश्रांती
 • ऊन = सूर्यप्रकाश
 • ऊर्जा = शक्ती
 • ऋण = कर्ज
 • ऋतू = मोसम
 • ऋषी = तपस्वी , मुनी , साधू , तापस
 • एकजूट = एकी , ऐक्य
 • एकमेव = एकच एक
 • एकाग्रता = एकातानता
 • एतद्देशीय = या देशाचा
 • ऐट = रुबाब , डौल
 • ऐश्वर्य = वैभव
 • ओज = तेजस्वीपणा
 • ओंजळभर = अंजूरभर
 • ओझे = वजन , भार
 • ओढा = झरा , नाला
 • ओतप्रोत = सर्व बाजूंनी पूर्ण
 • ओनामा = सुरूवात
 • ओळख = परिचय
 • औक्षण = ओवाळणे
 • औपचारिक = शिष्टाचार म्हणून केलेले कार्य
 • कंजूष = कृपण
 • कट = कारस्थान
 • कटी = कंबर
 • कटु = कडू
 • कठीण = अवघड
 • कठोर = निर्दय
 • कणव = दया
 • कथा = गोष्ट , कहाणी , हकिकत
 • कनक = सोने, कांचन, हेम
 • कंनडुक = चेंडू
 • कपाळ = ललाट , भाल , कपोल , निढळ , अलिक
 • कमळ = अंबुज, पंकज, नीरज, राजीव, नलिनी, अब्ज, सरोज
 • करमणूक = मनोरंजन
 • करूना = दया
 • कर्मठ = अतिशय धर्मशील
 • कलंक = डाग
 • कल्पतरू = इच्छित गोष्ट देणारा वृक्ष
 • कवळ = घास
 • कविता = काव्य , पद्य
 • कशिदा = भरतकाम
 • कष्ट = श्रम , मेहनत
 • कसब = कौशल्य
 • काक = कावळा
 • काठ = तिर, किनारा, तट
 • कान = कर्ण, श्रवण, श्रोत्र
 • कान = श्रवण
 • काम = कार्य , काज
 • कामधेनू = इच्छित वस्तू देणारी गाय
 • कामना = इच्छा
 • कारा = तुरंत
 • कारागृह = कैदखाना , तुरुंग
 • कार्य = काम
 • कार्यक्षम = कुशल , दक्ष , निपुण , हुशार
 • कालांतराने = दिसामासागे
 • काळ = समय , वेळ , अवधी
 • काळजी = चिंता, फिकीर, विवंचना
 • काळोख = अंधार, तिमिर, तम
 • कावडीचुंबक = अतिशय कंजूस
 • कावळा = काक , एकाक्ष , वायस
 • कावळा = वायस, एकाक्ष, काक
 • काष्ठ = लाकूड
 • काष्ठ = लाकूड
 • कासव = कूर्म , कामट , कमठ , कच्छप , कच्छ
 • किंकर = दास
 • किमया = जादू, चमत्कार
 • किरण = कर, अंशु, रश्मी
 • किल्ला = गड, तट, दुर्ग
 • कीर्ती = प्रसिद्धी , लौकिक , ख्याती
 • कुकर्म = वाईट काम
 • कुचंबणा = घुसमट
 • कुटी = झोपडी
 • कुटीर,कुटी = झोपडी
 • कुटुंब = परिवार
 • कुठार = कुऱ्हाड
 • कुतूहल = उत्सुकता
 • कुत्रा = श्वान
 • कुमक = मदत
 • कुरबुर = कुरकुर
 • कुशल = हुशार , तरबेज
 • कूजन = पक्षाचे गाणे
 • कूर्म = कासव
 • कृपण = कंजूष, चिकू
 • कृश = हडकुळा
 • कृश = हडकूळा
 • कोळिष्टक = जळमट
 • कोवळीक = कोमलता
 • क्षणभंगुर = थोडा काळ टिकणारे
 • क्षत = जखम, व्रण, इजा
 • क्षमा = माफी
 • क्षय = झीज, ऱ्हास
 • क्षीण = अशक्त
 • क्षीर = दूध
 • क्षीरसागर = दुधाचा समुद्र
 • क्षुधा = भूक
 • क्षेम = कल्याण, हित, कुशल
 • क्षोभ = क्रोध
 • खग = पक्षी , विहंग , व्दिज , अंडज , शकुन्त
 • खटाटोप = प्रयत्न
 • खडक = मोठा दगड , पाषाण
 • खडग = तलवार
 • खण = कप्पा
 • खरेपणा = न्यायनीती
 • खल = नीच , दुष्ट , दुर्जन
 • खाटा करणे = आंबवणे
 • खात्री = विश्वास
 • खाली जाणे = अधोगती
 • खिडकी = गवाक्ष
 • खेडे = गाव , ग्राम
 • खोड्या = चेष्टा , मस्करी
 • ख्याती = कीर्ती , प्रसिद्धी , लौकिक
 • गणपती = गजानन, वक्रतुंड, लंबोदर, गजमुख, विघनहर्ता, विनायक, विकट, हेरंब, गणेश, विग्नेश, गौरीनंदन, गौरीसुत, गौरीनंदन, गौरीसुत, व्यंकटेश
 • गंध = वास, परिमळ
 • गनीम = शत्रू, अरी
 • गंमत = मौज , मजा
 • गरज = जरुरी, आवश्यकता, निकड
 • गरवार = गर्भवती
 • गरुड = खगेंद्र , खगेश्वर , ताय , वैनतेय
 • गरुड = खगेंद्र, द्विजराज, वैनतेय
 • गर्व = अहंकार
 • गर्व = अहंकार, ताण
 • गवई = गायक
 • गवत = तृण
 • गवाक्ष = खिडकी
 • गहन = कळण्यास कठीण
 • गाजावाजा झाला = कीर्ती पसरली
 • गाणे = गीत , गान
 • गाय = धेनु, गो, गोमाता
 • गाव = ग्राम , खेडे
 • गुन्हा = अपराध
 • गुलामी = दास्य
 • गूढ = गुप्त गोष्ट
 • गृहिणी = घरधनिन
 • गोड = मधुर
 • गोणी = पोते
 • गोधूम = गहू
 • गोष्ट = कहाणी , कथा
 • गौरव = अभिनंदन, सन्मान
 • ग्रंथ = पुस्तक
 • ग्रस्त = त्रासलेला
 • ग्राम = गाव
 • ग्राहक = गि – हाईक
 • घनिष्ठ = दाट, अगदी जवळचे
 • घर = सदन , गृह , निकेतन , आलय , भवन , निवास , धाम , घृह
 • घरटे = खोपा
 • घवघवीत = भरपूर
 • घागर = घडा , मडके
 • घास = कवळ, ग्रास,
 • घोडा = अश्व , हय , वारू , तुरंग , वाजी
 • घोयका = घोळका , जमाव
 • चक्र = चाक
 • चंद्र = शशी , रजनीनाथ , इंदू , सुधाकर , निशानाथ , हिमांशू , शशांक , नक्षत्रेष , विधू , सोम
 • चन्हाट = दोरखंड
 • चरण = पाय , पाऊल
 • चरितार्थ = उदरनिर्वाह
 • चव = रुची , गोडी
 • चाक = चक्र
 • चांदणे = चंद्रिका, कौमुदी, ज्योत्स्ना
 • चारू = मोहक
 • चिडीचूप = शांत
 • चिंता = काळजी
 • चिमुरडी = लहान
 • चूक = दोष
 • चेतना = जीवनशक्ती
 • चेहरा = तोंड, मुख, वदन
 • चेहरा = मुख
 • चौकशी = विचारपूस
 • चौपदरी = झोळी
 • चौफेर = चार बाजूंना
 • चौर्य = चोरी
 • छडा = तपास
 • छंद = नाद, आवड
 • छात्र = विद्यार्थी
 • छान = सुरेख , सुंदर
 • छिद्र = भोक
 • जग = दुनिया , विश्व
 • जंगल = रान
 • जत्रा = मेळा
 • जन = लोक , जनता
 • जमीन = भूमी , धरती , भुई
 • जयघोष = जयजयकार
 • जरब = दरारा, दहशत, वचक, धाक
 • जरा = म्हातारपण
 • जर्जर = क्षीन झालेला
 • जान्हवी = गंगा नदी
 • जामात = जावई
 • जिज्ञासू = जाणण्यासाठी उत्सुक
 • जिन्नस = पदार्थ
 • जिव्हाळा = माया, प्रेम, ममता
 • जीर्ण = जुने
 • जीव = प्राण
 • जीवन = आयुष्य , हयात
 • जुलूम = अत्याचार , छळ , बळजोरी , अन्याय
 • ज्ञाता = सुज्ञ, शहाणा, जाणणारा, तज्ज्ञ, ज्ञानी
 • ज्येष्ठ = मोठा
 • ज्येष्ठ = मोठा, वरिष्ठ
 • ज्वर = ताप
 • झाड = वृक्ष , तरू , पादप , द्रूप , गुल्म , अगम , विटप , शाखी
 • झुंज = लढा, संग्राम, संघर्ष
 • झुंबड = गर्दी, रीघ, थवा
 • झेंडा = ध्वज, निशाण, पताका
 • झोका = झुला
 • झोका = हिंदोळा
 • झोप = निद्रा
 • झोपडी = कुटीर , खोप
 • टंचाई = कमतरता
 • टेकडी = हुकडी
 • ठक = लबाड
 • ठग = -चोर
 • ठसा = खुण
 • ठिकाण = स्थान
 • ठेकेदार = कंत्रादार, मक्तेदार
 • डोके = मस्तक , शीर्ष , शीर
 • डोके = शीर, मस्तक, मुर्धा, शीर्ष
 • डोंगर = पर्वत
 • डोया = डोळा डोंगर पर्वत , गिरी
 • डोळा = नेत्र , नयन , लोचन , चक्षु , अक्ष , आवळू , अंबक
 • डौल = दिमाख, ऐट, रुबाब
 • ढग = जलद, अंबुद, पयोधर, पयोद
 • ढग = मेघ , जलद , पयोधर , अभ्र , अंबूद , निरद , पयोद , अब्द , घन
 • ढेकूण = मुतकून, खटमल
 • तकदीर = दैव
 • तक्रार = गाऱ्हाणे
 • तमा = पर्वा,फिकीर
 • तरु = वृक्ष, झाड
 • तरुण = जवान, युवक
 • तलवार = खडग, समशेर
 • तलाव = तडाग , सरोवर , कासार
 • तळे = तलाव , सरोवर , तडाग
 • ताम्र = तांबे
 • तारण = रक्षण
 • तारू = जहाज, गलबत
 • तारे = तारका, चांदण्या, नक्षत्रे
 • ताल = ठेका
 • तिमिर = अंधार, काळोख
 • तुरुंग = कारागृह, कैदखाना, बंदीखाना
 • तुलना = साम्य
 • तृण = गवत
 • तृशीत = तहानलेला
 • तृषा = तहान, लालसा
 • तृष्णा = तहान
 • तोंड- तुंड , वक्र , आनन , वदन , मुख
 • त्रागा = डोक्यात राख घालणे
 • त्राता = रक्षण कारनारा
 • त्रिभुवन = तिन्ही लोक
 • त्वचा = कातडी
 • थट्टा = मस्करी , चेष्टा समूह
 • थंड = शीत, गार, शीतल
 • थवा = समुदाय, घोळका, गट, चमू, जमाव
 • थोबाड = गालपट
 • दगड = पाषाण , खडक
 • दंडवत = नमस्कार
 • दंत = दात
 • ददात = उणीव
 • दंभ = ढोंग
 • दरवाजा = दार , कवाड
 • दर्पण = आरसा
 • दागिना = अलंकार, भूषण
 • दानव = राक्षस, दैत्य, असुर
 • दाम = पैसा
 • दाम्पत्य = जोडपे,पतिपत्नी
 • दार = दरवाजा
 • दारा = पत्नी
 • दारा = बायको, पत्नी
 • दारिद्य = गरिबी
 • दास = चाकर, नोकर
 • दाहक = जाळणारा
 • दिवस = वार, वासर, दिन, अह
 • दिवा = दीप , दीपक
 • दीन = गरीब
 • दुजा = दुसरा
 • दुनिया = जग
 • दुर्ग = किल्ला
 • दुर्दशा = वाईट स्थिती
 • दुर्धर = कठीण, गहन
 • दुर्भिक्ष्य = कमतरता
 • दुर्मीळ = मिळवण्यासाठी कठीण
 • दूध = दुग्ध, पय, क्षीर
 • दृढता = मजबुती
 • दृश्य = देखावा
 • देऊळ = मंदिर, राऊळ, देवालय
 • देखत = बघत , पाहत
 • देखावा = दृश्य
 • देव = सूर, ईश्वर, अमर, निर्जर, परमेश्वर, ईश
 • देवाणघेवाण = देणेघेणे
 • देश = राष्ट्र
 • देह = शरीर, तनु, तन, काया, वपु
 • दैत्य = राक्षस, दानव, असुर
 • दैन्य = दारिद्र्य
 • दैन्यावस्था = वाईट स्थिती
 • दौलत = संपत्ती , धन
 • द्वेष = मत्सर , हेवा
 • धन = संपत्ती, द्रव्य, संपदा, दौलत
 • धनुष्य = चाप, कोदंड, कमठा, धनु, कारमुक
 • धरती = धरणी, पृथ्वी, वसुंधरा, वसुधा, मही, भूमी, क्षोणी, धरित्री, अवनी, रसा
 • धर्म = घाम
 • धवल = पांढरे
 • धी = बुद्धी
 • ध्वनी = आवाज , रव
 • नक्कल = प्रतिकृती
 • नगर = शहर, पूर, पुरी
 • नजर = दृष्टी
 • नजराणा = भेट, उपहार
 • नदी = सरिता , तटिनी , तरंगिणी , जलवाहिनी
 • नमस्कार = वंदन, नमन, प्रणिपात, अभिवादन
 • नर्तिका = नाचणारी
 • नवनीत = लोणी
 • नवरा = भ्रतार , वल्लभ , पती , कांत , नाथ , दादला , धव , अम्बुला
 • नातेवाईक = नातलग
 • नाथ = धनी, स्वामी
 • नामी = सुंदर
 • नारळ = श्रीफळ, नारियल
 • निगा = काळजी
 • निंद्य = निंदा करण्यालायक
 • नियम = पद्धत
 • निरझर = झरा
 • निरभ्र = ढग नसलेले
 • निर्जन = ओसाड
 • निर्झर = झरा
 • निर्धार = निश्चय
 • निर्मळ = स्वच्छ
 • निश्चय = निर्धार
 • निष्ठा = श्रद्धा
 • नीच = तुच्छ, अधम, चांडाळ
 • नृत्य = नाच
 • नृप = राजा, भूप, भूपती, भूपाळ, नरेश, महिपती
 • नेता = नायक, पुढारी
 • नोकर = चाकर, सेवक, दास
 • नौदल = आरमार
 • न्हौतं = नव्हते
 • पंक = चिखल
 • पंक्ती = रांग, ओळ, पंगत
 • पक्षी = खग, विहग, विहंग, अंडज, द्विज, पाखरू
 • पंडित = शास्त्री, विदवान, बुद्धिमान
 • पती = नवरा , वर
 • पत्नी = बायको , अम्बुला , अस्तुरी , अर्धागी , भार्या , कांता , दारा , जाया , सहधर्मचारिणी
 • पत्र = टपाल
 • पर = पीस,परका
 • पराक्रम = शौर्य, प्रताप, विक्रम, बहादूरी
 • परार्थ = दुसऱ्यासाठी
 • परिमल = सुवास, सुगंध
 • परिश्रम = कष्ट , मेहनत
 • परीक्षा = कसोटी
 • पर्वत = डोंगर , गिरी , अचल , शैल , अद्री
 • पर्वा = चिंता , काळजी
 • पल्लव = पालवि,कोवळे पान
 • पशु = प्राणी, जनावर, श्वापद
 • पहाट = उषा
 • पाऊल = पाय , चरण
 • पाऊलवाट = पायवाट
 • पाऊस = वर्षा , पर्जन्य
 • पाखरू = पक्षी
 • पाडा = आदीवासी ची१०-१५ घरांची वस्ती
 • पाणी = जल , नीर , तोय , उदक , जीवन , सलिल , पय , अंबू
 • पान = पर्ण, पत्र, पल्लव
 • पाय = पद, पाद, चरण
 • पारंगत = निपुण, तरबेज
 • पियुष = अमृत
 • पिशवी = थैली
 • पीत = पिवळा
 • पुंजा = पूजन
 • पुढारी = नेता, नायक, अग्रणी
 • पुतळा = प्रतिमा , बाहुले
 • पुरातन = प्राचीन
 • पुरुष = नर, मर्द
 • पुस्तक = ग्रंथ
 • पृथ्वी = धरणी , जमीन , वसुंधरा , वसुधा , धरा , भुमी , धरित्री , मही अवनी , भू , क्षमा , उरबी , कुंभिनी , मेदिनी , विश्वंभरा , क्षिती
 • पेय = पाणी, दूध
 • पोपट = राघू, रावा, शुक्र, किर
 • प्रकाश = – उजेड
 • प्रघात = चाल, पद्धत, रीत, रिवाज
 • प्रजा = लोक, रयत, जनता
 • प्रत – नक्कल
 • प्रताप = पराक्रम, शौर्य
 • प्रतीक = चिन्ह, खूण
 • प्रदेश = प्रांत
 • प्रपंच = संसार
 • प्रबंध = व्यवस्था
 • प्रवास = सफर , फेरफटका , पर्यटन
 • प्रवासी = वाटसरू , पांथस्थ , मार्गिक
 • प्रवीण = निपुण, कुशल, हुशार, पटू, तरबेज, निषणात
 • प्रसिद्ध = प्रख्यात, नामांकित, ख्यातनाम, विख्यात
 • प्राची = पूर्व दिशा
 • प्राचीन = पूर्वीचा, पुरातन, जुनाट
 • प्राण = जीव
 • प्रात : काळ = सकाळ, उषा, पहाट
 • प्रामाणिकपणा = इमानदारी
 • प्रारंभ = सुरुवात , आरंभ
 • प्रार्थना = स्तवन
 • प्रासाद = वाडा, मंदीर
 • प्रेम = प्रीती , माया , जिव्हाळा
 • प्रोत्साहन = उत्तेजन
 • फलक = फळा फांदी शाखा
 • फुल = पुष्प, सुमन, कुसुम, सुम
 • बक = बगळा
 • बक्षीस = पारितोषिक , पुरस्कार
 • बदल = फेरफार , कलाटणी
 • बंधन = निर्बंध, मर्यादा
 • बंधु = भाऊ, भ्राता
 • बरकत = भरभराट
 • बर्फ = हिम
 • बळ = शक्ती, जोर, सामर्थ्य, ताकद
 • बहर = हंगाम, सुगी
 • बहीण = भगिनी
 • बाग = बगीचा , उद्यान , वाटिका
 • बाण = शर, तिर, सायक
 • बादशाहा = सम्राट
 • बांधेसूद = रेखीव, सुडौल
 • बाप = पिता, वडील, तात, जनक, जन्मदाता
 • बाळ = बालक
 • बासरी = पावा
 • बिकट = कठीण, अवघड
 • बुद्धी = मती
 • बेडूक = मंडुक, दरदुर
 • बेढव = बेडौल
 • बेत = योजना
 • बैल = वृषभ, पोळ, खोड
 • ब्रम्हदेव = ब्रम्हा, चतुरानन, कमलसन, विरंची, विधी, प्रजापति
 • ब्राम्हण = द्विज, विप्र
 • ब्रीद = बाणा, प्रतीक्षा
 • भगिनी = बहीण
 • भरभराट = उत्कर्ष, प्रगती, समृद्धी
 • भरवसा = विश्वास, खात्री
 • भरारी = झेप , उड्डाण
 • भाऊ = बंधू , सहोदर , भ्राता
 • भाऊबंद = नातेवाईक, आप्त, सगेसोयरे
 • भाट = स्तुतिपाठक
 • भांडण = तंटा, कलह, झगडा, कज्जा
 • भान = शुद्ध, जागृती
 • भार = ओझे
 • भारती = भाषा , वैखरी
 • भाळ = कपाळ
 • भु = जमीन, धरा, भूमी, धरणी, धरित्री
 • भुंगा = भ्रमर , भृग , मिलिंद , मधुकर
 • भुंगा = भ्रमर, अली, मधूप, मिलिंद, मधुकर, भृंग
 • भूजंग = सर्प
 • भेकड = भित्रा, भ्याड, भिरु
 • भेद = फरक, भिन्नता
 • भेदभाव = फरक
 • भेसळ = मिलावट
 • भोंग = खोपटे , झोपडी
 • भोजन = जेवण
 • मकरंद = मध
 • मंगल = पवित्र
 • मजूर = कामगार
 • मज्जाव = निर्बंध
 • मंडपामां = मंडपामध्ये
 • मत्सर = द्वेष, असूया
 • मदत = साहाय्य
 • मंदपणा = मंडपाच्या
 • मंदिर = देऊळ , देवालय
 • मन = चित्त , अंतःकरण
 • मनसुबा = बेत, विचार
 • मनोरथ = मनातील इच्छा
 • ममता = माया , जिव्हाळा , वात्सल्य
 • मयूर = मोर
 • मलूल = निस्तेज
 • मस्तक = डोके , शीर , माथा
 • महा = महान, मोठा
 • महिना = मास
 • महिमा = थोरवी, मोठेपणा, महात्म्य
 • महिला = स्त्री , बाई , ललना
 • माणूस = मनुष्य, मनुज, मानव
 • माती = बुद्धी
 • मान = गळा
 • मानव = मनुष्य, माणूस, नर, मनुज
 • मानवता = माणुसकी
 • मार्ग = रस्ता , वाट
 • मार्ग = रस्ता, वाट, पथ, सडक
 • मासा = मिन, मत्स्य
 • मित्र = दोस्त , सोबती , सखा , सवंगडी
 • मिष्टान्न = गोडधोड
 • मुख = तोंड , चेहरा
 • मुद्रा = चेहरा , मुख , तोंड , वदन
 • मुनी = ऋषी, साधू
 • मुलगा = सूत, तनय, आत्मज, तनुज, पुत्र, नंदन
 • मुलगी = तनया, दुहीता, कन्या, तनुजा, लेक, सुता, पुत्री, आत्मजा
 • मुलामा = लेप
 • मुलुख = प्रदेश , प्रांत , परगणा
 • मूषक = उंदीर
 • मेरू = ऐका पर्वताचे नाव
 • मेष = मेंढा
 • मेहनत = कष्ट , श्रम , परिश्रम
 • मैत्री = दोस्ती
 • मोरणी = लांडोर
 • मोहाची फुले = मोवा
 • मोहिनी = भुरळ
 • मौज = मजा , गंमत
 • म्होरक्या = पुढारी , नेता
 • यज्ञ = मख, याग, होम
 • यती = सन्यासी
 • यश = सफलता
 • याचक = भिकारी
 • यातना = दुःख , वेदना
 • यातायात = त्रास
 • यान = अंतराळवाहन
 • युक्ती = विचार , शक्कल
 • युती = संयोग
 • युद्ध = लढाई, संगर, झुंज, संग्राम, समर, रण
 • युवती = तरुणी
 • येतवरी = येईपर्यंत
 • योग = संधी
 • योद्धा = लढवय्या
 • रंक = गरीब
 • रक्त = रुधिर
 • रणांगण = रणभूमी , समरांगण
 • रथी = योद्धा
 • रस्ता = मार्ग, पथ, वाट, पंथ
 • रस्ता = वाट
 • रांग = ओळ
 • राग = संताप, क्रोध, त्वेष, रोष, कोप
 • राजा = भूपती, भूप, नृप, नरेश, नरेंद्र, भूपाल, नृपती, राय, लोकपाल, भूमिपाल, पृथ्वी, पती, प्रजापति, भुपेंद्र
 • रात्र = रजनी, यामिनी, निशा, रात
 • रान = वन , जंगल , अरण्य , कानन
 • राष्ट्र = देश
 • रिता = रिकामा
 • रुक्ष = कोरडे, निरस
 • रुबाब = ऐट , तोरा
 • रूप = सौंदर्य
 • रेखीव = सुंदर , सुबक
 • रोष = राग
 • र्हास = हानी
 • लक्ष्मी = श्री, रमा, कमला, इंदिरा, पद्मा, वैष्णवी
 • लग्न = विवाह , परिणय
 • लघुता = लहान, कमीपणा
 • लढा = लढाई, संघर्ष
 • लढा = संघर्ष
 • लाज = शरम
 • लाज = शरम, भीड
 • लाट = लहर
 • लाडका = आवडता
 • लांब = दूर
 • लालसा = इच्छा
 • लावण्य = सौंदर्य
 • लावन्य = सौंदर्य
 • लोकोत्तर = श्रेष्ठ
 • लोटके = मडके
 • लोभ = हाव
 • लोह = लोखंड
 • वचक = धाक, दरारा
 • वंचना = फसवणूक
 • वडील = पिता
 • वत्स्य = वासरु, बालक
 • वंदन = नमस्कार, प्रणाम, नमन, अभिवादन, प्रणिपात
 • वद्रा = वर
 • वर = नवरा, पती, भ्रतार
 • वरचा = वद्राचा
 • वर्षा = पाऊस, पावसाळा
 • वल्लरी = वेल, लता
 • वस्त्र = कपडा
 • वाघ = व्याघ्र, शार्दूल
 • वाट = मार्ग , रस्ता
 • वाणी = भाषा,बोल
 • वानगी = उदाहरन, दाखला
 • वानर = मर्कट, कपी, शाखामृग
 • वापिका = विहीर
 • वायदा = करार
 • वारा = वात , पवन , अनिल , मारुत , समीर , वायू
 • वाली = रक्षण करनारा
 • वाशीम = संशय
 • वासना = इच्छा
 • वितरण = वाटप , वाटणी
 • विद्या = ज्ञान
 • विद्रुप = कुरूप
 • विनंती = विनवणी
 • विनय = नम्रता
 • विमल = निष्कलंक, निर्मळ
 • विरोध = प्रतिकार , विसंगती
 • विलग = सुटे, अलग
 • विलंब = उशीर
 • विवंचना = काळजी, चिंता
 • विवेक = सारासार विचार
 • विश्रांती = विसावा , आराम
 • विश्राम = विश्रांती
 • विश्व = जग , दुनिया
 • विषण = खिन्न, कष्टी
 • विषाद = खेद
 • विष्णू = श्रीपती, रमापती, रमेश, चक्रापानी, अच्युत, केशव, नारायण, माधव, गोविंदा, मधुसूदन, त्रिविक्रम, पुरोषोत्तम, वासुदेव, ऋषिकेश, पदमनाभ, पितांबर, शेषशायी
 • विसावा = विश्रांती , आराम
 • विस्तृत = विशाल, विस्तीर्ण
 • विस्मय = आश्चर्य, नवल
 • विहार = क्रीडा, सहल, भ्रमण
 • वीज = चपला, चंचला, तडीता, बिजली, सौदामिनी, विद्युत, विद्युलता
 • वृत्ती = स्वभाव
 • वृद्ध = म्हातारा
 • वेग = गती
 • वेदना = यातना, कळ, दुःख, व्यथा, शूळ
 • वेळ = समय , प्रहर
 • वेळू = बांबू
 • वेश = सोशाख
 • वेष = पोशाख
 • वैध = कायदेशीर
 • वैराण = ओसाड , भकास , उजाड
 • वैरी = शत्रू , दुष्मन
 • वैषम्य = विषाद
 • व्यथा = दु:ख
 • व्यय = खर्च
 • व्यवसाय = धंदा
 • व्याकुळ = दुःखी, कासाविस
 • व्याख्यान = भाषण
 • व्रण = खूण, क्षत
 • शंकर = महेश, त्र्यंबक, रुद्र, भालचंद्र, चंद्रशेखर, पार्वतीश, महादेव, सदाशिव, कैलासनाथ, महेश्वर, नीलकंठ, शिव, सांब, दिगंबर, त्रिनेत्र
 • शक्ती = ताकद, जोम, जोर, सामर्थ्य
 • शत = शंभर
 • शत्रू = अरी, रिपू, वैरी
 • शर = बाण
 • शर = बाण, तिर, सायक
 • शरीर = देह , तनू , काया , कुडी , अंग
 • शर्यत = स्पर्धा , होड , चुरस
 • शव = प्रेत
 • शहर = नगर
 • शाळा = विद्यालय
 • शाळुका = शिविलिंग
 • शास्त्रज्ञ = वैज्ञानिक
 • शाहिद = हुतात्मा
 • शिकस्त = पराकाष्ठा
 • शिकारी = पारधी
 • शिक्षक = गुरुजी, गुरू, मास्तर
 • शिक्षा = दंड , शासन
 • शिवार = शेत , वावर
 • शीघ्र = जलद
 • शीण = थकवा
 • शीत = थंड
 • शीतल = थंड , गार
 • शील = चारित्र्य
 • शेज = बिछाना, अंथरूण, शय्या
 • शेत = शिवार , वावर , क्षेत्र
 • शेतकरी = कृषक, कृषिवल
 • शेष = अनंत, वासुकी
 • श्रम = कष्ट , मेहनत
 • श्वापद = जनावर
 • संकट = आपत्ती
 • सकल = समस्त, सर्व, अखिल, निखिल, सगळा
 • संकल्प = बेत
 • संकल्प = बेत, मनसुबा
 • सकाळ = प्रभात
 • संग्राम = युद्ध, समर, संगर, लढाई
 • संघ = गट, चमू, समूह
 • संघर्ष = कलह, झगडा, टक्कर, भांडण
 • सचोटी = खरेपणा
 • सजा = शिक्षा
 • सज्जन = संत
 • संत = सज्जन , साधू
 • सदाचार = चांगले आचरण
 • संदेश = निरोप
 • संधी = मोका
 • संध्याकाळ = सायंकाळ , सांज
 • सन्मान = आदर
 • संपत्ती = धन , दौलत , संपदा
 • सफाई = स्वच्छता
 • समय = वेळ
 • समाधान = आनंद, संतोष
 • समुद्र = सागर, उद्दी, सिंधू, अर्णव, अंबुध्दी, पयोधी, जलधी, वारीराशी, रत्नाकर
 • समुद्र = सागर, सिंधू, रत्नाकर, जलधी, पयोधी, जलनिधी
 • सवलत = सूट
 • संशय = शंका
 • संशोधक = शास्त्रज्ञ
 • संसर्ग = संपर्क , संबंध, सहवास
 • संहार = नाश, विध्वंस, विनाश, सर्वनाश
 • सह्याद्री = सह्यपर्वत, सह्याचल, सह्यागिरी
 • सांगत = म्हणत
 • सागर = समुद्र , सिंधू , रत्नाकर , जलधी , दर्या , अर्णव
 • साथ = सोबत, संगत
 • साथी = सोबती , मित्र , दोस्त , सखा
 • साधू = संन्यासी
 • साप = सर्प, भुजंग, अहि
 • सामर्थ्य = शक्ती , बळ
 • साम्य = सारखेपणा
 • सायंकाळ = संध्याकाळ
 • सावली = छाया
 • साहित्य = लिखाण
 • सिद्ध = तयार
 • सिनेमा = चित्रपट , बोलपट
 • सिंह = केसरी, पंचानन, मृगेंद्र, मृगराज, वनराज
 • सीमा = मर्यादा, हद्द, वेस, मर्यादा, शिव
 • सुकाळ = विपुलता
 • सुगंध = सुवास , परिमळ , दरवळ
 • सुगम = सुलभ, सोपा, सुकर
 • सुचिन्ह = चांगले चिन्ह
 • सुंदर = सुरेख, रम्य, रमणीय, ललित, मनोहर, अभिराम
 • सुरुवात = आदी, आरंभ, प्रारंभ
 • सुरेल = गोड
 • सुलक्षण = चांगले लक्षण
 • सुवास = सुगंध , परिमल , दरवळ
 • सुविद्य = चांगला शिकलेला
 • सुविधा = सोय
 • सूत = धागा , दोरा
 • सूर = स्वर
 • सूर्य = रवी, भास्कर, मित्र, आदित्य, सविता, अर्क, भानू, चंडांशु, दिनकर, दिनमनी, प्रभाकर, दिवाकर, सहस्त्रकर, सहस्त्ररश्मी, मार्तंड, वासरमनी
 • सेनापती = सेनानी, सेनानायक
 • सेवक = दास, नौकर
 • सेवा = शुश्रूषा
 • सैन्य = फौज, दल
 • सोने = सुवर्ण, कनक, कांचन, हिरण्य, हेम
 • सोहळा = समारंभ
 • स्तुती = प्रशंसा, कौतुक
 • स्त्री = अबला, महिला, ललना, वनीता, नारी, अंगना, कामिनी
 • स्थान = ठिकाण , वास , ठाव
 • स्पर्धा = चुरस , शर्यत , होड , पैज
 • स्फूर्ती = प्रेरणा
 • स्वच्छ = नीट, निर्मळ, साफ
 • स्वच्छता = झाडलोट
 • स्वामी = मालक
 • स्वेच्छा = स्वतः ची इच्छा
 • स्वेद = घाम, घर्म
 • हकिकत = गोष्ट , कहाणी , कथा
 • हताश = निराश
 • हताश = निराश
 • हत्ती = गज , पिलू , सारंग , कुंजर
 • हद्द = सीमा , शीव
 • हरित = हिरवे
 • हरीण = मृग, सारंग, कुरंग
 • हर्दमच्यावानी – नेहमीप्रमाणे
 • हल्ला = चढाई
 • हळू चालणे = मंदगती
 • हाक = साद
 • हाट = बाजार
 • हात = कर, हस्त, पाणी, भुजा, बाहू
 • हारीच = एकत्र
 • हित = कल्याण
 • हिम = बर्फ
 • हिम = बर्फ
 • हिंमत = धैर्य, धाडस
 • हुकूमत = अधिकार
 • हुबेहूब = तंतोतंत
 • हुभा = उभा
 • हद्द = सीमा, शीव
 • हुरूप = उत्साह
 • हुशार = चतुर, चाणाक्ष
 • हेका = हट्ट , आग्रह
 • होडी = नाव, नौका, तर
 • ह्दय = अंतःकरण, अंतर

Read More :- Savitribai Phule Information In Marathi PDF Download – सावित्रीबाई फुले यांची माहिती

Aakash Samanarthi Shabd In Marathi

Aakash Samanarthi Shabd In Marathi:- आकाश ह्या शब्दाचे समानार्थी शब्द गगन, अंबर, नभ, तारांगण, अंतरिक्ष, व्योम, ख, अंतराळ, आभाळ, भास्कर, मित्र, भानू, दिनकर, आदित्य, अर्क, दिनमणी हे शब्द आहेत. ह्या शब्दांचा उपयोग तुम्ही आकाश च्या समानार्थी शब्द म्हणून उपयोग करू शकतात.

Nadi Samanarthi Shabd In Marathi

Nadi Samanarthi Shabd In Marathi:- नदी ह्या शब्दाचे समानार्थी शब्द आपगा, तटिनी, तटी, तरंगिणी, निम्नगा, सरिता हे शब्द आहेत. ह्या शब्दांचा उपयोग तुम्ही नदी च्या समानार्थी शब्द म्हणून उपयोग करू शकतात.

Samanarthi Shabd Marathi PDF Download

Conclusion For Synonyms Words In Marathi

Conclusion:– ह्या लेखामध्ये आपण 1600+ Samanarthi Shabd Marathi – Synonyms In Marathi  बघितले आहे. ह्या लेखाचा उपयोग हा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विदयार्थी साठी उपयुक्त ठरेल. आम्ही आशा करतो की Marathi Samanarthi Shabd ह्या आर्टिकल मधून तुम्हाला हवी असलेली माहिती ही मिळाली असेल.

Frequentaly Asked Questions For Samanarthi Shabd Marathi PDF Download

Q1. Nadi Samanarthi Shabd In Marathi

नदी ह्या समानार्थी शब्दाच्या सरिता, तटिनी, तरंगिणी, जलवाहिनी हे शब्द आहे.

Q.2. पहाट समानार्थी शब्द मराठी

पहाट ह्या समानार्थी शब्दाच्या प्रात : काळ, सकाळ, उषा हे सामानर्थी शब्द आहे.

Q3. खळगा समानार्थी शब्द मराठी

खळगा ह्या समानार्थी शब्दाचा खड्डा हा समानार्थी शब्द आहे.

Q4. योग्य समानार्थी शब्द मराठी

योग्य ह्या शब्दाचे काबील, पाठाउ, पात्र, लायक, सक्षम, समर्थ हे शब्द आहेत.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages