BDO Officer Information In Marathi:- Group Development Officer is a key officer in Panchayat. Knowing the BDO post information is essential for a student preparing for the competitive exam. In this article, we are going to get complete information about BDO i.e. Block Development Officer.
BDO Officer Information In Marathi:- गट विकास अधिकारी हा पंचायातीमधील एक प्रमुख अधिकारी आहे. BDO ह्या पदाची माहिती जाणून घेणे हे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्याला आवश्यक असते. आपण ह्या आर्टिकल मध्ये BDO म्हणजे Block Development Officer ची संपूर्ण माहिती घेणार आहोत.
BDO Information In Marathi
BDO Full Form Block Development Officer हा पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख गटविकास अधिकारी असतो. तो पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव असतो. तसेच तो पंचायत समितीच्या स्थायी समितीचाही पदसिद्ध सचिव असतो. त्याची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एम.पी.एस.सी.) तर नेमणूक राज्य सरकारमार्फत केली जाते. त्याची पंचायत समिति मध्ये वेग वेगळे कम करत असतो जसे की, पंचायत समितीचा कामकाजाचा अहवाल तयार करणे, अंदाजपत्रक तयार करणे, सभांना उपस्थित राहून इतीवृत्त लिहीणे, कर्मचाऱ्यांच्या रजा मंजूर करणे इ.
Read More:- Marathi Mulakshare PDF Download | मराठी मुळाक्षरे आणि त्याची संपूर्ण माहिती
BDO Full Form
BDO Full Form हा Block Development Officer चा पूर्ण अर्थ आहे.
नियुक्ती | Appointment
त्याची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एम.पी.एस.सी.) तर नेमणूक राज्य सरकारमार्फत केली जाते. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 97 मध्ये प्रत्येक गटासाठी एक गटविकास अधिकारी असेल अशी त्या मध्ये तरतूद करण्यात आली आहे. त्या नुसार गट विकास अधिकाऱ्याची नेमणूक करतात.
Read More:- Paribhasik Shabda Marathi PDf Download | पारिभाषिक शब्द मराठी ची संपूर्ण माहिती जाणून घ्या
वेतन | Salary
BDO गट विकास अधिकारी हे राजपत्रित पद असून त्यांचे अंदाजित मासिक वेतन हे रू.75,000/- इतके असेल. गट विकास अधिकारी (bdo) चे वेतन मॅट्रिक्स मधील Salary Level S – 20 : 56,100 ते 1,77,500 अधिक महागाई भत्ता व इतर शासन नियमानुसार देय भत्ते त्यांना देय असतात.
Read More:- प्रयोग व त्याचे प्रकार मराठी व्याकरण ची संपूर्ण माहीती जाणून घ्या | Voice And It’s Types In Marathi
कामे | Work
- गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचे अर्थसंकल्प तयार करणे, बैठका बोलावणे, ग्रामपंचायतिंच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
- तालुकास्तरावर पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख म्हणून BDO हे काम बघत असतात. पंचायत समितीचे सर्व करार त्याच्या सहीनीशी केले जातात.
- पंचायत समितीचा गट विकास अधिकारी हा प्रशासकिय अधिकारी आणि कार्यकारी अधिकारी असतो.
- पंचायत समितिच्या स्थायी समिती चे सचिव म्हणून काम पण तो पाहत असतो.
- गट विकास अधिकारी हा पंचायत समितीच्या सभापतीस प्रशासकीय बाबींवर सल्ला देण्याचे ही काम करत असतो.
- तालुक्यामधील सर्व विकास कामांची अंमलबजावणी करणे. विकास योजनांवर देखरेख ठेवणे. नियंत्रण करणे हे कामे तो करत असतो.
- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पंचायत समितीचा वार्षिक अहवाल सादर करणे.
- पंचायत समितीमधील Group-C व Group-D कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे आणि त्यांच्या रजा मंजूर करून देणे.
- पंचायत समितीचा मधील सर्व खर्च गटविकास अधिकाऱ्याच्या संमतीने व सहीनिशी केला जातो.
Read More:- संशोधक व त्यांनी लावलेले शोध ह्याची संपूर्ण माहिती | Scientists And Their Inventions In Marathi PDF Download
BDO गट विकास अधिकारी बद्दल महत्त्वपूर्ण माहिती | BDO Information In Marathi
गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा एक महत्वाचा अधिकारी असतो. त्याला इंग्रजीमध्ये BDO म्हणजेच ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर असे म्हणतात. गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा सचिव असतो. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गटविकास अधिकाऱ्याची निवड होत असते. तर त्याची नेमणूक महाराष्ट्र शासन द्वारे केली जाते. गटविकास अधिकारी हा Class 1 व Class 2 दर्जाचा अधिकारी असतो.
पंचायत समितीचा प्रशासकीय अधिकारी आणि समितीचा कार्यकारी अधिकारीही हा गटविकास अधिकारी असतो .गटविकास अधिकाऱ्यांवर नियंत्रण हे त्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे असते. गट विकास अधिकारी हा पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव असतो. तसेच तो पंचायत समितीचे अंदाजपत्रक गटविकास अधिकारी तयार करतो. पंचायत समितीस मिळणाऱ्या अनुदानाच्या रकमा काढण्याचे व वाटप करण्याचे अधिकार हा त्या गटविकास अधिकाऱ्याला असतो. पंचायत समितीचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी (ceo) ह्यांच्या कडे गटविकास अधिकारी हे पाठवीत असतात.
गटविकास अधिकाऱ्याने काही गैरप्रकार केल्यास त्याल शिक्षा देण्याचा अधिकार हा तेथील विभागीय आयुक्त यांना असतो. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यामधील एक प्रमुख दुवा म्हणून गटविकास अधिकारी काम करत असतो. आणि राज्य शासन व पंचायत समिती यामधील ही एक एक प्रमुख दुवा म्हणून गटविकास अधिकारी काम पाहतो. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 97 मध्ये प्रत्येक गटासाठी एक गटविकास अधिकारी असेल अशी त्या मध्ये तरतूद करण्यात आली आहे. त्या नुसार गट विकास अधिकाऱ्याची नेमणूक करतात.
Read More:- Marathi Grammar – Marathi Vyakaran | मराठी व्याकरणाची संपूर्ण सविस्तर माहिती PDF Download सह
Conclusion
आपण ह्या आर्टिकल मध्ये BDO Information In Marathi ची संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. त्याचे कार्य, वेतन, नियुक्ती, त्याचा बद्दल इतर आवश्यक माहिती. आम्ही आशा करतो की तुम्हाला ह्या आर्टिकल मधून गट विकास अधिकाऱ्या बद्दल संपूर्ण आवश्यक माहिती मिळाली असेल.
FAQ Frequently Asked Questions For BDO Information In Marathi
Ans:- BDO Full Form हा Block Development Officer हा पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख गटविकास अधिकारी असतो.
Ans:- गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा एक महत्वाचा अधिकारी असतो. त्याला इंग्रजीमध्ये BDO म्हणजेच ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर असे म्हणतात. गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा सचिव असतो.
Ans:- हा पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख गटविकास अधिकारी असतो. तो पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव असतो. तसेच तो पंचायत समितीच्या स्थायी समितीचाही पदसिद्ध सचिव असतो. त्याची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एम.पी.एस.सी.) तर नेमणूक राज्य सरकारमार्फत केली जाते.
Ans:- बीडीओ अधिकारी कसा होण्यासाठी तुम्हाला MPSC ची BDO ची परीक्षा देणे आवश्यक आहे. ती परीक्षा दिल्यानंतर तुमचे निवड होऊन तुम्ही अधिकारी बनू शकतात.
Ans:- हा पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख गटविकास अधिकारी असतो. तो पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव असतो. तसेच तो पंचायत समितीच्या स्थायी समितीचाही पदसिद्ध सचिव असतो. त्याची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एम.पी.एस.सी.) तर नेमणूक राज्य सरकारमार्फत केली जाते.
Ans:- गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचे अर्थसंकल्प तयार करणे, बैठका बोलावणे, ग्रामपंचायतिंच्या कामकाजावर देखरेख ठेवणे., तालुकास्तरावर पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख म्हणून BDO हे काम बघत असतात. पंचायत समितीचे सर्व करार, त्याच्या सहीनीशी केले जातात., पंचायत समितीचा गट विकास अधिकारी हा प्रशासकिय अधिकारी आणि कार्यकारी अधिकारी असतो.