Home » English Grammar In Marathi – Articles उपपदे
English Grammar In Marathi – Articles उपपदे
English Grammar In Marathi:- Questions based on English Grammar are also asked in MPSC as well as Banking exam. It is very important to know when and how to use articles in English grammar. Let’s learn about this in today’s post.
Advertisement
English Grammar In Marathi:- इंग्लिश ग्रामर वर आधारित प्रश्न MPSC तसेच बँकिंग च्या परीक्षे मध्ये सुद्धा विचारले जातात. इंग्लिश व्याकरण मध्ये आर्टिकल्स म्हणजेच उपपदे हि कधी केव्हा कशी वापरायची हे माहित असणे खूपच महत्वाचं आहे. आजच्या या पोस्ट मध्ये या बद्दल जाणून घेऊयात.
आर्टिकल्स म्हणजे काय ?
Advertisement
A ,An आणि The याना आर्टिकल्स म्हणजेच उपपदे असे म्हंटले जाते. उपपदे हि इंग्लिश मध्ये Noun नामाच्या आधी वापरली जातात.
आर्टिकल चे प्रकार
आर्टिकल चे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. ते आपण खालील प्रमाणे बघणार आहोत.
Indefinite Articles
Definite Articles
1. Indefinite Articles
Advertisement
A किंवा An ला Indefinite Articles असे म्हंटले जाते. या उपपदाचा एकाद्या ठराविक नामाची उपयोग केला जात नाही.
A या आर्टिकल बद्दल माहिती
A या पदाचा उपयोग एकवचनी मोजण्या येण्यासारख्या सामान्य नामाच्या अगोदर वापरतात. या मध्ये एकवचनी सामान्य नामाची सुरवात एका व्यंजनाने होते त्या अगोदर A हे उपपद वापरले जाते.
Advertisement
उदाहरणार्थ :- A book ,A Cat, A Pen, A girl
महत्वाची माहिती
जर का एकवचनी सामान्य नामाची सुरवात स्वराने होत असेल पण त्या स्वराचा उचार व्यंजन सारखा असेल तर त्या अगोदर सुद्धा a हे उपपद वापरले जाते .
उदाहरणार्थ :- A Uniform, A universal, A European, A union
तसेच काही शब्दांच्या अगोदर सुद्धा A हे उपपद वापरले जाते उदाहरणार्थ :- A shame, A Scare, A job, A hurry
याचवेळी महत्वाचे म्हणजे काही Pharses मध्ये सुद्धा A हे Article आपले जाते.
उदाहरणार्थ :- A low voice, A galaxy, A discount, take A rest, In a mood
An या आर्टिकल बद्दल माहित
An या आर्टिकल चा उपयोग इंग्लिश मध्ये एकवचनी मोजता येणाऱ्या सामान्य नामाच्या अगोदर केला जातो.
म्हणजेच ज्या एकवचनी मोजता येणाऱ्या सामान्य नामाची सुरवात स्वराने होते त्या अगोदर An हे उपपद वापरले जाते.
A, E, I, O, U या vowels च्या अगोदर an वापरले जाते उदाहरान :- An ant ,an elephant ,an ink ,an orange ,an umbrella.
महत्वाची माहिती
याच वेळी काही सामान्य नामाची सुरवात h ने होते पण त्याचा उच्चर मात्र silently केला जातो अशा वेळी सुद्धा an वापरले जाते .उदाहरण :an honest ,an honor, an hourly.
तसेच ज्या एकवचनी सामान्य नामाची सुरवात व्यंजनाने होते पण त्याचा ऊच्चर मात्र स्वर सारखा असेल तर तिथे सुद्धा an वापरले जाते .उदाहरण : An S.P, An M .COM असे.
अजून एखाद्या सामान्य नामाची सुरवात व्यंजनाने झाली असेल पण त्या अगोदर विशेषण वापरले असेल आणि त्याचवेळी त्या विशेषणांची सुरवात स्वराने झाली असेल तर तेव्हा सुद्धा an हे उपपद वापरले जाते .उदाहरण :an extraordinary person ,an old man.
काही phrases मध्ये an वापरले जाते जसे have an interest in.
No
व्याख्या
Examples
1.
जर एकाच नामाची दोन adjectives वापरले असतील आणि दोन्ही ऍडजेक्टिव्हस and ने जोडलेले असतील तर and च्या अगोदर आलेल्ल्या adjective च्या अगोदर उपपद वापरायचे .
A Pink And White Ball .
2.
जर का विशेषनानंतर नाम येत नसेल तर विशेषणाचा नंतर Artcile ना वापराने .
Shyam Is Tall
3.
नामाच्या सुरवातीला जर का विशेषण आले असेल तर त्या विशेषणाचा पहिल्या अक्षराच्या उचारानुसार article वापरले जाते
an attractive landscape ,an active elephant
4.
जर एखाद्या महान व्यक्तीसोबत दुसऱ्या व्यक्तीची तुला केली असेल तर त्या महान व्यक्तीच्या नावाअगोदर a किंवा an वापरावे .
he is an edison
5.
Possessives Adjectives नंतर नाम असेल तरीही त्या अगोदर a किंवा an ना वापराने
Your Pen ,My Book ,His Friend
6.
जर एखाद्या महान व्यक्तीसोबत दुसऱ्या व्यक्तीची तुला केली असेल पण त्या नंतर एखाद्या जागेचा उल्लेख केला असेल तर The वापरावे
he is The edison Of India
7.
another ,the other ,this ,these ,that ,those या विशेषानंतर एखादे नाम असेल तर त्याच्या अगोदर a an वापरात नाहीत .
that chair ,another women ,
Definite Articles
The हे उपपद definite आर्टिकल म्हणून वापरले जाते. म्हणजेच या आर्टिकल मध्ये एक विशेष व्यक्ती किंवा वस्तू दर्शवली जाते.
The आर्टिकल
The या उपपदाचा उपयोग एक विशेष वस्तू किंवा व्यक्ती दर्शवण्यासाठी केला जातो .
याचवेळी आपण या पदाचा उपयोग मोजता येणाऱ्या तसेच ना मोजता येणाऱ्या एकवचनी अनेकवचनी दोन्ही नामांसाठी केला जातो .
The हे उपपद दोन वाक्य लागोपाठ आल्या नंतर दुसऱ्या वाक्य मध्य त्याच नामाच्या अगोदर वापरले जाते ,
उदाहरण :There was a dog.The dog was barking .
No
व्याख्या
Examples
1.
जगातील एकमेव वस्तूंचा नावापूर्वी The हे उपपद वापरतात.
The Red Fort, The gatway of india, The india Gate, The Taj Mahal Etc.
2.
दिशांच्या नावाअगोदर सुद्धा The वापरले जाते .
The North ,The East ,The West ,The South असे
3.
नद्यांच्या आणि समुद्राच्या नावाअगोदर The वापरले जाते
The Indian Ocean ,The Ganga ,The Yamuna ,The Kaveri
4.
पर्वतांची नावांची सुरवात देखील The या उपपदाने होते .
The Sahyadri ,The Himalaya
5.
याचवेळी Superlative Degree च्या वाक्य मध्ये विशेषणाअगोदर The वापरले जाते .
Sagar Is Most The Honest Boy.
6.
आकाशातील तारे साठी सुद्धा उपपद वापरले जाते .
The Sun ,The Earth ,
7.
क्रमवाचक संख्या विशेषणं अगोदर the वापरले जाते
The Second ,The Fifth
8.
सामान्य नावावर विशेष जोर देण्यासाठी The उपपद वापरले जाते .
This is The Laptop Which I want to buy.
9
बाजू दर्शवण्यासाठी सुद्धा The वापरतात .
The Right ,The Left
10
एवढ्या देशाच्या नागरिक बद्दल बोलताना The वापरतात .
The Mexican ,The Indian
11
एकवचनी सामान्य नाम पूर्ण वर्गाचे प्रतिनिधित्व करत असेल तर तिथे The वापरले जाते .
The Dolphin is an Honest Animal .
12
same हा शब्द वापरण्या अगोदर The वापरात .
I saw the Same Thing .
13
News Paper च्या नावाअगोदर The वापरात .
The Hindu ,The Sakal
14
विशेषनामानंतर कोणतेही नाम आले असेल तर त्या वाक्यामध्ये ते त्या वर्गातील सगळ्या चा उल्लेख दाखवते म्हणून तिथे सुद्धा The वापरले जाते .
The Brave ,
15
एखाद्या वाक्यामध्ये संपूर्ण कुटुंबाचा उल्लेख करायचा असल्यास तिथे सुद्धा आडनावाच्या अगोदर The वापरतात .
We Are Invited By The Ghorpades
16
धर्माची माहिती देताना धर्माच्या नावाअगोदर The वापरले जाते
The Jain ,The Baudha ,The Muslim
17
जर समजा एखाद्या विशेषनामाची तुलना दुसऱ्या विशेष नामासोबत केली असेल आणि त्या नंतर लगेच राज्याचा किंवा शहराचा उल्लेख असेल तर विशेष नामाच्या अगोदर The वापररात
Virat Kohli is called The Steve Richardson of india
18
रेल्वे च्या नावाअगोदर The वापरले जाते .
The Kokan Express
19
राजकीय पक्ष्याच्या नावाअगोदर The येते
The Shivsena ,
20
किल्ले ,जहाज साठी सुद्धा The वापरात
The Raigad Fort , The Titanic
21
सेना लक्ष्करी दलाच्या नावाअगोदर The वापरतात.
The Indian Army ,
22
एखाद्या पदार्थवाचक नाम नंतर लगेच of येत असेल आणि नंतर एखादे नाम असेल तर The वापरले जाते .
The Team Of Mumbai ,
23
वाक्य मध्ये वाढ किंवा घट दाखवण्यासाठी More च्या अगोदर The येते .
The More You Think The More It Get Wrose.
24
Comparative Degree च्या वाक्यामध्ये शेवटी off the two असेल तर त्या वाक्यामध्ये to be नंतर The येते .
Akshay is the smarter of the two brothers .
The उपपद न वापरण्याचे नियम
Sr.No.
व्याख्या
Examples
1.
एखाद्या रस्त्याच्या नववगोदर The वापरले जात नाही .
LBS Road ,Gandhi Road
2.
महिन्याच्या व दिवसाच्या नववगोदर The वापरात नाहीत .
August ,May, Monday ,Sunday
3.
खेळाच्या नामाच्या पूर्वी The येत नाही
Football ,Cricket
4.
जेवणाच्या नावापूर्वी सुद्दा The उपपद येत नाही .
Lunch ,Dinner
5.
आजाराच्या नावामध्ये The वापरात नाही
Fever ,Cough ,
6.
भाववाचक नामाच्या अगोदर The येत नाही.
Honesty, Poverty
7.
ऋतूंच्या नावाच्या अगोदर The हे उपपद वापरता येत नाही
Mansoon, Winter, Summer
English Grammar In Marathi PDF Download
अनेक विध्यार्थींना English Grammar In Marathi संपूर्ण माहिती PDF Download स्वरूपात पाहिजे असते. त्यामुळे आम्ही English Grammar In Marathi PDF Download सविस्तर माहिती खालीलप्रमाणे देत आहोत.