Home » Time, Work and Speed In Marathi PDF Download | काळ, काम, वेग सूत्र, आणि उदाहरणे ह्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या
Time, Work and Speed In Marathi PDF Download | काळ, काम, वेग सूत्र, आणि उदाहरणे ह्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या
Time, Work, and Speed In Marathi:- While preparing maths for competitive exams, you have to prepare examples of time, work, and speed because these questions are definitely asked in MPSC, Zilla Parishad Bharti Gram Sevak Bharti. We lose the important points that we get in this. If we remember some formulas and rules in this, it becomes easy to get the correct answer. That is why in this post today we will see the complete information (time work and speed in Marathi).
Advertisement
Time, Work, And Speed In Marathi PDF
Time, Work and Speed In Marathi:- स्पर्धा परीक्षांसाठी गणिताची तयारी करताना काळ काम आणि वेग यावरील उदाहरणांची तयारी करावीच लागते कारण यावर MPSC ,जिल्हा परिषद भरती ग्रामसेवक भरती मध्ये प्रश्न हमखास विचारला जातातच.प्रश्न तसे खूपच सोपे असे असतात पण नीट बेसिक माहित नसल्या मुले आपण या मध्ये मिळणारे महत्वाचे गुण गमावून बसतो.या मध्ये काही सूत्रे तसेच नियम लक्षात ठेवल्यास अचूक उत्तर काढणे सोपे होते.या साठीच आजच्या या पोस्ट मध्ये आपण (time work and speed in Marathi) संपूर्ण माहिती पाहुयात.
काम, काळ आणि वेग महत्वपूर्ण माहिती | Time, Work and Speed Important Information
Advertisement
काळ, काम आणि वेग काढण्याचे वेग वेगळे सूत्र आणि ते काढण्याचे काही पद्धती आहे. आपण पहिल्यांदा ह्यांच्या सुत्रांची माहिती खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.
Time | काळ
काळ हे मोजमापासाठी वापरले जाते ज्या मध्ये तुम्ही किती तास काम केले आणि अन्य माहिती काळाची मापन माहिती देते.
कालावधी काळ मोजताना सेकंद, मिनिट, तास, दिवस, महिने, वर्षे या एकक मध्ये मोजले जाते.
Time Formula | काळाचे सूत्र
काळ मोजण्याचे सूत्र खाली प्रमाणे जाणून घेणार आहोत.
Advertisement
वेळ (T) = अंतर (D) / वेग (V) असे आहे.
वेळ म्हणजे अंतर प्रवास करण्यासाठी लागणारा वे
अंतर म्हणजे प्रवास केलेल्या मार्गाची लांबी
गती म्हणजे वस्तू ज्या वेगाने हलत आहे.
Work | काम
काम :काम म्हणजे आपण लावलेल्या बलाचा वस्तूवर झालेला परिणाम एखाद्या व्यक्तीने किती काम केले ते दर्शवते.
काम मोजण्यासाठी जुल हे एकक वापरले जाते.
Work Formula | कामाचे सूत्र
काळ मोजण्याचे सूत्र खाली प्रमाणे जाणून घेणार आहोत.
Advertisement
कामाचे सूत्र हे, काम (W) = बल (F) x अंतर (d) असे आहे.
Speed | वेग
वेग हा सुद्धा एक भोतिक परिणाम असून एखाद्या वस्तूच्या स्थानिक बदलाच्या दराचे मोजमाप करण्यासाठी वापरला जातो.
वेग मोजण्यासाठी मीटर प्रति सेकंद (m/s) किंवा किलोमीटर प्रति तास (km/h) हे एकक वापरले जाते.
Speed Formula | वेगाचे सूत्र
वेग साठी, वेग (v) = अंतर (d) / वेळ (t) हे सूत्र वापरले जाते.
काळ काम आणि वेग गणितीय संबंध | Mathematical Relation between Time Work And Speed
काळ व काम : – एखादे काम पूर्ण करण्यास लागणारा काळ (वेळ) ते काम करीत असलेल्या व्यक्तींच्या संख्येवर अवलंबून असतो.
काम आणि लागणारा काळ (वेळ) हे सम चलनात असते.
काम करणाऱ्या संख्या व लागणारा काळ (वेळ) हे व्यस्त चलनात असते.
काळ काम आणि वेग आधारित उदाहरणे | Examples Based On Time Work And Speed
१) उदा. ‘अ’ हा ‘ब’ च्या दुप्पट वेगाने काम करतो. तर ‘क’ हा ‘अ’ आणि ‘ब’ या दोघांच्या एकत्रित कामाइतके काम करतो. ‘अ’ एकटा 12 दिवसांत एक काम संपवितो तर ‘अ’, ‘ब’, ‘क’ मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील?
4
12
8
6
उत्तर : 4
स्पष्टीकरण :- ‘अ’ ला एक काम संपविण्यास 12 दिवस लागतात,जर ‘अ’, ‘ब’ च्या दुप्पट काम करतो, तर ‘ब’ ला ते काम करण्यास 24 दिवस लागतील.:: ‘अ’ व ‘ब’ हे दोघे एक दिवसात 1/12+1/24=3/24 काम करतील:: ‘क’ हा ‘अ’ आणि ‘ब’ यांच्या एवढे काम करतो, म्हणजेच 3/24 काम करतो‘अ’, ‘ब’, ‘क’ मिळून एक दिवसात 3/24+3/24=6/24 भाग काम करतात.:: तिघे मिळून ते काम 24/6=4 दिवसांत पूर्ण करतील.
२) उदा. एक काम 15 मुले 20 दिवसात पूर्ण करतात. जर 3 मुले 2 पुरुषांएवढे काम करीत असल्यास, तेच काम 20 पुरुष किती दिवसांत पूर्ण करतील?
15
8
12
10
उत्तर : 10
स्पष्टीकरण :-
3 मुले = 2 पुरुष म्हणजेच 15 मुले = 10 पुरुष,यावरून 10 पुरुष ते काम 20 दिवसांत करतात.: 20 पुरुष ते काम 10 दिवसांत करतील.
३) एक पाण्याची भरावयास चाळीस मिनिट लागतात. तर पाच टाकी भरण्यासाठी किती मिनिट लागेल
१)२००
२)१६०
३)१५०
४)२४०
उत्तर =२००
स्पष्टीकरण:-
काम करण्यासाठी लागणारा हा वेळ – काम आणि लागणारा वेळ हे समचलनात असतात
म्हणजे १ टाकी भरण्यासाठी ४० मिनिट लागतात
तर ५ टाकी भरण्यासाठी २०० मिनिट लागणार
४० मिनिट ×५ टाकी=२०० मिनिट
४) 6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसांत पूर्ण करतात, तर तेच काम 7 पुरुष आणि 12 मुले एकत्रितरीत्या किती दिवसांत पूर्ण करतील?
12
9
10
16
उत्तर : 9
स्पष्टीकरण :- 6 पुरुष किंवा 8 मुले म्हणजे 3:4 प्रमाण म्हणजेच 4 मुलाएवढे 3 पुरुष काम करतात.यानुसार 12 मुलाएवढे 9 पुरुष काम करतील आणि 6 पुरुष 24 दिवसांत काम करतील:: 7+9=16 याप्रमाणे 6×24/16 = 9, म्हणजेच 16 पुरुष 9 दिवसांत काम पूर्ण करतील.
Time, Work and Speed In Marathi PDF Download :- आपण या पोस्ट मध्ये आपण काळ काम आणि वेग संपूर्ण माहिती जाणून घ्या संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.
Time, Work and Speed In Marathi PDF Download :- आपण ह्या आर्टिकल मध्ये काळ, काम, वेग सूत्र, आणि उदाहरणे ह्यांची संपूर्ण सविस्तर पणे माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना काळ, काम, वेग सूत्र, आणि उदाहरणे यांची माहिती अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही PDF Download करण्यासाठी Time, Work and Speed In Marathi PDF Download देत आहोत. तुम्ही आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.