Straight Interest and Compound Interest | Simple Interest And Compound Interest In Marathi:- In the complex part of mathematics, we use some concepts in our daily business. While exchanging money, we are related to interest, loans. We have studied this in school life and solved the problems. In competitive exams like MPSC, Gram Sevak, Talathi, and Police recruitment, questions on simple interest and compound interest are definitely asked.
सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज | Simple Interest And Compound Interest In Marathi:- गणित मध्ये असलेलया विचिध भागामध्ये काही संकप्लना आपण दररोजच्या व्यवहारामध्ये वापरात असतो.पैसे ची देवाण घेवाण करताना व्याज ,कर्ज या बाबी शी सारखा आपला संबंध येत असतो.शालेय जीवनामध्ये आपण याचा अभ्यास केलेले असतो आणि यावरचे प्रश्न सोडवले असतात. MPSC ,ग्रामसेवक ,तलाठी ,पोलीस भरती या सारख्या स्पर्धा परीक्षा मध्ये सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यावर प्रश्न हमखास विचारले जातात.
यासाठी आम्ही ह्या आर्टिकल मध्ये व्याज म्हणजे काय Simple Interest And Compound Interest In Marathi कसा काढायचा त्याची सूत्रे,आणि त्याचे नियम याची संपूर्ण माहिती देणार आहोत.
व्याज म्हणजे काय ? | What Is Vyaj In Marathi
- जेव्हा घेतलेल्या रकमेला परत करताना त्या मध्ये अधिक मोबदला द्यावा लागतो त्यास व्याज असे म्हणतात.
- थोडक्यात घेतलेल्या कर्जावरचा जो परतावा असतो त्या मधली अधिक ची रकम म्हणजे व्याज.
- बँके कडून घेतलेल कर्ज आपल्याला दिलेल्या मुदती मध्ये परत करायचे असते या मध्ये बँक त्या कर्जावर एका ठराविक दराने व्याज आकारणी करते.
- व्याज फक्त द्यावेच लागते असा नाही बँके मध्ये जमा असलेल्या ठेवी वर बँक आपल्याला व्याज देत असते.
व्याज बद्दलचे काही महत्वाचे नियम | Important Rules About Interest
- जेव्हा आपण कर्ज घेतो तेव्हा कर्ज जेवढ्या वेळेसाठी घेतले जाते त्यास मुदत असे म्हणतात.(या मुदती मध्ये कर्ज फेड करणे आवश्यक असते.)
- जी रक्कम आपण आपण कर्ज म्हणून व्याजाने घेतो त्यास मुद्दल असे म्हणतात.
- या मुद्दल रक्कम म्हणजे कर्जावर ज्या दराने व्याज आकारणी केली जाते त्यास आपण व्याजदर असे म्हणतो.
- व्याजदर हा वार्षिक पद्धतीने म्हणजेच द.सा.द.शे. दर साल दर शेकडा नुसार आकारला जातो.
- जेव्हा मुद्दल म्हणजे कर्ज आणि आणि त्यावरचे व्याज याची बेरीज केली जाते तेव्हा त्यास रास असे म्हणतात,
- आपण घेतलेले कर्ज आणि त्यावर आकारल्या गेलेली व्याजाची रक्कम सारखीच होणे.
व्याजाचे प्रकार | Types Of Vyaj/ Interest
व्याजाचे मुख्य करून एकूण २ प्रकार आहेत (१) सरळ व्याज (simple Interest) आणि चक्रवाढ व्याज (Compound Interest) स्पर्धा परीक्षा मध्ये या दोन्ही वर आधारित प्रश्न विचारले जातात त्या मुले हा भाग सगळ्यात महत्वाचा आहे.
स्पर्धा परीक्षा टिप्स | Competitive Exam Tips For Interest
- स्पर्धा परीक्षा मध्ये व्याजाची उदाहरणे सोडवताना काही नियम गोष्टी लक्षात ठेवल्या तर व्याज हा टॉपिक सोपा होईल.
- या मध्ये मुद्दल, व्याजाचा दर, व्याज व मुदत ह्या चारही गोष्टींपैकी कोणत्याही तीन गोष्टी माहीत असल्यास चौथी गोष्ट काढता येते.
- कोणतेही व्याजाचे उदाहरण सोडवतांना उदाहरणामध्ये दिलेली मुदत हि वर्षा मध्ये दिलेली असते आणि जर ती महिन्यामध्ये दिलेली असेल तर वर्षामध्ये करून घ्यावी. (म्हणजेच दिवसाला ३६५ ने भागावे तर महिन्याला १२ ने भागावे)
- जेव्हा व्याजाची आकारणी केली जाते ज्या दिवशी रक्कम कर्जाऊ दिली तो दिवस घेतात त्याचवेळी कर्ज परत करण्याचा दिवस हिशेबात घेतला जात नाही.
Read More:- Percentage In Marathi PDF Download | शेकडेवारी ची सूत्र, नियम, उपयोग आणि इतर संपूर्ण माहिती जाणून घ्या
1. सरळ व्याज | Simple Interest In Marathi
- एका ठराविक पद्दतीने नियमितपणे आकारण्यात येणाऱ्या व्याजाला सरळ व्याज म्हणतात.
- सरळ व्याज हे फक्त मुद्दल वर आकारले जाते त्या मुले हे दरवर्षी सारखेच असते.
- हे व्याज मुद्दल, मुदत आणि व्याजाचा दर यांच्याशी सारख्या प्रमाणात असते.
- याचाच अर्थ कर्जाची मुदत जेवढी जास्त तेवढा व्याजाचा दर जास्त राहील आणि मुदत कमी असेल तर व्याजाचा दरही कमी राहील.
उदाहरणार्थ :
१००० रुपयाचे १५% दराने १५० रुपये व्याज द.सा.द.शे. आकारले असेल तर दरवर्षी १५० रुपये प्रमाणे नियमित व्याजाची आकारणी करता येईल.
Read More:- All Best Books For Talathi Exam PDF Download | तलाठी भरती परीक्षा साठी आवश्यक सर्वोत्तम पुस्तकांची यादी
सरळ व्याजाचे सूत्र | Simple Interest Formula In Marathi
सरळ व्याज काढण्यासाठी सूत्राचा वापर केला जातो सूत्र मध्ये खालील शॉर्टकट शब्द वापरले जातात.
मु = मुद्दल (कर्जाची रक्कम)
द = दर
क = कालावधी (मुदत)
सरळ व्याज = मु × द × क / 100
सरळ व्याज कसे काढतात ? | How To Find Simple Interest
उदाहरणार्थ :
उदा. ५०० रुपयांचे द सा द शे 10% दराने 2 वर्षांचे सरळव्याज किती रुपये होईल?
उत्तर:-
मुद्दल =५००
दर = १० %
कालावधी = २ वर्ष
म्हणून सरळ व्याज = मु × द × क / १००
=५०० × १० × २ /१००
सरळ व्याज = १०० रुपये.
2. चक्रवाढ व्याज | Compound Interest In Marathi
- चक्रवाढ व्याज मध्ये व्याजावर व्याज आकारले जाते म्हणजेच मुद्दल आणि व्याज मिळून तयार झालेल्या रकमेवर व्याज आकारले जाते.
- याच कारणा मुले चक्रवाढ व्याज हे सरळ व्याज पेक्षा जास्त असते.
- अर्थात जेव्हा पहिल्या वर्षी व्याज आकारले जाते तेव्हा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज दोन्ही सारखेच असतात.
- या नंतर दरवर्षी व्याजाची रकम वाढत जाते म्हणजेच पहिल्या वर्षीची रास ही दुसऱ्या वर्षीची मुद्दल असते तर दुसऱ्या वर्षीची रास तिसऱ्या वर्षीची मुद्दल असते.
- चक्रवाढ व्याज हे दर साल प्रमाणे दर सहामाहीतही आकारले जाते; सहा महिन्याचा दर आकारतांना व्याजाचा दर अर्धा करावा आणि मुद्दत दुप्पट करावी.
Read More:- Ghatank In Marathi PDF Download With Formulas | घातांक आणि त्याचे नियमांची संपूर्ण माहिती उदाहरणासह
चक्रवाढ व्याज काढण्याचे सूत्र | Compound Interest Formula In Marathi
चक्रवाढ व्याज काढण्यासाठी सूत्राचा वापर केला जातो.
या मध्ये मु = मुद्दल (कर्जाची रक्कम)
द = दर
क = कालावधी (मुदत)
चक्रवाढ व्याज =मु.( १ + द/१००)क -मु
चक्रवाढ व्याज कसे काढतात ?
उदाहरणार्थ :
द सा द शे 10% दराने १८००० रुपयांचे 2 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती रुपये होईल?
चक्रवाढ व्याज =मु.( १ + द/१००)क -मु
म्हणजेच इथे
मु = मुद्दल (कर्जाची रक्कम) =१८०००
द = दर = १०%
क = कालावधी (मुदत) = २ वर्ष
चक्रवाढ व्याज = १८०००(१+१०/१००)२-१८०००
=१८०००(११०/१००)२-१८०००
=१८०००(११/१०) x (११/१०) -१८०००
=१८० x १२१ -१८०००
=२१७८० -१८०००
चक्रवाढ व्याज =३७८० रुपये.
महत्वाची सूत्रे | Important Interest Formulas In Marathi
सरळ व्याज | मु × द × क / १०० |
चक्रवाढ व्याज | मु.( १ + द/१००)क -मु |
रास | मुद्दल + व्याज |
चक्रवाढ व्याजाची रास | मुद्दल = (१ + दर/१००)मुदत |
Read More:- Renu Sutra In Marathi PDF Download | Rasaynik Sutra | रासायानिक संयुगाचे नाव आणि त्यांची रेणुसूत्र
Simple Interest And Compound Interest Examples | सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज चे उदाहरणे
उदा. 1) द. सा. द शे ५ टक्के दराने ४ वर्षात २०० रुपये व्याज मिळाले तर मुद्दल किती रुपये ?
उत्तर:-
सरळव्याज = मुद्दल x मुदत x दर /१००
२०० = मुद्दल x ४ x ५/१०० म्हणजेच मुद्दल = २०० x १००/४ x ५
म्हणजेच मुद्दल = १००० रुपये होय.
उदा. 2) १२५० रुपये मुद्दलाचे द. सा. द शे ५ टक्के दराने किती वर्षात सरळव्याजानें दामदुप्पट होईल?
उत्तर:-
मुद्दल =१२५० म्हणजेच सरळव्याज =१२५०
सूत्रे सरळव्याज = मुद्दल x मुदत x दर /१००
म्हणजेच १२५० =१२५० x ५ x X /१००
याचाच अर्थ X = २० म्हणजेच मुदत = २० होय.
उदा. 3) द. सा. द शे २० टक्के दराने २ वर्षात १००० रुपयेच चक्रवाढ व्याज किती ?
उत्तर:-
सूत्र चक्रवाढ व्याज = मुद्दल (१+ दर /१००)मुदत – मुद्दल
चक्रवाढ व्याज =१०००(१+२०/१००)२– १०००
=१०००(१००/१००+२०/१००)२-१०००
=१०००(१२०/१००)२-१०००
=१००० x १२०/१०० x १२०/१०० -१०००
म्हणजेच चक्रवाढ व्याज = ४४० रुपये होय.
Read More:- Katha Lekhan In Marathi PDF Download | मराठी कथा लेखन ची संपूर्ण माहिती जाणून घ्या
Simple Interest And Compound Interest In Marathi PDF Download
Simple Interest And Compound Interest In Marathi PDF Download :- आपण ह्या आर्टिकल मध्ये सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज चे नियम, सूत्र उदाहरणे, आणि इतर संपूर्ण माहिती आणि संपूर्ण माहिती सविस्तर पणे जाणून घेतली आहे. अनेक विद्यार्थ्याना अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या विद्यार्थ्यांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही PDF Download करण्यासाठी PDF देत आहोत. तुम्ही Simple Interest And Compound Interest In Marathi आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.
Conclusion
आपण या पोस्ट मध्ये आपण Simple Interest And Compound Interest In Marathi ह्यांची संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण Simple Interest In Marathi, saral vyaj in marathi, chakravadh vyaj in marathi, हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.
FAQ For सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज | Simple Interest And Compound Interest In Marathi
Ans:- जेव्हा घेतलेल्या रकमेला परत करताना त्या मध्ये अधिक मोबदला द्यावा लागतो त्यास व्याज असे म्हणतात.
Ans:- एका ठराविक पद्दतीने नियमितपणे आकारण्यात येणाऱ्या व्याजाला सरळ व्याज म्हणतात.
Ans:- मुद्दल = रास – व्याज हे सूत्र वापरून मुद्दल काढली जाते.
Ans:- व्याजाचे मुख्यतः २ प्रकार पडतात ते म्हणजे (१) सरळ व्याज (२) चक्रवाढ व्याज
Ans:- जेव्हा व्याजावर व्याज आकारले जाते त्या व्याजाला चक्रवाढ व्याज असे म्हणतात
Related Posts:
- Ghatank In Marathi PDF Download With Formulas |…
- Nafa Tota | Profit and Loss in Marathi PDF Download…
- Time, Work and Speed In Marathi PDF Download | काळ,…
- Alankar In Marathi PDF Download | अलंकार त्याचे…
- Percentage in Marathi PDF Download | शेकडेवारी ची…
- Noun And Types Of Noun in Marathi PDF Download | नाम…