Advertisement

Alankarik Shabd In Marathi PDF Download | अलंकारिक शब्द आणि त्याचे अर्थ संपूर्ण माहिती

Alankarik Shabd

Alankarik Shabd In Marathi:- In competitive exams or school exams figurative words are given and asked to use them in a sentence or tell their meaning. Such questions are guaranteed in teacher exams. At such times we can easily acquire these qualities by knowing the figurative words. Figurative words are very important in Marathi grammar. In today’s post, we will see detailed information about Alankarik Shabda and its meaning.

Alankarik Shabd In Marathi:- स्पर्धा परीक्षा किंवा शालेय परीक्षांमध्ये अलंकारिक शब्द दिला जातो त्यांचा वाक्यात उपयोग किंवा त्याचा अर्थ सांगण्यास सांगितलं जातो. शिक्षक परीक्षांमध्ये असे प्रश्न हमखास असतात. अशा वेळी अलंकारिक शब्दांची माहिती करून आपण सहज हे गुण प्राप्त करू शकतो. अलंकारिक शब्दांचे मराठी व्याकरणा मध्ये खूप महत्त्व आहे. आजच्या या पोस्ट मध्ये Alankarik shabda आणि त्याचे अर्थ या बद्दल विस्तारित माहिती पाहुयात.

Alankarik Shabd

अलंकारिक शब्द म्हणजे एक प्रकारे भाषेचे दागिने अलंकारच होय .ज्या प्रमाणे माणूस सुंदर दिसण्या साठी चांगले कपडे दागदागिने वापरतो तसेच. लेखक सुद्धा भाषा अधिक सुंदर करण्यासाठी लेखनामध्ये अलंकारिक शब्दांचा वापर करतो अर्थात ह्या अलंकारिक शब्दांचा उपयोग फक्त वाक्य सुंदर करण्यासाठी केलेलं असतो त्याचा सरळ अर्थ ना घेता त्यावर आधारित अर्थ समजून घेणे आवश्यक असते.

Read More:- Shabdanchya Jati PDF Download | मराठी व्याकरण | शब्दांच्या जातीं आणि त्यांचे प्रकारांची संपूर्ण माहिती

What Is A Alankarik Shabd | अलंकारिक शब्द म्हणजे काय ?

  • अलंकारिक शब्द म्हणजे कमीत शब्दामध्ये अलंकारिक शब्द वापरून एखाद्या गोष्टीचा व्यापक अर्थ सांगणे होय.
  • एखादे पुस्तक किंवा कथा वाचताना एखाद्या घटनेचे वर्णन करण्यासाठी अलंकारिक शब्द वापरतो किंवा कविते मध्ये सुद्धा अलंकारिक शब्द वापरले जातात.
  • या शब्दांना भाषेचा दागिने अलंकार म्हणून बोलले जाऊ शकते.
  • हे अलंकारिक शब्द माहित असणे आवश्यक आहे नाहीतर त्यातून चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो.

Read More:- Batmi Lekhan In Marathi PDF Download | बातमी लेखन कसे करावे संपूर्ण माहिती

Alankarik Shabd And Meanings | अलंकारिक शब्द आणि त्यांचे अर्थ

Sr.Noअलंकार अर्थ
अष्टपैलू सर्व गुणसंपन्न (सर्व गुण असणारा )
लंबकर्ण बेअकली माणूस
शकूनी मामा कपटी माणूस
सुळावरची पोळी जीव धोक्यात घालणारे काम.
रामबाण औषध गुणकारी.
लंकेची पार्वतीअत्यंत गरीब स्त्री.
दगडावरची रेघकधीही न बदलणारे.
धोपट मार्ग सरळ मार्ग
पर्वणीअतिशय दुर्मिळ योग.
१०बिन भाड्याचे घरतुरुंग.
११मेषपात्रबावळट मनुष्य.
१२जमदग्नीचा अवताररागीट
१३पांढरा कावळानिसर्गात नसलेली वस्तू.
१४बोके संन्यासीढोंगी मनुष्य.
१५बोलाचीच कढीकेवळ शाब्दिक वचन.
१६मृगजळकेवळ आभास.
१७सांभाचा अवतारअत्यंत भोळा मनुष्य.
१८शेंदाड शिपाईभित्रा मनुष्य.
१९अकलेचा कांदामूर्ख.
२०कुंभकर्णझोपाळू माणूस.
२१खेटराची पूजाअपशब्दाने खरडपट्टी काढणे.
२२कळीचा नारद –भांडण लावून देणारा.
२३कूपमंडूकसंकुचित वृत्तीचा मनुष्य.
२४अरण्य पंडितमूर्ख मनुष्य
२५उंबराचे फूलअत्यंत दुर्मिळ वस्तू.
२६कळसूत्री बाहुलीदुसऱ्याच्या तंत्राने चालणारा.
२७गर्भ श्रीमंत जन्मापासून श्रीमंत.
२८गुरुकिल्ली मर्म, रहस्य.
२९घोरपडचिकाटी धरणारा.
३०टोळभैरव –नासाडी करणारे लोक.
३१त्रिशंकू –धड ना इकडे, ना तिकडे.
३२देव माणूस –चांगला सज्जन माणूस.
३३मायेचा पूतमायाळू माणूस.
३४अकरावा रुद्रअतिशय तापट माणूस.
३५अळवावरचे पाणीफार काळ न टिकणारी वस्तू.
३६कर्णाचा अवतारदानशूर, उदार माणूस.
३७खुशाल चेंडूचैनीखोर मनुष्य.
३८घर कोंबडाघराबाहेर न पडणारा.
३९चौदावे रत्नमार.
४०ताटाखालचे मांजर –दुसऱ्याच्या तंत्राने वागणारा.
४१बृहस्पती बुद्धिमान मनुष्य.
४२पिकले पानम्हातारा मनुष्य.
४३शेजारधर्मशेजाऱ्यांची चांगल्या तऱ्हेने वागण्याची पद्धत.
४४नंदीबैलहो ला हो म्हणणारा.
४५वाहती गंगाआलेली संधी.
४६गंगा यमुनाअश्रू.
४७अकलेचा खंदकअत्यंत मूर्ख माणूस.
४८श्रीगणेशाआरंभ करणे.
४९छत्तीसचा आकडाशत्रुत्व.
५०गाजर पारखीकसलीही पारख नसलेला.
५१काडी पहिलवान –हाडकुळा मनुष्य.
५२भीष्मपतिज्ञाकठीण प्रतिज्ञा.
५३खडाजंगीजोरदार मोठे भांडण.
५४वाटाण्याच्या अक्षतानकार.
५५चर्पटपंजरीनिरर्थक बडबड.
५६गंडांतरभीती दायक संकट.
५७स्मशान वैराग्यतात्कालिक वैराग्य.
५८गोगलगायनिरुपद्रवी मनुष्य.
५९गुळाचा गणपतीमंदबुद्धीचा.
६०भाकड कथाबाष्कळ गोष्टी.
६१पांढरा परीसलबाड माणूस.
६२मारुतीचे शेपूटलांबत जाणारे काम.
६३वामन मूर्तीबुटका माणूस.
६४उंटावरचा शहाणामूर्खपणाचा सल्ला देणारा
६५भगीरथ प्रयत्नअटोकाट प्रयत्न.
६६पाताळयंत्रीकारस्थान करणारा.
६७पोपटपंचीअर्थ न समजता पाठांतर करणे.
६८नवकोट नारायणखूप श्रीमंत.
६९मंथरादुष्ट स्त्री.

Read More:- Aupcharik Patra Format And Example | औपचारिक पत्र प्रारूप और उदाहरण

Alankarik Shabd In Marathi PDF Download

Alankarik Shabd In Marathi PDF Download :- आपण ह्या आर्टिकल मध्ये आलंकारिक शब्द आणि त्यांचे अर्थ संपूर्ण माहिती घेतली आहे. अनेक विद्यार्थ्याना व्याकरणामधील आलंकारिक शब्द आणि त्यांचे अर्थ प्रकांराची माहिती ही पीडीएफ मध्ये अभ्यासासाठी पाहिजे असते. त्याच्यासाठी आम्ही उमेदवारांना समजणे सोपे जावे आणि शब्दांची ची संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही Alankarik Shabd In Marathi PDF Download करण्यासाठी PDF देत आहोत. तुम्ही आलंकारिक शब्द आणि त्यांचे आर्थ प्रकारांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

Conclusion

आजच्या या पोस्ट मध्ये आपण आलंकारिक शब्द आणि त्यांचे अर्थ या बद्दल विस्तारित माहिती पहिली अगोदर सांगितल्या प्रमाणे व्याकरणाचा अभ्यास मध्ये हा भाग सगळ्यात महत्वाचा असतो. आपण ह्या आर्टिकल मध्ये alankarik shabd, alankarik shabd in marathi, marathi alankarik shabd, alankarik shabd marathi, alankarik shabd in marathi pdf हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती मध्ये किंवा कोणत्याही परीक्षे मध्ये चांगले गुण मिळवू शकता. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना उपयुक्त ठरेल.

FAQ Frequently Akshed Questions for Alankarik Shabd In Marathi

Q1. अलंकारिक शब्द म्हणजे काय?

Ans:- अलंकारिक शब्द हा एक मराठी शब्द आहे जो त्याच्या अर्थाऐवजी आवाज किंवा तालासाठी वापरला जातो. हे शब्द अनेकदा कविता आणि गाण्यांमध्ये विशिष्ट प्रभाव निर्माण करण्यासाठी वापरले जातात.

Q2. मराठीत अलंकारिक शब्द का वापरतात?

Ans:- अलंकारिक शब्द मराठीत भाषेत सौंदर्य, आवड आणि विविधता जोडण्यासाठी वापरले जातात. ते विशिष्ट मूड किंवा वातावरण तयार करण्यासाठी देखील वापरले जाऊ शकतात.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages