Advertisement

Batmi Lekhan In Marathi PDF Download | बातमी लेखन कसे करावे संपूर्ण माहिती

Batmi Lekhan In Marathi

Batmi Lekhan In Marathi:- How to write News Writing Marathi 8th, News Writing Marathi 9th, batmi lekhan in Marathi 10th class. It is asked in the applied writing type. There are questions like letter writing, advertisement writing, and then news writing. In the question, an incident is mentioned and a news report is asked about it. In today’s post to answer this question, what is news? Let’s see how news writing is scored along with sample news writing which you can download in PDF format.

Batmi Lekhan In Marathi

बातमी लेखन कसे करावे यावर बातमी लेखन मराठी 8 वी ,बातमी लेखन मराठी 9 वी, बातमी लेखन दहावी साठी परीक्षे मध्ये प्रश्न विचारला जातो. उपयोजित लेखन प्रकारामध्ये विचारला जातो. पत्र लेखन, जाहिरात लेखन नंतर बातमी लेखन असे प्रश्न असतात. प्रश्न मध्ये एखादी घडलेली घटना सांगितले जाते आणि त्यावर बातमी लेखन करायला सांगितले जाते. या प्रश्नच उत्तर देण्यासाठी आजच्या या पोस्ट मध्ये आपण बातमी म्हणजे काय ? बातमी लेखन कसे करावे यावर गुण कसे दिले जातात त्याचबरोबर बातमी लेखन चे नमुने पाहुयात जे तुम्ही PDF स्वरूपात Download करू शकतात.

Read More:- Jahirat Lekhan In Marathi With Format & Example | जाहिरात लेखन संपूर्ण माहिती

बातमी म्हणजे काय ? | What Is Batmi ?

  • Batmi ही वर्तमान घडामोडी, राजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि बरेच काही यासह विविध विषयांबद्दल घडलेल्या घडामोडी ची माहिती म्हणजे बातमी होय.
  • बातमी हा मराठी शब्द आहे ज्याचा अर्थ “बातमी” किंवा “रिपोर्ट” असा होतो.
  • हे एखाद्या बातमीचा किंवा अहवालाचा संदर्भ देखील देऊ शकते. पत्रकारितेच्या संदर्भात, बतमीचा वापर पत्रकारितेच्या शैलीत लिहिलेल्या छोट्या, तथ्यात्मक कथेचा संदर्भ देण्यासाठी केला जातो.

What is Batmi Lekhan | बातमी लेखन म्हणजे काय ?

  • सर्वप्रथम बातमी म्हणजे आपल्या आजूबाजूला घडलेल्या चालू असलेल्या घडामोडीं विषयी लिहिलेली माहिती सविस्तर लेखी माहिती देणे होय .
  • बातमी ही विविध माध्यमांद्वारे दिली जाते. म्हणजे बातमी मधील मजकुराला काळाचा संदर्भ दिलेला असतो. 
  • आपला गावामध्ये किंवा शहरामध्ये विविध घटना घडत असतात आपण या बातम्यांची माहिती वृत्तपत्रे तसे न्युज चॅनेल मध्ये पाहत असतो.
  • परीक्षे मध्ये तुम्हाला अशीच एखादी घटना वर्णन करून सांगितली जाते तीच व्यवस्थित बातमी लेखन करायचे असते .

Read More:- जगातील आंतरराष्ट्रीय संघटना त्यांची मुख्यालय माहिती PDF Download | International Organisations And Their Headquarters With PDF

बातमी लेखन साठी दिले जाणारे गुण | Marks Awarded For News Writing

  • उपयोजित प्रकारांमध्ये विचारल्या जाणाऱ्या Batmi Lekhan In Marathi साठी एकूण ५ गुण असतात .
  • बातमी लेखन मध्ये बातमीच्या शीर्षक हेडलाईन साठी १ गुण असतो .
  • त्या नंतर बातमी च वर्णन करताना तुम्ही तिसरे व्यक्ती असल्या प्रमाणे लेखन करण्यासाठी १ गुण असतो .
  • बातमी जास्त मोठी किंवा जास्त छोटी सुद्धा नसावी योग्य शब्दामध्ये समजेल अशी असण्या करता २ गुण दिले जातात .
  • बातमी लेखन साठी पत्रकार भाषाशैली वापरण्यास १ गुण दिला जातो.

बातमी लेखन कसे करावे ? | How To Write Batmi Lekhan In Marathi

  1. शीर्षक :बातमी लेखनामध्ये वाचकच लक्ष वेधून घेणारी गोष्ट असते ते म्हणजे शीर्षक शीर्षक वाचल्या नंतर वाचकाला पूर्ण बातमी वाचण्याची उत्कंठा निर्माण होणे आवश्यक असते .
  2. बातमीची सुरवात :बातमीची सुरवात करताना सगळ्यात आधी येते ते बातमीचा स्रोत माहिती कुना कडून मिळाली आहे जसे कि वृत्तपत्रांमध्ये असते म .टा प्रतिनिधी .
  3. स्थळ आणि दिनांक :या नंतर बातमीचा स्थळ आणि दिनांक लिहवे जिथली बातमी आहे ते आणि तारीख जसे कि शहापूर दि.११ जुन २०२३ .
  4. मुख्य बातमी :या नंतर मुख्य बातमी ची सुरवात करावी जी २ ते ३ परिच्छेद मध्ये असावी बातमीची सुरवात मधेच महत्वाचा भाग असावा त्या नंतर दुसरा परिच्छेद मध्ये विस्तारित माहिती लिहावी.

Read More:- DR. APJ Abdul Kalam Information In Marathi PDF Download | डॉ. A.P.J अब्दुल कलाम ह्यांचा जीवनाची संपूर्ण माहीती जाणून घ्या

बातमी कशी लिहावी ?

  • बातमी लेखन करताना सगळ्यात आधी वरच्या दिलेल्या फॉरमॅट चा नीट वापर करावा .
  • ज्या घटनेच बातमी लेखन करणार आहेत त्याची सविस्तर आणि अचूक माहिती पाहून ती लिहावी .
  • बातमी लेखनामध्ये जर का एखादा कार्यक्रम ची माहिती देत असाल तर अध्यक्ष प्रमुख यांची माहिती द्यावी ,
  • बातमी मध्ये घटनेचा क्रम अथवा कार्यक्रम क्रम नीट लिहावा तसेच बातमी सोडून अतिरिक्त लेखन टाळावे .
  • बातमी लेखनाचा काळ भूतकाळामधला असावा .

बातमी लेखनाचे उदाहरणे | Batmi Lekhan In Marathi Examples

Batmi Lekan On International Girl Child Day | आंतरराष्ट्रीय बालिका दिनावर बातमी लेखन | Balika Din Batmi Lekhan In Marathi

बातमी लेखन

लोकशासन
आंतरराष्ट्रीय बालिका दिन
जिल्ह्यातील शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दि. 12 ऑक्टोबर 2022

वार्ताहर, पुणे ():- जगभरात ११ ऑक्टोबरला साजरा केल्या जाणाऱ्या ‘आंतरराष्ट्रीय बालिका दिनाच्या निमित्ताने पुणे जिल्हा परिषदेने “सुकन्या समृद्धी” या उपक्रमाचे आयोजन केले होते. जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीमध्ये विविध स्पर्धांची योजना करण्यात आलेले होते. जिल्ह्यातील शासकीय व खाजगी अशा जवळपास तीनशे शाळांनी या कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. निबंधलेखन, काव्यवाचन, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, कराटे स्पर्धा अशा अनेक स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील विविध शाळांनी सहभाग घेतला होता. ‘सुकन्या समृद्धी‘ या एकमेव विषवावर या साऱ्या स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ जिल्हापरिषद अध्यक्ष श्री. राम देशपांडे यांच्या हस्ते संपन्न झाला. ‘मुलगी समृद्धी झाली तरच समाज समृद्धीच्या दिशेने जाईल’ असे म्हणून मुली ह्याच देशाच्या प्रगतीचे कारण बनतील असे विचार त्यांनी आपल्या भाषणात मांडले.

Read More:- Marathi Numbers PDF Download | मराठी अंक अक्षर संपूर्ण माहिती जाणून घ्या पीडीएफ मध्ये

Batmi Lekhan In Marathi

Batmi Lekan On International Womans Day | आंतरराष्ट्रीय महिला दिनावर बातमी लेखन | बातमी लेखन मराठी 8 वी

बातमी लेखन

लोकशासन

आंतरराष्ट्रीय महिला दिन

मॉडर्न हायस्कूल मध्ये “आंतरराष्ट्रीय महिला दिन” उत्साहात साजरा

दि. 9 मार्च 2022

वार्ताहर, नागपूर :- तालुक्यातील मॉडर्न हायस्कूल येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. नाम फाउंडेशनच्या फिल्ड ऑफिसर वरुण शिंदे यांनी महिलांसाठीच्या शासकीय योजनांची माहिती दिली व घरगुती मिरची, करवंदाचे लोणच, आवळा बनवून त्याची बाजारात कशी विक्री करावी याचे संपूर्ण मार्गदर्शन केले. यावेळी बचतगटाच्या ५०० महिलांना प्रत्येकी 2 किलो विविध प्रकारचे बियाणे मोफत वाटप करण्यात आले. ‘महिला सशक्तीकरण’ या विषयावर मॉडर्न हायस्कूलच्या विदयार्थिनींनी एक नाटिका सादर केली. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे सभापती श्री. घनश्याम शिंदे, सदस्य राम देशपांडे, तुकाराम भिडे आदी उपस्थित होते. मॉडर्न हायस्कूलच्या विदयार्थिनींसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यातील विजेत्या विदयार्थिनींना पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती देशपांडे यांनी ‘नारी जगात भारी’ अशी घोषणा देऊन साऱ्यांचा उत्साह वाढवला. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.

Read More:- 2023 Lokmanya Tilak Speech In Marathi PDF Download | लोकमान्य टिळकांचे भाषण सविस्तर पणे

Batmi Lekhan In Marathi

Batmi Lekhan In Marathi On Teachers Day | बातमी लेखन मराठी शिक्षक दिन

बातमी लेखन

लोकशासन

शिक्षक दिन

दिल्ली इंटरनॅशनल हायस्कूल मध्ये “आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन” उत्साहात साजरा

दि. ६ सप्टेंबर 2019, मंगळवार:-

वार्ताहर, नाशिक :-काल राज्यभरा मध्ये ५ सप्टेंबर शिक्षक दिन अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला. देशामधील विविध शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यामधील दिल्ली इंटरनॅशनल हायस्कूल शाळेच्या पटांगणामध्ये माननीय शिक्षण मंत्री डॉ. हंसराज शिंदे ह्यांच्या हस्ते शाळेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन पार पडले. त्या निमिताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले, जसे की गाणी, भाषण, आणि सांस्कृतीक कार्यक्रमाने उपस्थितांची मनं जिंकून घेतले. अध्यक्षीय भाषणामध्ये शिक्षण मंत्र्यांनी मुलांच्या गुणवत्तेचं कौतूक करून त्यांना पुढील शिक्षणाच्या योजना स्पष्ट केल्या आणि शुभेच्छा. त्या नंतर शाळेतल्या शिक्षकांसाठी विद्यार्थींनी एक नाटक सादर केले जे खूप मनोरंजन करणारे होते. त्या नंतर समुहगाना नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

Read More:- Best MPSC Book List In Marathi 2023 PDF Download | MPSC पुस्तकांची यादी पीडीएफ आणि सर्वकाही

Batmi Lekhan In Marathi
Batmi Lekhan In Marathi

Batmi Lekhan In Marathi PDF Download

Batmi Lekhan In Marathi PDF Download:- बातमी लेखनची संपूर्ण माहिती आपण ह्या आर्टिकल मध्ये बघितली आहे. अनेक विद्यार्थिंना बातमी लेखन ची माहिती ही पीडीएफ मध्ये पाहिजे असते. त्याच्यासाठी आम्ही उमेदवारांना समजणे सोपे जावे आणि बातमी लेखन ची माहिती दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही Batmi Lekhan In Marathi PDF Download करण्यासाठी PDF देत आहोत. तुम्ही बातमी लेखनची माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

Conclusion Of Batmi Lekhan In Marathi

शेवटी, मराठीतील बातमी लेखन खूप महत्त्व आहे. बातमी लेखन हे संवाद आणि आत्म-अभिव्यक्तीसाठी एक शक्तिशाली साधन म्हणून काम करते. ह्या बातमी लेखन मध्ये लिखित संवादाच्या या स्वरूपाद्वारे, व्यक्ती त्यांचे विचार, कल्पना आणि भावना प्रभावीपणे व्यक्त करू शकतात. Batmi Lekhan ही सांस्कृतिक वारसा जतन आणि प्रसारित करण्यास परवानगी देते, कारण ती बातमी लेखन हे मराठी परंपरेत खोलवर रुजलेला विषय आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण बातमी लेखन म्हणजे काय ?, बातमी लेखन कसे करावे ? | How To Write News?, बातमी लेखन साठी दिले जाणारे गुण | Marks Awarded For News Writing, बातमी लेखनाचे उदाहरणे | Example Of Batmi Lekhan हे सर्व बघितले आहे.

FAQ Frequently Asked Question For Batmi Lekhan In Marathi

Q1. बातमी लेखन कसे करावे

Ans:- बातमी लेखन करताना तुम्हाला चांगले शीर्षक, बातमीची सुरवात, त्या नंतर घटनेची तारीख स्थळ आणि दिनांक, आणि शेवटी मुख्य बातमी लिहणे आवश्यक आहे. त्या साठी तुम्हाला व्याकरणाची द्यान असणे आवश्यकआहे. त्या मध्ये भाषा ही साधी सरळ सोपी असणे आवश्यक आहे. बातमी लेखन करतांना ती भूतकाळात लिहिणे गरजेचे असते. आणि त्या मध्ये वाक्याची रचना व मांडणी साधी आणि इतर लोकांना समजण्यास सोपी असणे आवश्यक आहे.

Q2. बातमी म्हणजे काय ?

Ans:- Batmi ही वर्तमान घडामोडी, राजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि बरेच काही यासह विविध विषयांबद्दल घडलेल्या घडामोडी ची माहिती म्हणजे बातमी होय.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages