Advertisement

Shabdanchya Jati PDF Download | मराठी व्याकरण | शब्दांच्या जातीं आणि त्यांचे प्रकारांची संपूर्ण माहिती

Shabdanchya Jati:- Shabdanchya Jati is the most important part of Marathi grammar. Be it competitive exams or school exams, questions based on this are fixed in grammar, and losing marks on it means giving up a golden opportunity. For this only once it is necessary to read detailed information about word types and their types. In today’s post, we are going to see detailed information about Shabdanchya Jati and its types for you. Through this post, you can also download Shabdanchya Jati PDF Download.

Advertisement

Shabdanchya Jati

शब्दांच्या जाती हा प्रकार मराठी व्याकरणाचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. स्पर्धा परीक्षा असो कि शालेय परीक्षा व्याक्रणामध्ये यावर आधारित प्रश्न हे ठरलेले असतात. आणि त्यावर असलेले गुण गमावणे म्हणजे आलेली सुवर्ण संधी सोडून देणे होय. या साठीच फक्त एकदा तरी शब्दांची जाती त्यांचे प्रकार याबद्दल विस्तारित माहिती वाचून काढणे आवश्यक ठरते आजच्या या पोस्ट मध्ये आम्ही तुमच्यासाठी Shabdanchya Jati आणि त्याचे प्रकार या बद्दल विस्तरित माहिती बघणार आहोत. ह्या पोस्ट च्या माध्यमातून तुम्ही Shabdanchya Jati PDF Download पण डाउनलोड करू शकतात.

Advertisement

Read More:- Aupcharik Patra Format And Example | औपचारिक पत्र प्रारूप और उदाहरण

शब्द म्हणजे काय | What is a word?

शब्दाच्या जाती समजून घेताना शब्दाची व्याख्या शब्द म्हणजे काय ते अगोदर समजून घेऊयात . शब्द म्हणजेच अर्थपूर्ण अक्षर समूहाला शब्द असे म्हंटले जाते. शब्द जेव्हा वाक्यामध्ये वापरले जातात आणि त्यांना प्रत्यय जोडला जातो तेव्हा त्यांना पद असे म्हणतात.

Shabdanchya Jati In Marathi | शब्दांची जात म्हणजे काय?

Advertisement

शब्दांच्या जाती, म्हणजे मराठीमध्ये “शब्दांचे वर्गीकरण” ही एक भाषिक संकल्पना आहे. जी शब्दांची त्यांच्या व्याकरणाच्या गुणधर्मांवर आधारित वर्गीकरण करण्यासाठी वापरली जाते. यात शब्दांना वेगवेगळ्या गटांमध्ये किंवा वर्गांमध्ये, जसे की संज्ञा, क्रियापद, विशेषण, सर्वनाम इत्यादी, वाक्यातील त्यांच्या भूमिका आणि कार्यांवर आधारित संघटित करणे समाविष्ट आहे. हे वर्गीकरण भाषेची रचना आणि वाक्यरचना समजण्यास मदत करते, प्रभावी संवाद आणि भाषेचे विश्लेषण सुलभ करते.

Read More:- Batmi Lekhan In Marathi PDF Download | बातमी लेखन कसे करावे संपूर्ण माहिती

शब्दांच्या जातीचे प्रकार ? | Types Of Shabdanchya Jati ?

Advertisement

मराठीमध्ये शब्दांच्या वर्गीकरणात (शब्दांच्या जाती) त्यांच्या व्याकरणाच्या गुणधर्मांवर आधारित खालील प्रकारांचा समावेश होतो:-

शब्दांच्या जाती 8

  1. नामे:- लोक, ठिकाणे, गोष्टी किंवा कल्पना दर्शवणारे शब्द.
  2. क्रियापद :- क्रिया किंवा अवस्थांचे वर्णन करणारे शब्द.
  3. विशेषण :- वर्णन किंवा गुण प्रदान करण्यासाठी संज्ञांमध्ये बदल करणारे शब्द.
  4. क्रियाविशेषण अव्यय:- रीती, वेळ, स्थान किंवा पदवी दर्शविण्यासाठी क्रियापद, विशेषण किंवा इतर क्रियाविशेषणांमध्ये बदल करणारे शब्द.
  5. सर्वनाम (सर्वनाम): संज्ञांच्या जागी वापरलेले शब्द.
  6. शब्दयोगी अव्यय
  7. उभयान्वयी अव्यय
  8. केवलप्रयोगी अव्यय

मराठी भाषेतील वाक्यरचना आणि व्याकरणातील शब्दांची भूमिका आणि कार्ये समजून घेण्यास या श्रेणी मदत करतात.

Shabdanchya Jati Marathi | शब्दांच्या जाती

शब्दांची कार्ये विविध असतात व या त्यांच्या विविध कार्यावरून शब्दांच्या आठ जाती मानल्या जातात. त्या पुढीलप्रमाणे :-

  1. नाम
  2. सर्वनाम
  3. विशेषण
  4. क्रियापद
  5. क्रियाविशेषण अव्यय
  6. शब्दयोगी अव्यय
  7. उभयान्वयी अव्यय
  8. केवलप्रयोगी अव्यय

शब्दांच्या या जातीपैकी नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद या चार शब्दांच्या जातीत लिंग, वचन व विभक्ती यांच्यामुळे बदल होतो. म्हणून यांना विकारी किंवा सव्यय असे म्हणतात. तर क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी, केवलप्रयोग या चार शब्दांच्या जातीत लिंग, वचन किंवा विभक्ती यामुळे बदल होत नाही. म्हणून त्यांना अविकारी किंवा अव्यय असे म्हणतात.

Read More:- Jahirat Lekhan In Marathi With Format & Example | जाहिरात लेखन संपूर्ण माहिती

नामे | Shabdanchya Jati

प्रत्यक्षात असलेल्या किंवा कल्पित वस्तू वा त्यांच्या गुणधर्मांना दिलेल्या नावांना नामे म्हणतात. नामांचे मुख्य प्रकार तीन :-

1. सामान्यनाम

एकाच जातीच्या वस्तुंना सामान्यतः जी नावे देण्यात येतात, त्यांना सामान्यनाम असे म्हणतात. उदा. मोर, कोल्हा, मुलगा, शाळा, घर, कळप, सैन्य, सोने, दूध, कापड, सिंह इ. सामान्य नामात समुदाय वाचक नामे किंवा समुहवाचक नामे आणि पदार्थवाचक नामे समाविष्ट होतात.

  1. समूहवाचक नामे :– समुहाला दिलेली नावे. उदा. : जुडी, सैन्य, कळप, टोळी, समिती
  2. पदार्थवाचक नामे :- हे पदार्थ संख्येत न मोजता लिटर, मीटर, ग्रॅम इ. मध्ये मोजतात. उदा. सोने

2. विशेषनाम

ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील विशिष्ट वस्तू वा पदार्थ किंवा प्राणी यांचा बोध होतो त्यास विशेषनाम म्हणतात. उदा. गोपाळ, गंगा, हिमालय, भारत इ. 

3. भाववाचक नाम

प्राणी किंवा वस्तू यांच्यातील गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होणाऱ्या नामाला भाववाचक नाम असे म्हणतात. उदा. गोडी, माणुसकी, शांतता, चांगुलपणा, तारूण्य इ. भाव किंवा गुणांबरोबरच स्थिती किंवा क्रिया दाखविणाऱ्या नामांचा समावेश भाववाचक नामात होतो. उदा. बाल्य, तारुण्य, वार्धक्य, मरण, धाव, हास्य, चोरी, उड्डाण, नृत्य

सामान्य नामाचे अनेक वचन होऊ शकते. परंतू विशेष नामे व भाववाचक नामे यांचे अनेकवचन होत नाही. विशेषनामे व सामान्यनामे यांना धर्मिवाचक नामे तर भाववाचक नामाला धर्मवाचक नाम म्हणतात. आई, ई, की, गिरी, ता, त्व, पण/पणा, य, वा प्रत्यय लागून भाववाचक नामे तयार होता.

य/र्य सुंदरसुंदर – सौंदर्य, गंभीर – गांभीर्य, धीर धैर्य, मधुर-माधुर्य, पवित्र – पावित्र्य, पुरोहित – पौराहित्य, वात्सल, चतुर – चातुर्य
त्वप्रौढ – प्रौढत्व, पुरुष – पौरुषत्व, मनुष्य – मनुष्यत्व, स्वामी – स्वामित्व, वृद्ध- वृद्धत्व
पण/पणाभोळा – भोळेपणा, चांगला – चांगुलपणा, प्रामाणिक – प्रामाणिकपणा, शहाणा – शहाणपणा 
ताशांत – शांतता, नम्र नम्रता, सम समता, क्रुर – क्रुरता
गिरीफसव – फसवेगिरी, दादा-दादागिरी, गुलाम – गुलामगिरी
वागोड – गोडवा, गार – गारवा, ओला – ओलावा, दुर- दुरावा
कीपाटील – पाटीलकी, माणूस – माणूसकी, फुशार – फुशारकी, शाब्बास- शाब्बासकी
श्रीमंत – श्रीमंती, गरीब गरीबी, हुशार हुशारी, चोर-चोरी, वकील – वकीली
आईमहाग – महागाई, दांडगा – दांडगाई, नवल – नवलाई

विशेष नाम जातीवाचक वापरल्यास सामान्य नामाचे कार्य करते

कुंभकर्ण (अतिशय झोपाळू), भीम (सशक्त मुले), सुदाम (अशक्त मुले), कर्ण (उदार व्यक्ती), जमदग्नी (अतिशय रागीट मनूष्य), नारद, बाजीराव, नेपोलियन इ. विशेष नामे जातीच्या अर्थाने वापरल्याने सामान्य नामाचे कार्य करतात. जसे कुंभकर्ण म्हणजे झोपाळू माणसे, भीम माणसे सशक्त माणसे, कर्ण म्हणजे उदार माणसे या अर्थाने वापरल्यामुळे ती सामान्य नामे होतात.
उदा. अ) तो अगदी कर्ण आहे. ब) आम्हाला आजच्या विद्यार्थ्यात सुदाम नकोत भीम हवेत. विशेष नामाचे अनेकवचन झाल्यास त्याचे सामान्य नाम होते :-

विशेष नामाचे अनेकवचन झाल्यास त्याचे सामान्य नाम होते 

विशेष नाम ही एकवचनी असतात. परंतू विशेष नामाच्या पुढे अनेक वचनी शब्द आल्यास त्या विशेष नामाचे सामान्य नामात रुपांतर होते. उदा. १) आमच्या गावात तीन पाटील आहेत. २) काही स्त्रीयां सोळा सोमवारांचे व्रत करतात. (पाटील आणि सोमवार या विशेष नामाच्या पुढे तीन व सोळा ही संख्या विशेषणे आल्यामुळे त्यांचे सामान्यनाम झाले आहे.)

अव्ययसाधित नामे

परंतू, वाहवा, छी-थू या सारख्या काही अव्ययांचा उपयोग नामासारखा केला जातो. म्हणजेच ही अव्यये नामांची कार्ये करतात.
उदा. १) पराभवामुळे भारतीय क्रिकेट संघाची छी-थू झाली. २) राम परीक्षेत उत्तीर्ण झाल्यामुळे त्याची वाहवा झाली.

धातूसाधित नामे

कर, डर, वागणे, हसणे/हसु, रडणे, बोलणारा, देणारा, घेणारा इ. धातूंपासून (मुळ शब्दांपासून) तयार झालेले आहेत व हे शब्द नामाचे कार्य करतात म्हणून त्यांना धातूसाधित नामे म्हणतात. उदा. १) त्याच्या स्वभावाचे मला हसु आले. २) गुरुजींचे वागणे प्रेमळ आहे.. (टीप : मराठीमधील काही अभ्यासकांनी क्रियावाचक नाम हा नामाचा प्रकार पाडला आहे. परंतू धातूसाधित नामाची सर्व लक्षणे त्यामध्ये दिसून येतात.)

Read More:- जगातील आंतरराष्ट्रीय संघटना त्यांची मुख्यालय माहिती PDF Download | International Organisations And Their Headquarters With PDF

सर्वनामे | Shabdanchya Jati

सर्वनामे :- नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दांना सर्वनामे असे म्हणतात. नामाचा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्वनाम वापरले जाते.
सर्वनामांची संख्या :- मराठीत मूळ सर्वनामे नऊ आहेत. ती पुढीलप्रमाणे : मी, तू, तो, जो, हा, कोण, काय, आपण, स्वतः या सर्वनामामधील लिंगानुसार बदलणारी (तो, हा, जो) फक्त तीनच आहेत. तर वचनभेदानुसार बदलणारी (मी, तू, तो, हा, जो) पाच सर्वनामे आहेत.

एकूण (मुळची) सर्वनामेमी तूतोजोहाकोणकायआपणस्वत:
मी लिंगानुसार बदलणारीतो हाजो
वचनानुसार बदलणारीमीतूतोहाजो

सर्वनामांचे प्रकार :-

सर्वनामांचे एकूण सहा प्रकार पडतात.

1.पुरूषवाचक सर्वनामे :-

पुरुषवाचक सर्वनामांचे तीन प्रकार पडतात.

अ) प्रथम पुरुष वाचक सर्वनामे :- स्वत: बोलणारी व्यक्ती. उदा. मी, आम्ही, आपण, स्वत:

ब) द्वितीय पुरुष वाचक सर्वनामे :- ज्याच्याशी बोलायचे आहे ती व्यक्ती. उदा. तू, तुम्ही, आपण, स्वत:

क) तृतीय पुरुष वाचक सर्वनामे :- ज्याच्याविषयी बोलायचे आहे त्या व्यक्ती. उदा. तो, ते, ती, त्या

2. दर्शक सर्वनामे :-

जवळची किंवा दुरची वस्तू दाखविण्यासाठी उपयोग. जसे हा, ही, हे तो, ती, ते. उदा :– अ) हा कच्चा आंबा आहे. ब) ही माझी बॅग आहे. क) तो हुशार आहे.

3. संबधी सर्वनामे :-

वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखविणारी सर्वनामे. उदा. जो-जी, जे-ज्या. उदा. अ) जे चकाकते ते सोने नसते. ब) जो येईल तो पाहिल.

4. प्रश्नार्थक सर्वनामे :-

या सर्वनामांचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो व शेवटी प्रश्नचिन्ह येते. उदा. कोण, काय, कोणी, कोणाला इ. उदा. अ) बाहेर कोण उभे आहे?

5. सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे :-

कोणी, कोण, काय, अमका इ. सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामांबद्दल आली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही. तेव्हा त्यांना अनिश्चित किंवा सामान्य सर्वनामे म्हणतात. उदा. कोणी काही बोलू नये.

Read More:- डॉ. A.P.J अब्दुल कलाम ह्यांचा जीवनाची संपूर्ण माहीती जाणून घ्या | DR. APJ Abdul Kalam Information In Marathi PDF Download

6. आत्मवाचक सर्वनामे :-

स्वतः या अर्थी वापरण्यात येणाऱ्या सर्वनामांना आत्मवाचक सर्वनामे म्हणतात. आत्मवाचक सर्वनामे वाक्यात एकटी येत नाहीत. तर ती नाम किंवा सर्वनामासोबतच येतात. उदा. अ) तो आपण होऊन मनातले सांगू लागला. ब) मी स्वतः चोराला पाहिले.

(टीप :- 1) आपण – मी, आम्ही या अर्थाने प्रथम पुरूष वाचक सर्वनाम 2) आपण – तु, तुम्ही या अर्थाने – द्वितीय पुरुष वाचक सर्वनाम 3) आपण स्वतः या अर्थाने – आत्मवाचक सर्वनाम )

विशेषणे | Shabdanchya Jati

जो शब्द नामाबद्दल विशेष माहिती सांगून, नामाची व्याप्ती मर्यादित करतो तो शब्द म्हणजे ‘विशेषण’ होय. ज्या नामाबद्दल माहिती सांगितलेली असते, त्या नामाला ‘विशेष्य’ असे म्हणतात. उदा. ‘सुंदर मुल’ या वाक्यात मुल हे विशेष्य म्हणजेच नाम आहे आणि सुंदर हे विशेषण आहे. 

विशेषणाचे प्रकार

1. गुणविशेषण

नामाचा गुण किंवा विशेष दाखविणाऱ्या विशेषणाला गुणविशेषण म्हणतात. उदा. हिरवी पाने, आंबट बोरे, काळा फळा, चतुर मुलगा, सुंदर फुल, तऱ्हेवाईक राजा

2. संख्याविशेषण

नामाची संख्या दाखविणाऱ्या विशेषणाला संख्या विशेषण असे म्हणतात. उदा. बारा राशी, काही मुले

संख्याविशेषणाचे पोटप्रकार

1.गणनावाचक :- या विशेषणांचा उपयोग केवळ गणती वा गणना करण्यासाठी होतो.
जसे : दोन, अर्धा, तीन पंचमांश, चाही इ. (उदा. शंभर कौरव, पाव हिस्सा, अर्धा तास, पाची भावंडे) गणनावाचकचे तीन उपप्रकार पडतात :-
1. पुर्णांक वाचक :- उदा. १५, २०, १००….(वीस मुले, पाच आंबे)
2. अपुर्णांक वाचक :- उदा. पाव, अर्धा, दोन पंचमांश, दीड, सव्वा
3. साकल्यवाचक :- जेवढे आहे त्यापैकी सर्व या अर्थाने. उदा. दोन्ही, चाही, पाची… (दोन्ही भाऊ, पाची पांडव)

2. क्रमवाचक :- ही विशेषणे वस्तुंचा क्रम दाखवितात. जसे : पहिला, दुसरा, तिसरा, पाचवा इ.
उदा. पहिला पांडव, आठवा पुत्र, साठावे वर्ष, चौथे दुकान.

3. आवृत्तीवाचक :- ही विशेषणे संख्येची पट दाखवितात. जसे – दुप्पट, तिप्पट, चौपट, शतपट, दुहेरी, द्विगुणित, चौपदरी इ. उदा. द्विगुणित गोडी, चौपदरी घडी, दुप्पट रक्कम, तिप्पट व्याज.

4. पृथकत्ववाचक :- या विशेषणातून वेगवेगळेपणाचा/संख्यांच्या गटांचा बोध होतो. जसे – एकेक, दहादहा, पाचपाच, इ. उदा. एकेक ओळ, दहादहांचा गट, पाचपाचचे गठ्ठे

5. अनिश्चित :- ही संख्या विशेषणे निश्चित अशी संख्या दाखवित नाहीत. जसे-सर्व, काही,
पुष्कळ, इतर, इत्यादी, थोडेसे, उदा. सर्व मुले, काही प्राणी, इत्यादी पक्षी, इतर वस्तू, पुष्कळ लोक

3.  सार्वनामिक विशेषणे

जी विशेषणे सर्वनामांपासून तयार होऊन नामांबद्दल विशेष माहिती सांगतात त्यांना सार्वनामिके विशेषणे किंवा सर्वनामसाधित विशेषणे म्हणतात. उदा. हे झाड, माझे पुस्तक, तो पतंग, असल्या झोपड्या

4. नाम साधित विशेषणे

जी नामे पुढे येणाऱ्या नामांबद्दल विशेष माहिती सांगतात त्यांना नामसाधित विशेषणे म्हणतात. उदा. फळ-भाजी, सातारी पेढे, पुस्तक विक्रेता, कापड दुकान, पुणेरी फेटा, साखर काकडी, ग्रंथ दिंडी, नागपूरी संत्री, ऐतिहासिक वास्तू, बनारसी साडी 

5. धातू साधित विशेषणे

धातूंना (शब्दाच्या मूळ रूपाला) प्रत्यय लागून जे कार्य करतात त्यांना धातुसाधित विशेषणे म्हणतात. उदा. रांगणारे मूल, हसरी मुलगी, गाणारा शब्द विशेषणाचे माणूस, बोलकी मुलगी, उडणारा पक्षी, पिकलेला आंबा, पेटती काडी, पडकी भिंत वरील धातुसाधित विशेषणे रांग, हस, गै, बोल, उड, पीक, पेट, पड या धातूपासून बनलेली आहेत.

6. व्ययसाधित विशेषणे

वर, खाली, मागे, पुढे इ. मूळ अव्ययांना प्रत्यय लागून बनलेल्या विशेषणांना अव्यय साधित विशेषणे म्हणतात. उदा. वरचा मजला, खालची बाजू, पुढील शाळा, मागील भिंत, जवळचा मार्ग, समोरील इमारत

विशेषणाचे स्थानावरून दोन गट पडतात:-

1. अधिविशेषण (पूर्व विशेषण):- नामाआधी येणारे विशेषण म्हणजे आधिविशेषण होय. उदा. १) पिवळे सोने असते. २) हा गोड आंबा आहे.
2. विधिविशेषण (उत्तर विशेषण):- नामानंतर येणारे विशेषण म्हणजे विधिविशेषण होय. उदा. १) सोने पिवळे असते. २) हा आंबा गोड आहे. ३) तो मुलगा अशक्त आहे.

Read More:- 2023 Lokmanya Tilak Speech In Marathi PDF Download | लोकमान्य टिळकांचे भाषण सविस्तर पणे

क्रियापद | Shabdanchya Jati

वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद होय. उदा. राम निबंध लिहतो. यातील ‘लिहतो’ या शब्दाने वाक्याचा अर्थ पुर्ण झाला आहे. क्रियापदाला संस्कृतमध्ये आख्यात असे म्हणतात. क्रियापदाचे प्रकार पाहण्यापुर्वी कर्ता, कर्म कसे ओळखावे? ते पाहू.

कर्ता

क्रियापदाने दाखविलेली क्रिया करणारा जो कोणी असतो, त्यास कर्ता म्हणतात. कर्ता ओळखणे :– वाक्यातील क्रियापदाचा मूळ धातू (मूळ शब्द) शोधून काढावा व त्याला णारा/ णारी /णारे प्रत्यय जोडून कोण असा प्रश्न केल्यास येणारे उत्तर कर्ता असते.
उदा. सचिन क्रिकेट खेळतो. (खेळतो क्रियापदातील मूळ शब्द खेळ व त्याला ‘णारा’ प्रत्यय लावल्यास ‘खेळणारा कोण’ ? ‘सचिन’ हा कर्ता मिळतो.)

कर्म

क्रियापदाने दाखविलेली क्रिया ज्याच्यावर घडते, त्यास कर्म म्हणतात. म्हणजेच क्रिया भोगणारे किंवा सोसणारे कर्म असते.
कर्म ओळखणे :- अ) वाक्यातील क्रियापदाचा मूळ धातू शोधून काढावा व त्याला ‘ण्याची क्रिया’ कोणावर घडते? असा प्रश्न केल्यास येणारे उत्तर कर्म असते. ब) वाक्यातील क्रियापदाला काय/कोणाला ने प्रश्न विचारल्यास सुद्धा येणारे उत्तर कर्म असते.

उदा. राम आंबा खातो. (खाण्याची क्रिया कोणावर घडते – आंबा किंवा काय खातो ? – आंबा म्हणून आंबा हे कर्म आहे.)
वाक्यात कर्ता व कर्म या दोन्ही मधून एकाच शब्दाचा बोध होत असल्यास तो शब्द कर्ता मानावा. व त्या वाक्यात कर्म नाही असे समजावे.

उदा. राम शाळेत जातो. (जाणारा कोण? -‘राम’ व जाण्याची क्रिया कोणावर घडते? – ‘राम’ म्हणून या वाक्यात कर्म नाही.)

क्रियापदाचे प्रकार

1. सकर्मक क्रियापद

ज्या क्रियापदाच्या अर्थाची पूर्तता होण्यास कर्माची आवश्यकता असते त्यांना सकर्मक क्रियापदे म्हणतात. उदा. 1) राम बाण मारतो. 2) राधा पुस्तक वाचते.

2. अकर्मक क्रियापद

ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची आवश्यकता लागत नाही व कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्याशीच थांबते त्यास अकर्मक क्रियापद म्हणतात. उदा. 1) मी स्त्यात पडलो. २) चेंडू सीमापार गेला. ३) तो खुर्चीवर बसला.

3. द्विकर्मक क्रियापद

ज्या क्रियापदांना दोन कर्मे असतात, अशा क्रियापदांना द्विकर्मक क्रियापदे म्हणतात. उदा. १) राम हरणाला बाण मारतो. २) आजीने नातीने लाडू दिला.

  1. प्रत्यक्ष कर्म: -क्रियापदाला ‘काय’ ने प्रश्न विचारल्यास प्रत्यक्ष कर्म मिळते. प्रत्यक्ष कर्म वस्तूवाचक (दान जाणारे) असते व त्याची विभक्ती प्रथमा असते. उदा. बाण, लाडू.
  2. अप्रत्यक्ष कर्म :- क्रियापदाला ‘कोणाला’ ने प्रश्न विचारल्यास अप्रत्यक्ष कर्म मिळते. अप्रत्यक्ष कर्म व्यक्तीवाचक/प्राणीवाचक (दान घेणारे) असते व त्याची विभक्ती चतुर्थी असते. उदा. हरणाला, नातीने.

4. उभयविध क्रियापदे

उघडणे, मोडणे, कापले, मिटणे इ. क्रियापदे दोन वेगवेगळ्या वाक्यात सकर्मक व अकर्मक अशा दोन्ही पध्दतीने वापरता येतात. त्यांना उभयविध क्रियापदे म्हणतात.

उदा.

  1. श्रीरामाने शिवधनुष्य मोडले (सकर्मक)
  2. ते शिवधनुष्य मोडले. (अकर्मक)
  3. त्याने बोट कापले. (सकर्मक)
  4. त्याचे बोट कापले. (अकर्मक)

5. संयुक्त व सहायक क्रियापदे

धातुसाधित व सहायक क्रियापद या दोन्हींच्या संयोगाने बनलेल्या व एकच क्रिया दर्शविणाऱ्या क्रियापदांना संयुक्त क्रियापद असे म्हणतात. यामध्ये धातुसाधिताला मदत करून विधानाला केवळ पूर्णता आणण्याचे काम करणाऱ्या क्रियापदाला सहायक क्रियापद असे म्हणतात.

उदा.

  1. मुले आनंदाने नाचू लागली (नाचू-धातुसाधित, लागली – सहायक)
  2. शाम छपरावर चढत आहे. (चढत – धातूसाधित, आहे -सहायक)
  3. रामने धनुष्य मोडून टाकले. (मोडून – धातूसाधित, टाकले – सहायक)
  4. त्याने आपली सर्व संपत्ती वाटून टाकली. (वाटून – धातूसाधित, टाकली सहायक)

टीप :- दोन वेगळ्या क्रिया असलेल्या वाक्यात संयुक्त क्रियापद मानले जात नाही.

उदा. तू बाजारात जावून ये. यामध्ये फक्त ‘ये’ हे एकच क्रियापद आहे.

6. सिध्द क्रियापदे

ये, जा, कर, उठ, बस, रड इ. मुळचे धातू आहेत. त्यांना सिध्द धातू असे म्हणतात. या सिध्द धातूपासून बनलेल्या क्रियापदांना सिध्द क्रियापदे म्हणतात. उदा. जा धातूपासून जातो, उठ पासून उठतो, बस पासून बसतो, रड पासून रडतो इ.

7. साधित क्रियापदे

नामे, विशेषणे, क्रियापदे व अव्यये यांना प्रत्यय लागून बनलेल्या धातूपासून जी क्रियापदे तयार झाली आहेत. त्यांना साधित क्रियापदे असे म्हणतात. उदा. हात या नामापासून हाताळतो हे क्रियापद तर पुढे या अव्ययापासून पुढारली हे क्रियापद तयार झाले आहे. अशाच प्रकारे स्थिरावला, आणवली, हाताळतो, पाणावले, पुढारली इ. क्रियापदे साधित क्रियापदे आहेत. उदा. अ) चेंडू सीमारेषेबाहेर जावून स्थिरावला. ब) ती फुलांना नाजूकपणे हाताळते.

8. प्रयोजक क्रियापदे

जेव्हा एखादी क्रिया कर्ता स्वतः करीत नसून तो दुसऱ्या कोणालातरी करावयास लावीत असतो. तेव्हा त्यास प्रयोजक क्रियापद असे म्हणतात. किंवा वाक्यातील एखादी क्रिया घडण्यासाठी जर बाह्य घटक प्रेरित करत असेल तर अशा क्रियापदास प्रयोजक क्रियापद असे म्हणतात.

उदा. 1) विदुषकाने प्रेक्षकांना खूप हसवले. 2) ताई त्या मुलाला रडविते.

9. शक्य क्रियापदे

कर्त्याची क्रिया करण्याची शक्यता किंवा शक्ती (सामर्थ्य) ज्या क्रियापदामुळे दिसून येते त्यांना शक्य क्रियापदे असे म्हणतात. यामधील क्रियापदे जाववते, खाववते, पळवते, चालवते, पाहवते, ऐकवते इ. प्रकारची असतात.

उदा. १) मला आता थोडं चालवते २) त्याला आता उभे राहवते.

10. अनियमित क्रियापदे

आहे, पाहिजे, नव्हे, नाही, नये, नलगे या क्रियापदांची मूळ क्रियापदेच असून त्यात अमूक१ एक धातू आहे असे निश्चितपणे सांगता येत नाही त्यांना अनियमित किंवा गौण क्रियापदे असे म्हणतात.

उदा.

  1. संध्याकाळी फिरायला जाऊ नको
  2. मला जेवण पाहिजे
  3. औषधे नलगे मजला.
  4. तिने चित्रपटात काम करू नये.
  5. तो घरी नाही

11. भावकर्तृक क्रियापदे

ज्या वाक्यात कर्ता स्वतंत्रपणे दिसत नसून कर्ता हा क्रियापदातच सामावलेला असतो म्हणजेच क्रियेचा मूळ भाव (अर्थ) हाच कर्ता असतो. अशा क्रियापदांना भावकर्तृक किंवा अकर्तृक क्रियापदे असे म्हणतात.

उदा. १) त्याला प्रवासात नेहमी मळमळते. २) घरी येण्यापूर्वीच उजाडले.

अशाप्रकारे मळमळते, उजाडले, सांजावले, गडगडते इ. क्रियापदे भावकर्तृक आहेत.

12. करणरूप क्रियापद

होकारार्थी वाक्यातील क्रियापदाला करणरुप क्रियापद म्हणतात. उदा. १) नेहमी खरे बोलावे.

13. अकरणरूप क्रियापद

नकारार्थी वाक्यातील क्रियापदाला अकरणरूप क्रियापद म्हणतात. क्रियापदे अकरणरूप करताना न, ना, नये, नको, नाही यासारख्या शब्दांचा वापर केला जातो. उदा. १) मुलांनी खोटे बोलू नये.

14. अपुर्णविधान क्रियापद

काही अकर्मक वाक्यात कर्ता व क्रियापद असूनही वाक्याचा अर्थ पुर्ण होत नाही. त्या क्रियापदास अपूर्ण विधान क्रियापद म्हणतात. म्हणजेच वाक्याचा अर्थ पुर्ण करण्यासाठी एका विशिष्ट शब्दाची गरज असते. त्या शब्दास ‘विधानपूरक’ म्हणतात.

उदा. 1. माधव चांगला आहे. २) आंबा नासका निघाला. ४) भाऊसाहेब रागावलेले दिसतात. (अपुर्ण विधान क्रियापदे :- आहे, निघाला, दिसतात, विधानपूरक :- चांगला, नासका, रागावलेले)

Read More:- Best MPSC Book List In Marathi 2023 PDF Download | MPSC पुस्तकांची यादी पीडीएफ आणि सर्वकाही

क्रियाविशेषण अव्यय | Shabdanchya Jati

क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दास क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. म्हणजेच क्रियापदाने जी क्रिया दर्शविली जाते ती क्रिया केव्हा घडली, कोठे घडली, कशी घडली, किती वेळा घडली अशा प्रकारची माहिती देणारे अविकारी शब्द वाक्यात येतात त्यांनाच क्रियाविशेषण अव्यये असे म्हणतात.

क्रियाविशेषण अव्ययांचे प्रकार (अर्थावरून प्रकार)

1. कालवाचक क्रियाविशेषण अव्यये

ही अव्यये क्रिया केव्हा घडली हे दर्शवितात. ओळखण्याची पद्धत :- क्रियापदाला ‘केव्हा’ ? ने प्रश्न विचारणे.

उदा.

  • तो वारंवार आजारी पडतो.
  • काल अचानक मोठा पाऊस आला.

याचे तीन उपप्रकार :-

अ) कालदर्शक :- काल, आज, उद्या, परवा, जेव्हा, केव्हा, यंदा, मागे, पूर्वी, पुढे, आता, सध्या, येरवाळी

ब) सातत्य दर्शक :- सदा, सर्वदा, नित्य, सतत, नेहमी, अद्यापी, दिवसभर

क) आवृत्ती दर्शक :- एकदा, दोनदा, शंभरदा, हजारदा, पुन:पुन्हा, वारंवार, क्षणोक्षणी

2. स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यये :-

ही अव्यये क्रिया कोठ घडली किंवा ठिकाण दर्शवितात.

ओळखण्याची पद्धत :- क्रियापदाला ‘कोठे/कोठून’ ? ने प्रश्न विचारणे.

उदा. i) सभोवार गर्द हिरवी झाडे पसरली होती. ii) वाघ माझ्या समोरून गेला.

याचे दोन उपप्रकार :

अ) स्थितीदर्शक :- सर्वत्र, इथे, तिथे, वर, खाली, मागे, पुढे, तिकडे, सभोवार, आसपास
ब) गतिदर्शक :- इकडून, तिकडून, दुरून, मागून, खालून, समोरून

3. रितीवाचक क्रियाविशेषण अव्यये :-

ही अव्यये क्रिया कशी घडते ते दाखवितात.

उदा.- सावकाश, जलद, जपून, उभ्याने, गटागटा, पटपट.

ओळखण्याची पद्धत :- क्रियापदाला ‘कसे/कशी’ ? ने प्रश्न विचारणे.

उदा.

  • i) वाहने सावकाश चालवा.
  • ii) वारा फार जोराने वाहत होता.

याचे तीन उपप्रकार :-

अ) प्रकारदर्शक :- सावकाश, जलद,आपोआप, मुद्दाम

ब) अनुकरणदर्शक :- पटकन, पटपट, चमचम, झटकन

क) निश्चयार्थक :- खचित, खरोखर, नक्कीच

4. संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यये

ही अव्यये क्रिया किती वेळा घडली ते दर्शवितात.उदा. अनेकदा, नेहमी, भरपूर, थोडा, किंचित, अतिशय, मुळीच, बिलकुल.

ओळखण्याची पद्धत :- क्रियापदाला ‘किती/कितीदा’ ? ने प्रश्न विचारणे.

उदा.

  • त्याचे मी मुळीच ऐकणार नाही…
  • मामा येथे क्वचित येतात.

5. प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यये :-

का/ना यांचा वापर प्रश्न विचारण्यासाठी केल्यास ती प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यये होतात. उदा. तुम्ही आमच्याकडे याल का ?

6. निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यये :- यामध्ये न, ना या शब्दांचा वापर नकार किंवा विरोध दर्शविण्यासाठी केला जातो. उदा. अ) तो बोलेल तर ना., ब) ती न चुकता येते.

Read more:- 1 To 100 Marathi Numbers PDF Download | मराठी अंक अक्षर संपूर्ण माहिती जाणून घ्या पीडीएफ मध्ये

क्रियाविशेषण अव्ययांचे स्वरुपावरून प्रकार :

1. सिद्ध क्रियाविशेषण अव्यये :-

आज, पुढे, मागे, इथे, तिथे इत्यादी शब्द मुळ क्रियाविशेषण अव्यये आहेत. त्यांनाच सिद्ध क्रियाविशेषण म्हणतात. उदा. आज त्यांची मोठी सभा झाली.

2. साधित क्रियाविशेषण अव्यये :-

नाम, सर्वनाम, विशेषण, धातू, प्रत्यय, अव्यये इत्यादी मधीत मुळ शब्दांना प्रत्यय लागून बनलेल्या शब्दांना साधित क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. उदा. i) तिने सारे धान्य निवडून ठेवले. (धातू साधित) ii) मोठ्याने ओरडू नकोस. (विशेषणसाधित)

3. सामासिक क्रियाविशेषण अव्यये :-

अव्ययीभाव समासापासून ही क्रियाविशेषण अव्यये बनतात. उदा. आजन्म, प्रतिदिन, गावोगाव, घरोघर इ.

4. स्थानिक क्रियाविशेषण अव्यये :-

काही वेळा नामे, सर्वनामे, विशेषणे, अव्यये ही जशीच्या तशी वाक्यात येतात व क्रियाविशेषण अव्ययाचे कार्य करतात. त्यांना स्थानिक क्रियाविशेषण अव्य म्हणतात.

उदा.

  • ती काय माती गाते! (नाम)
  • तो गाणे चांगले गातो. (विशेषण)
  • सविता काय कपाळ सांगते! (नाम)
  • तो काय दगड वाचतो. (नाम )

दोन क्रियाविशेषण अव्यय :-

कधी कधी वाक्याचा प्रभाव दाखविण्यासाठी क्रियाविशेषण अव्ययाला दुसरे क्रियाविशेषण अव्यय जोडून आलेले असते.

उदा. १) चित्ता अतिशय वेगाने धावतो.
२) राम फार हळू बोलतो.

(वरील वाक्यात अधोरेखित केलेले दोन्ही शब्द क्रियाविशेषण अव्यय आहेत.)

Read More:- Varg Ani Vargmul 1 To 100 PDF Download | वर्ग आणि वर्गमूळ 1 ते 100 PDF Download

शब्दयोगी अव्यये | Shabdanchya Jati

जे अविकारी शब्द सामान्यतः नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात (कधीकधी क्रियापदे व क्रियाविशेषणे यांनाही जोडून येतात) आणि वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवितात त्यांना शब्दयोगी अव्यये असे म्हणतात.

उदा. घरावर, ढगामागे, माझ्याजवळ, व्यक्तीपेक्षा, जागेवरून, टेबलाखाली, दारापुढे.

शब्दयोगी अव्ययांचे अर्थावरून काही प्रकार पाडले जातात :

Sr. Noप्रकारअव्ययेउदाहरण
1कालवाचकआता, नंतर, पूर्वी, आतूनपरीक्षेपूर्वी तयारी झाली पाहीजे.
2स्थलवाचकमागे, पुढे, बाहेर, जवळ, समोरशितलने दारापुढे सुंदर रांगोळी काढली.
3करणवाचकमुळे, द्वारे, कडूनपत्राद्वारे माहिती कळवा.
4हेतूवाचकसाठी, प्रित्यर्थ, करिताउपचारासाठी मला पैसे हवेत.
5तुलनावाचकपरीस, पेक्षामाणसापरीस मेंढरं बरी.
6व्यतिरेकवाचकशिवाय, विना, वाचून, खेरीजकाट्यावाचून गुलाब कधी सापडेल काय ?
7कैवल्यवाचकफक्त, पण, केवळ, मात्र, चआईपण माझ्या बरोबर येणार आहे.
8दिक्वाचक प्रति, कडे, लागीमाझ्याकडे बघू नको.
9योग्यतावाचकयोग्य, सारखा, प्रमाणे, बरहुकूम हा आंबा खाण्यायोग्य आहे.
10संग्रहवाचक सुद्धा, केवळ, फक्त, देखीलमी सुद्धा तुला मदत करेन.
11संबंधवाचकविषयी, संबंधीतुझ्याविषयी माझ्या मनात काही नाही.
12साहचर्यवाचकबरोबर, सह, समवेततु पण माझ्याबरोबर प्रार्थना म्हण.
13भागवाचकपैकी, पोटीव्याजापोटी मला हजार रुपये द्यावे लागले
14विनिमयवाचक ऐवजी, जागी, बदलीचहाऐवजी कॉफी घेऊ
15विरोधवाचकविरुद्ध, उलटकाल पाकिस्तानविरुद्ध सामना झाला.
16परिमाणवाचक भरदिवसभर पाऊस कोसळत होता.

शुद्ध शब्दयोगी अव्यये :- ही, च, ना, पण, देखील, सुद्धा, मात्र इ. शब्दयोगी अव्यय दुसऱ्या शब्दाला जोडून येताना त्या शब्दाचे सामान्य रुप होत नाही. त्यास शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणतात.

जसे – हनुमान, देवदेखील, आईमात्र, तुम्हीपण, कुत्रासुद्धा

उदा.

१) तुम्ही म्हणलात तर आम्हीदेखील नाटकाला येवू.
२) आईमात्र अत्यंत प्रेमळ आहे.

शब्दयोगी अव्यये व क्रियाविशेषण अव्यये यांच्यातील फरक :

क्रियाविशेषण अव्यये ही वाक्यात स्वतंत्र असतात. तर शब्दयोगी अव्यये शब्दांना जोडून येतात. म्हणजेच वर, खाली, मागे, पुढे, जवळ इ. शब्द दुसऱ्या शब्दाला जोडून आल्यास त्यास शब्दयोगी अव्यय म्हणतात. व हेच शब्द स्वतंत्र आल्यास त्यास क्रियाविशेषण अव्यय म्हणतात.

उदा.

  • पक्षी झाडावर बसला. (शब्दयोगी अव्यय),
  • पक्षी उडून वर गेला (क्रियाविशेषण अव्यय)
  • टेबलाखाली पुस्तक पडले. (शब्दयोगी अव्यय),
  • मला खाली बसणे आवडते. (क्रियाविशेषण अव्यय)

उभयान्वयी अव्यये | Shabdanchya Jati

दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्ये यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यये असे म्हणतात. उदा. : आणि, व, अथवा, किंवा, पण, परंतु, म्हणून.

उभयान्वयी अव्ययांचे वर्गीकरण :

प्रधानत्वसूचक :-

ज्यावेळी दोन स्वतंत्र वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात. तेव्हा त्यांना प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय म्हणतात.

प्रधानत्व सूचकचे चार उपप्रकार :

1. समुच्चय बोधक:- आणि, व, शिवाय, अन, नि, आणखी इ. अव्यये दोन वाक्यांचा समुच्चय करून पहिल्या विधानात आणखी भर घालतात. उदा. अ) राम व शाम शाळेत गेले. ब) भयंकर वादळ सुटले आणि पत्रे उडून गेले.

2. विकल्प बोधक :- अथवा, किंवा, की, वा, आगर इ. अव्यये दोहोंतून एकाची निवड दर्शवितात. उदा. अ) तुम्ही या किंवा नका येऊ मी जाणारच. ब) दूरदर्शन शाप की वरदान ?

3. न्यूनत्व बोधक :- पण, परंतु, किंतु, परी, बाकी इ. अव्यये न्यूनता म्हणजेच कमीपणा, उणीव दर्शवितात. उदा. अ) मी अभ्यास केला; पण उत्तीर्ण झालो नाही. ब) मरावे परी किर्तिरुपी उरावे.

4. परिणाम बोधक:- म्हणून, यास्तव, सबब, याकरिता, अतएव, तस्मात इ. अव्यय पहिल्या वाक्यातील घटनेचा परिणाम दुसऱ्या वाक्यातून दर्शवितात.

उदा. अ) मोठा पाऊस झाला; म्हणून त्याला शाळेत येता आले नाही. ब) तो गैरहजर राहीला यास्तव त्याची निवड झाली नाही.

(टीप:- प्रधानात्वसूचक उभयान्वयी अव्यये वापरून जी वाक्ये तयार होतात त्यांना संयुक्त वाक्ये म्हणतात.)

2. गौणत्वसूचक :

जेव्हा एक प्रमुख वाक्य व दुसरी गौण वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडली जातात तेव्हा त्या उभयान्वयी अव्ययांना गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

गौणत्वसूचकचे चार उपप्रकार :-

1.स्वरूप बोधक :- म्हणजे, कि, म्हणून, जे इ. अव्यय प्रधान (मुख्य) वाक्यातील क्रियेचे स्वरूप दर्शवितात. उदा. अ) बारा वस्तू म्हणजे एक डझन ब) शिवाजी म्हणून एक राजा होऊन गेला. (स्वरूप बोधक वाक्यातील पहिले वाक्य प्रधान असते. तर दुसरे वाक्य गौण असते.)

2. कारण बोधक :- कारण, का की, कारण की इ. अव्यय पहिले प्रधान वाक्य त्याचे कारण म्हणून दुसऱ्या गौण वाक्यात जोडतात. उदा. अ) शेतकरी खुष झाला; कारण पाऊस चांगला पडला. ब) तो शाळेत गेला नाही कारण त्याला ताप आला आहे.
(कारण बोधक वाक्यातील पहिले वाक्य प्रधान असते. तर दुसरे वाक्य गौण असते.)

3. उद्देश बोधक :- म्हणून, यास्तव, सबब, कारण, कि इ. अव्यय गौण वाक्य हे प्रधान वाक्याचा हेतू किंवा उद्देश आहे असे दर्शवितात.

उदा.

  • अ) खुप पैसा मिळावा म्हणून तो दुबईला गेला.
  • ब) नोकरी मिळावी म्हणून तो शहरात आला.

(उद्देश बोधक वाक्यातील पहिले वाक्य गौण असते. तर दुसरे वाक्य प्रधान असते.)

4. संकेत बोधक :-

जर-तर, जरी-तरी, जेव्हा-तेव्हा म्हणजे इ.ही अव्यये प्रधान वाक्यातील अट दाखवून गौणवाक्यात तिचे विरूध्दार्थी कार्य दाखवितात. उदा. अ) जर अभ्यास केला तर तो उत्तीर्ण होईल. ब) निरोप आला तर मी जाईन. क) प्रयत्न केला तर फायदाच होईल.

(संकेत बोधक वाक्यातील पहिले वाक्य गौण असते. तर दुसरे वाक्य प्रधान असते.) (टीप:-गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यये वापरून जी वाक्ये तयार होतात त्यांना मिश्र वाक्ये म्हणतात.)

केवलप्रयोगी अव्यये | | Shabdanchya Jati |

आपल्या मनातील आनंद, दुःख, आश्चर्य इ. भावना व्यक्त करणाऱ्या अविकारी शब्दांना केवलप्रयोगी अव्यये असे म्हणतात. उदा. अरेरे, बापरे, अबब, शी इ. ही अव्यये आपल्या मनात दाटून आलेल्या भावनांचा स्फोट होऊन एकदम तोंडावाटे बाहेर पडतात. म्हणून त्यांच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह (!) देण्यात येते. त्यामुळेच त्यांना उद्गारवाचक अव्यये असेही म्हणतात. असे उद्गारवाचक शब्द शक्यतो वाक्याच्या सुरुवातीला येतात. त्यांच्यापुढे उद्गारवाचक चिन्ह येते व त्यानंतर येणाऱ्या वाक्यांपुढेही बहुतेकवेळा उद्गार चिन्ह येते. उदा. अरेरे! फार वाईट झालं!

केवलप्रयोगी अव्ययांद्वारे ज्या भावना प्रकट होतात त्यावरून त्यांचे खालील प्रकार पडतात.

हर्षदर्शक (आनंददर्शक)वा, वावा, अहाहा, ओहो, अहा.
शोकदर्शकअरेरे, अगाई, हाय, हायहाय, ॐ, आई गं.
आश्चर्यदर्शकअबब, बापरे, अरेच्या, ओहो, आँ, अहाहा
संमतिदर्शकजी, हां, जीहां, ठीक, बराय, अच्छा.
प्रशंसादर्शकशाब्बास, छान, ठीक, फक्कड, खासच, यंव, भले, भारी
विरोधदर्शकछे, छेछे, छट, हॅट, अंहं, च, उंहू
संबोधनदर्शकअगं, अहो, अरे, ए, अगा, रे.
तिरस्कारदर्शकशीऽ, इश्श, हुडुत, हुड, छी, थु:, धिक्
मौनदर्शकचुप, चिप्, गप, गुपचिप, चिडीचुप.

व्यर्थ उद्गारवाची अव्यय :-

बेटे, म्हणे, आपला, बापडा इत्यादी काही शब्द वाक्यामध्ये कोणतीही भावना व्यक्त करीत नाहीत व अर्थाच्या दृष्टीनेही निरर्थक असतात. अशा शब्दांना व्यर्थ उद्गारवाची अव्यय म्हणतात.

उदा.

  1. माझं मन बेटे गप्प बसेना.
  2. मी आपला काय बोलणार?
  3. काल म्हणे खूप गर्दी होती.
  4. मी बापडा एकटाच बसलो होतो.

पादपूरणार्थक केवलप्रयोगी अव्यय (पालूपदे) :-

होडका, असं का, बरं का, जळलं मेलं, आत्ता, आणखीन काय कळलं इत्यादी शब्द केवळ लकब म्हणून किंवा काही आठवत नसल्यास वापरले जातात. त्यांनाच पादपूरणार्थक किंवा पालूपदे म्हणतात.

उदा.

  • जळलं मेलं ते लक्षण!
  • तो वर्गात पहिला आला बरं का?
  • आणखीन काय बरे ते.
  • बरं का! तुम्हाला सांगायचे राहीलेच!

शब्दांच्या जाती PDF |Shabdanchya Jati PDF Download

Shabdanchya Jati PDF Download :- आपण ह्या आर्टिकल मध्ये शब्दांच्या जाती आणि त्यांचे प्रकारांची संपूर्ण माहिती घेतली आहे. अनेक विद्यार्थ्याना व्याकरणा मधील शब्द आणि शब्दांच्या जाती चे प्रकांराची माहिती ही पीडीएफ मध्ये अभ्यासासाठी पाहिजे असते. त्याच्यासाठी आम्ही उमेदवारांना समजणे सोपे जावे आणि शब्दांची ची संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही Shabdanchya Jati PDF Download करण्यासाठी PDF देत आहोत. तुम्ही शब्दांच्या जाती आणि त्यांचे प्रकारांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

Conclusion For Shabdanchya Jati

आजच्या या पोस्ट मध्ये आपण शब्दांच्या जाती आणि त्याचे प्रकार या बद्दल विस्तारित माहिती पहिली अगोदर सांगितल्या प्रमाणे व्याकरणाचा अभ्यास मध्ये हा भाग सगळ्यात महत्वाचा असतो ज्या मध्ये तुम्ही चांगले गुण मिळवू शकता. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना उपयुक्त ठरेल.

Frequently Asked Questions For Shabdanchya Jati

Q1. शब्दांच्या एकूण किती जाती आहेत ?

Ans:- शब्दांच्या एकूण ८ जाती प्रकार आहेत .

Q2. शब्दांच्या जाती ची नावे काय आहेत ?

Ans:- श. ब्दांची कार्ये विविध असतात व या त्यांच्या विविध कार्यावरून शब्दांच्या आठ जाती मानल्या जातात. त्या पुढीलप्रमाणे :- 1. नाम 2. सर्वनाम 3. विशेषण 4. क्रियापद 5.क्रियाविशेषण अव्यय 6. शब्दयोगी अव्यय 7.उभयान्वयी अव्यय 8. केवलप्रयोगी अव्यय

Q3. अविकारी शब्द म्हणजे काय ?

Ans:- ज्या शब्दाचे लिंग ,वचन,यामध्ये बदल होत नाही त्यास अविकारी शब्द म्हणतात.

Q4. विकारी शब्द म्हणजे काय ?

Ans:- ज्या शब्दाचे लिंग ,वचनं,बदल होतो त्यास विकारी शब्द म्हणतात.

Q5. नाम म्हणजे काय ?

Ans:- कोणत्याही वस्तूला जे नाव ठेवलेले असते, त्याला नाम असे म्हणतात.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages