Advertisement

All Best Marathi Bodh Katha PDF Download | मराठी बोध कथा त्यांच्या तात्पर्य सह पीडीएफ डाउनलोड करा

Marathi Bodh Katha

Best Marathi Bodh Katha PDF Download:- You must have heard many bodh kathas in your childhood. You can introduce new and better moral stories to the little ones in your home. You don’t need to go anywhere else for that. Parables are stories or stories from which we learn something. You will definitely be entertained from this parable and you will also learn a lot from the implications. In this article we are going to take information about Bodh Katha and their meaning for children and you can download Free PDF in this article.

Advertisement

Best Marathi Bodh Katha

Best Marathi Bodh Katha PDF Download:- आपण आपल्या लहान पणी अनेक बोध कथा ऐकल्या असेल. तुम्ही तुमच्या घरातील लहान मुलांना नवीन आणि चांगल्या बोध कथा एकवू शकतात. त्या साठी तुम्हाला इतर कोठेही जाण्याची गरज नाही. बोधकथा म्हणजे ज्या कथा मधून आपल्याला काहीतरी बोध होतो अशा कथा किंवा गोष्टी होय. या बोधकथा मधून तुमचं मनोरंजन तर नक्कीच होईल त्याचबरोबर तुम्हाला तात्पर्य मधून खूप काही शिकायला सुद्धा मिळेल. आम्ही ह्या आर्टिकल मध्ये लहान मूलांसाठी बोध कथा आणि त्यांचे तात्पर्य ह्यांची माहिती घेणार आहोत आणि तुम्ही ह्या आर्टिकल मध्ये Free PDF Download करू शकतात.

बोध कथा मराठीत -What Is Bodh Katha Marathi

Advertisement

बोध कथा ह्या एक कथा आहे जी एक धडा किंवा नैतिक शिकवते. या कथांमध्ये बर्‍याचदा अशी पात्रे असतात जी सकारात्मक किंवा नकारात्मक परिणामांची निवड करतात आणि वाचकाला पात्रांच्या चुकांपासून शिकायचे असते. बोध कथा अनेक भिन्न संस्कृती आणि परंपरांमध्ये आढळू शकतात आणि त्यांचा उपयोग मुलांना (आणि प्रौढांना) जीवनाचे महत्त्वाचे धडे शिकवण्यासाठी केला जाऊ शकतो.

1. मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी

एकदा एका जंगलात कावळा जातो. तिथे त्याला एक माकड आणि मांजर भेटले. त्या तिघांची चांगली मैत्री जमली. एक दिवस त्या तिघा मित्रांनी खीर करण्याचे ठरविले. माकड म्हणाले ‘मी साखर आणतो’. मांजर म्हणाले ‘मी दूध आणतो’. कावळा म्हणाला ‘मी शेवया आणतो’. तिघांनी पातेलेभर खीर केली. मग माकड म्हणाले ‘चला आपण आंघोळ करून येऊ आणि मगच खीर खाऊ’.

Advertisement

इकडे मांजराच्या तोंडाला पाणी सुटले होते. ते अर्ध्या वाटेतूनच परत आले. त्याने सगळी खीर खाऊन टाकली. थोडया वेळाने माकड व कावळा आले. पहातात तो काय, खिरीचे पातेले रिकामे! त्यांनी मांजराला विचारले ‘खीर कोणी खाल्ली?’ मांजर म्हणाले, ‘मला नाही माहीत.’ मग माकडाने एक घागर घेतली व सर्वजण नदीवर गेले. माकडाने घागर पाण्यात पालथी घातली. त्यावर उभे राहून माकड म्हणाले ‘ हुप हुप करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी’. पण घागर काही बुडाली नाही. 

मग कावळा घागरीवर उभा राहिला व म्हणाला ‘चूं चूं करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी’. पण घागर काही बुडाली नाही. आता मांजराची पाळी आली. मांजर खरे तर घाबरले होते. कसेबसे ते घागरीवर उभे राहिले व म्हणाले ‘ म्यांव म्यांव करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी’. अन काय आश्चर्य, घागर पाण्यात बुडाली. चोरून खीर खाल्ल्याची मांजराला शिक्षा मिळाली. 

Advertisement

तात्पर्य : कधीही खोटे बोलू नये.

2. लांडगा आला रे आला

एका गावात एक धनगर होता. त्याला अक्षय नावाचा मुलगा होता. अक्षय रोज आपल्या मेंढया घेऊन गावाबाहेर चरायला घेऊन जात असे. संध्याकाळ झाली की परत आणत असे. त्याचा हा रोजचा दिनक्रम होता. तो जेथे मेंढ्या चरायला घेऊन जाई तेथे शेती होती. अनेक गावकरी तेथे दिवसभर काम करत असत. एकदा तो असाच मेंढ्यांना घेऊन चरायला गेला होता. दुपार झाली. त्याने जेवण केले. 

पण नंतर त्याला फार कंटाळा येऊ लागला. काहीतरी गंमत करायची असे त्याने ठरवले. तो जोरात ओरडला, ‘लांडगा आला रे आला.’ लोकांना खरे वाटले. ते शेतातली आपली कामे सोडून काठ्या घेऊन धावत त्याच्याजवळ आले. त्याला विचारू लागले, ‘कुठे आला लांडगा’. तेव्हा तो मोठ्याने हसू लागला व म्हणाला, ‘कशी गंमत केली.’ शेतकरी संतापले. पण काय करणार, तसेच निघून गेले. 

दीपकला मात्र यात गंमत वाटली. दुसर्‍या दिवशी त्याने पुन्हा हाच उद्योग केला. शेतकर्‍यांना उगाचच एक हेलपाटा पडला. पुन्हा अक्षय कसे फसवले म्हणून हसू लागला. शेतकरी संतापून निघून गेले. तिसर्‍या दिवशी तो पुन्हा मेंढ्या चरायला घेऊन आला. दुपार झाली आणि तो जेवायला बसला. पण त्या दिवशी खरेच एक लांडगा तेथे आला आणि एका मेंढीवर ताव मारू लागला. अक्षय जोरजोरात ओरडू लागला ‘लांडगा आला रे आला.’ पण आजूबाजूच्या लोकांनी त्याला अजिबात भीक घातली नाही. तो नेहमीसारखीच थट्टा करतोय, असे वाटून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. लांडग्याने एक एक करत सर्व मेंढ्या खाल्ल्या. अक्षय आपला झाडावर बसून रडू लागला. पण आता काहीच उपयोग नव्हता. त्याला आपली चूक लक्षात आली. पण आता फार उशीर झाला होता. 

तात्पर्य : थट्टा उडविणे केव्हाही वाईटच.

3. टोपीवाला आणि माकडे

एक टोपीवाला होता. तो रोज टोप्या विकायला शेजारच्या गावात जात असे. जाताना जंगल लागत असे. एकदा तो दुपारी जंगलातून जात असताना तो थांबतो व झाडाच्या खाली जरा वेळ विश्रांती घेतो. तेव्हा तेथे झाडावर असलेली माकडे खाली उतरतात आणि त्याची पेटी उघडून त्यातल्या टोप्या घेऊन झाडाचे टोक गाठतात. थोडया वेळाने, त्या टोपीवाल्याला जाग येते. पाहतो तर काय. पेटीतील सगळ्या टोप्या गायब. 

तो इकडे तिकडे बघतो. काहीच दिसत नाहीत. मग वर बघतो, तर सगळ्या माकडांच्या डोक्यावर टोप्या. तो काळजीत पडतो. काय करावे हे त्याला सुचत नाही. तो त्यांना दगडे मारतो. पण ते झाडावरची फळे फेकून त्याला मारतात. शेवटी वैतागून तो आपल्या डोक्यावरची टोपी खाली फेकतो. हे पाहून ती माकडेही आपल्या डोक्यावरच्या टोप्या खाली फेकतात. तो पटापट आपल्या टोप्या गोळा करतो आणि तेथून निघून जातो.

तात्पर्य : शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ.

Read More:- Ghatank In Marathi PDF Download With Formulas | घातांक आणि त्याचे नियमांची संपूर्ण माहिती उदाहरणासह

4. चल रे भोपळया टुणुक टुणुक

एक होती म्हातारी. एकदा ती आपल्या लेकीकडे जायला निघाली. तिची लेक दुसर्‍या गावाला रहात होती. रस्त्यांत मोठे जंगल होते. म्हातारी काठी टेकत, टेकत रस्त्याने निघाली. वाटेत तिला भेटला कोल्हा. तो म्हणाला ‘म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो’. 

पण म्हातारी होती हुशार. ती म्हणाली, ‘मला खाऊन तुझे पोट भरणार नाही. त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते , तूपरोटी खाते, लठ्ठ मुठ्ठ होते, मग तू मला खा.’ कोल्ह्याला म्हातारीचे म्हणणे पटले. म्हातारी पुढे निघाली. तिला भेटला वाघ. तो म्हणाला, ‘म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो’.

त्याने डरकाळी फोडली. म्हातारी त्याला म्हणाली ‘मला खाऊन तुझे पोट भरणार नाही. त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते , तूपरोटी खाते, लठ्ठमुठ्ठ होते, मग तू मला खा. ‘ वाघाची अशी समजूत काढून म्हातारी पुढे निघाली. 

लेकीकडे ती खूप दिवस मजेत राहिली. खाऊन पिऊन लठ्ठमुठ्ठ झाली. आपल्या घरी परत येताना तिने एक मोठा लाल भोपळा घेतला. त्यात बसून ती भोपळयाला म्हणाली, ‘चल रे भोपळया टुणुक टुणुक’. भोपळा रस्त्याने निघाला. वाटेत वाघाने भोपळा पाहिला. तो म्हणाला ‘म्हातारे, म्हातारे थांब!’ आतून म्हातारी म्हणाली ‘कशाची म्हातारी आणि कशाची कोतारी.

चल रे भोपळया टुणुक टुणुक’. त्याबरोबर भोपळा जोरात पळू लागला. पुढे गेल्यावर भेटला कोल्हा. कोल्ह्यानेही भोपळयाला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण म्हातारी आतून म्हणाली ‘चल रे भोपळया टुणुक टुणुक!’. पुन्हा भोपळा जोरात पळू लागला. 

अशी होती म्हातारी हुशार. कोल्हा आणि वाघाच्या तावडीत ती काही सापडली नाही. भोपळयात बसून ती सुखरूप आपल्या घरी पोचली.

तात्पर्य : शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ.

5. एकीचे बळ मोठे असते

एका गावातील एक लाकूडतोड्या रोज जंगलात जात असे. एकदा त्याने जखमी झालेल्या जंगली कुत्र्याच्या पिलाचा जीव वाचवला तेव्हापासून त्याला त्या पिल्लाचा लळा लागला. ते पिलू त्याला तेथे भेटत होते. ते पाहून इतरही जंगली कुत्रे त्याच्याजवळ येत असत. 

परंतु त्यांना सर्वाना एका वाघाने फार त्रस्त करून सोडले होते. तो रोज त्यांच्यावर हल्ले करत होता. लाकूडतोड्याने एक योजना बनविली. नेहमीप्रमाणे वाघ डोंगराच्या माथ्यावर आला. सर्व कुत्री वेगवेगळ्या ठिकाणी थांबून त्याच्यावर भुंकू लागली. वाघाने चवताळून एका कुत्र्यावर झेप घेतली तसा तो कुत्रा खाली बसला. वाघाची उडी थेट त्या कुत्र्याच्या मागे असणार्‍या एका मोठया खडयात पडली. सगळ्या कुत्र्यांनी त्याच्यावर धाव घेतली व त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार केले. 

तात्पर्य : एकीचे बळ मोठे असते.

6. वाल्याचा वाल्मीकी झाला | marathi bodh katha small

रानात एक वाल्या कोळी नावाचा दरोडेखोर राहत होता. तो, रानात एक मार्गातून येणार्‍या-जाणार्‍या लोकांना भीती दाखवून आणि धाक दाखवून लुटायचा. त्यांचे पैसे आणि दागिने काढून घ्यायचा. त्या पैशावर आपले घर चालवायचा. त्याला एकदा नारदमुनींनी बघितले. नारदमुनींना वाईट वाटले. वाल्या कोळी जर असेच पाप करू लागला, तर त्याला नरकात शिक्षा भोगावी लागेल. 

ते लगेच वाल्या कोळीकडे गेले आणि त्याला म्हणाले, ”अरे, तू हे पाप का करतोस? लोकांना त्रास देऊन त्यांचे पैसे घेणे हे पाप आहे.” त्यावर वाल्या कोळी म्हणाला, ”मी हे पाप माझ्या बायका-मुलांना खायला-प्यायला मिळावे म्हणून करतो.” तेव्हा नारदमुनी म्हणाले, ”तू त्यांच्यासाठी करतोस, तर मग जा. त्यांना विचार की, मी पाप करून सगळे तुम्हाला देतो. तर माझ्या पापाचा अर्धा वाटा तुम्ही घेणार का?” वाल्या कोळी घरी गेला आणि त्याने आपल्या बायका-मुलांना विचारले. तेव्हा ती म्हणाली, ”तुमच्या पापाचे फळ आम्ही भोगणार नाही. 

तुम्ही लोकांना त्रास देऊन पैसे मिळविता, तर त्याचे पाप तुम्ही भोगा.” हे ऐकल्यावर वाल्या कोळ्य़ाला वाईट वाटले. आपण एवढी वर्षे निरपराध लोकांना फार त्रास दिला. त्याला त्याच्या कर्माचा पश्‍चात्ताप झाला. तो लगेच नारदमुनींना शरण गेला आणि म्हणाला, ”आपण मला क्षमा करा. या घोर पापातून मला मुक्त करा.” तेव्हा नारदमुनी प्रेमाने म्हणाले, ”वाल्या, तुला पश्‍चात्ताप होतोय ना? आता तुझ्या पापातून मुक्त होण्यासाठी तू ‘राम राम’ असा नामजप कर. जोपर्यंत मी परत येत नाही तोपर्यंत तू इथेच नामजप करत बस. मी लगेच जाऊन येतो,” असे म्हणून नारदमुनी गेले. आता वाल्या कोळी एका जागी बसून नामस्मरण करू लागला. 

 त्याला ‘राम राम’ असे म्हणता येत नव्हते; म्हणून तो ‘मरा मरा’ असा नामजप करायचा; पण तो नामस्मरण फार मनापासून करत होता. असे करता करता एक दिवस गेला, चार दिवस गेले, एक आठवडा झाला, तरी वाल्या कोळी नामस्मरणच करत होता. १ मास, २ मास असे करत करत वर्षे झाली; पण नारदमुनी आले नाहीत; पण वाल्याचा नामजप अखंड चालूच होता. तो ज्या रानात बसला होता, तेथे वाल्या कोळ्य़ाच्या भोवती रानातील लाल मुंग्यांनी वारूळ बनविले, तरीही वाल्या कोळी उठला नाही. हळूहळू वाल्याचे सगळे शरीर मुंग्यांच्या वारुळाखाली झाकले गेले. त्याने मनाशी निश्‍चय केला होता की, नारदमुनींनी सांगितलंय ना? ते येईपर्यंत मी इथेच नामस्मरण करत बसणार. असे न खाता-पिता शेकडो वर्षे नामजप करणार्‍या वाल्याला देव प्रसन्न झाला आणि त्याला म्हणाला, ”मी तुझ्या नामस्मरणामुळे प्रसन्न झालो आहे. 

तुझे सगळे अपराध मी क्षमा करतो. तू आता वाल्या कोळी नाहीस. आजपासून वाल्मीकी ऋषी आहेस. असे म्हणून देवाने त्याला आशीर्वाद दिला.” याच वाल्मीकी ऋषींनी ‘रामायण’ लिहिले. वाल्मीकी ऋषी फार प्रेमळ होते.

तात्पर्य : संगतीमुळे आपण चांगले बनतो; त्यामुळे नेहमी आपण चांगल्याच मुलांच्या संगतीत राहिले पाहिजे.

7. उंदराची टोपी

एक उंदीर होता. तो एकदा रस्त्यावरून चालत होता. चालता चालता त्याला एक कापडाचा ‘तुकडा’ सापडला. तर तो तुकडा बघून उंदराला वाटलं अरे व्वा ! आता आपण याची टोपी शिवून घेऊया. मग तो एका शिंप्याकडे गेला. शिंप्याला म्हणाला, “”शिंपीदादा, शिंपीदादा, मला या कापडाच्या तुकडयाची टोपी शिवून द्या””. तर शिंपी म्हणाला, “”चल हट, मी नाही देत जा””. तसा उंदराला आला राग. 

तो म्हणाला “”राजाकडे जाईल, चार शिपायांना बोलवेल, ते तुला मारतील व मग मी तुझी मजा बघेल””. शिंपी घाबरला. म्हणाला, “”नको रे बाबा, नको नको नको. आण तो तुकडा, मी टोपी शिवून देतो””. म्हणत शिंप्यानं टोपी शिवून दिली. तसा तो उंदीर गेला, कुणाकडं? परटाकडं ! परटाला म्हणाला , “”परीटदादा, परीटदादा, माझी एवढी टोपी धुवून द्या””. परीट खूप कामात होता. तो म्हणाला, “”नाही रे उंदरा, मला वेळ नाही आता. जा””. तसा तो उंदीर म्हणाला, “”राजाकडे जाईल, चार शिपायांना बोलवेल, ते तुला मारतील व मग मी तुझी मजा बघेल””. 

परीट घाबरला. म्हणाला, “”नको रे बाबा, नको नको नको. आण मी टोपी धुवून देतो””. म्हणत त्याने टोपी धुवून दिली. तसा उंदीर गेला रंगार्‍याकडे व म्हणला, “”रंगारीदादा रंगारीदादा, माझी टोपी छान लाल रंगवून द्या””. रंगारी म्हटला, “”जा जा, मी नाही देत जा.”” तसा उंदीर काय म्हटला? बरोब्बर! “”राजाकडे जाईल, चार शिपायांना बोलवेल, ते तुला मारतील व मग मी तुझी मजा बघेल””. रंगारी घाबरला आणि त्यानं टोपी छान लाल लाल रंगवून दिली. मग उंदीर गेला गोंडेवाल्याकडे व म्हणला, “”गोंडेवाले, गोंडेवाले, माझ्या टोपीला चार गोंडे लावून देता का?”” गोंडेवाला बोलला, “”मी नाही देत. 

ज्जा”” तसा उंदीर त्याला पण म्हणाला, काय?, “”राजाकडे जाईल, चार शिपायांना बोलवेल, ते तुला मारतील व मग मी तुझी मजा बघेल””. तसा गोंडेवाला घाबरला. म्हणाला, “”नको रे बाबा, नको नको नको. आण मी टोपीला गोंडे लावून देतो””. मग त्याने गोंडे लावून दिले. उंदीर झाला खूष. त्यानं टोपी घातली डोक्यावर आणि मजेत गाणी म्हणत चालला. तिकडून राजा चालला होता. राजाबरोबर होते शिपाई. 

राजाने उंदराला बघितले आणि शिपायांना म्हणाला, “”घ्या रे त्याची टोपी हिसकावून””. तशी शिपायांनी उंदराची टोपी हिस्कावली आणि राजाच्या डोक्यावर ठेवली. उंदीर पळाला आणि पळता पळता म्हणायला लागला, “”राजा भिकारी, राजा भिकारी! माझी टोपी घेतली, घेतली””. आता राजाला आला राग. त्यानं डोक्यावरची टोपी काढली आणि उंदराकडे भिरकावली. तशी ती टोपी उंदराने उचलली, झटकली आणि पुन्हा डोक्यात घातली आणि म्हणायला लागला , “”राजा मला भ्याला, माझी टोपी दिली, राजा मला भ्याला, माझी टोपी दिली, ढुमढुम ढुमाक, ढुमढुम ढुमाक, ढुम!

तात्पर्य : शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ.

Read More:- Nafa Tota | Profit And Loss In Marathi PDF Download | नफा आणि तोटा सूत्र, नियम, आणि उदाहरणांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

8. कावळा आणि कोल्हा 

एकदा काय झालं एक कावळा रानावना मध्ये फिरत असताना त्याला एक चपाती चा तुकडा मिळाला चपाती चा तुकडा घेऊन येतो काळा जंगलातील एका झाडावर बसला.

चपाती खाण्याचा विचार करत असताना काळाच्या मनात कल्पना आली की आता एक चपाती मिळाले उद्या पर्यंत अन्न शोधण्याची गरज भासणार नाही तेवढ्यात झाडाखालून एक कोल्हा जात होता व त्या कुणाची नजर झाडावर बसलेल्या कावळ्याच्या चोचीतील चपाती कडे गेली.

आपल्याला देखील कावळ्याच्या चोचीतील चपाती खाण्याची तीव्र इच्छा झाली त्यासाठी एक युक्ती सुचवली.
कोल्हा कावळ्याला म्हणाला, ” काय कावळे भाऊ कसे आहात फार दिवसांनी दर्शन झाले तुमचे. फार दिवस झाले तुमचा आवाज ऐकला नाही आणि तुमच्या आवाजातील गाणे देखील ऐकले नाही किती मधुर आहे तुमचा आवाज एकदा मला तुम्ही गाणे म्हणून दाखवा.”

कोल्हे यांनी केलेली स्तुती ऐकून कावळा अगदी आनंदित झाला व गाणे म्हणण्यासाठी कावळ्याने आपली चोच उघडतात चोचीतील चपाती खाली पडली को्हा्याने ती चपाती पटकन उचलली आणि पळाला.
जात असताना कुर्ल्याला वाटेमध्ये एक नदी लागली कोल्हा पळून खूप दमला होता व त्याने पाणी पिण्यासाठी नदीमध्ये वाकून पाहिले असता त्याला स्वतःचे प्रतिबिंब दिसले.

कोल्हा होता मूर्ख त्यांना वाटले की नदीमध्ये आणखीन एक कोणतातरी कोल्हा आहे व त्याच्या तोंडामध्ये एक चपाती आहे मग ही देखील चपाती आपल्याला मिळाल्याने दोन चपात्या मिळतील व आपले पोट भरेल असे विचार करून कोल्हाने‌ ओरडण्यासाठी तोंड उघडताच त्याच्या तोंडातील चपाती नदीमध्ये पडली. अशाप्रकारे कोल्ह्याला चपाती खायला मिळाली नाही व त्याला त्याची चूक करावी.

तात्पर्य : लालच खूप वाईट सवय आहे.

Read More:- Lasavi Masavi In Marathi PDF Download | L.C.M And H.C.F म्हणजेच ल.सा.वी आणि म.सा.वी कसा काढायचा ह्याची संपूर्ण माहिती जाणून घेऊ या

9. कबुतरे आणि शिकारी

एका जंगलामध्ये खूप सारे कबूतर एकत्र राहात होते. एका शिकाऱ्यांना या जंगलामध्ये राहणाऱ्या कबुतरांची चाहूल झाली व त्याने या कबुतराला पकडण्यासाठी एक युक्ती केली. शिकारी आणि कबूतर राहणाऱ्या आसपासच्या जागेमध्ये जाळी घातले व त्या जाळांमध्ये डाळींबाचे बीअंथरले.

तेथे एक कबुतरांचा थवा आला व त्या थव्यातील कबूतरांनी केवळ डाळिंबी चे बी पाहिले व ते बी खाण्यासाठी कबुतरखाने जाळ्यावर झेप घेता सर्व कबूतर जाळ्यामध्ये अडकले.

तेव्हा सर्व कबुतरांच्या लक्षात आले की आपण एखाद्या शिकाऱ्याच्या कावडी मध्ये सापडला त्या आजारातून सुटका करण्यासाठी एक एक कबूतर बळ मिळवून देण्याचा प्रयत्न करू लागली पण एकाही कबुतराला जाळ्यातून सुटका करता आली नाही. सर्व कबूतर हा तास झाले व त्यांना वाटले की आता आपण शिकार होणार तेवढा कबुतराच्या थव्यातील एक म्हातारी कबूतर पुढे आले व सर्व कबुतरांना सांगत ते म्हणाले, ” एकट्याच्या बलाने हे जाळ उडणे अतिशय कठीण आहे परंतु सर्व कबुतराने एकसाथ मिळून ताकद लावली तर आपण हे सर्व जाळे घेऊन पडू शकतो.”

म्हाताऱ्या कबुतरा चे बोलणे सर्व कबुतरांचा लक्षात आले व सर्वांनी एक साथ मिळून ताकत लावताच जाळे उडाले व सर्व कबूतर जाळ्यात सोबत पळून गेले अशा प्रकारे सर्व कबुतरांची शिकाऱ्याच्या हातातून सुटका झाली.

तात्पर्य : एकीचे बळ मोठे असते.

10. ससा आणि कासव

एका जंगलामध्ये एक ससा आणि कासव राहत होते ससा हा नावाप्रमाणे चतुर आणि चपळ आणि कासव थोडे मंद असते. परंतु दोघांची चांगली मैत्री असते.

एकदा सशाच्या मनामध्ये कासवा सोबत पैज लावण्याची इच्छा होते व तसे ससा कासवाला म्हणतो की, आपल्या दोघांमध्ये पैज लावूया जो कोणी या पैजमध्ये जिंकेल तो सर्वश्रेष्ठ असेल. ठरल्याप्रमाणे कासव देखील पैज लावायला हो म्हणतो. त्यावर ससा कासवाला म्हणते की जो कोणी समोरच्या टेकडी पर्यंत सर्वात प्रथम पोहोचेल तो ही शर्यत जिंकेल.

ठरल्या प्रमाणे दुसर्या दिवशी कासवाची आणि सशाची पैज लागली. ससा होता चटळ ससा शर्यतीमध्ये सुरुवातीलाखूप धावत पळत सुटला आणि कासव हळूहळू शर्यत जिंकण्याचा प्रयत्न करीत होते.
थोडे पुढे धावत आले आणि त्याने मागे वळून पाहिले तर त्याला कासव कोठे ही दिसले नाहीत त्यावर कसा म्हणाला, ” ्जोपर्यंत कासव माझ्यापर्यंत पोचतील तोपर्यंत एक झोप घेतो.” असे म्हणून ससा एका झाडाखाली एक विश्रांतीसाठी थांबला.

कासव हळूहळू चालत ससापर्यंत आले व कासवाने पाहिले ते ससा विश्रांतीसाठी झोपला आहे.
कासव आपल्या मंद पावलाने हळूहळू टेकडीच्या दिशेने चालतं होते. कासव टेकडी पर्यंत पोचणार तोच सशाला जाग आली. ससा उठून पाहतो तर काय कासव त्याला कोठेही दिसेना त्यावर ससाने टेकडीच्या दिशेने धाव घेतली व तेथे गेल्याने त्याला कळाले की ही शर्यत कासवाने जिंकलेली आहे.
अशाप्रकारे ससा च्या चपळता पुढे कासवाचा प्रयत्न जिंकला.

तात्पर्य : गर्वाचे घर खाली.

Read More:- Simple Interest And Compound Interest In Marathi PDF Download | सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज चे सूत्र, उदाहरण, नियमांची संपूर्ण माहिती

11. लाकूडतोड्या आणि देवदूत

एक गाव होते त्या गावांमध्ये एक लाकूडतोड्या राहत असे तो लाकूडतोड्या रोज नदीकाठी असलेल्या एका झाडावर चढून एक लाकूडतोड्या लाकडे तोडत असतो. एक दिवस काय झाले लाकूडतोड्या नदीकाठी एका झाडावर चढून लाकडे तोडत असताना अचानक त्याची कुर्‍हाड नदीत पडते. नदी खोल असल्यामुळे त्याला नदीत जाऊन ती कुर्‍हाड काढता येत नव्हती. तो दुःखी होऊन रडू लागतो.

हे पाहून नदीतून एक देवदूत येतो. तो त्याला म्हणतो की, काळजी करू नकोस. मी तुला तुझी कुर्‍हाड काढून देतो. तो देवदूत नदीत डुबकी मारतो व सोन्याची कुर्‍हाड काढतो व म्हणतो ही का तुझी कुरहाड? लाकूडतोड्या म्हणतो, नाही ही माझी कुर्‍हाड नाही..

देवदूत पुन्हा नदीत डुबकी मारतो व चांदीची कुर्‍हाड काढतो व म्हणतो ही का तुझी कुर्‍हाड? लाकुडतोड्या म्हणतो नाही. मग तो देवदुत लोखंडाची कुर्‍हाड काढतो. लाकू़डतोड्या आता मात्र हीच माझी कुर्‍हाड असल्याचे सांगतो. कुर्‍हाड परत मिळाल्याने आनंदी होतो. लाकूडतोड्याचा प्रामाणिकपणा पाहून देवदूत लाकूडतोड्यावर प्रसन्न होतो. त्याला सोन्याची व चांदीची अशा दोन्ही कुर्‍हाडी बक्षीस म्हणून देतो.

तात्पर्य: नेहमी प्रामाणिक राहावे

12. आरोग्य हीच खरी श्रीमंती आहे | Marathi Bodh Katha

एका शहरात एक श्रीमंत माणूस राहत होता. तो पैशाने खूप श्रीमंत होता पण शरीराने आणि आरोग्याने फार गरीब होता. खरतर तो नेहमी पैसे कमवायचा विचार करत असे, पैसे मि ळवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत केली पण त्याच्याकडे शरीरासाठी अजिबात वेळ नव्हता. त्यामुळे श्रीमंत असूनही त्याला अनेक नवनवीन रोगांनी घेरले होते आणि शरीर हळूहळू अशक्त होत चालले होते, परंतु या सर्व गोष्टींकडे त्याने लक्ष दिले नाही आणि तो सतत पैसे कमावण्यात मग्न होता. एके दिवशी तो संध्याकाळी थकून घरी परतला आणि थेट झोपायला गेला. बायकोने जेवण दिले पण खूप थकल्यामुळे त्याने जेवायला नकार दिला आणि तो उपाशी झोपला.

मध्यरात्री त्याच्या अंगात तीव्र वेदना होत होत्या, त्याला समजत नव्हते की काय होत आहे? अचानक त्याच्या समोर एक विचित्र आकृती उभी राहिली आणि म्हणाली, हे मानव, मी तुझा आत्मा आहे आणि आजपासून मी तुझे शरीर सोडत आहे. ती व्यक्ती घाबरत घाबरत म्हणाली, तुला माझे शरीर का सोडायचे आहे, मी खूप कष्ट करून एवढा पैसा आणि वैभव कमावले आहे, मी इतका आलिशान बंगला बांधला आहे, तुला इथे राहायला काय हरकत आहे?

आत्मा म्हणाला, ऐक हे मानव, माझे घर हा आलिशान बंगला नाही, तर तो तुझा शरीर आहे, जो खूप अशक्त झाला आहे आणि अनेक रोगांनी घेरला आहे. कल्पना करा की जर तुम्हाला बंगल्याऐवजी जीर्ण झोपडीत राहावे लागले तर तुम्हाला किती वाईट वाटेल, त्याचप्रमाणे तुम्ही तुमचे शरीर म्हणजे माझे घर जीर्ण आणि उद्ध्वस्त केले आहे, ज्यामध्ये मी आता राहू शकत नाही. असे बोलून आत्मा त्या व्यक्तीच्या शरीरातून निघून गेला आणि जगू लागला
केवळ पैसे कमावण्याच्या लोभापोटी त्या व्यक्तीला लहान वयातच आपला जीव गमवावा लागला.

मित्रांनो, ही केवळ कथा नसून जीवनातील सत्य आहे. जगातील अनेक लोक पैसे कमवण्याच्या नादात आपले आरोग्य गमावून बसतात, आपल्या आत्म्याला आणि आत्म्याला आलिशान बंगल्याची किंवा पैशाची गरज नाही, तर निरोगी शरीराची गरज आहे, असे त्यांना वाटत नाही. ,

तात्पर्य : पैसा हे सर्वस्व नसून आरोग्य हीच सर्वात मोठी श्रीमंती आहे.

Read More:- Noun And Types Of Noun In Marathi PDF Download | नाम आणि नामाचे प्रकारांची संपूर्ण माहिती | Nam In Marathi

13. गुरु शिष्य बोधकथा | Marathi Bodh Katha

एक शिष्य आपल्या गुरूकडून आठवडाभराची रजा घेऊन गावी जात होता. मग गावी पायी जावे लागे. जाताना वाटेत एक विहीर दिसली. शिष्याला तहान लागली म्हणून त्याने विहिरीतून पाणी घेतले आणि घसा ओला केला. शिष्याला विलक्षण समाधान मिळाले, कारण विहिरीचे पाणी अतिशय गोड आणि थंड होते.

शिष्याने विचार केला – गुरुजींसाठीही इथेच पाणी का घेऊ नये. तो मुसळ भरून परत आश्रमाच्या दिशेने निघाला. त्यांनी आश्रमात पोहोचून गुरुजींना सर्व काही सांगितले. गुरुजींनी शिष्याकडून शंख घेतला आणि पाणी प्यायले आणि समाधान वाटले. तो शिष्याला म्हणाला – खरोखर पाणी गंगेच्या पाण्यासारखे आहे. शिष्य आनंदी झाला. गुरुजींची अशी स्तुती ऐकून शिष्य परवानगी घेऊन आपल्या गावी गेला.

थोड्याच वेळात आश्रमात राहणारा दुसरा शिष्य गुरुजींकडे पोहोचला आणि त्यानेही ते पाणी पिण्याची इच्छा व्यक्त केली. गुरुजींनी शिष्याला माचडी दिली. शिष्याने एक घोट घेताच, त्याने पाणी बाहेर धुऊन टाकले. शिष्य म्हणाला – गुरुजी, या पाण्यात कडूपणा आहे आणि हे पाणी थंडही नाही. तुम्ही त्या शिष्याची विनाकारण स्तुती केलीत.

गुरुजी म्हणाले – बेटा, या पाण्यात गोडवा आणि शीतलता नसेल तर काय झाले. ज्याने ते आणले त्याच्या मनात आहे. त्या शिष्याने पाणी प्यायले असते तेव्हा त्याच्या मनात माझ्याबद्दल प्रेम उत्पन्न झाले असते. हेच महत्त्वाचे आहे. तुझ्यासारखं मलाही या मुसक्याचं पाणी आवडलं नाही. पण हे बोलून मला त्याचे मन दुखवायचे नव्हते. असे असेल की मशाकात पाणी भरले की थंड होते आणि मशाक स्वच्छ नसताना हे पाणी इथे येताना तसेच राहिले नाही, पण आणणाऱ्याचे प्रेम कमी होत नाही,

तात्पर्य : प्रत्येक गोष्टींमध्ये चांगले शोधता आला पाहिजे.

Read More:- Nibandh In Marathi PDF Download | निबंध मराठी मध्ये ची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घ्या

14. निर्मल मन | Marathi Bodh Katha

गुरु शिष्य भ्रमंतीला निघाले होते. फिरता फिरता ते एका जंगलात येवून पोहोचले. जंगलात काही अंतरावर एक झरा वाहत होता. गुरुजींना तहान लागली होती. त्यांनी शिष्याच्या हाती कमंडलू दिले आणि त्याला पाणी घेवून येण्यास सांगितले. शिष्य झऱ्या पाशी गेला आणि त्याला असे दिसले कि तेथून नुकतेच बैल गाड्या गेल्या आहेत, बैल पाण्यातून गेल्याने पाणी खूप गढूळ झाले आहे. पाण्यात झाडाची पाने पडलेली आहेत. त्याने विचार केला असे घाण झालेले पाणी गुरूंसाठी नेणे योग्य नाही. तो तसाच परत गुरूंकडे गेला आणि म्हणाला,”गुरुजी, पाणी खूप गढूळ आहे, आपल्याला दुसरी काही तरी व्यवस्था पहावी लागेल.” गुरुजी म्हणाले,” अरे त्यापेक्षा तू असे कर पुन्हा त्या झऱ्यापाशी जा आणि पुन्हा पाणी आणण्याचा प्रयत्न कर.”

शिष्य गेला, त्याला पुन्हा पाणी गढूळ दिसले, तो परत आला, गुरुनी त्याला परत पाठवले, असे चार पाच वेळेला झाले. शेवटी शिष्य कंटाळला, त्याच्या चेहऱ्यावर नाराजीचे आणि कंटाळलेले भाव दिसू लागले पण शिष्य गुरुज्ञा मोडायला तयार नव्हता. गुरुनी त्याला परत पाणी आणायला पाठवले. आताच्या वेळी त्याला मात्र आश्चर्य वाटले कारण या वेळी पाणी अगदी नितळ, स्वछ नि निर्मळ होते. त्याने ते पाणी कमंडलू मध्ये भरले आणि गुरूंसाठी घेवून आला. गुरुनी पाणी प्राशन केले आणि शिष्याला म्हणाले,”वत्सा ! आपल्या मनात सुद्धा असेच कुविचारांचे बैल धिंगाणा घालत असतात. ते मनाची निर्मळता कमी करून मनाला मलिन करण्याचा प्रयत्न करतात. पण आपण त्यापासून सावध राहिले पाहिजे. कुविचारांचा प्रभाव आपल्या मनावर होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे. मनाच्या झरयातील पाणी शांत होण्याची प्रतीक्षा जर आपण केली तर मनात कायम स्वच्छ, चांगले विचार येतील.

तात्पर्य :भावनेच्या भरात कधीही निर्णय घेवू नये.”

Read More:- Best Vanrakshak Book PDF Download | वन रक्षक भरती च्या तयारी साठी सर्वोत्तम पुस्तकांची माहिती जाणून घ्या

15. आई वडिलांचे प्रेम | Marathi Bodh Katha

एक तरुण बागेत काम करीत होता. सुर्य डोक्यावर आला तरी त्याचे बागकाम संपत नाहिसे पाहून त्याची आई घरातून ओरडली, ‘अरे नारायणा ! ऊनं कोण रणरणतं आहे ! घरात ये ना ? वाटल्यास उरलेलं काम संध्याकाळी कर.’ दोन तीन वेळा सांगूनही आपला मुलगा आपल्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, असं पाहून त्या बाईने आपल्या चार-पाच वर्षांच्या नातवाला-म्हणजे उन्हात बागकाम करणाऱ्या मुलाच्या मुलाला उचललं आणि बागेत असलेल्या आपल्या मुलापाशी नेऊन ठेवलं. आपल्या मुलाला उन्हात आणून ठेवल्याचं पाहून त्याचा पिता आपल्या आईवर भडकून म्हणाला, ‘आई ! अगं ऊन कोण तापलयं ! आणि दादूला तू इथे उन्हात आणून ठेवलसं ? त्याला उन्हाचा त्रास नाही का होणार?’ त्या तरुणाची आई मुद्दाम म्हणाली, ‘ऊन लागलं तर लागलं; त्यात विशेष काय आहे?’तो तरुण म्हणाला, ‘आई ! तो माझा मुलगा आहे.

त्याल ऊन लागतयं म्हणून नुसता त्यालाचा त्रास होत नाही, तर त्याला होणाऱ्या त्रासामुळं माझ्याही जिवाची तगमग होऊ लागली आहे.’ यावर आई म्हणाली, ‘मग नारायणा , तू अस विचार कर की, तुझ्या या मुलाला ऊन लागताच जशी तुझ्या जिवाची तगमग सुरु झाली, तशीच तगमग तू मघापासून उन्हात काम करीत असल्यामुळे माझ्याही जिवाची तगमग होत नसेल का ?’ वृध्द व प्रेमळ आईचा हा बिनतोड युक्तीवाद ऎकून गोविंदा निमूटपणे कुदळ, कोयती उचलून, बागेतून हसत हसत घरात गेला.

तात्पर्य :आई वडिलांचे प्रेम खूप असते त्यांचं कायम ऐकावे.

Read More:- Percentage In Marathi PDF Download | शेकडेवारी ची सूत्र, नियम, उपयोग आणि इतर संपूर्ण माहिती जाणून घ्या

Free Marathi Bodh Katha PDF Download

ह्या Marathi Bodh Katha PDF Downloa :- आपण ह्या आर्टिकल मध्ये मराठी बोध कथा आणि त्यांचे तात्पर्य ह्यांची सविस्तर पणे जाणून घेतली आहे. अनेक जणाना अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही marathi bodh katha pdf free download करण्यासाठी PDF देत आहोत. तुम्ही Marathi Bodh Katha PDF Download आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

Conclusion Of Marathi Bodh Katha

आपण या पोस्ट मध्ये आपण मराठी मध्ये बोध कथा ह्यांची संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण marathi bodh katha, marathi bodh katha tatparya, marathi bodh katha small, marathi bodh katha in marathi language, marathi bodh katha pdf, downlod marathi bodh katha हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही वनरक्षक भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

FAQ Frequently Asked Questions For Marathi Bodh Katha

Q1. बोधकथा म्हणजे काय ?

Ans:- बोधकथा म्हणजे ज्या कथा मधून आपल्याला काहीतरी बोध होतो अशा कथा किंवा गोष्टी होय.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages