Advertisement

Vitamin Chart in Marathi PDF Download | विटामीन ची संपूर्ण माहिती, प्रकार, स्त्रोत बद्दल सर्व माहिती जाणून घ्या

vitamin chart in marathi

Vitamin Chart In Marathi PDF:- Vitamins are vitamins that are essential nutrients for the growth of our body which we get from food. Vitamins are compounds of carbon. Also, since vitamins are not produced in the body, we get them from sources like fruits, vegetables, and meat. All Vitamin Chemical Names Diseases Caused by Deficiency Sources of Acquisition Questions are asked in the GK Subject in Competitive Examination To prepare for these questions, in today’s post, we have provided Vitamin Chart In Marathi PDF full information.

Vitamin Chart in Marathi PDF Download

Vitamin Chart In Marathi PDF:- व्हिटॅमिन्स म्हणजेच जीवनसत्व होय जीवनसत्व हे आपल्या शरीराच्या वाढीसाठी लागणारे महत्वाचे पोषक तत्व असतात जे आपल्याला अन्नामधून मिळतात.जीवनसत्व हि कार्बन ची सयुंगे असतात. तसेच जीवनसत्व हि शरीरामध्ये तयार होत नसल्या मुळे ती आपल्याला फळ ,भाजीपाला ,मांस या सारख्या स्त्रोत मधून प्राप्त होतात. व्हिटॅमिन त्यांचे रासायनिक नाव त्यांच्या कमतरतेमुळे होणारे रोग ते मिळवण्याचे स्रोत या वर आधारित प्रश्न स्पर्धा परीक्षा मध्ये GK च्या विषय मध्ये विचारले जातात याच प्रश्नांची तयारी करण्यासाठी आजच्या या पोस्ट मध्ये आपण पाहुयात Vitamin Chart In Marathi PDF संपूर्ण माहिती.

Read More:- All Kalam In Marathi PDF Download | Kalam 1 To 395 | भारतीय राज्यघटनेतील कलम 1 ते 395 पर्यंत च्या सर्व कलमांची माहिती जाणून घ्या

व्हिटॅमिन म्हणजे काय ? | Whats Is Vitamin ? | Vitamin Information In Marathi

  • व्हिटॅमिन ला मराठी जीवनसत्व असे म्हणतात याचाच अर्थ शरीराच्या आरोग्य साठी महत्वाचे असणारे पोषक घटक होय.
  • जीवनसत्वांचा शोध सर फ्रेडीरिक गॉवलॅड हॉपकिन नावाच्या शास्त्रज्ञाने लावला.
  • फक्त मानवच नाही तर सर्व सजीवांना सूक्ष्म प्रमाणात जीवनसत्त्वांची आवश्यकता असते.
  • जीवनसत्व हि कार्बनची सयुंगे असतात.
  • एकूण १३ जीवनसत्व व्हिटॅमिन्स आता अस्तित्वात आहेत.

Read More:- Direct And Indirect Speech In Marathi With Examples PDF Download | English Grammar In Marathi

व्हिटॅमिन चे प्रकार | Types Of Vitamin

मानवी शरीराला आवश्यक असलेल्या व्हिटॅमिनची संख्या 13 आहे. या व्हिटॅमिनना दोन गटात विभागले जाते:

  • वसामध्ये विरघळणारे व्हिटॅमिन: अ, डी, ई, आणि के
  • पाण्यात विरघळणारे व्हिटॅमिन: बी1, बी2, बी3, बी5, बी6, बी9, बी12
  • व्हिटॅमिन चे मुख्य असे २ प्रकार आहेत १ म्हणजे जलविद्राव्य (पाण्यात विरघळणारी)– जे कि जीवनसत्व आहे आणि दुसरा म्हणजे स्निग्ध विद्राव्य (स्निग्ध पदार्थात विरघळणारी ) जी कि अ, ड, ई, आणि के ही जीवनसत्त्वे आहेत.

जीवनसत्व संपूर्ण माहिती | Vitamins Information

या मध्ये आपण प्रत्येक जीवनसत्वाची महत्वाची माहिती विस्तारित स्वरूपात पाहुयात.

 अ-जीवनसत्त्व | Vitamin – A

  • जीवनसत्व अ चे शास्त्रीय नाव रेटीनॉल आहे.
  • जीवनसत्व अ लहानपानपासून योग्य प्रमाणात प्राप्त झाले तर पूढच्या आयुष्यमध्ये त्याचा फायदा चांगला होतो.
  • हे व्हिटॅमिन डोळे व त्वचा यांच्या आरोग्याकरिता तसेच हाडांच्या बाळंतली साठी महत्वाचे असते.
  • अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे  त्वचा, रोग व रात आंधळेपणा सारखे आजार होतात.
  • अ व्हिटॅमिन मिळवण्याचा मुख्य स्रोत टमाटे, अंडी, यकृत, भाज्या फळे, आवळा, सोयाबीन, मांस हे आहेत.

Read More:- All Synonyms Words List PDF Download From A To Z | Similar Words Lists

जीवनसत्त्व – ब | Vitamin – B

  • ब जीवनसत्व vitamin B हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे.
  • ब जीवनसत्व हे विविध जीवनसत्वांचा समूह आहे या मध्ये जीवनसत्त्व ब १ ब २ब ३ ब ५ ब ६ ब ७ ब ९ ब १२ असे समूह आहेत.
  • याची शास्त्रीय नावे अनुक्रमे थायमिन , रायबोफ्लेविन  ,नायसीन,पेंटोथेनिक ऍसिड,पिरीडॉक्सीन  ,बायोटिन,फॉलीक ऍसिड आणि सायनोकोबालमीन अशी आहेत.
  • ह्या जीवनसत्वामुळे आपल्या शरीरातील विविध पेशींमध्ये ऊर्जा निर्माण होते.
  • ब जीवनसत्व हे आपल्याला अनेक अन्नपदार्थातून मिळते. त्यात फळभाज्या, तांदूळ , टोमॅटो, ताजी फळे, बटाटा, शेंगदाणे, यीस्ट, चणा, मका, कोबी, मासे, अंडी, हिरव्या पालेभाज्या, बीन्स, बदाम, अक्रोड व विविध वनस्पती बियाणे यांचा समावेश आहे.
  • या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे  बेरीबेरी नावाचा आजार होतो.

Read More:- All Opposite Words List PDF Download From A To Z | Antonyms Words In English

क-जीवनसत्त्व | Vitamin – C

  • Vitamin C हे आपल्या शरीरासाठी सगळ्यात महत्वाचे असे जीवनसत्व मानले जाते.
  • आपल्या शरीरामध्ये अँटीऑक्सिडेंटचे कार्य व्यवस्थित ठेवण्यासाठी आणि शरीरात कोलाजीनची निर्मिती करण्यासाठी हे जीवनसत्व महत्वपूर्ण असते.
  • क जीवनसत्वाचे रासायनिक नाव अस्कॉर्बीक ऍसिड असे आहे.
  • हे जीवनसत्व दात आणि हिरड्याच्या आरोग्याकरिता महत्वाचे असते. या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे स्कर्व्ही नावाचा आजार होतो. तसेच हिरड्यांच्या रक्त पुरवठ्यात व वाढीत अडथळा येतो. जखमा भरून न येता त्यांत पू होतो
  • हे जीवनसत्व . लिंबुवर्गीय फळे टोमॅटो, आवळा, संत्री, मोसंबी इत्यादि मध्ये आढळते तसेच इंजेकशन आणि औषध स्वरूपात घेता येते.

Read More:- 307 Kalam In Marathi | भारतीय दंड संहिता कलम 307 ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

 ड-जीवनसत्त्व | Vitamin – D

  • ड जीवनसत्वाचे रासायनिक नाव हे कॅल्सिफेरॉल असे आहे.
  • Vitamin D हे हार्मोन असून ते आपले दात, मज्जातांतू, स्नायू व हाडे यांना बळ देण्यासाठी आवश्यक आहे.
  • हे जीवनसत्व आपल्या शरीरातील आतड्यातून कॅल्शियम शोषून घेऊन ते हाडांना आणि दातांना मजबूत करते.
  • यामुळे आपल्या दात, हिरड्या, हाडे व त्वचेचे आरोग्य चांगले राहते.
  • जर हे ड जीवनसत्व कमी असेल तर  अस्थिचा मृदुपणा, दंतक्षय व त्वचा रोग असे रोग होतात.
  • Vitamin D मिळवण्याचे मुख्य स्रोत हे  मासे, कोर्ड लिव्हर, ऑईल, अंडी सूर्याची कोवळी किरणे हे आहेत.

Read More:- Fundamental Rights In Marathi PDF Download | भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि त्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

 ई-जीवनसत्त्व | Vitamin – E

  • Vitamin E चे शास्त्रीय नाव टोकोफेरॉल असे आहे हे.
  • ई जीवनसत्व हे शरीरातील रक्तात लाल रक्तकोशिका Red Blood Cells बनवण्यासाठी उपयोगी असते.
  • तसेच हे जीवनसत्व  शरीरातील फँटी ऍसिडचे संतुलन व्यवस्थित ठेवण्यासाठी महत्वाचे असते.त्याचबरोबर  योग्य प्रजननासाठी सुद्धा व्हिटॅमिन इ महत्वाचे असते.
  • या जीवनसत्वाच्या अभावामुळे  वांझपणा स्नायूचा अशक्तपणा, लाल पेशीचे विघटन, वारंवार गर्भपात होणे असे रोग होऊ शकतात.
  • Vitamin E मिळवण्याचे महत्वपूर्ण स्रोत हे अंकुरित कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या हे आहेत.

Read More:- Time, Work And Speed In Marathi PDF Download | काळ, काम, वेग सूत्र, आणि उदाहरणे ह्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

के – जीवनसत्त्व | Vitamin – K

  • Vitamin K याला शास्त्रीय नाव नॅप्थोक्विनान असे आहे.
  • हे जीवनसत्व आपल्या ला झालाय जखमेनंतर होणारा रक्तस्त्राव थांबविण्याचे कार्य करते म्हणजेच रक्त गोठण्यास मदत करते.
  • या जीवनसत्वाच्या अभावामुळे जखमी नंतर रक्तस्त्राव ना थांबता वाहत राहतो.
  • जीवनसत्व क मिळवण्याचा मुख्य स्रोत हा पालेभाज्या व कोबी ब्रोकली आणि बिट हे आहेत.

Read More:- Bhagat Singh Information In Marathi PDF Download | भगत सिंह ह्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Vitamin Chart In Marathi PDF

  • या चार्ट मध्ये व्हिटॅमिन आणि त्याची शास्त्रीय नावे, मिळणारे फायदा ,अभावामुळे होणारे रोग तसेच मुख्य स्रोत या बद्दल माहिती आहे.
Sr.NoVitamin Scientiesउपयोगअभावी होणारे आजारSources
जीवनसत्त्व अरेटिनॉलडोळे व त्वचा यांच्या आरोग्याकरितात्वचा, रोग व रात आंधळेपणाटमाटे, अंडी, यकृत, भाज्या फळे, आवळा, सोयाबीन, मांस
 जीवनसत्त्व ब १थायमिन चेतासंस्थेचे आरोग्यबेरीबेरी धन्य, यीस्ट, यकृत,
 जीवनसत्त्व ब २रायबोफ्लोविनचयापचय क्रियेकरितापेलाग्राअंडी, यकृत, मांस, दूध व शेंगदाणे
जीवनसत्त्व ब ३ नायसिन त्वचा व केसत्वचारोग व केस पांढरेदूध, टमाटे, उस, यीस्ट, अंडी
 जीवनसत्त्व ब ५ पेंटोथेनिक ऍसिडहार्मोन्सच्या कार्यासाठी जीवनसत्त्व ब ५ उपयुक्त अनामियाकोबी, ब्रोकोली
 जीवनसत्त्व ब ६ पायरीडॉक्झिनरक्त संवर्धनाकरिताअनामियायकृत व पालेभाज्या
 जीवनसत्त्व ब ७  बायोटिनआपल्या अन्नाचे उर्जेमध्ये रूपांतर करण्यास मदत करतेडोळा, केस, त्वचा आणि मेंदूच्या कार्यासाठी हे महत्वाचे आहे. अंडी ,रताळे ,मशरूम ,केळी
जीवनसत्त्व ब ९फॉलीक ऍसिडऍसिड रक्ताचे आरोग्य राखणेअनामियायकृत व पालेभाज्या
जीवनसत्त्व ब १२ सायनोकोबालमीनक्तनिर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या काही मूलभूत चयापचय प्रक्रियांसाठी बेरीबेरी, पेलाग्रा,खराब पचन,हिरव्या पालेभाज्या, बीन्स आणि मटार
१० जीवनसत्त्व  अस्कॉर्बीक ऍसिड  दात व हिरड्यांच्या आरोग्याकरिता    स्कव्हा, हिरड्या सुजणे, हिरड्यांमधून रक्त येणे   लिंबुवगाय फळे, टोमॅटो, आवळा, संत्री, मोसंबी इत्यादि
११जीवनसत्त्व कॅल्सीफेरॉलदात, हिरड्या, हाडे व त्वचेचे आरोग्यअस्थिचा मृदुपणा, दंतक्षय व त्वचा रोगमासे, कोर्ड लिव्हर, ऑईल, अंडी सूर्याची कोवळी किरणे
१२ जीवनसत्त्व टोकोफेरॉल योग्य प्रजननासाठी  वांझपणाअंकुरित कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या
१३ जीवनसत्त्व के  फायलोक्विनोन रक्त गोठण्यास मदत रक्त गोठत नाहीपालेभाज्या व कोबी

Read More:- All Problems On Age In Marathi PDF Download | वयवारी वर सूत्रे, प्रश्न आणि उत्तरे ह्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Vitamin Chart in Marathi PDF Download

Vitamin Chart in Marathi PDF Download :- आपण या पोस्ट मध्ये विटामीन ची संपूर्ण माहिती, प्रकार, स्त्रोत संपूर्ण माहिती सविस्तर पणे बघितली आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

Conclusion Of Vitamin Chart In Marathi

Vitamin Chart in Marathi PDF Download :- आपण ह्या विटामीन ची संपूर्ण माहिती, प्रकार, स्त्रोत बद्दल सर्व संपूर्ण सविस्तर पणे माहिती जाणून घेतली आहे. Vitamin Chart In Marathi PDF Download अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही PDF Download  करण्यासाठी Vitamin Chart In Marathi PDF देत आहोत. तुम्ही आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

FAQ Frequently Asked Questions For Vitamin Chart In Marathi

Q1. जीवनसत्व अ चे रासायनिक नाव काय आहे?

Ans:- जीवनसत्व अ चे रासायनिक नाव रेटिनॉल आहे. हे वसामध्ये विरघळणारे जीवनसत्त्व आहे जे दृष्टी, प्रजनन, आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी आवश्यक आहे. रेटिनॉल हे जीवनसत्व अचे मूळ स्वरूप आहे

Q2. व्हिटॅमिन किती आहेत?

Ans:- मानवी शरीराला आवश्यक असलेल्या व्हिटॅमिनची संख्या 13 आहे. या व्हिटॅमिनना दोन गटात विभागले जाते:
1). वसामध्ये विरघळणारे व्हिटॅमिन: अ, डी, ई, आणि के 2).पाण्यात विरघळणारे व्हिटॅमिन: बी1, बी2, बी3, बी5, बी6, बी9, बी12

Q3. रोज प्रत्येक व्हिटॅमिन ची किती प्रमाणात गरज असते?

Ans:- मानवी शरीराला आवश्यक असलेल्या प्रत्येक व्हिटॅमिनची रोजची गरज खालीलप्रमाणे आहे:
वसामध्ये विरघळणारे व्हिटॅमिन 1)अ-जीवनसत्त्व (रेटिनॉल): पुरुषांसाठी 900 मायक्रोग्राम, महिलांसाठी 700 मायक्रोग्राम 2) ड-जीवनसत्त्व (कॅल्सीफेरॉल): पुरुषांसाठी 15 माइक्रोग्राम, महिलांसाठी 15 माइक्रोग्राम 3) ई-जीवनसत्त्व (टोकोफेरॉल): पुरुषांसाठी 15 मिलीग्राम, महिलांसाठी 12 मिलीग्राम 4) के-जीवनसत्त्व (फिलोक्विनोन): पुरुषांसाठी 120 माइक्रोग्राम, महिलांसाठी 90 माइक्रोग्राम

Q4. दररोज किती प्रमाणात जीवनसत्व आवश्यक आहे?

Ans:- Ans:- मानवी शरीराला आवश्यक असलेल्या प्रत्येक व्हिटॅमिनची रोजची गरज खालीलप्रमाणे आहे:
वसामध्ये विरघळणारे व्हिटॅमिन 1)अ-जीवनसत्त्व (रेटिनॉल): पुरुषांसाठी 900 मायक्रोग्राम, महिलांसाठी 700 मायक्रोग्राम 2) ड-जीवनसत्त्व (कॅल्सीफेरॉल): पुरुषांसाठी 15 माइक्रोग्राम, महिलांसाठी 15 माइक्रोग्राम 3) ई-जीवनसत्त्व (टोकोफेरॉल): पुरुषांसाठी 15 मिलीग्राम, महिलांसाठी 12 मिलीग्राम 4) के-जीवनसत्त्व (फिलोक्विनोन): पुरुषांसाठी 120 माइक्रोग्राम, महिलांसाठी 90 माइक्रोग्राम

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages