Advertisement

Katha Lekhan In Marathi PDF Download | मराठी कथा लेखन ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Katha Lekhan In Marathi

Katha Lekhan In Marathi:- Story writing is a skill part of art. Great writers create their books only by writing stories. From a small page, we have been listening to the story told by our grandfather. Questions based on this story writing are asked in the 9th to 12th class exams. Which is for 5 marks, in today’s post how to write a story for the preparation of these 5 marks. We are going to see detailed information about how to start while writing a story, and what is important in the exam.

Advertisement

Katha Lekhan In Marathi

Katha Lekhan In Marathi :- कथा लेखन हा एक कौशल्य कलेचा भाग आहे. कथा लेखन करूनच मोठे मोठे लेखक आपले पुस्तक तयार करतात. लहान पानापासून आपण आजोबानी सांगितलेली गोष्ट ऐकत आलेले असतो.या कथा लेखन वर आधारित प्रश्न ९ वि पासून १२ वि च्या परीक्षे मध्ये विचारले जातात. जे कि 5 गुणांसाठी असते आजच्या या पोस्ट मध्ये आपण या 5 गुणांच्या तयारी साठी कथा लेखन कसे करावे. कथा लेखन करताना सुरवात कशी करावी ,परीक्षे मध्ये काय महत्वाचे असते ,या सगळ्या बाबत विस्तारित माहिती बघणार आहोत.

Advertisement

Read More:- Marathi Mulakshare PDF Download | मराठी मुळाक्षरे आणि त्याची संपूर्ण माहिती

What Is Katha Lekhan In Marathi | कथा लेखन म्हणजे काय ?

  • कथा लेखन म्हणजे एखाद्या काल्पनिक कहाणी चे लेखन करणे होय.
  • कथा लेखन हे घडलेल्या सत्य घटनेचं सुद्दा असू शकते.

Important Points Katha Lekhan In Marathi | मराठी कथा लेखन साठी महत्वाचे मुद्दे

  • कथेची सुरुवात शीर्षकाने होते या साठी कथेला शोभेल तसेच कथा लक्षात येईल असे शीर्षक असणे आवश्यक आहे.
  • कथा लिहिताना कथेची सुरवात आकर्षक असावी ज्या मुले वाचकाची उत्कंठा शेवट पर्यंत राहिले.
  • कुठे मध्ये सुरवात मध्य तसेच शेवट असणे आवश्यक आहे.
  • परीक्षे मध्ये दिलेल्या माहितू नुसार कथेच्या घटना आणि स्थळाचा उल्लेख करावा.
  • कथेची पात्र त्या कहाणी ला उठून दिसतील अशीच असावीत.
  • कथा ज्या ठिकाणाची आहे त्याच ठिकाणावर भाषा संवाद ठेवावे.
  • कथालेखन नेहमी भूतकाळामध्ये करावे.
  • कथेकचा शेवट करताना त्यातून काय शिकायला मिळाले बोध तात्पर्य हे सुद्धा टाकावे.

Read More:- Paribhasik Shabda Marathi PDf Download | पारिभाषिक शब्द मराठी ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

परीक्षे मध्ये कथा लेखन वर आधारीत विचारले जाणारे प्रश्न

  • परीक्षे मध्ये कथा लेखन करण्यासाठी कथा बीज दिले जाते.
  • म्हणजेच कथा लेखन साठी चा आशयाचा गाभा तुम्हाला दिला जातो, शीर्षक दिले जाते आणि त्या वरून कथा लेखन करायला सांगितले जाते.
  • दिलेल्या मुद्द्यावरून कथालेखन करायला सांगितले जाते.
  • कथेच्या शीर्षकावरून कथालेखन.
  • कधी कधी शब्द दिला जातो त्या वरून कथा लेखन सांगितले जाऊ शकते तर अपूर्ण कथा देऊन ती पूर्ण करायला सुद्धा सांगितले जाऊ शकते.
Advertisement

Read More:- संत तुकाराम महाराज माहिती मराठी मध्ये जाणून घ्या | Sant Tukaram Maharaj Information In Marathi

कथांचे प्रकार | Types Of Katha Lekhan In Marathi

कथांचे विविध प्रकार पडतात त्याची संपूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.

  • सामाजिक कथा
  • पौराणिक कथा
  • बोधकथा
  • रूपककथा
  • विज्ञान कथा
  • साहस कथा
  • रहस्य कथा
  • ऐतिहासिक कथा
  • विनोदी कथा
Advertisement

Read More:- Marathi Grammar – Marathi Vyakaran | मराठी व्याकरणाची संपूर्ण सविस्तर माहिती PDF Download सह

कथा लेखनाचे नमुने | Katha Lekhan In Marathi Format

1 कथा लेखन नमुना – दिलेल्या माहिती वरून कथा लेखन करा | Short Katha Lekhan

शेतकरी – चार मुले – आळशी – आपापसात भांडणे – शेतकरी हैराण – शेतकरी आजारी – मुलांना सुधारवण्यासाठी युक्ती – चार काट्या तोडायला लावणे – सहज तुटणे – परत चार काट्या एकत्र बांधणे – तोडण्यासाठी सांगणे – मुले असमर्थ होणे- मुलांची चूक लक्षात येणे – वडिलांची माफी मागणे – एकत्र समजूतीने राहणे- तात्पर्य

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका गावात बाबाजी नावाचा एक शेतकरी राहत होता. बाबाजी खूप मेहनती व कष्टाळू शेतकरी होता. बायकोच्या निधनानंतर त्याने आपल्या चारही मुलांचे शिक्षण पूर्ण केले व त्यांना कशाचीही कमी जाणवू दिली नाही. परंतु त्याची चारही मुले ही फारच आळशी आणि सतत भांडणारी होती. त्या चौघांचेही एकमेकांकडे एक क्षण ही पटत नव्हते. त्यांच्या हया अश्या वागण्याने शेतकरी नेहमीच चिंतेत असे. त्याच्या या आळशीपणामुळे आणि भांडणामुळे तो खूपच हैराण झाला होता.

एके दिवशी बाबाजी खूपच आजारी पडला होता. आपल्यानंतर आपल्या या मुलांचे कसे होणार ह्याची चिंता त्याला सारखी भेडसावत होती. आपल्या हया भांडखोर मुलांना सुधारविण्यासाठी त्याने एक युक्ती केली.

त्याने मुलांना चार सामान आकाराच्या काट्या आणवयास सांगितल्या व एक एक काटी प्रत्येकाला दिली आणि ती तोडायला सांगितली तेव्हा चारही मुलांनी आपली आपली काटी लगेच तोडली.

आता त्याने त्या चारही काट्या एकत्र बांधून ठेवायला सांगितल्या व ती एकत्र केलेल्या काट्याची जुडी एक एक करून प्रत्येक मुलाला तोडण्यासाठी सांगितली. प्रत्येक मुलाने खुप जोर लावला परंतु ती जुडी कोणाकडूनही तुटली गेली नाही. शेतकऱ्याची चारही मुले त्या काट्याची जुडी तोडण्यास असमर्थ ठरली.

आता मात्र चारही मुले एकमेकांकडे बघू लागली कारण त्यांना त्यांची चूक लक्षात आली होती. त्यांनी वडिलांची क्षमा मागितली व त्यांना एकीच्या बळाचे महत्व लक्षात आले.

शेतकरी खूप आनंदी झाला व त्यानंतर काही दिवसांनी शेतकऱ्याची तब्येतही सुधारली व शेतकऱ्याची मुले त्याला शेतीत मदत करू लागली व एकत्र समजूतीने राहू लागली.

तात्पर्य :- एकीचे बळ हे खूप मोठे असते.

Read More:- संशोधक व त्यांनी लावलेले शोध ह्याची संपूर्ण माहिती | Scientists And Their Inventions In Marathi PDF Download

2. कथा लेखन नमुना शीर्षकावरून कथालेखन जसे कराल तसे भराल | Short Katha Lekhan In Marathi | कथा लेखन मराठी 9वी

एका शहरात चार चोर मित्र होते. चौघेही एकत्र मिळून अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या चोऱ्या करीत असत आणि दरोडे घालीत असे व चोरी करून मिळालेल्या संपत्तीचा चौघेही नेहमी समान वाटा करीत असत. अशा प्रकारे कित्येक वर्ष त्यांचा हा उद्योग चालत आलेला होता.

एके दिवशी या चारही चोर मित्रांनी एक मोठी चोरी केली व त्यामुळे त्यांना भरपूर संपत्ती प्राप्त झाली होती. त्या चोरीमध्ये अनेक सोने, नाणे, रत्नजडित हिरे-जवाहारात त्याचप्रमाणे अनेक सुवर्णमुद्राही मिळाल्या होत्या. चोरी करून आलेला इतका सगळा माल पाहून चौघेही चोरमित्र अत्यंत आनंदी झाले व त्यांच्या आनंदाचा पारावर उरत नव्हता.

आपल्याला मिळालेल्या या अमूल्य अफाट संपत्तीचा चौघांनीही समान वाटा करायचा या हेतूने ते चौघेही एका जंगलात जाण्याचे ठरवितात. जंगलात जाऊन मिळालेल्या ऐवजाचे चार समान हिस्से करून आपापला वाटा घेण्यासाठी आतुर झाले होते. ज्यावेळी मिळालेले चोरीचे ऐवज चौघांनी उघडून पाहिले त्यावेळी मात्र चौघेही अवाक झाले होते.

अशातच त्या चौघांनाही खूप भूक लागली. म्हणून त्या चौघांनी पैकी दोघांनी ठरवले की जवळच असलेल्या गावी जाऊन खाण्यासाठी काही मिठाई आणि इतरही खाद्यपदार्थ घेऊन यावे आणि त्यानंतर चौघांचे चोरीच्या ऐवजाचे समान हिस्से करून घ्यावेत. ठरल्याप्रमाणे चार चोर मित्रांपैकी दोन चोर मित्र हे जवळच्या दुकानात खाद्यपदार्थ आणण्यासाठी गेले.

इथे जंगलात उरलेल्या दोन चोरांच्या मनात खाण्यासाठी आणायला गेलेल्या इतर दोन चोरांचा वाटाही आपणच घ्यावे याबद्दलची हाव निर्माण झाली. परंतु त्यांचाही वाटा जर मिळवायचा असेल तर त्यांना मारणे गरजेचे होते हे या दोघांच्या लक्षात आले होते. त्याचप्रमाणे विरुद्ध दिशेला जे दोन चोर मित्र खाण्याचे आणण्यासाठी गेले होते त्यांच्याही मनात हाव निर्माण झाली व जंगलातील दोन चोरांना मारून त्यांचाही वाटा आपण दोघेही समान वाटून घ्यावा अशी योजना ते दोघेही बनवू लागले. त्याप्रमाणे त्यांनी योजनाही केली व मिठाई आणण्यासाठी गेलेल्या दोन्ही चोरांनी घेतलेल्या मिठाई मध्ये विष मिसळून जंगलात परत गेले.

जंगलातील दोन्ही चोरमित्र आपल्या इतर दोन मित्रांची वाटच पाहत होते. मिठाई घेऊन आलेले दोन्ही चोर हे हात पाय धुण्यासाठी विहिरीवर गेले असता जंगलातील दोन्ही मित्रांनी त्यांना विहिरीत धक्का दिला व विहिरीत पडून त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. आता त्या दोघांनी आणलेली मिठाई व इतर खाद्यपदार्थ आपण मनसोक्त खाऊन त्यांच्या वाटणीचा हिस्साही दोघांमध्ये समान वाटून घेऊ असे ह्या उरलेल्या दोन मित्रांनी ठरवले.

आपल्या चोरीच्या इतक्या अखंड हिस्सातील दोन वाटेकरी कमी झाल्यामुळे हे दोघे खूपच आनंदी होते आनंदाच्या भरात ते घाई घाईत मिठाई खाऊ लागले. मिठाई आणायला गेलेल्या दोन मित्रांनी आणलेल्या मिठाईत आधीच विष कालवले असल्यामुळे इतर दोन मित्रांनी ती मिठाई खाल्ल्यामुळे त्यांचाही जागीच मृत्यू झाला.

अशा प्रकारे चारही मित्रांचा जास्त हाव केल्यामुळे व एकमेकांबद्दल एकमेकांच्या मागे कपट कारस्थान केल्यामुळे जागीच मृत्यू झालेला होता. व त्याचमुळे चोरी केलेले अमूल्य ऐवज त्या चौघांपैकी एकाच्याही वाट्याला आलेले नव्हते.

तात्पर्य –अति तेथे माती किंवा जसे कराल तसे भराल

Read More:- प्रयोग व त्याचे प्रकार मराठी व्याकरण ची संपूर्ण माहीती जाणून घ्या | Voice And It’s Types In Marathi

3. कथा लेखन नमुना – माहितीच्या आधारे कथालेखन | Short Katha Lekhan In Marathi

(घरात दोन भाऊ एकटे, फाईलमध्ये दहशतवाद्यांची माहिती, दहशतवादी घरात घुसले, फाईलशोधणे , खोलीत बंद, दहशतवाद्याला अटक)

एके दिवशी शाम आणि त्याचा लहान भाऊ करण दोघेही घरी एकटेच होते. त्याचे वडील पोलीस अधिकारी होते. त्याने घरी लाल रंगाची फाईल आणली होती. त्यात सर्व कुख्यात दहशतवाद्यांची माहिती होती.
वडिलांनी ती फाईल कपाटात सुरक्षित ठेवली होती हे शामला माहीत होते. श्याम आणि करण खेळत असताना दोन दहशतवादी त्यांच्या घरात घुसले आणि म्हणाले, लाल फाईल कुठे आहे? शाम खूप हुशार होता.
तो म्हणाला, “वर बेडरूमच्या कपाटात. मी तिथे पोहोचू शकत नाही.” लाल फाईल घेण्यासाठी दोन्ही दहशतवादी त्या खोलीत गेले.तो कपाटातील फाईल शोधत असतानाच श्यामने हळूच त्या खोलीचा दरवाजा बाहेरून बंद केला आणि वडिलांनाही हाक मारली, काही वेळातच त्याचे वडील पोलिसांसह तेथे पोहोचले.
दोन्ही दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. अशाप्रकारे श्यामने आपल्या हुशारीने दोन्ही दहशतवाद्यांना पकडले. सगळ्यांनी त्याचं खूप कौतुक केलं.

तात्पर्य – कोणतीही समस्या समजूतदारपणाने हाताळली जाऊ शकते.(शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ)

Read More:- Samas In Marathi PDF Download | समास व त्याचे प्रकार ह्यांची संपूर्ण माहिती जाणून घेऊया

कथा लेखन नमुना ४ | 10th class short katha lekhan in marathi | कथा लेखन मराठी 10वी साठी

आळशी मुलगा, पैशाने भरलेली पिशवी, कष्ट न करता इतका पैसा, फालतू खर्च, काम करण्याची गरज नाही, मूल्य आणि मोल )

अक्षय एक आळशी मुलगा होता. असाच भटकण्यात त्यांचा वेळ जात असे. या कारणास्तव तो नेहमी काम करण्यापासून दूर राहायचा. एके दिवशी त्याला पैशांनी भरलेली पिशवी सापडली.
त्याच्या नशिबावर तो आनंदी झाला. खूप पैसे सापडले या विचाराने तो आनंदी झाला. अक्षय काही पैसे देऊन मिठाई, कपडे आणि इतर वस्तू खरेदी केल्या.
त्यामुळे तो विनाकारण पैसे खर्च करू लागला. तेव्हा त्याची आई म्हणाली, “बेटा, अशी उधळपट्टी करू नकोस. हा पैसा व्यवसाय सुरू करण्यासाठी वापर” अक्षय म्हणाला, आई माझ्याकडे भरपूर पैसा आहे
म्हणूनच मला काम करण्याची गरज नाही. ” हळूहळू अक्षय ने सर्व पैसे खर्च केले, आता त्याच्याकडे एक पैसाही नव्हता. अशा प्रकारे तो पुन्हा त्याच पदावर आला. सोनूच्या लक्षात आले की जर त्याने तो पैसा मेहनतीने कमावला असेल तर त्याची किंमत आणि मोल त्याला नक्कीच समजली असेल.

शिक्षण :- पैशाची उपयुक्तता तेव्हाच कळते जेव्हा तो कष्टाने मिळवला जातो.

Read More:- शब्दसिद्धी व त्याच्या प्रकारांची संपूर्ण सविस्तर माहिती | Shabsiddhi And Their Types PDF

कथा लेखन मराठी PDF | Katha Lekhan In Marathi PDF Download

Katha Lekhan In Marathi PDF Download:- आपण ह्या आर्टिकल मध्ये कथा लेखन मराठी ची संपूर्ण माहिती आणि संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. अनेक विद्यार्थ्याना अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यांच्यासाठी आम्ही विद्यार्थ्याना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही PDF Download करण्यासाठी PDF देत आहोत. तुम्ही Katha Lekhan In Marathi आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

Conclusion

आपण या पोस्ट मध्ये आपण Katha Lekhan In Marathi ह्यांची संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण katha lekhan in marathi, short katha lekhan in marathi, 10th class short katha lekhan in marathi हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना उपयुक्त ठरेल.

FAQ Frequently Asked Questions For Katha Lekhan In Marathi

Q1. कथा लिहिणे कठीण आहे का?

Ans:- कथा लिहिणे कठीण किंवा सोपे आहे हे तुमच्या वैयक्तिक कौशल्ये आणि अनुभवावर अवलंबून असेल. तसेच, जर तुम्ही नियमितपणे कथा लिहिली तर तुम्ही कथा लिहिण्याची कला आत्मसात करू शकता आणि चांगली कथा लिहू शकता.

Q2. कथा लिहिण्यासाठी मला किती वेळ लागेल?

Ans:- कथा लिहिण्यासाठी लागणारा वेळ तुमच्या कथा संकल्पनेच्या आकारावर, तुमच्या अनुभवावर आणि तुमच्या वेळेच्या उपलब्धतेवर अवलंबून असेल. तसेच, जर तुम्ही नियमितपणे कथा लिहिली तर तुम्ही थोड्या वेळातच चांगली कथा लिहू शकता.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages