Advertisement

All Best Marathi Mhani PDF Download । मराठीतील सर्व म्हणी आणि त्यांचा अर्थ संपूर्ण माहिती

Marathi Mhani:- Marathi Sayings and Their Meanings Sayings in Marathi Marathi Grammar i.e. Sayings are very important in English. There are various types of proverbs, and the meaning of proverbs can be asked while studying for the exam. Also, questions such as identifying proverbs, completing the sayings, and using them in sentences are also asked. For this, it is necessary to understand all the proverbs known in the Marathi language and their meanings, Marathi mhani v tyanche arth, Marathi mhani pdf, Marathi mhani ani arth, Best Marathi Mhani List. In today’s post, all Marathi sayings and their meanings are given in Marathi Mhani with Meaning.

Marathi Mhani | मराठी म्हणी

Mhani In Marathi :- मराठी म्हणी व त्यांचे अर्थ मराठी मराठी व्याकरण मध्ये म्हणी म्हणजेच इंग्रजी मध्ये Sayings खूप महत्वाच्या आहेत. म्हणी मध्ये विविध प्रकार आहेत परीक्षे चा अभ्यास करताना म्हणीचा अर्थ विचारला जाऊ शकतो. तसेच म्हणी ओळख, म्हणी पूर्ण करा, वाक्यात उपयोग करा असे प्रश्न सुद्धा विचारले जातात. यासाठी मराठी भाषेमध्ये ज्ञात असलेल्या सर्व म्हणी आणि त्यांचे अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. आजच्या या पोस्ट मध्ये मराठीतील सर्व म्हणी व त्यांचा अर्थ Marathi Mhani with Meaning दिले आहेत.

  • म्हणी म्हणजे काय तर सत्य परिस्तिथी कथन करण्यासाठी वापरलेलं मार्मिक वाक्य जे वारंवार वापरले जाऊ शकते .
  • हि वाक्य म्हणजेच म्हणी पारंपरिक पद्धतीने खूप अगोदर पासून वापरली जातात ज्या मध्ये वेगवेगळे प्रकार आहेत .
  • जसे कि एखाद्याचा स्वभाव दाखवण्यासाठी वापरलेली म्हण उदाहरणार्थ :जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही .
  • त्याचबरोबर ,वाईट काळ दाखवणार्या, विनोदी म्हणी, वैचारिक म्हणी अशे प्रकार ह्या मध्ये आहेत.

Read More:- 1500+ Samanarthi Shabd Marathi PDF Download | मराठी समानार्थी शब्द

All Marathi Mhani

Marathi Mhani List PDF :- मराठी मध्ये अनेक म्हणी प्रसिद्ध आहेत. त्या म्हणी आपल्या दैंनदिन आयुष्यात वापरल्या जातात. आपण अश्याच काही प्रसिद्ध म्हणी आणि म्हणी चा अर्थ बघणार आहोत. ह्या Best Marathi Mhani List PDF चा उपयोग करून तुम्ही सर्व म्हणी चे अर्थ जाणून घ्या.

Marathi Mhani With Meaning List PDF

Sr. No.मराठी म्हणम्हणीचा अर्थ
1हातावर तुरी देणेएखाद्याच्या कचाट्यातून सुटणे
2हातच्या कंकणाला आरसा कशालाउघड सत्य हे केव्हाही खरे करता येऊ शकते
3हात दाखवून अवलक्षणउगाचच विविध गोष्टी मागे धावून हसे करुन घेणे
4सरकारी काम अन बारा महिने थांबकाही कामं नेहमी विलंबाने होत असतात, त्या साठी धीर देणे योग्य
5समुद्रामाजी फुटकें तारूचांगल्या गोष्टींबरोबर वाईट गोष्टी पण असतात
6वाळूचे कणही रगडीता तेलही गळेकठोर परिश्रमामुळे कोणतीही गोष्ट साध्या होऊ शकते
7राम कृष्ण आले गेले तरीही जग का चालायचे थांबलेव्यावहारिक बाबी कुणासाठीही थांबत नाही
8भित्यापाठी ब्रह्म राक्षसभित्रा माणूस सदैव कोणत्याही छोट्या गोष्टींना घाबरतो.
9बाप दाखव नाही तर श्राद्ध करकोणत्याही गोष्टीचा पुरावा मागणे
10नाव सगुणी अन करणी अवगुणीनावाप्रमाणे न राहता वाईट कृत्य करणे
11नर का नारायण बनणेकर्म करून उच्च होणे
12नकटे व्हावे पण धाकटे होऊ नयेछोट्या व्यक्तींना नेहमी कामे सांगितली जातात
13दोन डोळे शेजारी, भेट नाही संसारीजिवलग दोन व्यक्तींची भेट जवळ असूनही न होणे.
14अंगाचा तीळ पापड होणे किंवा अंगाची तलखी होणे किंवा अंगाची लाही लाही होणेखूप संतापणे
15अक्कल खाती जमानुकसान होणे
16अडला हरी गाढवाचे पाय धरीअडचणीच्या वेळी मूर्खाचीही मनधरणी करावी लागते
17अति तेथे मातीकोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाल्यास काम बिघडते
18असंगाशी संग प्राणाशी गाठअयोग्य माणसाची सांगत धरल्यास प्राणही जाऊ शकतो
19आंधळी पाण्याला गेली अन घागर फोडून घरी आलीअक्षम व्यक्तीस काम दिल्यास ते तडीस जाणे कठीण असते
20आठ पुरभय्ये अन नऊ चौबेजमत नसल्यास सगळ्यांची चूल वेगवेगळी असते
21आपण शेण खायचं अन दुसऱ्याच तोंड हुंगायचस्वतः वाईट कर्म करायचे अन दुसऱ्यावर संशय घ्यायचा
22आयत्या पिठावर रेखोट्या मारणेकोणतेही काम न करता दुसर्‍याच्या जिवावरउपभोग घेणे
23उंच वाढला एरंड तरी हो‌ईना इक्षुदंडछोट्या गोष्टी मोठ्यांशी बरोबरी करू शकत नाही.
24उथळ पाण्याला खळखळाट फारअर्धवट ज्ञान असणारा व्यक्ती उगाच ज्ञानप्रदर्शन करतो
25उस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नयेएखाद्या चांगल्या गोष्टीचा ती नष्ट होईल एव्हढा उपभोग घेऊ नये.
26एकाने गाय मारली तर दुसऱ्याने वासरू मारू नयेएकाने वाईट गोष्ट केली तर आपल्यालाही वाईट गोष्ट करण्याचा हक्क पोहोचत नाही
27एकावे जनाचे करावे मनाचेसर्वांचे विचार एकूण आपला स्वतःचाच निर्णय घ्यावा
28ओसाड रानात एरंडाचा उदो उदोअशिक्षित गावात कमी शिकलेला हुशार विद्वान ठरतो
29कडू कारले तुपात तळले,साखरेत घोळले तरी ते कडू ते कडूचवाईट व्यक्तीची वाईट सवय कधीही जात नाही
30कळते पण वळत नाहीचांगल्या गोष्टी कृतीत आणता येणे कठीण असते
31कोंबड झाकलं तरी तांबड उगवल्या शिवाय राहत नाही सत्य कधीही लपवू नाही.
32घरात घाण दारात घाण कुठे गेली गोरीपानकाम न करता फक्त दिखाउपणा करणे
33चोराच्या मनात चांदणेवाईट व्यक्ती कायम कुटिल डाव रचण्यात मग्न असते
34जसा भाव तसा देवआपली जशी श्रध्दा असेल त्याप्रमाणे आपल्याला फळ मिळेल.
35जो खाईल आंबा तो सोशेल ओळंबाएखाद्या गोष्टीचा लाभ घेताना त्याचे दोष स्वीकारावे लागतात
36दमडीची नाही मिळकत आणि घडीची नाही फुरसतरिकामटेकडा माणूस आपण खूप व्यस्त आहे असे दर्शवितो.
37दहा गेले पाच उरलेआत्मविश्वास कमी होणे.
38दुध पोळलं की ताक फुकून प्यावेएखादा अवघड प्रसंग सोसल्यावर पुढे काळजी घेणे
39देणं न घेणं आणि कंदिल लावून येणंउगाचच एखाधाची खोड काढणे.
40पहिले पाढे पंचावन्नभरपूर समजावुन सुद्धा वाईट वागण्यात बदल न होणे
41यज्ञास बळी बोकडाचादुर्बळ व्यक्तीला कठीण काम करण्यास सांगणे
42शेरास सव्वाशेरप्रत्येक वाईट माणसाला त्यापेक्षा वरचढ माणूस मिळतोच
43हा सूर्य आणि हा जयद्रथपुराव्यासहित सिद्ध करणे
44वाऱ्यावरती वरात काढणेस्वतः नियोजन न करता दुसऱ्यावर विसंबून महत्त्वाचे काम करणे
45वड्याचे तेल वाग्यांवरएका गोष्टीचा राग दुसऱ्यावर काढणे
46वाचाल तर वाचालशिक्षण घेतले की तरच प्रगती होऊ शकते
47बडा घर पोकळ वासाश्रीमंत असण्याचा आव आणणे
48पी हळद आणि हो गोरीउतावीळ होणे
49नावडतीचे मीठ अळणीनावडत्या व्यक्तीने केलेली कोणतीही गोष्ट न आवडणे .
50नव्याचे नऊ दिवसनवेपणा असतानाचे कौतुक नंतर टिकत नाही
51दिसतं तस नसतं म्हणून जग फसतंदिखाऊ गोष्टी या कायम तकलादू असतात, मुळात वेगळेच काही असते.
52तेरड्याचा रंग तीन दिवसएखादे काम थोडे दिवस जोरात चालून एकदम बंद पडणे
53ज्याची मिळते पोळी त्याची वाजवावी टाळीआपल्या मालकाचे गुणगान करणे
54जावयाचं पोर हरामखोरमाणसाचा स्वभाव आपल्या स्वार्थ साधण्यासाठीचअसतो .
55चोर तो चोर वर शिरजोरस्‍वतः चोर असून आणखी जास्त चढेलपणाच्या गोष्‍टी सांगणारा
56घोडा मैदान जवळ असणेपरीक्षा लवकरच होणे
57गाव करी ते राव न करीएकीचे बळ एकट्या माणसाच्या कामाच्या तुलनेत जास्त असते
58खिळ्यासाठी नाल गेला अन नालीसाठी घोडाव्यवस्थित नियोजन नसल्याने खूप नुकसान होणे
59खायला कोंडा निजेला धोंडाखूप गरिबी असणे
60क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहेअधिक बोलण्या पेक्षा काम करणे चांगले असते
61कुठे राजा भोज कुठे गंगुतेलीताकतवान माणूस आणि दुर्बळ यांची तुलना होऊ शकत नाही
62करवंदीच्या जाळीला काटेचांगल्या वस्तूबरोबर वाईट गोष्टींचा सामना करावा लागतो
63एका हाताने टाळी वाजत नाहीदोष दोन्हीकडे असतो
64एक पाय मोडल्याने गोम लंगडी होत नाहीएक काम न भेटल्याने मस्तच आयुष्य संपत नाही .
65उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी भरीउद्योगी मनुष्य जीवनात यशस्वी होतो
66उठता लाथ बसता बुक्कीकायम धाकात ठेवणे
67उचलली जीभ लावली टाळ्यालाबेताल बोलणे
68आठ हात लाकुड, न‌ऊ हात धलपीएखाद्या गोष्टीची फारच स्तुती करून सादर करणे
69आंधळ्याची बहिऱ्याशी गाठएकमेकांना मदत न करणाऱ्या व्यक्ती जवळ येणे
70अडाण्याची गोळी भल्यास गिळीअशिक्षीत माणूस कोणालाही अडचणीत आणू शकतो
71आकांक्षापुढती गगन ठेंगणेआशावाद ठेवल्यास कोणतेही लक्ष्य साध्य होते
72आंधळीपेक्षा तिरळी बरीएखादी बाब अगदीच वाईट स्वीकारण्यापेक्षा थोडी दोष असलेली गोष्ट स्वीकारणे
73अडला नारायण गाढवाचे पाय धरीबलाढ्य व्यक्ती गरजेच्या वेळी सामान्य माणसाकडे मदत मागणे
74अठरा विश्वे दारिद्र असणेअत्यंत गरिबी असणे
75अगं अगं म्हशी, मला कुठं नेशी?एकाच्या चुकीसाठी इतर लोकाना दोष लावणे
76अक्कल नाही काडीची म्हणे बाबा माझे लग्नं कराक्षमता नसताना एखाद्या गोष्टीचा हट्ट करणे.
77हपापाचा माल गपापाअती हव्यासाने असलेली श्रीमंती ही नष्ट होते
78हत्ती होऊन ओंडके, मुंगी होऊन साखर खाल्लेली बरीमोठेपणा न मिरवता छोटे होऊन आपले काम परिपूर्ण करणे सुखी आहे
79शुध्द बीजापोटी फळे रसाळ गोमटीसंस्कारी कुटुंबात चांगल्या व्यक्ती असतात
80शितावरून भाताची परीक्षाफार थोड्या नमुन्यावरुन मोठ्या वस्तूंची चाचणी करणे
81विंचवाचे बिहाड पाठीवरफिरत्या माणसाचा ठाव ठिकाणा लागणे कठीण
82लहानपण देगादेवा मुंगी साखरेचा रवामोठे असण्या पेक्षा लहान होऊन सुखी राहणे चांगले
83लहान तोंडी मोठा घासछोट्या व्यक्तीने आवाक्या बाहेरच्या गोष्टी करणे
84भरंवशाच्या म्हशीला टोणगापूर्ण निराशा करणे
85बळी तो कान पिळीबलवान माणूस दुर्बळ माणसांना त्रास देतो
86पुढच्यास ठेच मागचा शहाणाएकाच मार्गावरील पुढील व्यक्तीस वाईट अनुभव आल्यास तो मागच्या माणसा साठी मार्गदर्शक ठरतो
87पालथ्या घड्यावर पाणीनि:र्बुध्ध व्यक्तीचे वागणे सुधारत नाही
88नाव मोठे लक्षण खोटेमोठा थाट दाखवणे पण प्रत्यक्षात काहीच नसणे
89नाचता येईना आंगण वाकडेस्वतः येत नसलेली गोष्ट न करता इतर गोष्टीस बोल लावणे
90नाकापेक्षा मोती जड होणेडोईजड होणे
91नरोवा कुंजरोवाकोणत्याही गोष्टीबाबत भाष्य न करणे
92दैव देते कर्म नेतेकर्म वाईट केले तर चांगल्या गोष्टीचा त्याग करावा लागतो
93तोंडाला पाने पुसणेशब्द देऊन समोरच्या व्यक्तीचे काम न करणे
94तहान लागल्यावर विहीर खोदणेगरज लागल्यानंतरच एखाद्या गोष्टीसाठी तयारी करणे
95तवा तापला तोवर भाकरी भाजून घ्यावीजोवर लाभ घेता येतो तोपर्यंत स्वार्थ साधून घेणे.
96तरण्याला लागली कळ अन म्हातारयाला आल बळतरणा माणसाने आळशीपणा करणे तर म्हाताऱ्याने उत्साह दाखवणे
97ढवळ्याशेजारी बांधला पावळया, वाण नाही पण गुण लागलादोन व्यक्तींना सोबत राहताना एकमेकांच्या सवयी लागणे.
98तळ्यात मळ्यात करणेमनाची अवस्था अस्थिर असणे
99डोंगर पोखरून उंदीर कढणेजास्त मेहनत करून कमी फायदा होणे
100डल्ला मारणेदुसऱ्याची वस्तू चोरणे

Marathi Mhani Ani Arth

Marathi Mhani Ani Arth PDF:- ह्या मध्ये तुम्ही म्हणी ओळख, म्हणी पूर्ण करा, वाक्यात उपयोग करा असे प्रश्न सुद्धा विचारले जातात 100+ म्हणी पीडीएफ मध्ये डाउनलोड करा .

1ठकास महाठकप्रत्येक वाईट माणसाला त्यापेक्षा वरचढ माणूस मिळतोच
2टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नहीकष्टाशिवाय यश मिळत नाही
3ज्याचं जळतं त्यालाच कळतंआपले दु:ख आपल्यालाच सोसावे लागते
4जेथे पिकतं तिथे विकतं नाहीएखादी गोष्ट जास्त प्रमाणात असलेल्या भागात त्या गोष्टीचे महत्त्व राहत नाही.
5अंगात नाही बळ आणि चिमटा घे‌उन पळदुर्बळ मनुष्य बलवान व्यक्ती वर सरळ हल्ला न करता छोटी खोडी काढून पसार होतो.
6अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धेनावाप्रमाणे लोक नसतात
7अठरा विश्व दारिद्र्य त्याला छत्तीस कोटी उपायजीवनात यशस्वी होण्यासाठी अनेक उपाय आहेत
8अडली गाय खाते कायगरजू माणूस कोणत्याही अटी स्वीकारून काम करतो
9अन्नछ्त्रात मिरपूड मागू नयेगरजवंत व्यक्तीला पर्याय नसतो
10अपयश ही यशाची पहिली पायरी आहेकोणत्याही यश मिळवताना सुरवातीला अपयश येऊ शकते
11आंधळे दळते अन कुत्रे पीठ खातेएकाने कष्ट करायचे अन दुसऱ्याने लाभ घ्यायचा
12आंधळ्या प्रजेत हेकणां राजाअसहाय्य गरीब लोकांमध्ये एखादा चुकीचे निर्णय घेऊन राज्य करतो
13आई जेवू घालीना बाप भिक मागू देईनादोन्हिकडून संकटात सापडणे
14आईचा काळ नि बायकोशी मवाळआईशी वाईट वागून बायकोला महत्त्व देणे
15आचार तेथे विचारचांगली संस्कृती चांगल्या विचाराना जन्म देते
16आधीच मर्कट तशातच मद्य प्यालाआधीच विचित्र बुद्धीचा,अनअति प्रोत्साहन मिळाल्यामुळे त्याच्या चेष्टाना उत येतो
17आपल्या अळवाची खाज आपणास ठावीआपले दोष आपल्यालाच माहित असते
18इच्छा तसे फळमनात चांगले विचार ठेऊन केलेले कार्य यशस्वी होतेच
19इकडे आड तिकडे विहीरकोंडी होणे
20उंटावरचा शहाणाचुकीचा सल्ला देणारा
21उंटावरून शेळ्या हाकणेकोणत्याही कामात सहभाग न घेता उगाच फुकटाचे मार्गदर्शन करणे
22उन पाण्याने घर जळत नसतेएखाद्यावर खोटे आरोप केले तरी त्याची बेअब्रू होत नाही
23उपट सूळ, घे खांद्यावरनसते लचांड पाठीमागे लावून घेणे
24एकटा जीव सदाशिवएकटा माणूस सुखी असतो
25करायला गेलो एक आणि झाले भलतेचचांगले करायला गेले तरी वाईट घडणे
26करीन ती पूर्वअंगी असे कर्तुत्व असावे की जे ठरविले ते घडून आलेच पाहिजे
27कुठेही जा पळसाला पाने तीनचसर्वत्र परिस्थिती सारखीच असते
28कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेचवाईट व्यक्तीची वाईट सवय कधीही जात नाही
29कुन्हाडीचा दांडा गोतास काळदुसऱ्यांना इजा करताना आपल्यालाही इजा होऊ शकते
30खाल्ल्या मिठाला जागणेमालकाशी प्रामाणिक राहून संकट काळी मदत करणे
31गाढवाचा गोंधळ लाथांचा सुकाळमुखं मनुष्य आपल्या वागण्याने सर्वदूर गोंधळ उडवतो
32घोंगडे भिजत पडणेएखादी गोष्ट खूप दिवसापासून प्रलंबित असणे
33चमत्कारास नमस्कार करणेअसाध्य गोष्टीना मानाने
34चांभाराची नजर जोड्यावरआपआपल्या व्यवसाया संबधित गोष्टींकडे अधिक लक्ष देणे ,
35चालत्या गाडीला खीळ घालणेएखाद्याच्या चांगल्या कामात व्यत्यय आणणे
36जपून पाऊल टाकणेकाळजीपूर्वक काम करणे
37जसा गुरु तसा चेलाएका प्रमुख व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाल त्या व्यक्तीच्या स्वभावचेच लोक निर्माण होतात.
38जिकडे सुई तिकडे दोराजवळचे संबंध असणारे एकमेकांजावळ कायम असतात.
39जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाहीवाईट व्यक्तीची वाईट सवय कधीही जात नाही
39दांत कोरून पोट भरतोजगण्यासाठी फार थोडे श्रम घेऊन जीवन व्यतीत करणे.
40दाखवायचे दात वेगळे अन खायचे दात वेगळेदाखवताना विचार वेगळे अन मनात काही वेगळेच विचार
41दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते पण स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाहीस्वतःच्या चुकांकडे दुर्लक्ष करून दुसऱ्याच्या चुकांविषयी बोलणे
42दोघींचा दादला उपाशीएकाच वेळी दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यामुळे कोणताही अपेक्षित लाभ न होणे.
43दोन्ही घरचा पाहुणा उपाशीदोन वेगवेगळ्या लोकांना पाठिंबा देणाऱ्या व्यक्तीला तोटा होतो
44द्या दान सुटे गिरान एखादा आशावाद दाखवून पैसे ची अपेक्षा करणे
45नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न कमी तयारीअसलेल्या कार्यात अनेक बाधा येणे
46नकर्त्यांचा वार शनिवारकाम न करणारा व्यक्ती फक्त कारणे सांगतो
47नव्याची नवलाईएखाद्या नवी गोष्टीचा उदोउदो करणे
48नाव सोनुबाई अन हाती कथलाचा वाळानावाप्रमाणे लोकप्रियता नसणे
49निंदकाचे घर असावे शेजारीआपल्या टीकाकारांमुळे आपला विकास होतो
50निर्लज्जम सदा सुखीवाईट व्यक्तीला त्याचा वागण्याचे काहीही वाटत नाही
51पाण्यात राहून माशाशी वेरबलवानाशी शत्रुत्व काय कामाचे ?
52पेराल तसे उगवेलकर्मानुसार तसे फळ मिळते
53फट म्हणताच ब्रम्ह छोट्या गोष्टीवरुन दोषी ठरवणे
54वागावेच लागते कधी गाडीवर नाव तर कधी नावेवर गाडीसर्वाना प्राप्त परिस्थितीनुसार वागावेच लागते
55वारा पाहून पाठ फिरवावीवातावरण पाहून वागावे
56संगत गुण से सोबत गुणदोन व्यक्तींना सोबत राहताना एकमेकांच्या सवयी लागणे
57हत्ती गेला शेपूट राहिलंअवघड काम संपल्यानंतर छोटे राहणे
58हलवायाच्या घरावर तुळशीपत्रस्वतःच्या व्यवसायात लोकप्रिय असूनही आपल्या घरासाठी आपल्या व्यवसायासंबधित सुविधा देता न येणे
59सुंठेवाचून खोकला गेलापरस्पर संकट टळले
60सुंभ जळतो पण पिळ जळत नाहीभरपूर शिक्षा होऊन सुध्दा वाईट प्रवृत्ती नष्ट करता येत नाही
61शेखी मीरविणेउगाचच मोठ्या गोष्टी करणे
62शेळी जाते जीवानिशी खाणारा म्हणतो वातडआपल्या स्वार्थ साधण्यासाठी दुसऱ्याच्या जीवाचा विचार न करणे
63चोरावर मोरप्रत्येक वाईट माणसाला कधीतरी दुसरा वरचढ माणूस मिळतोच.
64जखमेवर मीठ चोळणेआधीच त्रस्त असताना परत त्याच गोष्टीविषयी त्रास देणे
65छत्तीसाचा आकडाविरुद्ध मत असणे
66जळत घर भाड्याने कोण घेणार?संकटाची गोष्ट कोणालाच आवडत नाही
67जळी स्थळी काष्ठी पाषाणी असणेसगळी कडे असणे
68चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचेप्रत्येकाचे दिवस येतात
69गाढवाच्या पाठीवर गोणीकष्टकरी माणसाला तया कष्टा संबधित लाभ मिळत नाही तो लाभ इतरांना मिळतो
70गाढवं मेलं ओझ्याने अन शिगरू मेलं हेलपाट्यानेसमजदार व्यक्ती काम करत आपले जीवन व्यतित करतात तर मुर्ख मनुष्य काम न समजल्याने त्रस्त जगतो.
71गरज सरो नि वैद्य मरोकाम झाल्या नंतर त्या माणसाला विसरणे .
72गरज ही शोधाची जननी आहेगरजेतूनच नवीन शोध गोष्टी निर्माण होतात
73गरजवंताला अक्कल नाहीअसहाय्य माणूस कोणाकडेही मदतीची याचना करतो
74गरजेल तो बरसेल कायमोठमोठ्या गोष्टी करणारे लोक मुळात काहीही काम करत नाहीत
75गाढवाने शेत खाल्ले ,पाप ना पुण्यवाईट व्यक्तीला त्याचा वागण्याचे काहीही वाटत नाही
76गाढवापुढे वाचली गीता ,कालचा गोंधळ बरा होताचांगले ज्ञानदिल्यावरही व्यक्तीचे वाईट वागणे
77गाढवाला गुळाची चव कायमूर्ख माणसाला चांगल्या गोष्टींची किंमत नसते
78गावात घर नाही अन रानात शेत नाहीकफल्लक असणे
79गावात नाही झाड अन म्हणे एरंडया ला आले पानएखादी गोष्ट उगीचच वाढवून सांगणे
80गोरा गोमटा कपाळ करंटानुसते दिखाऊपण काही कामाचे नसते
81चढेल तो पडेलफार गर्व केला तर पराजय निशित असतो
82घोडं झालया मराया अन बसणारा म्हणतो मी नवांदुसऱ्याचे दु:ख न पाहता आपलाच विचार करणे
83चोराच्या उलट्या बोंबागुन्हा कबूल न करता समोरच्यास दोषी ठरवणे.
84चोरीचा मामला हळू हळू बोंबलावाईट गोष्ट सर्व बाजूंनी झाकण्याचा प्रयत्न होतो.
85छडी लागे छमछम विद्या येई घमघमकठीण परिश्रम व दंड यामुळेच यश मिळते
86श्वानाचीया भुंकण्याला हती देईना किंमतबलवान व्यक्ती दुर्बल माणसाला किंमत देत नाही
87ज्याचा कंटाळा त्याचा वानोळाजी कंटाळवाणी बाब असते तीच स्वीकारावी लागणे
88जो श्रमी त्याला काय कमीकष्ट करणाऱ्या व्यक्तीस काही कमी पडत नाही.
89जात्यातले रडतात आणि सुपातले हसतातदुसऱ्यावर हसताना विचार करावा काही दिवसांनी अशी वेळ आपल्यावरही येऊ शकते .
90जशी नियत तशी बरकतआपले यश आपल्या चांगल्या विचारांवर अवलंबुन असते.
91जशास तशेसमोरच्या व्यक्ती व्यवहारानुसार आपला व्यवहार ठरवावा
92चार आण्याचा मसाला बारा आण्याची कोंबडीएखाद्या छोट्या गोष्टीची किंमत कमी आणि इतर खर्च खूप जास्त असणे
93चमडी जाईल पण दमडी जाणार नाहीपैश्यावर खूप प्रेम असणे
94घोड्यावर हौदा हत्तीवर खोगीरकोणताही विचार न करता कृत्य करणे
95घरोघरी मातीच्या चुलीसर्वदूर सारखीच परिस्थिती असते
96घरात नाही एक तीळ अन मिशाला पिळगरीब असताना श्रीमंतीची एट करणे
97घरचा उंबरठा दारालाच माहितघरातील गोष्टी घरातल्या लोकांनाच माहित असते
98गोगल गाय पोटात पायवरून दुर्बळ वाटणारे आतून स्वार्थी असू शकतात
99गुरवाचे लक्ष निविद्यावरमाणसाला स्वार्थाच्या गोष्टी लगेच कळतात
100गाव तिथे उकिरडासगळीकडे सारखीच परिस्तिथी असते

Marathi Mhani Ani Arth

Marathi Mhani Ani Arth :- आधुनिक म्हणी, गावरान, मराठी, मराठी जुन्या म्हणी, आणि वाक्प्रचार, ऐतिहासिक म्हणीमराठी विनोदी म्हणीमराठी म्हणींचा संग्रह व त्याचे अर्थ, वाक्यात उपयोग स्पष्टीकरणासह खाली दिलेल्या आहेत.

1गाजराची पुंगी वाजली तर वाजली ,नाहीतर मग मोडून खाल्लीएखाद्या गोष्टीचा उपयोग आपल्या अपेक्षेप्रमाणे झालातर ठीक,नाहीतर त्याचा अन्य तर्हेने उपयोग करणे
2गर्वाचे घर खालीगर्व असलेल्या माणसाचा पराजय होतोच
3गंगेत घोडं न्हालंसर्व इच्छा पूर्णत्वास जाणे
4गंगा वाहते तोवर हात धुवून घ्यावेजोवर लाभ घेता येतो तोपर्यंत स्वार्थ साधून घेणे.
5खिशात नाही दमडी अन बदलली कोंबडीऐपत नसताना बडेजाव दाखविणे
6खायला काळ भुईला भारज्याचा काही उपयोग नाही असा माणूस भार बनतो
7खाता पिता दोन लाथाकायम घाबरवून ठेवणे
8कुंपणानेच शेत खाणेरक्षणकर्त्यानेच नुकसान करणे
9काविळ झालेल्यास सर्व पिवळे दिसतेआपणास ज्या गोष्टी जसे विचार करतो तश्याच वाटतात
10कावळा बसायला अन फांदी तुटायला भलत्याच गोष्टीचा संबंध वेगळ्याच गोष्टीला लावणे
11काळी बेंद्री एकाची अन सुंदर बायको लोकाचीसर्वाना आपल्या गोष्टीपेक्षा इतरांच्या चांगल्या आहेत असे वाटते
12काळ आला होता पण वेळ आली नव्हतीप्राणांतिक संकटातून वाचणे
13करंगळी सुजली तर डोंगरा एवढी होईल कायछोट्या माणसाला थोर माणसाची बरोबरी करणे अशक्य आहे
14एकादशीच्या घरी शिवरात्रएका दरिद्री माणसाचा दुसऱ्या दरिद्री माणसाचा उपयोग होत नाही.
15एका दगडात दोन पक्षी मारणेएकाच गोष्टीने दोन काम करणे
16एक पाय तळ्यात एक पाय मळ्यातदोन मार्गांवर हात ठेऊन चालणे
17उसाच्या पोटी कापूसकर्तबगार व्यक्तीच्या वंशात आळशी माणूस असणे
18इज्जतीचा फालुदा होणेअपमान होणे
19आलीया भोगासी असावे सादरएखाद्याच्या वाट्याला वाईट काळ आला असेल तर तो सहन करणे
20आली चाळीशी, करा एकादशीपरिस्थितीनुसार आपल्या सवयी बदलवणे
21आवळा देऊन कोहळा काढणेअल्प आमिष दाखवून मोठे काम करून घेणे
22आले अंगावर घेतले शिंगावरसंकटाचा सामना धैर्याने करावा
23आरोग्य हेच ऐश्वर्यचांगले आरोग्य ही यशाची गुरुकिल्ली आहे
24आभाळ फाटल्यावर त्याला ठिगळ कसे लावायचेमोठे संकट आले की बचाव करणे अवघड असते
25आमचे गहू आम्हालाच देऊआपल्याच वस्तूचा चतुराईने दुसऱ्याना लाभ न मिळू देता स्वतःच लाभ घेणे
26आपला तो बाब्या दुसऱ्याच ते कारटंस्वतःच्या चुकांकडे दुर्लक्ष करून दुसऱ्याच्या चुकांविषयी बोलणे
27आधीच उल्हास त्यात फाल्गुन मासआधीच हौशीने केलेलं काम अन त्याला अनुकूल परिस्थिती निर्माण होणे
28आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणारएखादी गोष्ट अस्तित्वात नसतांना त्याची अपेक्षा करणे व्यर्थ आहे
29आकारे रंगती चेष्टामाणसाच्या बाह्य स्वरूपावरून त्याचा कार्याचा अंदाज करता येत नाही
30आईजीच्या जिवावर बाईजी उदारदुसऱ्याचा पैसा दान करून स्वतः चा बडेजाव दाखविणे
31असेल तेव्हा दिवाळी नाहीतर शिमगाभरपूर पैसे असल्यावर चैन करायची नाहीतर गप्प बसायचे
32अपुऱ्या घड्याला डब डब फार कमी बुद्धिवान माणूस आपले ज्ञान उगाच सर्वदूर सांगत सुटतो
33अपयश हे मरणाहून बोचते अपयश मरणापेक्षा भयंकर आहे व लाजीरवाणे आहे
34अडाण्याचा गेला गाड़ा, वाटेवरची शेते काढामूर्ख माणूस कोणत्याही प्रकारे विचित्र वर्तन करू शकतो
35अडली गाय अन फटके खायअडचणीत सापडलेल्या व्यक्तीस जास्त त्रास देणे
36अचाट खाणे मसणात जाणेअती प्रमाणात कोणतीही गोष्ट घातक ठरू शकते
37अंधारात केले तरी उजेडात आलेगुप्तपणे केलेली गोष्ट कधीही सर्वाना कळू शकते
38अंथरूण पाहून पाय पसरावेआपली आवक जेव्हढी असेल तेवढेच पैसे खर्च करावे
39खाली मुंडी पाताळ धुंडीस्वभावाने गरीब वाटणारा मनुष्य ही धोकेदायक असू शकतो
40खाण्याराला चव नाही रांधणारयाला फुरसत नाहीएखाद्या गोष्टीची मागणी वाढली की ती गोष्ट मुक्तपणे सहन करणे भाग असते
41खतास महाखतप्रत्येक वाईट माणसास दुसर वरचढ माणूस मिळतोच
42कोळसा उगाळावा तेवढा काळावाईट व्यक्तीचा अनुभव कायम वाईट असतो
43केली खाता हरखले व हिशेब देता कचरलेकोणताही विचार न करता कर्ज करायचे व देणी वाढली की काळजी करायची
44कावळ्याच्या शापाने गाय मरत नाहीदुर्जन व्यक्तीच्या चिंतनाने चांगल्या माणसाचे नुकसान होऊ शकत नाही
45काय ग बाई उभी घरात दोघी तिघीघरात काम करणारे पुष्कळ वाढले की प्रत्येकजण कामचुकारपणा करू लागतो
46काट्यावाचून गुलाब नाहीचांगली गोष्ट कठीण परीश्रमाने मिळते
47काखेत कळसा गावाला वळसाजवळ असलेली वस्तू दुसरीकडे शोधणे
48काकडीची चोरी अन फाशीची शिक्षाथोड्याश्या अपराधानंतर फार मोठी शिक्षा करणे
49कामा पुरता मामाव्यावहारीक जगात स्वार्थ बाळगणे
50काम नाही घरी अन सांडून भरीकाम नसताना उगाच काम वाढवून तेच काम परत परत करणे
51काम न धंदा, हरी गोविंदारिकामटेकडा मनुष्य फक्त बडबड करण्यात आपला वेळ घालवतो.
52कसायाला गाय धार्जिणीगुंडांच्या पुढे लोकं नमतात व पुढे पुढे करतात
53औषधा वाचून खोकला गेलापरस्पर संकट टळले
54ओळखीचा चोर जीवे मारीएखाद्याला आपण गुन्हा करताना पाहिल्यास तर तो आपल्या जिवावर उठतो
55ओल्याबरोबर सुके जळतेदुष्टांच्या बरोबर राहिल्याने सज्जन माणसास ही त्रास होतो
56एका कानावर पगडी घरी बाईल उघडीबाहेर श्रीमंतीचा आव आणायचा व घरी दारिद्र्यात राहणे
57उपसा पसारा मग देवाचा आसराआधी कामा करावे मग देव देव करावे
58उत्तम शेती मध्यम व्यापार नि कनिष्ठ नोकरीनोकरी पेक्षा व्यापार व व्यापारापेक्षा शेती उत्तम आहे
59उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंगएखाद्या गोष्टीसाठी खूप घाई करणे
60उचल पत्रावळी म्हणे जेवणारे कितीमुद्द्याचे काम सोडून भलतीच चौकशी करणे
61उघड्याकडे नागडा गेला अनं रात्रभर हिवाने मेलाएक लहान पत असलेली व्यक्ती दुसऱ्या गरीब व्यक्तीची बरोबरी करू शकत नाही.
62आसू ना मासू , कुत्र्याची सासूजिव्हाळा नसताना वरवर कळवळा दाखविणे
63आयत्या बिळावर नागोबाकोणतेही काम न करता दुसर्‍याच्या जिवावर उपभोग घेणे
64आपले नाक कापून दुसऱ्याला अपशकूनआपले नुकसान झाले तर दुसऱ्याचे पणनुकसान होवो ही मनीषा मनात बाळगणे
65आपला हात जगन्नाथआपली उन्नती आपल्यावरच अवलंबून असते,
66आपण हसे लोकाला अन घाण आपल्या नाकालाज्या दोषाबद्दल लोकास हसायचे, तोच दोष आपल्यात असताना दुर्लक्ष करणे
67आपण चिंतीतो एक पण देवाच्या मनात भलतेचप्रत्येकच गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही
68आईची माया न पोर जाई वायाअति लाडाने मुल बिघडते
69अनोळख्याला भाकरी द्यावी पण ओसरी देऊ नयेअपरिचित माणसाशी अधिक सलगी करू नये
70अतिपरीचयेत अवज्ञाअतिघनीष्ट सबंध हानिकारक ठरू शकतो
71अति शहाणा त्याचा बैल रिकामाशिष्ट माणसाशी व्यवहार करताना लोक जपून वागतात त्यामुळे त्यांना काम करणे जड जाते
72अति राग भीक मागरंगामुळे कोणतीही गोष्ट साध्य करता येत नाही
73अंतकाळापेक्षा मध्यांन्नकाळ कठीणमरणापेक्षा भुकेच्या यातना कठीण असतात
74आशेची माय निराशानिराशा येईल म्हणून आशा कधीही सोडू नये
75इजा बिजा तीजाएकसारख्या होणाऱ्या घटना टाळता येत नाही
76उडत्या पक्षाची पिसे मोजणेसहज चालता बोलता एखाद्या गोष्टीची पारख करणे
77उचलली जीभ लावली टाळायला कोणताही विचार न करता बोलणे
78उखळात डोके घातल्यावर मुसळाची भीती कशालाएखादे मोठे , कठीण काम हातात घेतल्यानंतर श्रमांचा विचार करायचा नसतो
79उकिरड्याची दैना बारा वर्षांनी देखील फिटतेगरीब व्यक्तीचे दिवस कधीही पालटू शकतात
80उंदीर गेला लुटी अन आणल्या दोन मुठीमनुष्य आपल्या कुवतीनुसार काम करतो
81उंदराला मांजर साक्षवाईट माणसाने दुसर्‍या वाईट माणसाविषयी चांगले सांगणे
82कानामागून आली तिखट झालीनवीन आलेली व्यक्ती लवकरच यशस्वी होणे
83काठी मारल्याने पाणी दुभंगत नाहीखरी मैत्री आगंतुक कारणाने तुटत नाही
84दुष्टी आड सृष्टीआपल्या पाहण्यापलीकडे पण जग आहे
85दिवसा चुल रात्री मूलदिवस-रात्र कामाचा त्रास असणे.
86दिवस गेला रेटारेटी, चांदण्यात कापूस वेचीतदिवसभर आपला वेळ वाया घालवून शेवटच्या क्षणास धावा-धाव करणे.
87दाम करी कामपैशाला किंमत असते
88दगडावरची रेघकायमची गोष्ट
89दक्षिणा तशी प्रदक्षिणाव्यवसायात जसा लाभ असेल तसे महत्त्व आपल्या ग्राहकास देणे
90तू राणी मी राणी पाणी कोण आणीदोन नाजूक व्यक्ती कधीही काम करत नाही,
91तुझी दाढी जळू दे पण माझी वीडी पेटू देदुसऱ्याचे नुकसान झाले तरी चालेल पण स्वतःचा स्वार्थ साधणे
92तीन तिघाडा काम बिघाडाएखादे काम भरपूर जणांनी लक्ष केंद्रित करून केले तर अपयश येऊ शकते
93ताकापुरते रामायणएखादी गोष्ट मिळेपर्यंत संवाद साधणे.
94तळ हाताने सूर्य झाकला जात नाहीछोट्या गोष्टीनी फार मोठे गोष्ट दडवता येत नाही
95ज्याला नाही अक्कल त्याची घरोघरी नक्कलमुर्ख माणसाची सर्वत्र उपेक्षा व टिंगल होते.
96जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडालाआपले काम दुसऱ्यावर ढकललेतर अपयश येते
97जिथे कमी तेथे आम्हीपडेल ते काम करून समोरच्यास हातभार लावणे
98चोर नाही तर चोराची लंगोटीभरपूर अपेक्षा असताना अल्प लाभावर समाधान मानणे.
99चिंती परा ते येई घरावाईट चिंतन केले की तशीच घटना आपल्या आयुष्यात घडते
100चकाकते ते सोने नसतेबडेजाव करणारे सर्वजण श्रीमंत नसतात

Read More:- 2000+ Virudharthi Shabd In Marathi PDF Download – मराठी विरुद्धार्थी शब्द

All Marathi Mhani List

1चतुर्भुज होणेलग्न करणे
2चांगल्या कामाचा प्रारंभ स्वतःच्या घरापासून व्हावाचांगली गोष्ट स्वतः पासून सुरवात करावी
3चुकणे हा मानवाचा धर्म आहेमाणूस चुकू शकतो
4चुकलेला फकीर मशिदीतमनुष्य आपल्या मूळ स्थानावर परततो.
5जशी कामना तशी भावनाआपण जसे चिंतन करतो त्याप्रमाणे आपले विचार बनतात.
6ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळीएका प्रदेशात सर्व गुणधर्माचे लोकं राहतात
7ज्याचा हात मोडेल त्याच्या गळ्यात पडेलवाईट कृत्य स्वतःलाच भोगावे लागते
8ज्याची मिळते पोळी त्याची वाजवावी टाळीआपल्या मालकाचे गुणगान करणे
9झाडाजवळ छाया अन बुवाजवळ बायाथोडे आमिष दाखविले तरी मनुष्याची धाव तिकडेच असते
10झाकली मूठ सव्वा लाखाचीदुर्गुण असले तरी प्रकट करू नयेत
11ज्याला नाही अक्कल त्याची घरोघरी नक्कलमुर्ख माणसाची सर्वत्र उपेक्षा व टिंगल होते.
12दिव्या खाली अंधारमोठ्या व्यक्तीचे सुद्धा गुण दोष असतात
13दिवाळी दसरा हात पाय पसरासण बघून भरमसाठ खर्च करणे
14दिल्या भाकरीचा सांगितल्या चाकरीचाएखादा माणूस एकाच ठिकाणी फार काही अपेक्षा न ठेवता काम करतो.
15अती झालं अऩ हसू आलंएखाद्या गोष्टीचा जास्त उहापोह केला तर ती गोष्ट हास्यास्पद ठरते
16आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोनअपेक्षेपेक्षा जास्त लाभ होणे
17असेल तेव्हा दिवाळी नाहीतर शिमगाभरपूर पैसा असल्यावर चैन करायची नाहीतर गप्प बसायचे
18आपले नाही धड अन शेजाऱ्याचा कढआपली परिस्थिती चागली नसताना दुसऱ्याच्या परिस्थिती विषयी कळकळ दाखविणे
19एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथएकमेकांच्या सहकार्याने सर्वांचाच फायदा होतो
20एक ना धड भारभार चिंध्याअनेक गोष्टी अपूर्ण करून , कोणत्याही गोष्टी पूर्ण न करणे
21उडाला तर कावळा बुडाला तर बेडूकएखाद्या गोष्टीची पारख लगेचच होत नाही त्यासाठी थोडा वेळ जाऊ द्यावा लागतो
22आपली पाठ आपणास दिसून येत नाहीआपले दोष आपल्याला दिसत नाहीत
23आधीच आम्हाला हौस, त्यात पडला पाऊसएखाद्या अचानक ठरलेल्या गोष्टीत बाधा उत्पन्न होणे
24आधी पोटोबा मग विठोबाअगोदर पोट भरावे मग देवास आळवावे
25आधणातले रडतात अन सुपातले हसतात्तदुसऱ्यांना हसताना विचार करणे क्रमप्राप्त आहे, काही दिवसांनी तशी वेळ आपल्यावरही येऊ शकते
26आजा मेला नि नातू झालाएकीकडे फायदा तर दुसरीकडे तोटा होणार
27आखुड शिंगी आणि बहुदुधीसर्व आपल्या मनासारखे व्हावे असे वाटणे
28अप्पा मारी गप्पाकाही रिकामटेकडे उगाच चर्चेचे पाल्हाळ लावतात
29अनुभवल्याशिवाय कळत नाही, चावल्याशिवाय गिळत नाहीएखाद्या गोष्टीत सहभाग घेतल्याशिवाय ती गोष्ट साध्य होत नाही
30असतील शिते तर नाचतील भुतेसंपत्ती असलेल्या व्यक्तीकडे सर्वजण येतात
31आधी जाते बुद्धी मग जाते लक्ष्मीआधी वर्तन बिघडते मग मनुष्य कंगाल होतो
32कठीण समय येता कोण कामास येतोआपल्या अडचणीच्या वेळेस कोणीही मदतीला येत नाही
33तेल गेले तूप गेले हाती आले धुपाटणेएकाच दोन वेगवेगळ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यावर दोन्ही गोष्टींचा लाभ न होणे
34ढवळ्या जातो आणि पवळ्या येतो पण सावळा गोंधळ तसाच राहतोकारभारी व्यक्ती बदलली तरी फारसे बदल होत नाही अन तोच तो गोंधळ उडतो.
35डोळ्यात अंजन घालणेएखाद्यास दिवसाढवळ्या विश्वासघात करुन फसविणे
36नसून खोळंबा असून दाटीएखाद्या प्रमुख व्यक्तीचा कोणताही उपयोग न होणे
37नवी विटी नवे राज्यनवीन राज्यकर्ते नवीन कायदे आणतात
38साखरेचे खाणार त्याला देव देणारसगळ्यांशी आपुलकीने वागल्यास असाध्य बाब साध्य होऊ शकते
39सरड्याची धाव कुंपणा पर्यंतचदुर्बळ माणूस एका मर्यादेच्या काम करतो
40वराती मागून घोडेएखादी गोष्टीचे महत्व संपल्या नंतर त्यासाठी उपाय योजना करणे व्यर्थ आहे
41लेकी बोले सुने लागेएकाला बोलल्यावर दुसऱ्याने त्यातील संदेश ओळखणे
42मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाहीकाही गोष्टी स्वतःअनुभावल्याशिवाय कळत नाही
43मूर्ती लहान पण कीर्ती महानछोटा मनुष्य तरी कार्यक्षमता खूप असणे
44मुलाचे पाय पाळण्यात दिसतातव्यक्तीचे गुणदोष सुरवातीच्या काळात लगेच कळतात
45बाळाचे बाप ब्रह्मचारीनिष्पाप वाटणाऱ्या व्यक्ती दोषी असणे
46दे माय धरणी ठाय करणेखूप त्रस्त होणे
47दुर्दैवाचे दशावतार होणेअनेक बाजूने संकट येणे
48दात कोरुन पोट भारता येत नाहीइकडून तिकडून आणलेल्या अल्प मिळकतीवर जीवन व्यतीत करता येत नाही
49ताकास तूर न लागू देणेमनातील गोष्ट न सांगणे
50जिकडे पोळी तिकडे गोंडा घोळीएखद्या ठिकाणी लाभ असता तिकडे विशेष लक्ष्य देणे.
51घार हिंडते आकाशी परी तिचे चित पिल्लांपाशीघर प्रमुखाचे लक्ष आपल्या मुलांकडेच असते
52घरात नाही कौलान रिकामा डौलगरीब असताना श्रीमंतीची एट करणे
53कशात काय अन फाटक्यात पायबडेजाव दाखविला तरी उपयोग नसतो
54ओठी तेच पोटीबोलावे तसे वागावे, सरळमार्गी माणूस
55एकादशी अन दुप्पट खाशीनियमांच्या विरुद्ध वर्तन करणे दरिद्री माणसाचा उपयोग होत नाही
56ऊस झाला डोंगा परी रस नाही डोंगाबाह्य स्वरूपावरून व्यक्तीच्या स्वभावाची पारख करता येत नाही
57उभारले राजवाडे अन तेथे आले मनकवडेश्रीमंती आले की त्यामागे हाजी हाजी करणारे येतातच
58आपल्या गल्लितच कुत्रे शिरजोरआपल्या भागात आपला वरचष्मा ठेवणे
59आपलेच दात अन आपलेच ओठआपल्या माणसांनी आपल्याच माणसाना त्रास देणे
60रात्र थोडी सोंगे फारकाम भरपूर, वेळ कमी
61लंकेत सोन्याच्या विटादुसऱ्याची श्रीमंती आपल्या काही कामाची नसते
62लंकेची पार्वती असणेखूप गरीब असणे
63देश तसा वेशप्रदेशाप्रमाणे आपले संस्कार, पोशाख बदलतो.
64थेंबे थेंबे तळे साचेकाटकसर केल्यास बरीच शिल्लक मागे पडते
65दहा मरावे पर दहांचा पोशिंदा मरु नयेमहत्त्वाची व्यक्ती गेली तर फार मोठे नुकसान होते.
66दही वाळत घालून भांडणएखाद्या नुकसानाची तमा न बाळगता वैर करणे सुरूच ठेवणे
67गड आला पण सिंह गेलाएक महत्त्वाची गोष्ट मिळवताना दुसरी महत्त्वाची गोष्ट दूर जाणे
68करून करू भागले अन देवपूजेला लागलेवाईट गोष्टींचा वीट आल्यावर चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करणे
69एकी हेच बळएकत्र समुदाय कायम जिंकतो
70एकूण घेत नाही त्याला सांगू नये काहीजो एकात नाही त्याला समजावण्याचा प्रयत्न करू नये
71उभ्याने यावे अन ओणव्याने जावेकोणतेही काम स्वाभिमानाने करावे त्याचे श्रेय नम्रपणाने घ्यावे
72आग सोमेश्वरी नि बंब रामेश्वरीगरजू माणसाला मदत न करता, गरज नसलेल्या माणसाला मदत करणे
73आगीतून निघून फुफाट्यात पडणेएका संकटातून निघून दुसर्‍या संकटात सापडणे
74आत्याबाईला मिशा असत्या तर तिला काकाच म्हटले असतेअशक्य गोष्टींची चर्चा करण्यात काही अर्थ नसतो
75इच्छिलेले घडते तर भिक्षुकही राजे होतेसर्व इच्छेप्रमाणे झाले असते तर सर्व लोकं धनवान झाले असते
76उघड्या डोळ्यांनी प्राण जात नाहीधडधडीत नुकसान होत असताना न प्रतिकार करता माणसाला स्वस्थ बसवत नाही
77एक नूर आदमी दस नूर कपडामाणसाचा रुबाब नीटनेटक्या पोशाखाने वाढतो
78एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीलोकात एकदा की नाचक्की झाली की लोकं त्याच दृष्टीने पाहतात.
79एका हाताने टाळी वाजत नाहीभांडणात एकाचीच चुकी नसते, प्रत्येकाची थोडी चूक असतेच असते
80ओठात एक नि पोटात एकप्रकट करताना विचार वेगळे अन मनात काही वेगळेच विचार.
81ओढाळ गुराला लोढणे गळ्यालागुन्हेगाराला कायद्याचा वाचक बसावयास हवा
82कधी तुपाशी तर कधी उपाशीपैसा असला तर चंगळ करायची नाही तर उपाशी राहायचे
83खाई त्याला खव खवेज्यांनी चोरी केली अस्वस्थ होतो
84खाजवून खरुज काढणेएखाद्याची उगाचच कुरापत काढणे
85ज्याचा कंटाळा त्याचा वानोळाजी कंटाळवाणी गोष्ट असते तीच स्वीकारावी लागणे
86झालं गेलं अन गंगेला मिळालंझालेल्या गोष्टी दुर्लक्ष करून पुढे मार्गक्रमण करणे
87दिवस बुडाला मजूर उडालाटाम-टून काम करून निघून जाणे.
88दुधापेक्षा सायीवर प्रेम जास्तमुलांपेक्षा नातवंडांवर अधिक प्रेम असणे.
89नाक दाबले की तोंड उघडतेमनस्थितीत हवे ते काम एखाद्यास कोंडीत पकडून ऋण घेता येते
90बुडत्याला काठीचा आधारसंकटग्रस्त मनुष्यास छोटी मदत सुद्धा मोठी वाटते
91बैल गेला अन झोपी केलाएखादी गोष्टीचे महत्व संपल्या नंतर त्यासाठी उपाय योजना करणे व्यर्थ आहे
92बोलण्यापेक्ष मौन श्रेष्ठअधिक बोलण्या पेक्षा काम करणे चांगले असते
93राजा उदार झाला हाती भोपळा दिलाआशा असताना एखाद्या मोठ्या व्यक्तीने अपेक्षेनुसार काम न करणे
94संन्याश्याच्या लग्नाला शेंडीपासून प्रारंभमुळात कमी तयारी असलेल्या व अडखळत असलेल्या कार्यात अनेक बाधा येणे
95शेंडी तुटो की पारंबी तुटोएखाद्या गोष्टीचे परिणाम काय राहणार याची चिंता न करणे
96वासरात लंगडी गाय शहाणीमूर्ख लोकांमध्ये कमी बुध्धिवान मनुष्यसुद्धा प्रसिद्ध असतो
97दारात नाही आड म्हणे लावतो झाडसाधने नसताना एखादी गोष्ट हौस म्हणून करणे
98दिवस मेला इथं तिथं अन रात्र झाली निजु कुठंदिवसभर आपला वेळ वाया घालवून शेवटच्या क्षणास धावा-धाव करणे.
99जाळा वाचून नाही कढ,माये वाचून नाही रड ज्याने काही वाईट नाही केले त्याला भीती कसली
100जावे त्याचा वंशा,तेव्हा कळेएखाद्या व्यक्तीचे दु:ख त्याच्या जवळ गेल्यावर कळते

Read More:- Vasudev Balwant Phadke Information In Marathi PDF Download। वासुदेव बळवंत फडके बद्दल सर्व माहिती

Marathi Mhani Tyanche Arth PDF

1उधारीचे पाते अन सव्वा हात रितेउधारीने घेतलेला माल मग कमीच भरणार
2आपल्याच पोळीवर तूप ओढून घ्यायचेइतरांचा विचार न करता स्वार्थ साधणे
3आंधळी पाण्याला गेली अन घागर फोडून घरी आलीअक्षम व्यक्तीस काम दिल्यास ते तडीस जाणे कठीण असते
4देह देवळात चित्त पायतणातएका ठिकाणी मन एकाग्र न करता ,दुसऱ्याच ठिकाणीचित्त घोटाळणे.
5दुधात साखर पडणेएकाचवेळी अनेक गोष्टीचा लाभ होणे
6दुखणे हत्तीच्या पायाने येते आणि मुंगीच्या पायाने जातेदु:ख लवकर संपत नाही.
7दांत आहे तर चणे नाहीत, चणे आहेत तर दांत नाहीतसर्व गोष्टी उपलब्ध असल्यातरी त्याचा उपभोग घेता न येणे.
8तोबरयाला पुढे ,लगमला मागेफायद्याचा वेळी पुढे पुढे ,कामाच्या वेळी मात्र मागेमागे
9चोर सोडून संन्याश्याला फाशीअपराधी व्यक्तीस दंड न करता निष्पाप व्यक्तीला त्रास देणे
10ग ची बाधा झालीफाजील आत्मविश्वास बळावणे
11खिशात न्हाई आणा, अन ह्याला बाजीराव म्हणागरीब मनुष्यास कोणीही कीमत देत नाही
12कुसंतानापेक्षा नि:संतान बरेवाईट मुले पोटी जन्मल्यापेक्षा मुले जन्मालान आलेली चांगली
13कुठे इंद्राचा ऐरावत कुठे शामभट्टाची तट्टाणीमाणसाची तुलना दुर्बळ माणसाशी होऊ शकत नाही
14कवड्यांचे दान केले अन गावात नगारे वाजविलेदान छोटे करून इतर लोकांना महती सांगत फिरणे
15करून गेला गाव अन दुसऱ्याचेच नावएकाने केलेल्या गुन्ह्याचा आरोप दुसऱ्यावर ठेवणे
16ऐतखाऊ लांडग्याचा भाऊकष्ट न करण्याची सवय असलेला मनुष्य कुठेही आयते खायला मिळाले की डल्ला मारतात
17उसाबरोबर एरंडाला पाणीएखाद्या गोष्टीचा लाभ अनपेक्षितरीत्या दुसऱ्या जवळच्या गोष्टीला होतो
18आधी करावे मग सांगावेकार्य पूर्ण कैल्याशिवाय त्याबद्दल उगाच बोलू नये
19आपण सुखी तर जग सुखीआपण आनंदात असता सर्व जग सुखी वाटणे
20दुधाची तहान ताकावरछोट्या गोष्टीत समाधानी राहणे
21दुःख रेड्याला न डाग पखालीलाएखाद्याच्या त्रासामुळे दुसरा चांगला व्यक्ती त्रासात पडणे.
22दानवाच्या घरी रावण देवजसा आपला स्वभाव तसे आपले श्रद्धास्थान बदलते.
23कमरेचे सोडले नि डोईला बांधलेसर्व लाजलज्जा टाकून देणे
24ओ म्हणता ठो येईनाकसलेही ज्ञान नसणे
25ऐकावे जनाचे पण करावे मनाचेदुसऱ्यांचे न ऐकता स्वतःचे निर्णय स्वतःघेणे
26एका माळेचे मनी ओवायला नाही कुणीसर्व एकसारखे असताना कोणीच काम करत नाही
27एका कानाचे दुसऱ्या कानाला कळत नाहीअत्यंत गुप्तपणे आपले कार्य करणे
28एकदा की नाव कानफाट्या पडले की पडलेचलोकात एकदा की नाचक्की झाली की लोकं त्याच दृष्टीने पाहतात
29ऋषीचे कुळ अन हरळीचे मुळ शोधू नयेऋषी अन महान अज्ञात गोष्टींचे मुळ शोधायचा प्रयत्न करू नये
30उडदामाजी काळेबेरे चांगल्या गोष्टी सोबत वाईट गोष्ट असु शकते
31आस्मान दावणेपराजय करणे
32आखाड्याच्या मैदानात पहिलवानाची किंमतमाणसाला योग्य ठिकाणीच किंमत मिळते
33आज अंबरी उद्या झोळी धरीकधी थाटामाटात तर कधी दरिद्री राहणे
34आचार भ्रष्ट नि सदा कष्टअनाचाराने वागणारा माणूस सदा दु:खी असतो
35एक कोल्हा सतरा ठिकाणी व्यालाएकाच माणसाचा भरपूर लोकाना त्रास होणे
36एक घाव दोन तुकडेएका फटक्यात निकाल लावणे
37केव्हाच नाही त्यापेक्षा उशीर बराअशक्य गोष्ट उशीरा हाती घेतलेली बरी
38गतं न शौच्यमएखादी गोष्टीचे महत्व संपल्या नंतर त्यासाठी उपाय योजना करणे व्यर्थ आहे
39घोडे खाई भाडेएखाद्या गोष्टीवर भरमसाठ खर्च होणे
40कोल्हयाला द्राक्षे आंबटचन मिळणारी गोष्ट आवडत नाही असे दर्शवीणे
41कुहाडीचा दांडा गोतास काळआपल्या जातभाईंचे नुकसान होणे
42प्रयत्नांती परमेश्वरखूप कष्ट करण्याची तयारी असली की कोणतीही गोष्ट साध्य होऊ शकते
43प्रत्येक कुत्र्याचा दिवस असतोप्रत्येकाचा दिवस येतो
44पायीची वहाण पायी बरीयोग्यतेप्रमाणे वागवावे
45नाकाचा बालखूप जवळची व्यक्ती
46ध चा मा करणेसांगताना एखाद्या मूळ गोष्टीत बदल करून आपला स्वार्थ साधणे
47दुष्काळात तेरावा महिनासंकटात अधिक भर पडणे
48दगडा पेक्षा वीट मऊछोट्या गोष्टीत समाधानी राहणे
49चोराच्या वाटा चोरालाच माहीतवाईट कृत्य करणाऱ्या व्यक्तीस त्याचे मार्ग व स्त्रोत माहिती असतात
50खाल्ल्या घराचे वासे मोजणेज्या घरात राहतो त्याच घराशी बेईमानी करणे
51कोल्हा काकडीला राजीलहान माणसे थोड्या गोष्टीने संतुष्ट होतात
52कर्कशेला कलह तर पद्मिनीला प्रीती गोडदुष्ट स्त्रीला भांडणे आवडतात तर गुणवतीला प्रेम आवडते
53कर नाही त्याला डर कशालादोषी नसताना कसलेही भय राहत नाही
54करायला गेले गणपती अन झाला मारुतीजे करायचे ते नित समजून करावे नाही तर भलतेच घडते
55एका पुताची माय वळचणीखाली जीव जायएक मुलगा पोटी असून सुद्धा तोआईला सुखाने जगू देत नाही
56एका कानाने एकवे दुसऱ्या कानाने सोडून द्यावेऐकलेल्या सगळ्याच गोष्टींचा विचार करणे व्यर्थ आहे
57उधार तेल खावत निघालेउधारीच्या मालत काही न काही दोष असतो
58उकराल माती तर पिकतील मोतीशेतीची चांगली मशागत तर पिके चांगली येतात
59एका माळेचे मनीसर्वजण येथून तेथून सारखे
60एरंडाचे गुर्हाळएखादी गोष्ट लांबलचक व कंटाळवाणी असणे
61ठेवीले अनंते तैसेची राहावेजी परिस्थिती आहे त्यात समाधान मानावे
62देवाची करणी अन नारळात पाणीनैसर्गिक गोष्टींना तोड नसते
63दाणा दाणा टिपतो पक्षी पोट भरतोकष्टकरी आपले पोट अत्यंत जिकिरीने भरतो
64ताकास जाऊन लोटा लपवणेएखादी गोष्ट इच्छा नसतांना लपविणे
65गरिबान खपाव ,धनिकान चाखावजीवावर कोणीही बलाढ्य दुबळ्या माणसाच्या आपला फायदा करून घेतो
66शुद्ध नाही मन तया काय करी साबणमनात कुविचार असता चांगले विचार ऐकणे व्यर्थ आहे
67मनी वसे ते स्वप्नीआपण ज्या गोष्टीचा सदैव विचार करतो तीच गोष्ट आपल्याला आसपास दिसते (आभास होतो)
68बाबाही गेला दशम्या गेल्याएकाच दोन वेगवेगळ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यावर दोन्ही गोष्टींचा लाभ न होणे

Read More:- Swatantra Veer Savarkar Information In Marathi PDF Download – स्वातंत्र्यवीर सावरकर यांची सविस्तर माहिती

Marathi Mhani PDF Download

Marathi Mhani With Meaning PDF Download :- बहुतेक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना म्हणी आणि म्हणी चा अर्थ पीडीएफ मध्ये डाउनलोड करू शकतात. खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

Conclusion Of Marathi Mhani

Conclusion :- ह्या पोस्ट मध्ये तुम्हाला 700+ मराठी म्हणी आणि त्या म्हणी च्या अर्थ हा पीडीएफ मध्ये उपलब्ध करून देत आहोत. आपण ह्या पोस्ट मध्ये marathi mhani v tyanche arth, marathi mhani pdf, marathi mhani ani arth, Best Marathi Mhani List हे सगळे बघितले आहेत. आधुनिक म्हणी, गावरान, मराठी, मराठी जुन्या म्हणी, आणि वाक्प्रचार, ऐतिहासिक म्हणीमराठी विनोदी म्हणीमराठी म्हणींचा ह्या सर्व म्हणी आम्ही दिल्या आहेत.

Frequently Asked Question Marathi Mhani

Q1. मराठी म्हणी व वाक्प्रचार

Ans:- 1) देवाची करणी अन नारळात पाणी – नैसर्गिक गोष्टींना तोड नसते
2) दुष्काळात तेरावा महिना – संकटात अधिक भर पडणे

Q2. ऐतिहासिक मराठी म्हणी

Ans:- 1) हातच्या कंकणाला आरसा कशाला – उघड सत्य हे केव्हाही खरे करता येऊ शकते.
2) सुंठेवाचून खोकला गेला – परस्पर संकट टळले

Q3. म्हणी म्हणजे काय इन मराठी?

Ans:-म्हणी म्हणजे काय तर सत्य परिस्तिथी कथन करण्यासाठी वापरलेलं मार्मिक वाक्य जे वारंवार वापरले जाऊ शकते .

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages