Vibhakti In Marathi:- Vibhakti and Types One of the major and important topics in Marathi grammar is vibhakti. While preparing for competitive exams like MPSC, it is necessary to see and study complete Marathi grammar, inflections and their types are also very important.
Vibhakti In Marathi
Vibhakti In Marathi:- विभक्ती आणि प्रकार मराठी व्याकरण मधला एक प्रमुख आणि महत्वपूर्ण विषय म्हणजेच विभक्ती होय. MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करताना संपूर्ण मराठी व्याकरण पाहणे आणि अभ्यासाने आवश्यक आहे विभक्ती आणि त्यांचे प्रकार हे सुद्धा खूपच महत्वाचं आहे आजच्या या पोस्ट मध्ये Vibhakti आणि Types Of Vibhakti तसेच परीक्षा मध्ये येणार त्यावर आधारित प्रश्नाची तयारी करूयात.
Read More:- All Marathi Letter Writing With Format & Example | सर्व मराठी पत्र लेखन माहिती
विभक्ती म्हणजे काय ?
- विभक्ती चा सरळ अर्थ म्हणजे विभक्त वेगळे किंवा विभागीकरण करणे होय.
- व्याकरणाच्या भाषेमध्ये नाम आणि सर्वनाम यांचे वाक्यतील क्रियापदाशी किंवा शब्दांशी येणारे संबंध दाखवण्यासाठी वापरलेले विकार म्हणजेच विभक्ती होय.
- या मध्ये जी अक्षरे विभक्ती दर्शवतात त्यांना विभक्ती प्रत्यय असे म्हंटले जाते.
- विभक्ती मध्ये अनेक प्रकार आहेत ज्या मध्ये प्रत्यय वापरले जातात.
विभक्ती चे प्रकार – Types Of Vibhakti
- मराठी व्याकरण मध्ये विभक्ती चे एकूण ८ प्रकार आहेत.
- याचाच अर्थ नामच क्रियापदाशी आणि इतर शब्दांशी ८ प्रकारें संबंध येतो.
- १) प्रथमा विभक्ती
- २) द्वितीया विभक्ती
- ३) तृतीया विभक्ती
- ४) चतुर्थी विभक्ती
- ५) पंचमी विभक्ती
- ६) षष्टी विभक्ती
- ७) सप्तमी विभक्ती
- ८) संबोधन विभक्ती
Read More:- 1600+ Samanarthi Shabd Marathi PDF Download | मराठी समानार्थी शब्द
विभक्तीची रूप आणि सामान्य रूप
सर्वनामाला किंवा नामाला विभक्तीचे प्रत्यय लावण्यापूर्वी सर्वनाम किंवा नामाच्या स्वरूपामध्ये जो बदल होतो त्यास सामान्य रूप असे म्हणतात. विभक्ती आणि सामान्य संपूर्ण माहिती देणारा तक्ता खालील प्रमाणे.
मूळ रूप | सामान्य रूप | विभक्तीचे प्रत्यय |
फुलाने | फूला | ने |
पायला | पाया | ला |
Read More:-Shahu Maharaj Information In Marathi PDF Download | राजर्षी शाहू महाराजांची संपूर्ण माहिती
विभक्ती प्रत्यय ओळखा
सर्वनामाचे आणि नामाचे विभक्ती रूप तयार करण्यासाठी जे अक्षरे जोडण्यात येतात, त्या अक्षरांना प्रत्यय असे म्हणतात.
उदाहरणार्थ:- शामने रामला मारले.
वर दिलेल्या वाक्या मध्ये ने आणि ला हे विभक्ती प्रत्यय आहेत. अर्थपूर्ण वाक्य पूर्ण होण्यासाठी विभक्ती प्रत्यय असणे आवश्यक आहे.
Read More:-Gram Sevak Information In Marathi PDF Download | ग्रामसेवकाची संपूर्ण माहिती मराठी मध्ये
विभक्ती प्रत्यय तक्ता मराठी – Vibhkati Pratyay Table
विभक्ती मध्ये प्रामुख्याने दोन प्रकार पडतात एक वचन आणि अनेकवचन त्या मध्ये वेग वेगळे प्रत्यय आणि त्यांच्या शब्दांचे रूप आहेत. खालील दिलेल्या तकत्यात विभक्ती प्रत्यय तक्ता मराठीआणि त्यांची सर्व माहिती देण्यात आलेली आहे.
विभक्ती | एकवचन | अनेकवचन | ||
---|---|---|---|---|
प्रत्यय | शब्दांचे रूप | प्रत्यय | शब्दांचे रूप | |
प्रथमा | प्रत्यय नाहीत | मूल | प्रत्यय नाहीत | मुले |
द्वितीया | स, ला, ते | मुलास, मुलाला | स,ला,ना,ते | मुलांस, मुलांना |
तृतीया | ने, ए, शी | मुलाने, मूलाशी | नी, शी, ई, ही | मुलांनी, मुलांशी |
चतुर्थी | स, ला, ते, | मुलास, मुलाला | स,ला,ना,ते | मुलांस, मुलांना |
पंचमी | ऊन, हून | मुलाहून | ऊन,हून | मुलांहून |
षष्ठी | चा, ची, चे | मुलाचा, मुलाची | चे,च्या,ची | मुलांचा, मुलांची |
सप्तमी | त, ई, आ | मुलात | त, ई, आ | मुलांत |
संबोधन | प्रत्यय नाहीत | मुला | नो | मुलांनो |
Read More:- Samuh Darshak Shabd PDF Download | सर्व समूहदर्शक शब्दांची माहिती (Collective Words)
विभक्तीचे कारकार्थ
वाक्यातील सर्वनाम किंवा नाम यांचे क्रियापदाशी जो संबंध असतो त्यांना ‘कारकार्थ’ म्हणतात.
विभक्ती प्रकार | कारकार्थ |
प्रथमा | कर्ता |
द्वितीया | कर्म |
तृतीया | करण |
चतुर्थी | संप्रदान |
पंचमी | अपादान |
षष्ठी | संबध |
सप्तमी | अधिकरण |
संबोधन | हाक |
प्रथमा विभक्ती – Vibhakti In Marathi
- प्रथमा विभक्ती एक अशी विभक्ती आहे ज्या मध्ये कोणतेही प्रत्येय लावले जात नाही.
- या मध्ये विभक्ती चा अर्थ हा कर्ता असतो.
उदाहरणार्थ :-
१) राम आंबा खातो.
२) बदक पाण्यात पोहोते.
३) कोकिळा गाणे गाते.
द्वितीया विभक्ती
- द्वितीय विभक्ती मध्ये कर्ता +कर्म +क्रियापद एकत्र असते.
- या मध्ये स ला ते आणि स ला ना ते प्रत्यय लावले जातात.
उदाहरणार्थ :-
१) ताई दादाला बोलावते.
२) अक्षय सतीशला शिकवतो.
३) पोलीस चोराला पकडतात.
तृतीय विभक्ती
- या विभक्ती मध्ये कर्ता +कर्म +क्रियापद एकत्र असते .
- हिथे कर्म मध्ये तृतीय विभक्ती प्रत्येय ने, ए, शी – ने, शी, ही, ई वापरली जातात .
उदाहरणार्थ :-
१) मित्राने पुस्तक दिले ..
२) रामाने धनुष्य मोडले ..
३) वडिलांनी पैसे पाठवले .
Read More:- Sandhi In Marathi PDF Download | संधी आणि संधीचे प्रकार संपूर्ण माहिती
चतुर्थी विभक्ती – Vibhakti In Marathi
- चतुर्थी विभक्ती मध्ये कर्ता +कर्म +कर्मा +क्रियापद असते.
- हिथे चतुर्थी स, ला ते – स, ला, ना, ते – संप्रदान विभक्ती प्रत्यय वापरले जाते.
उदाहरणार्थ :-
१) आजीने नातीला गोष्ट सांगितली.
२) शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.
३) शिक्षक जनतेला शिकवण देतात.
पंचमी विभक्ती
- पंचमी विभक्ती मध्ये ऊन, हून – ऊन, हून – अपादान विभक्ती प्रत्यय वापरले जाते.
उदाहरणार्थ :-
१) मी शाळेतून आताच घरी आलो.
२) चोराने घरातून पळ काढला.
