Advertisement

Panchvarshiya Yojana |Five Year Plans of India (From 1951 to 2017)|भारताच्या सर्व पंचवार्षिक योजनां ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Panchvarshiya Yojana | Five-Year Plans of India

Five-Year Plans of India | Panchvarshiya Yojana:- Five-Year Plans of India Information and Panchvarshiya Yojana:- After India became independent, the Government of India was putting more emphasis on economic planning. In this, the Five Year Plans since 1947 have been of great importance. It is necessary to look at the full details of all the Five Year Plans till 2017 to see that different questions are asked in the competitive exams about India. In today’s post, we will see the complete information about Five Year Plans of India Marathi 2024, as well as the study. This information can be downloaded in PDF format.

Advertisement

Five-Year Plans of India Information

Five-Year Plans of India Information| Panchvarshiya Yojana:- भारत स्वातंत्र्य झाल्या नंतर भारत सरकार अर्थव्यस्था नियोजनावर जास्त भर देत होते. या मध्ये १९४७ पासून आतापर्यंत झालेल्या पंचवार्षिक योजना खूपच महतवाच्या आहेत. भारत बद्दल स्पर्धा परीक्षांमध्ये वेगवेगळे प्रश्न विचारले जातात या साठी २०१७ पर्यंत झालेल्या सगळ्या पंचवार्षिक योजनांची संपूर्ण माहिती पाहणे आवश्यक आहे. आजच्या या पोस्ट मध्ये आपण Five Year Plans of India Marathi 2024 संपूर्ण माहिती पाहुयात तसेच अभ्यासातही हि माहिती pdf स्वरूपात सुद्धा दवनलोड केली जाऊ शकते.

Advertisement

Read More:- Shetkari Chalval Information| शेतकरी चळवळीची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Five Year Plans (1951 ते 2017) | पंचवार्षिक योजना (1951 ते 2017)

  • Panchvarshiya Yojana |पंचवार्षिक योजनांची सुरवात १९५१ पासून झाली या योजनांमधून भारत सरकार कडून नियोजन पूर्ण विकास करण्याचा प्रयत्न केले गेला.
  • प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये एक महत्वाचं असा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्या पद्धतीने कार्य केले गेले आहे. 

1st Five Year Plan in India | पहिली पंचवार्षिक योजना

  • पहिली पंचवार्षीक योजना हि 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956 झाली होती.
  • या योजनेचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू तर उपअध्यक्ष हे गुलजारीलाल नंदा हे होते.
  • या योजनेमधून राष्ट्रीय उत्पन्नात 2.1 % वार्षिक वाढ तसेच कृषी क्षेत्राचा विकास करण्याचे उद्दिष्टे होते.
  • तसेच अन्नधान्य उत्पादन वाढवून चलनवाढ आटोक्यात आणणे हे हेतू होते.
  • पहिल्या पंचवार्षिक योजनेमधून राष्ट्रीय उत्पन्न – 3.6 % (वार्षिक वृद्धीदर) झाला तसेच चलनवाढीचा दर कमी झाला.
  • ठरवल्या प्रमाणे अन्नधान्य उत्पादन – 66.9 MT पर्यंत गेले पण औद्योगिक वाढ मात्र संथ होती .
  • या योजनेमध्ये कृषी व सिंचन, वाहतूक व दळणवळण, सामाजिक सेव यावर सार्वजनिक खर्च केले गेले.

Read More:- NATO Information In Marathi | नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन बद्दल ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

2nd Five Year Plan in India| दुसरी पंचवार्षिक योजना-

  • दुसरी पंचवार्षिक योजना 1 एप्रिल 1956 ते 31 मार्च 1961 मध्ये झाली या योजनेचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू हे होते तर उपाध्यक्ष हे टी टी कृष्णामचारी हे होते .
  • या योजनेला भोतिकवादि योजना असे सुद्धा म्हंटले जाऊ शकते.
  • योजनेचे उद्धिष्ट ४.५ % वार्षिक वृद्धिदर तसेच वाहतूक आणि दळणवळण वर भर देणे हे होते.
  • योजनेमध्ये द्योगिकीकरण भर भर देण्यात आलेला तसेच रोजगार निर्मिती तसेच लघुउदयोग्यांवर लक्ष करण्यात आले होते.
  • योजनमधून मोठ्या प्रमाणात चलनवाढ सध्या करण्यात आली तसेच ४.२ % वार्षिक वृद्धिदर प्राप्त झाला.

3rd Five Year Plan in India | तिसरी पंचवार्षिक योजना-

  • तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषी व उद्योग दोन्हीवर भर देण्यात आला होता.
  • ह्या योजनेचा कार्यकाळ 1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966 हा होता तसेच अध्यक्ष – जवाहरलाल नेहरु आणि लालबहादूर शास्त्री आणि उपाध्यक्ष – सी एम त्रिवेदी आणि अशोक मेहता हे होते.
  • योजनेची उद्दिष्ठे 5.6% वार्षिक वृद्धीदर सध्या करणे तसेच सार्वजनिक खर्च – 1) वाहतूक व दळणवळण 2) उद्योग 3) कृषी व सिंचन वाढवणे हे होते.
  • या तोजनेच्या कार्यकाळ मध्ये वार्षिक वृद्धिदर २.८ टक्के इतका होता तर अन्नधान्य उत्पादन मात्र होते.
Advertisement

Read More:- Lok Sabha Information In Marathi | भारतातील लोकसभेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या

4th Five Year Plan in India | चौथी पंचवार्षिक योजना

  • चवथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये स्थैर्यासह आर्थिक वाढ व आर्थिक स्वावलंबन या गोष्टींवर भर देण्यात आला.
  • योजनेचा कार्यकाळ 1 एप्रिल 1969 ते 31 मार्च 1974 हा आहे तसेच अध्यक्ष –इंदिरा गांधी आणि उपाध्यक्ष – धनंजय गाडगीळ, सी.सुब्रमण्यम, दुर्गप्रसाद धर खे होते.
  • या योजनेमध्ये NDP आधारित ५.७ टक्के वार्षिक वृद्धिदर गाठण्याचे उद्दिष्ट होते.
  • तसेच सर्वाधिक खर्च कृषी व सिंचन आणि त्यानंतर उद्योग आणि वाहतूक दळणवळण केला.गेला
  • योजनेमध्ये शिक्षण आणि मनुष्यबळ विकास यावर भर देण्यात आला.
  • या योजनेमधून 3.3% वार्षीक वृद्धिदर सध्या झाला तसेच तीव्र चलनवाढ झाली.

5th Five Year Plan in India | पाचवी पंचवार्षिक योजना

  • पाचव्या पंचवार्षिक योजनेमध्ये दारिद्र्य निर्मूलन व स्वावलंबन आणि आत्मनिर्भरता यावर लक्ष देण्यात आले होते.
  • हि योजना 1 एप्रिल 1973 ते 31 मार्च 1978 दरम्यान झाली होती तसेच योजनेचे
  • इंदिरा गांधी तसेच उपाध्यक्ष – दुर्गप्रसाद धर, पी एन हक्सर हे होते.
  • योजनेची उद्दिष्ठे GDP वर आधारीत 4.4% वार्षिक वृद्धीदर प्राप्त करणे तसेच गरिबी कमी करणे हे होते.
  • या योजनेमधून वार्षिक वृद्धीदर -4.8% इतका होता तर तसेच अतितीव्र अतितीव्र चलनवाढ झाली.

Read More:- Rashtrageet In Marathi | भारतीय राष्ट्रगीता बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या | Jana Gana Mana In Marathi

6th Five Year Plan in India |सहावी पंचवार्षिक योजना-

  • 6th Panchvarshiya Yojana | सहाव्या पंचवार्षिक योजनेमध्ये रोजगारनिर्मिति वर भर देण्यात आला होता.
  • हि योजना1 एप्रिल 1980 ते 31 मार्च 1985 अध्यक्ष –इंदिरा गांधी आणि राजीव गांधी हे होते तर उपाध्यक्ष – एन डी तिवारी , शंकरराव चव्हाण आणि पी व्ही नरसिंहराव हे होते.
  • योजनेचे उद्दिष्ट 5.2% वार्षिक वृद्धीदर सध्या करून दारिद्र्य निर्मूलन हे होते.
  • योजनेमधून वार्षिक वृद्धीदर -5.7% इतका राहिला तसेच चलनवाढ आटोक्यात आली पण औद्योकींग वृद्धिदर मात्र कमी झाला.

7th Five Year Plan in India | सातवी पंचवार्षिक योजना

  • सातव्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुद्धा रोजगारनिर्मिती वर लक्ष देण्यात आले.
  • या योजनेचा 1 एप्रिल 1985 ते 31 मार्च 1990 हा आहे तसेच अध्यक्ष – राजीव गांधी आणि व्ही पी सिंग तर उपाध्यक्ष – मनमोहन सिंग , पी शिवशंकर , माधवसिंग सोळंकी आणि रामकृष्ण हेगडे हे होते.
  • योजनेचे उद्दिष्ट वार्षिक वृद्धीदर – 5% करणे तर सार्वजनिक क्षेत्र मध्ये खर्च करणे हा होता.
  • या योजनेमधून वार्षिक वृद्धीदर- 6% राहिला परंतु चलनवाढ चालू राहिली.

8th Five Year Plan in India | आठवी पंचवार्षिक योजना

  • आठव्या पंचवार्षिक योजनेमध्ये मनुष्यबळ विकास यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.
  • या योजनेचा कार्यकाळ 1 एप्रिल 1992 ते 31 मार्च 1997 होता तसेच अध्यक्ष – नरसिंहराव आणि एच डी देवेगौडा आणि उपाध्यक्ष – प्रणब मुखर्जी आणि मधू दंडवते हे होते.
  • उद्दिष्ठे मानवी विकासाला सर्वाधिक प्राधान्य आणि वार्षिक वृद्धीदर -5.6% इतका करणे हे होते.
  • योजनेमधून वार्षिक वृद्धीदर – 6.7% इतका सध्या झाला.
Advertisement

Read More:- Rajya Sabha Information In Marathi | राज्य सभे बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या

9th Five Year Plan in India | नववी पंचवार्षिक योजना-

  • नवव्या पंचवार्षिक योजनेमध्ये सामाजिक न्याय व समानतेसह आर्थिक वाढ करण्यात आली.
  • हि योजना 1 एप्रिल 1997 ते 31 मार्च 2002 दरम्यान झाली योजनेचे अध्यक्ष –आय.के.गुजराल आणि अटलबिहारी वाजपेयी हे होते तर उपाध्यक्ष – मधू दंडवते, जसवंत सिंग आणि के.सी.पंत होते.
  • योजनेची उद्दिष्ठे वार्षिक वृद्धीदर – 6.5% करणे आणि सार्वजनिक खर्च वाढवणे हे होते.
  • या मधून वार्षिक वृद्धीदर – 5.5% इतका झाला तर चलनवाढ कमी झाली.

10th Five Year Plan of India | दहावी पंचवार्षिक योजना-

  • दहावी पंचवार्षिक योजना हि शिक्षण योजना / लोकांची योजना म्हणून ओळखली जाते.
  • या योजनेचा कार्यकाळ 1 एप्रिल 2002 ते 31 मार्च 2007 दरम्यानचा आहे तसेच योजनेचे अध्यक्ष अटलबिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग तर उपाध्यक्ष – के सी पंत आणि मॉंटेकसिंग अहलुवालिया हे होते.
  • योजनेची उद्दिष्टे वार्षिक वृद्धीदर – 7.9% इतका करणे तर रोजगारनिर्मिती वाढवणे हे होते.तसेच औद्योगिक उत्पादन 10% वृद्धीदर करणे असे होते.
  • योजनेमधून वार्षिक वृद्धीदर – 7.7% इतका झाला तर औद्योगिक वृद्धीदर -8.2% इतका राहिला.

Read More:- Raw Information In Marathi | रिसर्च अँड अनॅलिसिस विंग बद्दल ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

11th Five Year Plan of India | अकरावी पंचवार्षिक योजना

  • 11th Panchvarshiya Yojana |अकराव्या पंचवार्षिक योजनांमधून गतिशील आणि सर्वसमावेशक विकास सध्या करण्याचा लक्ष होते.
  • योजनेकचा कार्यकाळ एप्रिल 2007 ते 31 मार्च 2012 हा होता अध्यक्ष –मनमोहन सिंग तर उपाध्यक्ष – मॉंटेकसिंग अहलुवालिया हे होते.
  • योजनेची उद्दिष्टे वार्षिक वृद्धीदर-9% तर GDP ७.६% इतका करणे हे होते.
  • दारिद्र्य 10% ने कमी करणे
  • सुशिक्षित बेरोजगारी 5% च्या खाली आणणे
  • विद्यार्थ्यांची गळतीप्रमाण 20% वर आणणे
  • साक्षरता -85% करणे
  • उच्च शिक्षण घेणाऱ्यांची संख्या 15% करणे
  • शिशु मृत्यदर 28 व माता मृत्यदर 100 पर्यंत कमी करणे
  • एकूण जननदर 2.1 आणणे
  • 2009 पर्यंत सर्वांना स्वच्छ पाणीपुरवठा
  • 2009 पर्यंत सर्व खेडी व दारिद्र्य रेषेखालील लोकांना विजजोडणी करून देणे
  • 2012 पर्यंत सर्वांना ब्रॉडबँड सेवा पुरविणे
  • वने व आच्छादित क्षेत्रात 5% वाढ करणे
  • ऊर्जा कार्यक्षमता 20% ने वाढविणे
  • 2011 पर्यंत सर्व नद्या व शहरी घनकचरा व्यवस्थापन करून स्वच्छ करणे हे होते.
  • या योजनेमधून 92% खेड्यांना वीज पुरवण्यात आली साक्षरता दर ७३ टक्के राहिला तसेच वार्षिक वृद्दीदार ७.९ टक्के इतका राहिला.

Read More:- Dnyanpeeth Puraskar Marathi List 2024 | सर्व ज्ञानपीठ पुरस्कारांची प्राप्त व्यक्तींची संपूर्ण यादी आणि माहिती जाणून घ्या

12th Five Year Plan of India | बारावी पंचवार्षिक योजना

  • 12th Panchvarshiya Yojana | बाराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुद्धा अधिक समावेशक विकासावर भर देण्यात आला.
  • या योजनेचा कार्यकाळ 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2017 हा होता योजनेचे अध्यक्ष मनमोहन सिंग तर उपाध्यक्ष – मॉंटेकसिंग अहलुवालिया हे होते.
  • योजनेची उद्दिष्ट
  • जीडीपी वृद्धीदर 8.2%
  • कृषी वृद्धीदर – 4%
  • उत्पादन वृद्धीदर – 10%
  • दारिद्र्य 10% ने कमी करणे
  • 50 दशलक्ष रोजगार निर्मिती
  • सरासरी शैक्षणिक वर्षात 7 वर्षे वाढ
  • शैक्षणिक असमानता दूर करणे
  • माता मृत्युदर 1 , शिशु मृत्यूदर 25 व बाल लिंगगुणोत्तर 950 पर्यंत करणे
  • जननदर 2.1 आणणे
  • सिंचित क्षेत्राचे प्रमाण 103 दशलक्ष हेक्टर करणे
  • ग्रामीण टेलीडेन्सीटी 70% करणे
  • वायूउत्सर्जन 25% कमी करणे
  • वनच्छादित क्षेत्रात 1 दशलक्ष हेक्टर ची वाढ करणे
  • 30000 मेगावॅट पुनर्निर्मिती क्षम ऊर्जा अशी होती.
  • तसेच योजनेमधून
  • वृद्धीदर – 6.9%
  • शिशु मृत्युदर – 34
  • माता मृत्यूदर – 130
  • जननदर – 2.3 सध्या झाले

Read More:- Shetkari Chalval Information| शेतकरी चळवळीची संपूर्ण माहिती जाणून घ्या

पंचवार्षिक योजना आणि महत्वाच्याघडामोडी | Five-Year Plans Of India Information

प्रत्येक पंचवार्षीक योजनेच्या कार्यकाळामध्ये महत्वाच्या घडामोडी घडत होत्या स्पर्धा परीक्षांमध्ये यावर आधारित प्रश्न विचारला जाऊ शकतो यासाठी त्या नुसार घडामोडींची विस्तारित माहिती पाहणे आवश्यक आहे.

क्रमांक.पंचवार्षिक योजना घडामोडी
पहिली पंचवार्षिक योजनाआंध्र राज्याची निर्मिती (1953)
युजीसी ची स्थापना (1953)
पहिली आयआयटी खरगपूर येथे स्थापन (1951)
समुदाय विकास कार्यक्रम सुरु (1952)
राष्ट्रीय विस्तार योजना (1953)
दामोदर खोरे विकास प्रकल्प – टेनेसी खोरे प्रकल्पाच्या धर्तीवर
भाक्रा – नांगल धरण – सतलज नदीवर (1955)
हिराकूड धरण – महानदी वर
स्टेट बँक ऑफ इंडिया ची स्थापना (1955)
ICICI ची स्थापना (1955)
सिंद्री खत कारखाना (झारखंड) (1951)
दुसरी पंचवार्षिक योजनामहाराष्ट्र राज्य निर्मिती
दुसरे औद्योगिक धोरण(समाजवादी समाजरचना) 1956
BHEL ची निर्मिती
नांगल आणि रुरकेला खत कारखाना -1961
भिलाई लोह पोलाद उद्योग (रशिया च्या मदतीने)
रुरकेला लोह पोलाद उद्योग (जर्मनी च्या मदतीने)
दुर्गापूर लोह पोलाद उद्योग (ब्रिटन च्या मदतीने)
आयआयटी कायदा – 1956
एलआयसी ची स्थापना (1956)
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ची स्थापना (1957)
तिसरी पंचवार्षिक योजनाभारत-चीन आणि भारत-पाकिस्तान युद्ध
गोवा मुक्तिसंग्राम (1961)
नागालँड ची स्थापना (1963)
कृषी किंमत आयोगाची स्थापना (1965 – प्रो.दांतवाला)
भारतीय अन्न महामंडळ ची स्थापना (1964)
आयडीबीआय आणि युटीआय ची स्थापना (1964)
चौथी पंचवार्षिक योजना…पाहिले शिक्षण धोरण (1968)
भारत-पाकिस्तान युद्ध (1971)
MRTP (1969)& FERA ACT(1973)
अनुकूल व्यापार तोल- 1972-73
बोकारो लोह पोलाद उद्योग (रशियाच्या मदतीने)
SAIL ची निर्मिती (1973)
ऑपरेशन फ्लड (1970)
अवर्षणप्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम (1973-74)
बँकांचे राष्ट्रीयीकरण (1969)
पाचवी पंचवार्षिक योजनापोखरण चाचणी (1974)
सिक्कीम ला राज्याचा दर्जा
42 वी घटना दुरुस्ती आणि आणीबाणी ची सुरुवात
अनुकूल व्यापरतोल (1976-77)
पाहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण (1976)
TRYSEM, ICDS आणि DDP या योजना सुरू झाल्या
RRB ची स्थापना (1975)
HDFC ची स्थापना (1977)
सहावी पंचवार्षिक योजना-भोपाळ गॅस दुर्घटना (1984)
एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम (1980)
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना (1980)
ग्रामीण क्षेत्रातील महिला व बालकांसाठी विकास योजना(1982)
बँकांचे राष्ट्रीयीकरण (1980)
नाबार्ड ची स्थापना (1982)
सातवी पंचवार्षिक योजनाइंदिरा आवास योजना (1985)
ग्रामीण क्षेत्राचा शाश्वत विकास करण्यासाठी CAPART ची स्थापना (1986)
जवाहर रोजगार योजना (1989)
नेहरू रोजगार योजना (1989)
दुसरे शिक्षण धोरण (1986)
खडू फळा मोहीम (1987)
राष्ट्रीय गृह बँकेची स्थापना (1988)
आठवी पंचवार्षिक योजना73 वी आणि 74 वी घटनादुरुस्ती (1993)
रुपया चालू खात्यावर पूर्ण परिवर्तनीय
खासदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम(1993)
मध्यान्ह आहार योजना(1995)
नववी पंचवार्षिक योजनपोखरण अणू चाचणी II (1998)
कारगिल युद्ध (1999)
FEMA कायदा (2000)
स्वर्णजयंती शहरी रोजगार योजना (1997)
स्वर्णजयंती ग्रामस्वरोजगार योजना (1999)
पंतप्रधान ग्रामोदय योजना (2000-01) – आरोग्य, शिक्षण, गृहनिर्माण, विद्युतीकरण, पेयजल,
पोषण यावर भर देऊन मानवी विकास
सर्व शिक्षा अभियान (2000-01)
१०दहावी पंचवार्षिक योजना-राष्ट्रीय कामाच्या बदल्यात अन्न योजना(2004)
भारत- अमेरिका नागरी अणू करार (2005)
भारत निर्माण योजना (2005) गृहनिर्माण, सिंचन, पेयजल, रस्ते, विद्युतीकरण, दूरसंचार यांवर भर
जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान योजना (2005)
FRBM कायदा (2004)
जननी सुरक्षा योजना (2005)
एनआरएचएम (2005)
११अकरावी पंचवार्षिक योजनाजागतिक आर्थिक मंदी (2008)
मुंबई हल्ला (2008)
साक्षर भारत अभियान (2009)
शिक्षण हक्क कायदा (2009)
प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा कार्यक्रम (2010)
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम (2009)
NAPCC ची सुरुवात (2008)
१२बारावी पंचवार्षिक योजनाएनएसडीएम आणि एनएसडीए ची स्थापना
राष्ट्रीय शहरी जीवनोन्नती कार्यक्रम (2013)
राष्ट्रीय कृषी विस्तार आणि तंत्रज्ञान अभिमान (2014)
उन्नत भारत अभियान (2014)
पढे भारत बढे भारत (2014)
राष्ट्रीय आरोग्य अभियान (2013)

Read More:- Arjun Award Winners Lists 2023 |2023 मध्ये अर्जुन पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींची यादी आणि त्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Five-Year Plans Of India PDF Download

Panchvarshiya Yojana :- बहुतांश विध्यार्थ्याना Five Year Plans of India PDF Download ची माहिती ही PDF स्वरूपात पाहिजे असते. त्यामुळे ही आम्ही PDF स्वरूपात ही माहिती उपलब्ध करून देत आहे. खालील Five Year Plans of India वर क्लिक करा.

Read More:- Bharat Chhodo Andolan 1942 PDF |1942 च्या भारत छोडो आंदोलनाची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Conclusion

Five Year Plans of India | Panchvarshiya Yojana :- आपण या पोस्ट मध्ये Five Year Plans of India PDF Download वर आधारीत भरती परीक्षे यामध्ये विचारले जाणार महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरांची माहीती सविस्तर पणे बघितली आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

FAQ Frequently Asked Questions

Q1.एकूण किती पंचवार्षिक योजना झाल्या?

Ans:- एकूण १२ पंचवार्षिक योजना १९५१ ते २०१७ दरम्यान झाल्या.


Q2. सगळ्यात यशस्वी पंचवार्षिक योजना कोणती होती?

Ans:- सगळ्यात यशस्वी पंचवार्षिक योजना हि सहावी पंचवार्षिक योजना होती ज्या मध्ये आर्थिक विकास झाला.

Q3.पहिल्या पंचवार्षिक योजनेची सुरवात कधी झाली?

Ans:- पहिली पंचवार्षिक योजना हि १९५१ ते १९५६ दरम्यान झाली. 

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages