All Marathi Letter Writing With Format & Example | सर्व मराठी पत्र लेखन माहिती Marathi Grammer - Marathi Vyakaran मराठी व्याकरण Study Material by Sandesh Shinde - September 25, 2023September 25, 20230 Table of Contents Advertisement ToggleMarathi Letter Writing With Format & ExampleMarathi Letter Writing And FormatLetter Writing In Marathi | पत्र लेखन म्हणजे काय ?पत्र लेखनाचे प्रकार – Types Of Letter Writing In MarathiInformal Letter in Marathi | अनौपचारिक पत्रे अनौपचारिक पत्रे नमूने – Informal Letter in Marathi Formats अनौपचारिक पत्रे नमूना 1 – Informal Letter in Marathi Format 1 अनौपचारिक पत्रे नमूना 2 – Informal Letter in Marathi Format 2अनौपचारिक पत्रे कसे लिहावे ?औपचारिक पत्रे – Formal Letter Informationऔपचारिक पत्रे नमूने – Formal Letter In Marathi Formatऔपचारिक पत्रे नमूना – Formal Letter In Marathi Formatऔपचारिक पत्रे कसे लिहावे ?औपचारिक पत्रांचे प्रकार – Types Of Formal Letter1. तक्रार पत्र – Complaint Letter तक्रार पत्र नमूना – Complaint Letter Format 2. विनंतीपत्र – Request Letterविनंतीपत्र नमूना – Request Letter Format मागणीपत्र – Demand Letterमागणी पत्र नमूना – Demand Letter Format चौकशीपत्र – Inquiry Letterअभिनंदन पत्र – Congratulations Letterआभार पत्र – Letter of Thanksआभार पत्र नमूना – Letter of Thanks Format निमंत्रणपत्र – Letter of Invitationनिमंत्रणपत्र नमूना – Letter of Invitation Formatक्षमापत्र – Letter of Apologyक्षमापत्र नमूना – Letter of Apology Format ConclusionFrequentaly Asked Questions For Marathi Letter Writing Marathi Letter Writing With Format & Example Marathi Letter Writing With Format & Example:- Marathi Letter Writing | Letter Writing In Marathi:- In today’s world of mobile phones and digital technology, the world has become very close. You can send a letter to a person who is very far away from a place where you can communicate with the help of the Internet. In earlier times, letters were sent to each other by post. Letter writing may have decreased now, but in terms of competitive exams, writing and understanding letters are still as important. Let’s have a detailed look at what letter writing is today and the different types of letter writing. Marathi Letter Writing And Format मराठी पत्र लेखन | Marathi Letter Writing-आजच्या मोबाईल च्या आणि डिजिटल तंत्रज्ञाच्या जगामध्ये जग खूपच जवळ आलेले आहे. एका ठिकाणहून खूप दूरच्या व्यक्तीशी तुम्ही इंटरनेट च्या मदतीने संवाद साधू शकतो पत्र पाठवू शकता. पूर्वीच्या काळी एकमेकांना पोस्ट ने पत्र पाठवली जायची या मध्ये विविध असे प्रकार होते. पत्रलेखन आता नक्कीच कमी झाला असेल पण स्पर्धा परीक्षे च्या दृष्टीने आजही पत्र लेखन करणे आणि समजावून घेणे तितकाच महत्वाचे आहे. आजच्या पत्रलेखन म्हणजे काय आणि पत्रलेखन चा विविध प्रकार यांची विस्तारित माहिती पाहुयात. Letter Writing In Marathi | पत्र लेखन म्हणजे काय ? पत्र लेखन म्हणजे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला पत्राच्या रूपाने संदेश पाठवणे किंवा सभांषण करणे होय . पत्र लेखन हे पारिवारिक ,तसेच कार्यालयीन कामकाजाचे असू शकते . जसे कि पूर्वीच्या काळी लोक आपल्या दूरच्या नातेवाईकांशी पत्राद्वारे संवाद साधत असत जे कि आता खूपच दुर्मिळ आहे पण कार्यालयीन कामकाज अर्ज पद्धती मध्ये आजही पत्र लेखन केले जाते . पत्र लेखांचे विविध प्रकार आहेत या मध्ये २ प्रमुख प्रकार म्हणजे औपचारिक आणि अनौपचारिक पत्रे होय. Read More: –1600+ Samanarthi Shabd Marathi PDF Download | मराठी समानार्थी शब्द Advertisement पत्र लेखनाचे प्रकार – Types Of Letter Writing In Marathi अनौपचारिक पत्रे – Informal Letter in Marathi औपचारिक पत्रे – Formal Letter in Marathi Informal Letter in Marathi | अनौपचारिक पत्रे Advertisement अनौपचारिक पत्रे म्हणजे एक प्रकारे कॊटुंबिक पत्रे हि आपल्या परिवारामध्ये नातेवाईक ची खुशाली कळवण्यासाठी उदाहरणार्थ आपण निम्मित बाहेरगावी राहत असाल तर आई वडिलांना तिकडे तिकडची परीस्थित वगैरे सांगणारे पत्र अनौपचारिक पत्रे मध्ये येते इंटरनेट आणि मोबाईल मुले अशा प्रकारची पत्रे आता सध्या कोणीही लिहीत नाही अशा पद्धतीची पत्र आता फक्त इतिहासमध्येच पाहावयास मिळतात. तरी सुद्धा स्पर्धा परीक्षा ची तयारी करताना अशा पात्रांचा नमुना अभ्यासाने आवश्यक आहे. अनौपचारिक पत्रे नमूने – Informal Letter in Marathi Formats खाली काही अनौपचारिक पत्रे नमूने देण्यात आले आहे. ह्या पत्रांच्या नमुन्याचा उपयोग तुम्हाला अनौपचारिक पत्रे लिहण्यास मदत होणार आहे. खाली प्रमाणे तुम्ही ह्या पत्रांचे नमुने बघू शकतात. अनौपचारिक पत्रे नमूना 1 – Informal Letter in Marathi Format 1 Advertisement समीर जगदाळे,गुरुकृपा सोसायटी,चारकोप कांदीवली,मुंबई – ४०००६७.दि. १९ जून २००८ ती. मामांना, सा. न. वि. वि. पत्र लिहिण्यास कारण की आज लोकसेवा आयोग परीक्षेचा निकाल वर्तमान पत्रात वाचला. आय.ए.एस. परीक्षेत ८२ टक्के गुण मिळवून पहिल्या दहा उमेदवारात तुमचे नाव पाहून खूप आनंद झाला. लगेच एक किलो पेढे आणले आणि पूर्ण सोसायटीत वाटले. ज्याला त्याला ही आनंदाची बातमी सांगत सुटलो. फोनची सोय नसल्याने पत्र लिहून तुमचे अभिनंदन करतो. मामा, तुम्ही असेच यश मिळवत पुढे जा व आमच्यासाठी एक प्रेरणाशक्ती बना. ती. आजोबा व आजीस माझा नमस्कार. आम्ही सर्वजण सुखरुप आहोत. पुन्हा एकदा तुमचे अभिनंदन व कौतुक करून पत्र पुरे करतो. कळावे. तुमचा लाडका,समीर अनौपचारिक पत्रे नमूना 2 – Informal Letter in Marathi Format 2 दिनांक : 10 जानेवारी 2023.प्रति, माननीय संचालक,नेहरू तारांगण,वरळी, मुंबई. विषय :- वैज्ञानिक उपक्रमाबद्दल अभिनंदन. महोदय, नेहरू तारांगण हे खगोलप्रेमींसाठी हक्काचे ठिकाण आहे. याचा अनुभव आमच्या शाळेच्या भूगोल मंडळाच्या शैक्षणिक भेटीत घेता आला. अवकाशातील विविध घडामोडी आम्ही एका जागेवर बसून बघू शकलो. बंद इमारतीत खुले आकाश बघताना सर्वच विद्यार्थी चकित झाले होते. अंतराळातील ग्रह- ताऱ्यांची सखोल माहिती मिळाली. विविध खगोल विज्ञान प्रदर्शनांसाठी या माहितीचा विद्याथ्र्यांना निश्चितच उपयोग होईल. नेहरू तारांगणामुळे विद्यार्थ्यांत आणखी खगोल जिज्ञासा निर्माण झाली आहे. आमच्या शाळेच्या भूगोल मंडळासाठी ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. शैक्षणिक भेटीच्या यशस्वीतेत नेहरू तारांगणाचे सहकार्य फार मोलाचे आहे. आपल्या या वैज्ञानिक उपक्रमाबद्दल आणि दुपारच्या उन्हात चांदण्यांची शीतलता देणाऱ्या नेहरू तारांगणाचे खूप आभार. आपल्या पुढील सर्व उपक्रमांस सदिच्छा! आपला कृपाभिलाषी,अ. ब. क विदयार्थी प्रतिनिधी,भूगोल मंडळ,अभिनव विद्यालय. अनौपचारिक पत्रे कसे लिहावे ? या पत्रामध्ये जास्त अशी बंधने नसतात महतवाची माहिती टाकल्या नंतर लिहिणारा अशी पत्रे हवी तशी लिहू शकतो. तरी सुद्धा या मध्ये सुरुवातीला डाव्या कोपऱ्यात तारीख लिहिणे चांगले ठरते. त्या नंतर ज्याला पत्र लिहीत आहात त्या व्यक्ती च नाव उदाहरणार्थ प्रिया आईस ,बाबांस नमस्कार असे नाव टाकावे. या मध्ये विषय टाकणे आवश्यक नाही. यानंतर मुख्य विषय सुरु केले जाऊ शकतात या मध्ये विषय बदलताना जरुरी परिच्छेद पाडावेत. पात्र अनौपचारिक असल्या मुले रोजची सहज सोप बोली भाषा वापरावी. पत्राचा समारोप घरची विचारपूस करून केला जातो. Read More :- Shahu Maharaj Information In Marathi PDF Download | राजर्षी शाहू महाराजांची संपूर्ण माहिती औपचारिक पत्रे – Formal Letter Information औपचारिक म्हणजेच कार्यालयीन पत्रे जी खूपच महत्वाची असतात आजच्या इंटरनेट च्या जगामध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या पत्रांनी पटव्यवहार केला जातो. अशी पत्रे मागणी किंवा तक्रार करण्यासाठी खूपच जास्त वापरली जातात उदाहरणार्थ :वीज पुरवठा खंडित होण्या मुले त्या बाबत तक्रार करणारे पत्र वीज कंपनी ला पाठवणे. अशा पत्रांमध्ये तारीख वेळ आणि भाषा योग्य [पद्धतीने लिहिणे खूपच महत्वाचे असते. बहुतांश स्पर्धा परीक्षांमध्ये यावर आधारित प्रश्ने विचारली जातात. कार्यालयीन औपचारिक पात्रांमध्ये विविध प्रकार आहेत याची माहिती विस्तारित पद्धतीने पाहुयात. औपचारिक पत्रे नमूने – Formal Letter In Marathi Format खाली काही अनौपचारिक पत्रे नमूने देण्यात आले आहे. ह्या पत्रांच्या नमुन्याचा उपयोग तुम्हाला अनौपचारिक पत्रे लिहण्यास मदत होणार आहे. खाली प्रमाणे तुम्ही ह्या पत्रांचे नमुने बघू शकतात. Read More :- Gram Sevak Information In Marathi PDF Download | ग्रामसेवकाची संपूर्ण माहिती मराठी मध्ये औपचारिक पत्रे नमूना – Formal Letter In Marathi Format नैतिक शिक्षण हा अभ्यासक्रमात अनिवार्य विषय म्हणून ओळखण्यासाठी तुमच्या राज्याच्या शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहा. ई – 317, प्रताप विहार,विजय नगर,जिल्हा – गाझियाबाद (उत्तर प्रदेश)तारीख: 20-02-2023 प्रती, माननीय शिक्षण मंत्री, शिक्षण विभाग, उत्तर प्रदेश. विषय:- नैतिक शिक्षण हा अभ्यासक्रमात अनिवार्य विषय बनवण्याचे पत्र. सर, आधुनिक युगात शाळा, सरकारी कार्यालये, व्यावसायिक कर्मकांड इत्यादी सर्वच क्षेत्रांत प्रचलित असलेली अराजकता, लुटमार, भ्रष्टाचार, अनैतिकता इ. सर्वश्रुत आहे. आज देशातील लोकांमध्ये स्वार्थ, खादाडपणा आणि असंतोषाची प्रवृत्ती घर करून बसली आहे, ज्याचे मुख्य कारण म्हणजे जीवनातील नैतिक मूल्यांचा अभाव. त्यामुळे नागरिकांच्या उन्नतीसाठी आणि जीवनात नैतिक मूल्यांचा समावेश व्हावा ही नम्र विनंती. शाळांमध्ये नैतिक शिक्षण सक्तीचे करा. नैतिक शिक्षणाचा समावेश गणित आणि विज्ञानासारखा अनिवार्य विषय म्हणून अभ्यासक्रमात केला पाहिजे. विद्यार्थी या विषयात अनुत्तीर्ण झाल्यास त्याला पुढील वर्गात प्रवेश देऊ नये, असे नियम असावेत. तुम्ही माझ्या सूचनेचा गांभीर्याने विचार कराल अशी मला मनापासून आशा आहे. धन्यवाद,राजेश शर्मा औपचारिक पत्रे कसे लिहावे ? औपचारिक पत्र म्हणजेच कार्यालयीन पत्र या मध्ये सगळे नियम पळून पत्र लिहावे लागते . पत्राची सुरवात करताना सगळ्यात आधी उजव्या कोपर्या मध्ये दिनांक लिहावा . कार्यालयीन पत्र असल्या मुले प्रति लिहिलीय नंतर संबंधित विभाग व त्या अधिकाऱ्याचे नाव टाकावे . स्पर्धा परीक्षांमध्ये दिलेल्या प्रशांनुसार पत्ता आदी माहिती तिथे भरावी . या नंतर पत्राचा विषय तक्रार ,मागणी जे काही असेल तो टाकावा . मुख्य पत्र सुरु करताना सुरुवातीला महोदय किंवा महोदय असे टाकावे . या नंतर मुख्य पत्र सुरु करून पत्राचा विषय विस्तारित स्वरूपात सांगावा या मध्ये २ परिच्छेद टाकावे . शेवट करताना आपला विश्वासू आणि तुमचे नाव टाकावे . औपचारिक पत्रांचे प्रकार – Types Of Formal Letter तक्रारपत्र – Complaint Letter विनंतीपत्र – Request Letter मागणीपत्र – Demand Letter चौकशीपत्र – Inquiry Letter अभिनंदन पत्र – Congratulations Letter आभारपत्र – Letter of Thanks निमंत्रणपत्र – Letter of Invitation क्षमापत्र – Letter of Apology Read More :- Samuh Darshak Shabd PDF Download | सर्व समूहदर्शक शब्दांची माहिती (Collective Words) 1. तक्रार पत्र – Complaint Letter तक्रार पत्र हे सध्या स्वरूप मध्ये असते या मध्ये आपण एकाद्या वस्तू किंवा सेवे बद्दल तक्रार करू शकता. तक्रार पत्र मध्ये तक्रार हि कशाबद्दल आणि कोणाविरुद्ध केली आहे हे महत्वाचे असते. तसेच तक्रारींचे कारण आणि पुरावा मांडणे सुद्धा तितकेच आवश्यक असते. उदाहरणार्थ :एकादी वस्तू किंवा सेवा घेताना तुमची फसवणूक होणे, नुकसान होणे ,अन्याय होणे ,लाभ न मिळणे. तुम्ही अशी तक्रार पत्रे राज्यशासन ,संबंधित संस्था किंवा व्यक्ती यांच्या कडे पाठवून नुकसान भरपाईची मागणी सुद्धा करू शकता. तक्रार पत्र नमूना – Complaint Letter Format रस्त्यावरील कर्कश आवाजामुळे अभ्यासात येणाऱ्या व्यत्ययाबद्दल पोलीस खात्याकडे एक तक्रार नोंदवा. श्री. प्रसाद,२४० प्रभात रस्ता, पुणे ४,दिनांक : १०-३-२०१० मा. पोलीस सब इन्स्पेक्टरडेक्कन जिमखाना पोलीस स्टेशन, पुणे ४ सा. न. वि.वि. मार्च व एप्रिल हे आम्हा विद्यार्थ्यांचे ऐन परीक्षांचे दिवस. मी या वर्षी बारावीच्या परीक्षेस बसत आहे. परीक्षा दोन मार्चपासून सुरू होणार आहे. आमच्या घराशेजारी एक मंगल कार्यालय आहे. चे दिवस ये हे ऐन लग्नसराईचे असल्यामुळे तेथे दररोज कोणते ना कोणते तरी लग्नाचे वऱ्हाड येते. विवाह समारंभ हा आनंद सोहोळा आहे त्यामुळे बॅन्ड वाजंत्री वाजणारच हे मान्य आहे. लग्नसमारंभानंतरही सिनेसंगीताच्या रेकॉर्ड्स रात्री उशिरापर्यंत कर्कश आवाजांत वाजत राहिल्या तर अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे कठीण होते. लग्न समारंभाचा आनंद घेताना आसपासच्या लोकांना त्रास होणार नाही ह्याचा विचार करावयास हवा तसे होत नाही. तरी आपण या बाबतीत विशेष लक्ष घालून वेळेचे बंधन घालून, हा त्रास कमी करू शकला तर आम्हा विद्यार्थ्यांवर अनंत उपकार होतील. कृपया यात आपण लक्ष घालावे. तसदीची माफी असावी. कळावे. आपलाआनंद केतकर 2. विनंतीपत्र – Request Letter विनंती पत्र हे एखाद्या संस्था किंवा कंपनी ला विनंती करण्या साठी लिहिले जाऊ क्षमते. उदाहरणार्थ :गणेशउत्सव दरम्यान रात्री १२ नंतर लाऊड स्पीकर बंद ठेवण्या साठी तुम्ही मंडळाला पत्र लिहू शकता. ह्या मध्ये कुणाला पत्र लिहिणार आहेत त्याची सुरवात करून पुढे मुख्य विनंती पत्राचा विषय लिहायला घेतला जातो. विनंतीपत्र नमूना – Request Letter Format तुम्ही चार दिवस शाळेत अनुपस्थित राहणार आहात, त्या साठी मुख्याध्यापकांना पत्र लिहा कुमारी रमा जोशी,५ लीला सदन, सावरकर नगर,नाशिक.दि. ११ जानेवारी, २००९ प्रती, माननीय मुख्याध्यापक, आदर्श विद्यालय, नाशिक आदरणीय गुरुवर्य, सा.न.वि.वि. मी आपल्या शाळेत ७ वी अ वर्गात शिकत आहे. दि. १८ जानेवारी २००९ रोजी माझ्या मोठ्या भावाचे लग्न आहे. लग्न सांगली येथे आहे. या लग्नासाठी आम्ही घरांतील सर्वजण जाणार आहोत. म्हणून मी १६ जानेवारी ते २२ जानेवारी पर्यत शाळेत उपस्थित राहू शकणार नाही. या रजा काळातील बुडालेला माझा अभ्यास मी माझ्या मैत्रिणींच्या साहाय्याने पूर्ण करीन. मी अभ्यासात मागे पडणार नाही अशी मी खात्री देते. तरी कृपया मला रजा द्यावी, ही नम्र विनंती तसदीबद्दल क्षमा असावी. आपली नम्रर. मा. जोशी(इ. ७ वी तुकडी अ) मागणीपत्र – Demand Letter जेव्हा आपल्याला एखादी वस्तू किंवा सेवा हवी असते तेव्हा तिची मागणी करणार पत्र म्हणजेच मागणी पत्र होय. त्या वस्तूची योग्य ती किंमत देण्याची आपली तयारी असते अर्थात हे पत्र पूर्ण पणे अधिकृत असून त्याचा रेकॉर्ड ठेवला जातो. पत्राची भाषा हि अर्थतच विनंती पत्र सारखीच असते. या पत्राद्वारे तुम्ही संस्था ,कंपनी किंवा दुकानाकडे वस्तू किंवा सेवा मागणी करू शकता. जसे कि शालेय वस्तूची मागणी करणे ,औषध मागवणे ,घरगुती कामाच्या वस्तूंची मागणी करणे ,माहिती पुस्तके मागवणे असे. मागणी पत्र नमूना – Demand Letter Format खेळाच्या सामानाची मागणी पत्र क्रीडा विभाग प्रमुखपेठे हायस्कूल, पुणे.दि. 20-2-2023 क्रीडा साहित्य विश्व,शंकर नगर,गंगापूर रोड, नाशिक सा.न.वि.वि. आमच्या शाळेच्या क्रीडा विभागासाठी खाली नमूद केलेला माल कृपया त्वरित पाठवावा. मालाचे योग्य दर लावावेत आणि बील मालासोबत पाठवावे. खेळाचे कोणते साहित्य हवे आहे ते खाली नमूद केले आहे. व्हॉलिबॉल6 नग लेझिम३ डझन (३६ नग)टेबल टेनिस बॉल3 डझनडॉज बॉल7 नग बॅडमिटन शटल्स5 डझन कळावे ही विनंती आपलाक्रीडा विभाग प्रमुख, चौकशीपत्र – Inquiry Letter चोकशी पत्र मध्ये आपण एकाद्या गोष्टींच्या उपलब्धतेबाबत चोकशी करू शकतो . पत्रामध्ये चोकशी कोणत्या गोष्टीची करायची आहे या बद्दल सविस्तर लिहिले जाते . पात्राची भाषा हि आदरार्थी अशी असावी तसेच शेवट तसदीबद्दल क्षमस्व असे शब्द लिहून करावा. चौकशीपत्र नमूना – Congratulations Letter शीतल साठे,१२, गर्ल्स हॉस्टेल,पुणे. प्रिय आईस,. कशी आहेस ? मी मजेत, खूप वेळानंतर पत्र लिहायला मिळत आहे. सध्या आमच्या परीक्षा चालू होत्या. अभ्यासात वेळ कसा निघायचा समजायचं नाही. परवा राजू दादा चा फोन आलेला. त्याने तुझ्या सर्दी खोकला बद्दल सांगितले. स्वतःची काळजी घे. डॉक्टर कडे जा, गरम पाणी पी, 1 गुळण्या कर. आजी आजोबा कसे आहेत, विचारला म्हणून सांग. सुट्टीत येईन भेटायला. तुझी,शीतल अभिनंदन पत्र – Congratulations Letter अभिनंदन पत्र हे आपण आपल्या परिवारामध्ये तसेच आपल्या काम मधल्या स्टाफ ला सुद्धा लिहू शकता . या पत्राद्वारे तुम्ही केलेल्या कामाचं अभिनंदन किंवा मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदन करू शकता . पत्राची भाषा हि हर्षात्मक असून त्या मध्ये कोतुक केलेलं असावे . उदाहरणार्थ :मित्राला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्या नंतर त्याच अभिनंदन करणारे पत्र. अभिनंदन पत्र नमूना – Congratulations Letter Format A – 101पदवीसाठी अभिनंदन पत्ररीजन्सी घरेनवी मुंबई १७ फेब्रुवारी २०२१ प्रिय गायत्री, आम्ही तुमच्या पदवीदानाबद्दल आमचे हार्दिक आणि दयाळू अभिनंदन करण्यासाठी लिहित आहोत. प्रिये, तुम्ही यशस्वीरित्या आम्हा सर्वांना अभिमान वाटला, आणि तुमचे ९०% गुणांचे विलक्षण गुण ऐकून आम्हाला आनंद झाला. ही एक उत्कृष्ट कामगिरी आहे आणि त्यासाठी मोठ्या उत्सवाची गरज आहे. आम्हाला खात्री आहे की तुम्ही हे साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम केले असतील कारण कष्ट आणि दृढनिश्चयाशिवाय हे शक्य झाले नसते. आम्हाला खात्री आहे की तुमची कामाची नैतिकता, दृढनिश्चय आणि सचोटी तुम्हाला चांगल्या ठिकाणी घेऊन जाईल. आमच्या कौतुकाचे प्रदर्शन करण्यासाठी, आम्ही तुमच्यासाठी एक छोटी भेट जोडली आहे. तुमच्या नवीन कारकिर्दीसाठी शुभेच्छा!राम आणि शीला आभार पत्र – Letter of Thanks या पत्राद्वारे आपल्या कामामध्ये मदत केल्या बद्दल त्या व्यक्तीचे आभार मानले जातात . या पात्राची भाषा नम्र अशी सौजन्य पूर्ण असते . उदाहरणार्थ:- १०वि मध्ये चांगले मार्क्स मिळवून पास झाल्यानंतर आपल्या शिक्षकांना पत्र लिहून त्यांचे आभार मानाने. या मध्ये मग तुम्ही शिक्षकांनी घेतलेली मेहनत आणि केलेली मदत यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करू शकता. पत्राचा शेवट आदरार्थी करावा. आभार पत्र नमूना – Letter of Thanks Format अॅडव्हायझरी बोर्डसाठी आभार पत्र तारीखनाव पत्ताशहर/राज्य/झिप प्रिय (सल्लागार मंडळ सदस्यांचे नाव):- वर्क-बेस्ड लर्निंग अॅडव्हायझरी बोर्डवरील तुमच्या सक्रिय सहभागाद्वारे (हायस्कूलचे नाव) येथील वर्क-बेस्ड लर्निंग प्रोग्रामला तुम्ही दिलेला वेळ, प्रतिभा आणि कौशल्य यासाठी धन्यवाद. तुम्ही तुमच्या समर्पणाने आणि आमच्या विद्यार्थ्यांच्या आणि कार्यक्रमाच्या सतत पाठिंब्याने फरक पडला आहे. तुमच्या कल्पना, इनपुट आणि उत्साह सर्वात उपयुक्त ठरला आणि आमच्या प्रोग्राममध्ये मौल्यवान सुधारणा करण्यात आम्हाला मदत केली. (सल्लागार समितीच्या सहाय्याने तुमच्या प्रोग्रामशी संबंधित बदल समाविष्ट करण्यासाठी हा परिच्छेद वैयक्तिकृत करा).पुन्हा, या समितीवर काम करताना तुमचे योगदान, वेळ आणि प्रयत्नांबद्दल मी तुमचे आभार मानतो. प्रामाणिकपणे, (समन्वयकाचे नाव)कार्य-आधारित शिक्षण समन्वयक निमंत्रणपत्र – Letter of Invitation निमंत्रण पत्र हे तुमच्या कडे असेल्या कार्य साठी लोकांना निमंत्रण देणारे पात्र असते . निमंत्रण पत्र आणि लग्नाचे पत्रिका दोन्ही निमंत्रण च होय पण पत्रिका आणि पत्र या मध्ये फरक आहे . निमंत्रण पत्राद्वारे तुम्ही एका विशिष्ठ व्यक्तीला पत्राद्वारे निमंत्रण पाठवता . या मध्ये लग्नाचे आमंत्रन ,वाढदिवस ,पूजा ,किंवा इतर अन्य कार्यक्रम यांचे आमंत्रण असते . पत्राचे सुरवातीला विषय टाकून पुढे या मध्ये आदरायुत्क भाषा वापरून निमंत्रण दिले जाते . निमंत्रणपत्र नमूना – Letter of Invitation Format पासून/कडून[प्रेषकाचे नाव] [पत्ता] तारीख: [पत्र लिहिल्याची तारीख प्रती, [प्राप्तकर्त्यांचे नाव] [पत्ता]प्रिय सर/मॅडम, तुम्हाला कळविण्यात मला आनंद होत आहे की तुम्ही [इव्हेंटचे नाव] साठी हार्दिक आमंत्रित आहात. हा कार्यक्रम [इव्हेंटचा पत्ता] येथे आयोजित केला जाईल आणि [इव्हेंटच्या तारखेला] [इव्हेंटच्या वेळी] आयोजित केला जाईल. कार्यक्रम अधिक आनंददायी करण्यासाठी मध्यान्ह भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. कृपया आमच्याशी [संपर्क क्रमांक] वर संपर्क करून किंवा [ईमेल आयडी] वर ईमेल करून [तारीख] रोजी किंवा त्यापूर्वी आपल्या उपलब्धतेची पुष्टी करा. आम्ही इव्हेंट [इव्हेंटचे नाव] मध्ये आपल्या उपस्थितीची वाट पाहत आहोत. आपले विनम्र,[स्वाक्षरी][प्रेषकाचे नाव] क्षमापत्र – Letter of Apology हे पत्र आपल्या चुकी साठी क्षमा मागणारे पत्र असते. पत्राची भाषा नम्रता पूर्वक असणे आवश्यक आहे. पात्राची सुरुवात आपला पत्ता नाव टाकून पुद्धे विषय लिहावा. या नंतर मूळ मायना ज्या मध्ये केलेली चूक आणि त्याची क्षमा मागावी. शेवट सुद्धा आदरार्थी असा करावा. क्षमापत्र नमूना – Letter of Apology Format एका ग्राहकाला दिलगिरी पत्र पासून/ कडून,ग्रीन पार्क,नवी दिल्लीदिनांक: २९/०४/२०२२ प्रती, अखिल दासएनचेंटेड वुड्स प्रायव्हेट लिमिटेडH/n 53, JK लेनमालवीय नगरनवी दिल्ली. विषय: माफीनामा पत्र प्रिय महोदय, 29 एप्रिल 2022 रोजी तुम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नाबाबत मी तुम्हाला उत्तर देत आहे. सर्वप्रथम, टीम STB ऑनलाइन स्टोअरच्या वतीने, तुमच्या अपेक्षा पूर्ण न करणारे उत्पादन वितरित केल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करू इच्छितो. मी समजतो की तुम्हाला चुकीचे उत्पादन वितरित करणे किती निराशाजनक असू शकते म्हणून मी या समस्येचे निराकरण करण्यासाठी माझ्या सामर्थ्याने सर्वकाही करेन. मी आमच्या डिलिव्हरी भागीदारांना या मिश्रणाची माहिती देण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला आहे आणि त्यांनी मला आश्वासन दिले आहे की योग्य उत्पादन तुम्हाला 30 मे 2022 रोजी वितरित केले जाईल. आमच्याकडून ही चूक झाली असल्याने, मी यासाठी व्यवस्था केली आहे. उत्पादन विनामूल्य वितरित केले जाईल. ही समस्या आमच्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल मी तुमचे आभारी आहे आणि अशा चुकीची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेईन. टीम STB ऑनलाइन स्टोअरमध्ये, आम्ही आमच्या सर्व ग्राहकांना महत्त्व देतो आणि त्यांना आमच्या सेवा आणि उत्पादनांमध्ये उत्कृष्टतेने पुरवठा करण्यावर लक्ष केंद्रित करतो. प्रामाणिकपणे,जॉर्डन ह्नियलमटीम STB ऑनलाइन स्टोअरमोबाईल : XXXXXXXXXXX Read More :- Sandhi In Marathi PDF Download | संधी आणि संधीचे प्रकार संपूर्ण माहिती Conclusion Conclusion:- आपण ह्या आर्टिकल मध्ये बघितले की पत्र लेखन म्हणजे काय आहे. त्याच्या उपयोग कसा करतात त्या सर्वांची माहिती आपण ह्या आर्टिकल Letter Writing In Marathi मध्ये जाणून घेतली आहे. letter writing in marathi, marathi letter writing format, marathi new format of letter writing, how to write letter in marathi, letter writing in marathi for 9th class, how to write letter in marathi, how to write email letter in marathi, patra lekhan marathi. ह्या आर्टिकल मध्ये तक्रारपत्र – Complaint Letter, विनंतीपत्र – Request Letter, मागणीपत्र – Demand Letter, चौकशीपत्र – Inquiry Letter, अभिनंदन पत्र – Congratulations Letter, आभारपत्र – Letter of Thanks, निमंत्रणपत्र – Letter of Invitation, क्षमापत्र – Letter of Apology आणि Letter Writing Format In Marathi Formal Letter in Marathi इत्यादि बघितले आहे. Frequentaly Asked Questions For Marathi Letter Writing Q1. पत्र लेखनाचे मुख्य प्रकार कोणते ? Ans:- पत्र लेखनाचे २ मुख्य प्रकार आहेत औपचारिक पत्रे, आणि अनौपचारिक पत्रे, यामधून परत औपचारिक पात्रांमध्ये निमंत्रणपत्र, आभारपत्र, अभिनंदन पत्र किंवा गौरवपत्र, चौकशीपत्र, क्षमापत्र, मागणीपत्र, विनंतीपत्र, तक्रारपत्र, स्व-परिचयपत्र. असे उपप्रकार आहेत. Q2. पत्र लेखन म्हणजे काय ? Ans:- पत्र लेखन म्हणजे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला पत्राच्या रूपाने संदेश पाठवणे किंवा सभांषण करणे होय . भरती अपडेट साठी टेलिग्राम ला जॉईन करा Related Posts:Marathi Leave Application Letter Example And Format…All Arj In Marathi With Format & Example | सर्व…All Marathi Grammar - Marathi Vyakaran PDF Download…All Fundamental Duties In Marathi PDF Download |…Noun And Types Of Noun in Marathi PDF Download | नाम…Batmi Lekhan In Marathi PDF Download | बातमी लेखन…