३) अक्षय माझ्याहून उंच आहे.
षष्टी विभक्ती
- हि विभक्ती एखाद्या गोष्टी वरचे कर्त्याचे संबंध ,मालकी हक्क दर्शवते.
- या मध्ये चा, ची, चे – चा, ची, चे – संबंध असे प्रत्यय वापरले जातात.
उदाहरणार्थ :-
१) त्याचे अक्षर सुंदर आहे.
२) राम ची सायकल नवीन होती.
३) माझा देश स्वतन्त्र आहे.
सप्तमी विभक्ती
- सप्तमी विभक्ती वाक्यातील स्थळ काळ दर्शवते.
- त, ई, आ – त, ई, आ – अधिकरण असे प्रत्यय वापरले जातात.
उदाहरणार्थ :-
१) त्याचे अक्षर सुंदर आहे .
२) राम ची सायकल नवीन होती .
३) माझा देश स्वतन्त्र आहे .
संबोधन (अष्टमी) विभक्ती – Vibhakti In Marathi
- अष्टमी विभक्ती संबोधन म्हणजेच हाक मारणे होय सांगणे किंवा आज्ञा देणे होय.
- या मध्ये नो हे प्रत्यय वापरले जाते.
उदाहरणार्थ :-
१) विद्यार्थ्यांनो शिस्त पाळा.
२) नागरिकांनो शांतात राख.
३) मित्रानो सहकार्य करा.
Vibhakti In Marathi PDF Download
Vibhakti In Marathi PDF Download– बहुतेक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना PDF मध्ये पाहिजे असते. अश्या विध्यार्थ्यांसाठी आम्ही विभक्तीची संपूर्ण माहिती हि पीडीएफ तयार करून PDF मध्ये तयार केली आहे. ती आम्ही खालील प्रमाणे दिलेली आहे. त्यासाठी तुम्ही खालील दिलेल्या डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.
Conclusion
Conclusion For Vibhakti In Marathi:- आपण ह्या आर्टिकल मध्ये बघितले की विभक्ती म्हणजे काय आहे. त्याच्या उपयोग कसा करतात त्या सर्वांची माहिती आपण ह्या आर्टिकल Vibhakti In Marathi मध्ये जाणून घेतली आहे. ह्या आर्टिकल मध्ये विभक्ती म्हणजे काय ?, विभक्तीची रूप आणि सामान्य रूप, विभक्तीचे कारकार्थ, प्रथमा विभक्ती – Vibhakti In Marathi, विभक्ती चे प्रकार – Types Of Vibhakti इत्यादि बघितले आहे.
Frequently Asked Questions For Vibhakti In Marathi
विभक्तीचे प्रकार चे एकूण 8 प्रकार पडतात प्रथमा विभक्ती, द्वितीया विभक्ती, तृतीया विभक्ती, चतुर्थी विभक्ती, पंचमी विभक्ती, षष्टी विभक्ती, सप्तमी विभक्ती, संबोधन विभक्ती.
व्याकरणाच्या भाषेमध्ये नाम आणि सर्वनाम यांचे वाक्यतील क्रियापदाशी किंवा शब्दांशी येणारे संबंध दाखवण्यासाठी वापरलेले विकार म्हणजेच विभक्ती असे म्हणतात.
रामास वनवास मिळाला अधोरेखित शब्दाची विभक्ती ही द्वितीया विभक्ती आहे.
सर्वनामांच्या किंवा नामांच्या रूपात जो बदल होतो त्याला ‘विभक्ती‘ असे म्हणतात. उदाहरणार्थ. – समुद्रा मध्ये श्यामने उडी मारली. . समुद्रा मध्ये श्यामने ही विभक्तींची रूपे आहेत.
Related Posts:
- शब्दसिद्धी व त्याच्या प्रकारांची संपूर्ण सविस्तर…
- 300+ GK Questions In Marathi PDF Download | सामान्य…
- Noun And Types Of Noun in Marathi PDF Download | नाम…
- All Best Marathi Bodh Katha PDF Download | मराठी बोध…
- Dvandva Samas In Marathi PDF Download | द्वंद समास…
- Viram Chinh In Marathi PDF Download | विराम चिन्ह…