Tense and Types of Tense | Kal v Tyache Prakar Tense and Types of Tense in Marathi:- While studying Marathi grammar, an important and basic topic at the beginning is tense and types of tense. In order to prepare for all the exams like Gram Sevak, Talathi Recruitment, and MPSC Zilla Parishad Recruitment, in this post today we will see the total types of tenses and their detailed information.
Kal Ani Kalache Prakar | Tense and Types of Tense in Marathi
काळ आणि काळाचे प्रकार | Kal v Tyache Prakar | Tense and Types of Tense in Marathi:- मराठी व्याकरण चा अभ्यास करताना सुरवातीलाच असणारा महत्वाचा आणि मूळ टॉपिक म्हणजे काळ आणि काळाचे प्रकार हा आहे. शालेय परीक्षा पासून ग्रामसेवक ,तलाठी भरती, MPSC ज़िल्हा परिषद भरती अशा सर्व परीक्षा मध्ये काळावर आधारित प्रश्न विचारले जातात त्याची तयारी करण्यासाठी आजच्या या पोस्ट मध्ये आपण काळाचे एकूण प्रकार आणि आणि त्याची विस्तारित माहिती पाहुयात.
Read More:- Best Books For Gram Sevak Books PDF Download | ग्रामसेवक भरती साठी सर्वोत्तम पुस्तकांची यादी
काळ म्हणजे काय? What Is Kal/Tense In Marathi
जेव्हा आपण एखादे वाक्य वाचतो तेव्हा त्यामधून कोणती क्रिया घडली आहे ते समजते या बरोबर ती क्रिया कधी घडली आहे हे सुद्धा समजते यालाच काळ असे म्हणतात.
Type Of Tenses काळाचे प्रकार | Types Of Kal In Marathi
काळाचे एकूण मुख्य असे ३ प्रकार आहेत आणि त्या मध्ये परत उपप्रकार सुद्धा आहेत.
- वर्तमान काळ (Present Tense )
- भूतकाळ (Past Tense )
- भविष्य काळ (Feature Tense )
Read More:- All ZP Maharashtra Required Document Lists 2023 | जिल्हा परीषद भरती साठी लागणारे आवश्यक कागदपत्रांची यादी
Vartman Kal In Marathi | वर्तमान काळ | Present Tense In Marathi
जेव्हा आपण वाक्य वाचतो तेव्हा क्रिया आता घडत असेल तर तो काळ वर्तमान काळ म्हणून समजला जातो.
Vartaman Kaal Examples In Marathi | वर्तमान काळाचे उदाहरण | Vartman Kal In Marathi Example
उदाहरणार्थ :-
- तो आंबा खातो.
- मी क्रिकेट खेळतो.
- आम्ही अभ्यास करतो.
- तो गाणे गातो.
वर्तमान काळाचे प्रकार | Types Of Vartman Kal
वर्तमान काळाचे एकूण ४ उपप्रकार आहेत साधा वर्तमान काळ,अपूर्ण वर्तमान काळ / चालू वर्तमान काळ,पूर्ण वर्तमान काळ,रीती वर्तमान काळ / चालू पूर्ण वर्तमान काळ
1. साधा वर्तमान काळ | Sadha Vartman Kal
जेव्हा वाक्य वाचताना क्रियापदाच्या रुपावरुन आपल्याला कळते कि क्रिया आता घडत आहे तेव्हा त्याला साधा वर्तमानकाळ म्हणतात.
उदाहरणार्थ :-
- कविता चहा पिते.
- आकाश मॅच पाहतो.
- मी आंबा खातो.
२. अपूर्ण वर्तमान काळ / चालू वर्तमानकाळ | Chalu Vartman Kal/ Apurn Vartman Kal
जेव्हा वाक्य वाचताना क्रियापदाच्या रुपावरुन आपल्याला समजते कि क्रिया हि वर्तमान काळामध्ये चालू अथवा सुरु आहे तेव्हा त्यास अपूर्ण वर्तमान काळ / चालू वर्तमानकाळ म्हणतात.
उदाहरणार्थ :-
- रमेश अभ्यास करत आहे.
- आई स्वयंपाक बनवत आहे.
- अक्षय अंगणात खेळत आहे.
3. पूर्ण वर्तमान काळ | Purn Vartman Kal
जेव्हा वाक्य वाचताना क्रियापदाच्या रुपावरुन आपल्याला समजते कि क्रिया हि वर्तमान काळामध्ये ती नुकतीच पूर्ण होत असते तेव्हा तेव्हा त्यास पूर्ण वर्तमानकाळ असे म्हणतात.
उदाहरणार्थ :-
- सुरेश ने अभ्यास केला आहे.
- आकाश झोपला आहे.
- आईने स्वयंपाक बनवला आहे.
४. रीती वर्तमानकाळ / चालू पूर्ण वर्तमानकाळ | Chalu Purn Vartman Kal
जेव्हा वाक्य वाचताना क्रियापदाच्या रुपावरुन आपल्याला समजते कि क्रिया हि वर्तमान काळामध्ये सतत घडत आहे किंवा तसे दाखवले आहे तेव्हा त्याला ‘रीती वर्तमानकाळ’ असे म्हणतात.
उदाहरणार्थ :-
- राहुल दररोज अभ्यास करतो.
- श्याम नेहमी व्यायाम करतो.
- राहुल रोज शाळेत उशिरा यतो.
Read More:- Sam Sankhya PDF Download | Even Numbers In Marathi | सम संख्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या
वर्तमान काळ महत्वाची माहिती | Important Information Of Vartman Kal
अ ) जेव्हा इतिहासातील काही घटना या भूतकाळात घडलेल्या असलेल्या तरी त्या वर्तमानकाळात सांगितल्या जातात. अशा वेळी त्याला ऐतिहासिक वर्तमान काळ असे म्हणतात.गोष्टी किंवा पौराणिक कथा मध्ये याचा वापर केला जातो.
उदाहरणार्थ :-
१) शिवाजी महाराजांनी मावळ्यांना सांगितले.
२) अर्जुन कृष्णाला म्हणतात.
ब) जेव्हा एखादे वाक्य अवतरण चिन्हामध्ये बोलले जाते तेव्हा त्याचा अर्थ वर्तमानकाळासारखा दिसतो.
उदाहरणार्थ :-
- सुभाष चंद्र बोस म्हणतात,”तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा”
क) जेव्हा वाक्यामध्ये नुकतीच झालेल्या क्रियामधला जवळचा भूतकाळ सांगताना वर्तमान काळ वापरला जातो तेव्हा त्यास संनिहित भूतकाळ’ असे म्हंटले जाते.
उदाहरणार्थ :-
१) नाव घेताच मामा हजर.
ड) त्रिकालाबाधित सत्य असलेल्या गोष्टी साध्या वर्तमानकाळात सांगितल्या जातात
उदाहरणार्थ :-
१) पृथ्वी सूर्याभोवती फिरते.
Read More:- Marathi Padhe PDF Download | 1 ते 50 मराठी पाढे ची संपूर्ण माहिती जाणून घ्या
भूतकाळ | Past Tense | Bhutkal In Marathi
जेव्हा एखाद्या वाक्याच्या क्रियापदावरून क्रिया ही पहिलेच घडून गेली आहे असे समजतंय जेव्हा त्या काळाला भूतकाळ असे म्हणतात.
उदाहरणार्थ :-
१) आम्ही सिनेमा बघितला.
२) श्याम ने आईस क्रिम खाल्ली.
Read More:- Sant Namdev Information In Marathi | संत नामदेवांची संपूर्ण माहिती जाणून घ्या
भूत काळाचे प्रकार | Types Of Past Tense | Types Of Bhutkal In Marathi
भूतकाळाचे सुद्धा एकूण ३ प्रकार आहेत साधा भूतकाळ,अपूर्ण / चालू भूतकाळ,पूर्ण भूतकाळ,रिती भूतकाळ / चालू पूर्ण भूतकाळ
1. साधा भूतकाळ | Sadha Bhutkal In Marathi
- जेव्हा वाक्यामध्ये घडून गेलेल्या क्रियतेबद्दल बोलले जाते तेव्हा त्यास ‘साधा भूतकाळ’ असे म्हटले जाते.
उदाहरणार्थ :-
१) रामने जेवण केले.
२) शाम कामावर गेला,
2. अपूर्ण भूतकाळ / चालू भूतकाळ | Chalu Bhutkal In Marathi
जेव्हा एखाद्या वाक्यात क्रियापदाच्या रुपावरुन भूतकाळामध्ये ती क्रिया चालू होती असे बोलले जाते तेव्हा अपूर्ण भूतकाळ असतो.
उदाहरणार्थ :-
१) सागर क्रिकेट खेळात होता.
२) महेश बागेत काम करत होता.
3. पूर्ण भूतकाळ | Purn Bhutkal In Marathi
जेव्हा वाक्याच्या क्रियापदाच्या रुपावरून एखादी क्रिया पूर्ण झालेली असते असे जेव्हा समजते तेव्हा त्यास ‘पूर्ण भूतकाळ’ असे म्हणतात.
उदाहरणार्थ :-
१) आम्ही फिरायला गेलो होतो.
२) किरण शाळेत गेला होता.
(ड) रिती भूतकाळ / चालू पूर्ण भूतकाळ | Chalu Purn Bhutkal In Marathi | Riti Kal In Marathi
भूतकाळात एखादी क्रिया सातत्याने घडत आलेली असुन काही वेळा ती क्रिया पूर्णसुद्धा झालेली तेव्हा त्याला रिती भूतकाळ’ किंवा ‘चालू पूर्ण भूतकाळ असे बोलतात.
उदाहरणार्थ :-
१) शाम दररोज फिरायला जात असे.
२) गणेश नियमित अभ्यास करत होता.
भूतकाळ महत्वाची माहिती | Imporatant Information Of Pass Tense/Bhutkal
१) एखादी क्रिया भविष्यामध्ये निश्चित होणार आहे या अर्थी नि:संशय भविष्यकाळ सांगितला जातो.आणि तिथे भूतकाळ चा वापर केलेलं असतो.
उदाहरणार्थ :-
तुम्ही अभ्यास केले नाही तर तुम्हाला शिक्षा होणारच.
२) कधी कधी एखाद्या वाक्यात चालू वर्तमान काळातील क्रिया पूर्ण होण्याच्या आधीच भूतकाळात बोलली जाते
उदाहरणार्थ :-
ते पहा तुझे मामा आले.
३) त्याचवेळी कधी कधी संनिहित भविष्यकाळ दर्शविण्यासाठी भूतकाळाचा वापर केला जातो.
उदाहरणार्थ :-
तू जेवायला सुरवात कर मी आलोच.
४) कधी कधी एखादी गोष्ट होऊन त्याचा परिणाम झाला आले तर भूतकाळ वापरला जातो.
नीट तयारी केली असती तर अशी वेळच आली नसती.
भविष्यकाळ | Bhavishya Kal In Marathi
वाक्यातील क्रियापदाच्या रुपावरून जेव्हा एखादी क्रिया ही पुढे भविष्यात घडणार आहे असे समजते तेव्हा अशा काळाला ‘भविष्यकाळ’ असे म्हणतात.
उदाहरणार्थ :-
१) आम्ही खेळायला जाणार,
२) मी क्रिकेर्ट बनणार.
Read More:- All Dinvishesh PDF Download | दिनविशेष 2023 ची संपूर्ण माहिती | Aajcha Dinvishesh
भविष्यकाळाचे प्रकार | Types Of Future Tense | Types of Bhavishya Kal
भविष्य काळाचे एकूण ४ प्रकार आहेत साधा भविष्यकाळ,अपूर्ण भविष्यकाळ / चालू भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ,रिती भविष्यकाळ / चालू पूर्ण भविष्यकाळ.
1. साधा भविष्यकाळ | Sadha Bhavishya Kal In Marathi
जेव्हा एखाद्या वाक्यात घडणारी क्रिया पुढील काळात घडणार आहे असे समजते येते अशा काळाला ‘साधा भविष्यकाळ’ असे म्हणतात.
उदाहरणार्थ :-
१) उद्या शाळा सुरु होईल.
२) सीमा अभ्यास करेल.
2. अपूर्ण भविष्यकाळ / चालू भविष्यकाळ | Chalu Bhavishya Kal In Marathi
जेव्हा एखाद्या वाक्याच्या क्रियापदाने दर्शवलेली कृती ही भविष्यकाळात चालू असते किंवा पूर्ण झालेली नसते तेव्हा त्याला ‘अपूर्ण भविष्यकाळ’ किंवा ‘चालू भविष्यकाळ’ असे म्हणतात.
उदाहरणार्थ :-
१) सागर जेवण करत असेल.
२) अमर फुटबॉल खेळात असेल.
3. पूर्ण भविष्यकाळ | Purn Bhavishya Kal In Marathi
जेव्हा वाक्यातील क्रियापदाने दर्शवलेली क्रिया ही भविष्यकाळात असुन ती पूर्ण समजते तेव्हा त्या काळाला ‘पूर्ण भविष्यकाळ’ असे म्हणतात.
उदाहरणार्थ :-
१) सागरचे जेवण झाले असेल.
२) मी परदेशात गेलेला असेन.
4. रिती भविष्यकाळ / चालू पूर्ण भविष्यकाळ | Chalu Purn Bhavishya Kal In Marathi
जेव्हा एखाद्या वाक्यातून क्रिया ही भविष्यात नेहमी घडणारी असेल असे दिसते तेव्हा त्याला ‘रिती भविष्यकाळ’ किंवा ‘चालू पूर्ण भविष्यकाळ’ असे म्हणतात.
उदाहरणार्थ :-
१) मी रोज शाळेत जाईन.
२) वीणा रोज घरकाम करत जाईल.
भविष्य काळ महत्वाची माहिती | Imporatant Information Of Bhavishya Kal In Marathi
- अशक्य गोष्टीबद्दल सांगण्यासाठी भविष्यकाळाचा वापर करतात.
- मनातली इच्छा सांगताना बहुतेकदा ते भविष्यकाळाचा वापर केला जातो.
- एखादा संभव किंवा संकेत दर्शविण्यासाठी भविष्यकाळाचा वापरला जातो.
Kal In Marathi PDF Download
Kal In Marathi PDF Download :- आपण ह्या आर्टिकल मध्ये काळाचे आणि काळाचे प्रकार त्यांची सविस्तर पणे माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही Kal In Marathi PDF Download करण्यासाठी PDF देत आहोत. तुम्ही Kal Ani Kalache Prakar Marathi आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.
Conclusion
आपण या पोस्ट मध्ये आपण काळ आणि काळाचे प्रकाराची संपूर्ण माहिती संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण kal in marathi, vartman kal in marathi example, bhavishya kal in marathi, vartman kal in marathi, kal in marathi grammar, kal in marathi meaning, vartaman kal in marathi, kal in marathi example, meaning of kal in marathi, kal meaning in marathi, kal olkha in marathi हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.
FAQ Frequently Asked Question For Kal In Marathi
Ans:- जेव्हा आपण एखादे वाक्य वाचतो तेव्हा त्यामधून कोणती क्रिया घडली आहे ते समजते या बरोबर ती क्रिया कधी घडली आहे हे सुद्धा समजते यालाच काळ असे म्हणतात.
Ans:- काळाचे एकूण मुख्य असे ३ प्रकार आहेत आणि त्या मध्ये परत उपप्रकार सुद्धा आहेत.वर्तमान काळ (Present Tense), भूतकाळ (Past Tense ), भविष्य काळ (Feature Tense )
Ans:- १) रामने जेवण केले.
२) शाम कामावर गेला,