Advertisement

Keval Prayogi Avyay In Marathi | The Interjection (केवल प्रयोगी अव्यय) बद्दल ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Keval Prayogi Avyay In Marathi

Keval Prayogi Avyay In Marathi | The Interjection:- In Marathi grammar, there are four types of adjective parts: the adjective part and the verb part, the ambiguous part, and the interjection part. We have already seen the aggregate information about the drug. In today’s post, we are going to learn the complete information about the experimental adjective Kaela, which means The Interjection in English.

Keval Prayogi Avyay | The Interjection

Keval Prayogi Avyay In Marathi | The Interjection:- केवल प्रयोगी अव्यय-The Interjection मराठी व्याकरण मध्ये अव्यय भागामध्ये क्रियाविशेषण अव्यय आणि शब्दप्रयोगी अव्यय , उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय असे ४ प्रकार आहेत.अव्यय बद्दल एकत्रित माहिती आपण अगोदर पहिली आहे. आजच्या या पोस्ट मध्ये आपण केवल प्रयोगी अव्यय म्हणजेच इंग्लिश मध्ये The Interjection बद्दल संपूर्ण माहिती पाहुयात.

Read More:- All MPSC Buddhimatta Chachani Questions PDF Download | MPSC बुद्धिमत्ता चाचणी वर आधारित सर्व प्रश्नांची आणि उत्तर माहिती जाणून घ्या

Interjection In Marathi | The Interjection | केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय ?

  • जेव्हा आपण वाक्यामध्ये अचानक किंवा उस्फूर्तपणे उद्गार वापरतो आणि त्या मधून भावना व्यक्त करतो तेव्हा त्या शब्दांना केवलप्रयोगी अव्यय शब्द असे म्हणतात.
  • केवळ प्रयोग चा सरळ अर्थ म्हणजे  केवल त्यांचा प्रयोग करायचा म्हणून जे शब्द वापरले जातात ते केवल प्रयोगी.
  • या शब्दांमधून मनातील आनंद, दुःख, आश्चर्य इत्यादी भावना व्यक्त केल्या जातात.

Read More:- Arogya Shastra PDF Download | आरोग्यशास्त्राची महत्वाची संपूर्ण माहिती जाणून घ्या

केवल प्रयोगी अव्यय चे गुणविशेष

  • हे शब्द वाक्यात केवळ वापरायचे म्हणून केवलप्रयोगी अव्ययाचा उपयोग करतात.
  • हे केवळ प्रयोगी शब्द वाक्याच्या सुरवातीला वापरले जातात ते आणि वाक्य हे वेगळे असते त्यामुळे त्यांचा वाक्यही संबंध नसतो.
  • केवल प्रयोगी अव्यय द्वारे मनातील भावना उत्स्फूर्तपणे  व्यक्त केला जातो.
  • वाक्य मधील भावना व्यक्त करून हे शब्द वाक्यानं शोभा आणतात.
  • केवल प्रयोगी अव्यय शब्द वापरल्या नंतर उद्गारवाचक शब्द वापराने आवश्यक असते.

Read More:- National Civilian Awards List PDF Download | भारतातील सर्व राष्ट्रीय पुरस्कार आणि त्यांची संपूर्ण माहिती आणि यादी जाणून घ्या

केवल प्रयोगी अव्यय शब्द :

  • दुःख, आश्चर्य, आनंद, राग, द्वेष, तिरस्कार, अबब, वाहवा, अरेरे, हे देवा, अरे बापरे, हाय हाय, बाप रे बाप यासारखे शब्द हे केवलप्रयोगी शब्द आहेत.

Read More:- All Mpsc History Questions And Answers In Marathi PDF Download | MPSC इतिहास वर आधारित सर्व प्रश्नांची आणि उत्तर माहिती जाणून घ्या

The Interjection Types | केवल प्रयोगी अव्ययाचे प्रकार

केवलप्रयोगी अव्ययाचे साधारणपणे पुढील 9 प्रकार आहेत.

१. हर्षदर्शक केवलप्रयोगी अव्यय

उदाहरणार्थ – वा, वावा, आहा, ओहो, अहाहा इत्यादी.

२. तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्यय

उदाहरणार्थ – हट्, धिक्, थुः, हुड, फुस इत्यादी.

३. आश्चर्यकारक केवलप्रयोगी अव्यय

उदाहरणार्थ – आं, अबब, बापरे, अरेच्चा, अहाहा इत्यादी.

४. प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय

उदाहरणार्थ – शाबास, भले, वाहवा, छान, फक्कड, खासच, भारी इत्यादी.

५. संमतिदर्शक केवलप्रयोगी अव्यय

उदाहरणार्थ – हां, ठीक, बराय, अच्छा इत्यादी.

६. विरोधदर्शक केवलप्रयोगी अव्यय

उदाहरणार्थ – छे, छट, छेछे, अंहं, हॅट इत्यादी.

७. शोकदर्शक केवलप्रयोगी अव्यय

उदाहरणार्थ – अरेरे, अगाई, अयाई, हायहाय, हाय इत्यादी.

८. संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्यय

उदाहरणार्थ – अहो, अरे, अगं, ए, बा, रे इत्यादी.

९. मौनदर्शक केवलप्रयोगी अव्यय

उदाहरणार्थ – चुप, चिप, गप इत्यादी.

Read More:- MIDC Full Information In Marathi | महाराष्ट्रातील औद्योगिक संस्था संपूर्ण माहिती जाणून घ्या

Interjection In Marathi PDF Download | Keval Prayogi Avyay PDF Download

Kevalprayogi avyav PDF Download :- आपण ह्या आर्टिकल मध्ये केवलप्रयोगी अव्ययआणि त्यांचे प्रकारांची संपूर्ण माहिती घेतली आहे. अनेक विद्यार्थ्याना व्याकरणा मधील शब्द आणि केवलप्रयोगी अव्यय चे प्रकांराची माहिती ही पीडीएफ मध्ये अभ्यासासाठी पाहिजे असते. त्याच्यासाठी आम्ही उमेदवारांना समजणे सोपे जावे आणि शब्दांची ची संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही Kevalprayogi avyav PDF Download करण्यासाठी PDF देत आहोत. तुम्ही शब्दांच्या जाती आणि त्यांचे प्रकारांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

Conclusion

Keval Prayogi Avyav:- आजच्या या पोस्ट मध्ये आपण केवलप्रयोगी अव्यय आणि त्याचे प्रकार या बद्दल विस्तारित माहिती पहिली अगोदर सांगितल्या प्रमाणे व्याकरणाचा अभ्यास मध्ये हा भाग सगळ्यात महत्वाचा असतो ज्या मध्ये तुम्ही चांगले गुण मिळवू शकता. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना उपयुक्त ठरेल.

Frequently Asked Questions For Keval Prayogi Avyav | Interjection In Marathi

Q1. केवलप्रयोगी अव्यय चे किती जाती आहेत ?

Ans:- शब्दांच्या एकूण ९ जाती प्रकार आहेत .

Q2. खेळावं प्रयोग प्रकारांची नावे काय आहेत ?

Ans:-१. हर्षदर्शक केवलप्रयोगी अव्यय, २. तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्यय, ३. आश्चर्यकारक केवलप्रयोगी अव्यय, ४. प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय, ५. संमतिदर्शक केवलप्रयोगी अव्यय, ६. विरोधदर्शक केवलप्रयोगी अव्यय,७. शोकदर्शक केवलप्रयोगी अव्यय, ८. संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्यय, ९. मौनदर्शक केवलप्रयोगी अव्यय

Q3. केवलप्रयोगी अव्यय म्हणजे काय व्याख्या?

Ans:-जेव्हा आपण वाक्यामध्ये अचानक किंवा उस्फूर्तपणे उद्गार वापरतो आणि त्या मधून भावना व्यक्त करतो तेव्हा त्या शब्दांना केवलप्रयोगी अव्यय शब्द असे म्हणतात.

Q4. विकारी शब्द म्हणजे काय ?

Ans:- ज्या शब्दाचे लिंग ,वचनं,बदल होतो त्यास विकारी शब्द म्हणतात.

Q5. नाम म्हणजे काय ?

Ans:- कोणत्याही वस्तूला जे नाव ठेवलेले असते, त्याला नाम असे म्हणतात.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages