Advertisement

Marathi varnmala – मराठी वर्णमाला स्वरादी, स्वर आणि व्यंजन, त्यांची माहिती आणि प्रकार

वर्णमाला म्हणजे काय ?

वर्णमाला म्हणजे काय ?:- हे मानवाच्या तोंडावाटे बाहेर पडणारे मूलध्वनी रंगाच्या साह्याने लिहून ठेवतात म्हणून, अक्षरमालेला वर्णमाला असे म्हणतात. पारंपारिक मराठी वर्णमालेमध्ये एकूण 48 वर्ण होते. सध्याच्या आधुनिक मराठी वर्णमालेमध्ये त्यांची संख्या एकूण 52 वर्ण आहेत.

वाक्य म्हणजे काय ?

वाक्य म्हणजे काय ? :- अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाला विशिष्ट अर्थ प्राप्त होत असेल, तर त्यालाच वाक्य असे म्हणतात. पूर्ण अर्थाचे बोलणे म्हणजे सुद्धा वाक्य होय. वाक्य हे शब्दांपासून तयार होते.
For Example:- स्वयम हुशार आहे.

शब्द म्हणजे काय ?

शब्द म्हणजे काय ?:- विशिष्ट क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला अर्थ प्राप्त होत असेल, तर त्यालाच शब्द असे म्हणतात. शब्द अक्षरांपासून तयार होतो.
For Example:- स्वयम

अक्षर म्हणजे काय ?

अक्षर म्हणजे काय ? :- ह्या मध्ये पूर्ण उच्चारलेले वर्ण म्हणजे अक्षर होय. ह्या अक्षरांना ध्वनीचिन्हे असे म्हणतात कारण अक्षरे ही मानवाच्या तोंडावाटे निघणाऱ्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा आहेत. सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजने अक्षरे आहेत. अक्षर वर्णापासून तयार होते. अक्षर म्हणजे नाश न पावणारे होय.
1. अक्षर = व्यंजन + स्वर

2. अक्षर = स्वर ; तसेच

Advertisement

वर्ण म्हणजे काय ?

वर्ण हे मानवाच्या तोंडावाटे निघणाऱ्या मूल ध्वनिंना वर्ण असे म्हणतात. मानवाच्या तोंडावाटे बाहेर पडणारे मूलध्वनी ज्या चिन्हांच्या साह्याने लिहिले जातात, त्यांना सुद्धा वर्ण असे म्हणतात. वर्ण म्हणजे रंग होय.

मराठी भाषेतील सर्व वर्णांची विभागणी तीन प्रकरांमद्धे केली जाते.

  1. स्वर
  2. स्वरादी
  3. व्यंजन

मराठी वर्णमालेमध्ये 14 स्वर, 2 स्वादरदी, 34 व्यंजने2 विशेष संयुक्त व्यंजने हे (क्ष, ज्ञ) आहेत. मराठी वर्णमाळेमद्धे 14 स्वर +2 स्वादरदी +34 व्यंजने +2 विशेष संयुक्त व्यंजने = असे एकूण 52 वर्णमाले आहे.

मराठी भाषेतील वर्णमाला आणि अक्षरमाला

ह्या मराठी भाषेतील वर्णमाला आणि अक्षरमाला ह्यांची संपूर्ण विस्तारीत माहिती खालील प्रमाणे.

व्यंजन म्हणजे काय ? आणि व्यंजने

व्यंजन म्हणजे ज्या वर्णाचा उच्चार पूर्ण होण्यासाठी शेवटी एखाद्या स्वराचे मदत घ्यावी लागते. त्या वर्णाला मराठी मधील व्याकरणात व्यंजन असे म्हणतात.

व्यंजने :- ह्या मध्ये क्, ख्, ग्, घ्, ङ् च्, छ्, ज्, झ्, ञ् ट्, ठ्, ड्, ढ्, ण् त्, थ्, द्, ध्, न् प्, फ्, ब्, भ्, म् ,य् , र्, ल्, व्, श्, ष्, स् , ह् , ळ् असे एकूण 34 व्यंजने आहेत.

विशेष संयुक्त व्यंजने

विशेष संयुक्त व्यंजने : ह्या विशेष संयुक्त व्यंजने मध्ये क्ष् , ज्ञ् हे दोन अक्षर आहे.

1. स्वर

ज्या वर्णांचा उच्चार करताना तोंडातील अवयवांचा एकमेकांशी स्पर्श होत नाही त्यांना स्वर असे म्हणतात. ज्या वर्णांचा उच्चार सहज व स्वतंत्रपणे होतो त्यांना सुद्धा स्वर असे म्हणतात. पारंपरिक मराठी वर्णमालेमध्ये एकूण 12 स्वर होते. आधुनिक मराठी वर्णमालेमद्धे सुद्धा एकूण 14 स्वर आहेत.

स्वर :- ह्या मध्ये अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, लृ, ॠ , अॅ , ऑ हे एकूण 14 स्वर आहेत.

स्वरांचे प्रकार आणि प्रकारांची सविस्तर माहिती ही खाली प्रमाणे देण्यात आलेली आहे.

स्वरांचे प्रकार

1. ऱ्हस्व स्वर

ऱ्हस्व स्वर :- ज्या स्वरांचा उच्चार आखूड होतो त्यांना ऱ्हस्व स्वर असे म्हणतात. ऱ्हस्व स्वरांची मात्रा ही 1 आहे. वर्णांचा उच्चार करण्यासाठी लागणाऱ्या कालावधी मात्र असे म्हणतात. ऱ्हस्व स्वर एकूण 5 आहेत. अ, इ, उ, लृ हा स्वर फक्त क्लृप्ती या एकाच शब्दामध्ये वापरला जातो. लृ हा स्वर लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.

Advertisement

2. दीर्घ स्वर

दीर्घ स्वर :- ज्या स्वरांचा उच्चार लांबट होतो त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात. दीर्घ स्वरांची मात्र ही 2 आहे. दीर्घ स्वर एकूण 3 आहेत. आ, ई, ऊ, ए, ओ, आो हे सुद्धा दीर्घ स्वर आहेत.

3. संयुक्त स्वर

संयुक्त स्वर :- दोन स्वर एकत्र येऊन तयार झालेल्या नवीन स्वरांनाच संयुक्त स्वर असे म्हणतात.

4. सजातीय स्वर

सजातीय स्वर: – समान उच्चार स्थान असलेल्या स्वरांनाच सजातीय स्वर असे म्हणतात. ज्या स्वरांचे उच्चार स्थान एकच आहे त्यांना सुद्धा सजातीय स्वर असे म्हणतात. मराठी भाषेमध्ये सजातीय भाषेमध्ये सजातीय स्वरांच्या तीन जोड्या आहेत. अ – आ ; इ – ई ; उ – ऊ

5. विजातीय स्वर

विजातीय स्वर :- भिन्न (असमान ) उच्चार स्थान असलेल्या स्वरांनाच विजातीय स्वर असे म्हणतात. ज्या स्वरांचे उच्चार स्थान वेगवेगळे असते त्यांना सुद्धा विजातीय स्वर असे म्हणतात. सजातीय स्वरांच्या वरील तीन जोड्या सोडून इतर कोणतेही दोन स्वर एकत्र आल्यास त्यांनाछ विजातीय स्वर असे म्हणतात.
For Example. अ – इ, आ – ई, उ – ए

स्वरांचे इतर प्रकार

  1. मूलस्वर :- जे स्वर इतर कोणत्याही स्वरापासून तयार झाले नाहीत त्यांनाच मूलस्वर असे म्हणतात. सर्व ऱ्हस्व स्वर मूलस्वर आहेत.
  2. द्विगुणित स्वर :- एका मूलस्वरामध्ये तोच मूलस्वर मिळवल्यास तयार झालेल्या नवीन स्वरलाच द्विगुणित स्वर असे म्हणतात. उदा. आ, ई , ऊ
    आ = अ + अ
    ई = इ + इ
    ऊ = उ + उ
  3. तदुत्पन्न स्वर :- जे स्वर मूलस्वरांपासून तयार होतात त्यांनाचा तदुत्पन्न स्वर असे म्हणतात. आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ, ही सर्व तदुत्पन्न स्वर आहेत.
  4. नवे स्वर :- अॅ , ऑ हे दोन स्वर इंग्रजी भाषेमधून मराठीमध्ये आले आहेत. अरविंद मंगरुळकर यांनी अॅ , ऑ दोन स्वरांचा समावेश मराठी वर्णमालेमध्ये केला आहे. त्यांनी मराठी व्याकरणाचा पुनविचार या पुस्तकात ही माहिती दिली आहे.

2. स्वरादी

स्वरादी :- ज्या वर्णांचा उच्चार करायच्या आगोदार स्वर येतो, त्यांना स्वरादी असे म्हणतात. ज्या वर्णांचा आधी स्वर आहे त्याला स्वरादी असे म्हणतात. मराठी वर्णमालेमध्ये स्वरादींचा समावेश मो. के दामले यांनी केला. अनुस्वार (अं) आणि विसर्ग (अ:) हे एकूण दोन वर्ण स्वर आहेत.

अनुस्वार

अनुस्वार: – स्पष्ट व खणखाणीत उच्चारंना अनुस्वार असे म्हणतात. उदा. अं

विसर्ग

विसर्ग या शब्दाच्या अर्थ श्वास सोडणे असा आहे. विसर्गाचा उच्चार करताना श्वास बाहेर सोडला जातो. विसर्ग या वर्णाचा उच्चार ह् या व्यंजनाला थोडा देऊन केलेल्या उच्चारासारखा करतात. उदा अ:

Frequnatly Asked question on मराठी वर्णमाला


मराठी वर्णमालेत एकूण किती स्वर आहेत
?

ह्या मध्ये अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, लृ, ॠ , अॅ , ऑ हे एकूण 14 स्वर आहेत.

व्यंजन म्हणजे काय ?

व्यंजन म्हणजे ज्या वर्णाचा उच्चार पूर्ण होण्यासाठी शेवटी एखाद्या स्वराचे मदत घ्यावी लागते. त्या वर्णाला मराठी मधील व्याकरणात व्यंजन असे म्हणतात.

मराठी स्वर आणि व्यंजन किती आहेत

पारंपरिक मराठी भाषेत वर्णमालेमध्ये एकूण 12 स्वर होते. मध्यंतरी त्या मध्ये दोन स्वादरी अनुस्वार (अं) आणि विसर्ग (अ:) मध्ये एकत्र झाल्यामुळे वर्णमालेमद्धे स्वर हे एकूण 12 स्वर + 2 स्वादरी = 14 स्वर आहेत.

स्वर किती आहेत ?

स्वर 12 असून त्या मध्ये 2 स्वादरी वाढल्या मुळे आता स्वर हे 14 झाले आहे. अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अँ आ: ऋ ऌ

स्वरांचे प्रकार किती

स्वरांचे मुख्य 5 प्रकार आहेत. ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर, सजातीय स्वर, विजातीय स्वर असे मुख्य 5 प्रकार आहे. त्यामध्ये इतर प्रकार येतात. इतर प्रकारांमध्ये मूलस्वर, तदुत्पन्न स्वर, नवे स्वर, द्विगुणित स्वर असे प्रकार पडतात.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages