Advertisement

All Best Marathi Ukhane For Female And Males | पुरुष आणि महिलांसाठी सर्वोत्कृष्ट मराठी उखाणे

Marathi Ukhane

Marathi Ukhane:- Ukhane is a type of proverb. Ukhane is a popular cultural heritage from a long time ago. We have these proverbs used for girls, and wives taking names in marriage ceremonies or any other function. In proverbs, social situations are presented in an interesting way. In today’s post, various proverbs are given to men as well as women. You can also download this example PDF.

Marathi Ukane For Male And Female

Marathi Ukhane:- उखाणे हा म्हणींचा एक प्रकार आहे उखाणे हे फार पूर्वीपासून असलेला लोकप्रिय  सांस्कृतिक वारसा आहे.आपल्या कडे लग्न संभारंभ किंवा अन्य कोणत्याही कार्यक्रमध्ये मुली, बायका नाव घेतात त्या साठीच हे उखाणे वापरले जातात.उखाण्या मध्ये सामाजिक परिस्थिती, मनोरंजक पद्धतीने मांडली जाते. आजच्या या पोस्ट मध्ये पुरुष तसेच स्त्रियांसाठी असलेले विविध उखाणे दिले आहेत. तुम्ही हे उखाणे PDF डाउनलोड देखील करू शकता.

उखाणे म्हणजे काय ? | What is Ukhane?

  • उखाणे म्हणजे एखाद्या समारंभामध्ये पुरुष आणि स्त्रियांसाठी तयार केले गेलेले मनोरंजक कविता होय.
  • उखाणे हे एकाच ओळीचे असतात त्या मध्ये यमक वापरून ते मनोरंजक बनवलेले जातात.

Read More:- List Of All National Parks In India Information PDF Download

Marathi Ukhane For Female | महिलांसाठी उखाणे

या पोस्ट मध्ये महिलांसाठी पटकन घेता येतील आणि लक्षात ठेवता येतील असे गमतीशीर उखाणे दिले आहेत.हे मुलींसाठी असलेले उखाणे तुम्ही Marathi Ukhane For Female pdf स्वरूपात डाउनलोड करू शकतात.

1. “जीवनाच्या सागरात सप्तरंगी पूल विचारांचा, ……. च्या सह संसार करीन सुखाचा.”

2. “सर्वांना नमस्कारा साठी जोडते हो हात,….रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट.”

3. “कपाळाचं कुंकु, जसा चांदण्यांचा ठसा,….चे नाव घेते, सार्‍या जणी बसा.”

4. “दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस, ……रावांचे नाव घेते,आज आहे हळदी कुंकवाचा दिवस.”

5. “घास घेण्यासाठी हातात घेतले पुरी श्रीखंड, …. ना लाभो आयुष्य उदंड.”

6. “शाहू राजे बांधतात कोल्हापुरी फेटा,…. रावांच्या संसारात माझा अर्धा वाटा.”

7. “अभिमान नाही संपत्तीचा, गर्व नाही रुपाचा,….रावाना घास भरवते वरण-भात-तुपाचा.”

8. “राम लक्ष्मणाची जोडी अमर झाली जगात, …. चे नाव घेते …. च्या घरात.”

9. “चांदीच्या ताटात हळदी कुंकवाचा काला,….रावांच नाव घ्यायला आजच प्रारंभ केला.

10. “हळदी कुंकूचे, निमंत्रण आले काल,….रावांचे नाव घेऊन, कुंकू लावते लाल.”

11. “मंगळसूत्रातील दोन वाट्या सासर आणि माहेर,….रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर.”

12. “चंद्राच्या महालात रोहिणीची चाहूल,….रावांच्या जीवनात टाकते मंगलमई पाऊल.”

13. “शिवाजीसारखा पुत्र, जिजाईसारखी माता, …. चे नाव घेते कांता.”

14. “उन्हाच्या उकाड्यामुळे, सगळे झाले त्रस्त,
सगळे म्हणतात ______ आणि _______ ची जोडी आहे जबरदस्त.”

15. “अथांग वाहे सागर,संथ चालते होडी,परमेश्वर सुखी ठेवो,….नी माझी जोडी.”

16. “हळदी कुंकवाला जमला, सुवासिनींचा मेळ,….रावांचे नाव घेण्याची हीच ती खरी वेळ.”

17. “चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा,…. रावांच्या नावाने घालते सौभाग्याचा चुडा.”

18. “जीवनाच्या सागरात सप्तरंगी पूल विचारांचा, …. च्या सह संसार करीन सुखाचा.”

19. “ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल,….नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल.”

20. “जाईजुईच्या फुलांचा मधुर सुटतो सुवास,….चे नाव घेऊन देते घास.”

21. “मंगलदेवी मंगलमाते वंदन करते तुला,….रावांचे आयुष्य वाढो हीच प्रथना तुला.”

22. “राम लक्ष्मण सीता तीन मूर्ती साक्षात्,…. नाव घेते नीट ठेवा लक्षात.”

23. “संसार रुपी वेलीचा, गगनात गेला झुला,….रावांचे नांव घेते, आशीर्वाद द्यावा मला.”

24. “लावीत होते कुंकू, त्यात पडला मोती,….सारखे पती मिळाले भाग्य म्हणून मानू किती?”

25. “लग्नासारख्या गोड दिनी आज्ञा कशी मोडू,….रावांना घास देताना,मला येई गोड हसू.”

26. “शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडतात माथी,….राव माझे जीवनसाथी.”

27. “सागराला शोभते निळाईचे झाकण,….चे नाव घेऊन सोडते कंकण.”

28. “सासुरवाशीण मुलीने राखावा थोरामोठ्यांचा मान, …. रावांना कन्या केली दान.”

29. “गर्द आमराई त्यामाध्ये पोपटाचे थवे,….चे नाव माझ्या ओठी यावे.”

30. “दाराच्या चौकटीला गणपतीचं चित्र …. रावांच्या मुळे मिळालं सौभाग्याचं मानपत्र”

31. “राम सीता लक्ष्मण चालले वनात, …. रावांच्या मी आहे सहभागी जीवनात.”

32. “नदीच्या काठावर कृष्ण वाजवितो बासरी,….रावां सोबत आली मी सासरी.”

33. “कुरुंदाची सहन चंदनाचे खोड,….रावांचे बोलणे अमृतापेक्षा गोड.”

34. “चंदेरी चळिला सोनेरी बटन………..रावांना आवडते तंदूरी चिकन.”

35. “जास्वदांच्या फुलांचा हार, गणपती बाप्पाच्या गळ्यात,….रावांचे नाव घेते, स्त्रियांच्या मेळ्यात.”

Traditional Ukhane In Marathi For Female

36. “शंकराची पूजा पार्वती करते वाकून,… नाव घेते सर्वांचा मान राखून”

37. “साजूक तुपात नाजूक चमचा,….रावांचं नाव घेते आशीर्वाद असावा तुमचा.”

38. “हिरव्या हिरव्या रानात, चरत होते हरण,….रावांचे नाव घेते, हळदी कुंकाचे कारण.”

39. “जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, …. नाव घेते पत्नी या नात्याने.”

40. “डाळिंब ठेवले फोडून, संत्र्याची काढली साल,….रावांच्या नावाने कुंकु लावते लाल.”

41. “राजहंस पक्षी शोभा देतो वनाला,…. चं नाव घेते आनंद माझ्या मनाला.”

42. “आकाशाच्या अंगणात ,ब्रह्मा ,विष्णू आणि महेश,….रावांचे नाव घेऊन करते हो गृहप्रवेश.”

43. “आकाशात चमकतात तारे, जमिनीवर चमकतात हिरे, …. हेच माझे अलंकार खरे.”

44. “अंबाबाईच्या देवळासमोर हळदीकुंकवाचा सडा, …. रावांच्या नावाने भरते लग्नचुडा.

45. “केळी देते सोलून पेरू देते चोरून,….रावांच्या जीवावर कुंकू लावते कोरून.

46. “गणपतीला आवडतात दुर्वा, कृष्णाला आवडते तुळशी,….रावांच नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी.

47. “केळीच्या पानावर गाईचं तूप,….रावांचं कृष्णासारखं रुप.

48. “आनंदाने भरला दिन हा लग्नाचा,….ल घास देते,गोड जिलेबीचा.

49. “आईवडिलांनी दिला जन्म, ब्रह्मदेवाने बांधल्या गाठी,… माहेर सोडलं …. रावांच्या सौख्यासाठी.

Read More:- All E-Balbharti Books PDF Download | महाराष्ट्र स्टेट बोर्ड बालभारती चे सर्व पुस्तके डाउनलोड करा

Modern Marathi Ukhane For Female

50. “शामकृष्ण कन्हैयाला राधेचा ध्यास, …. देते जिलबीचा घास.

51. “शिवाजीसारखा पुत्र, जिजाईसारखी माता, …. चे नाव घेते कांता.”

52. “गुलाबाचे फुल दिसायला ताजे,….रावांचे नांव घेते, सौभाग्य माझे.

53. “हळद असते पिवळी, कुंकू असते लाल,….रावांची मिळाली साथ झाले जीवन खूशहाल.”

54. “सासरचे निरंजन माहेरची फुलवात,…. चे नाव घेण्यास करते सुरुवात.”

55. “सावित्रीने नवस केला पती मिळावा सत्यवान, …. ची राणी झाले मी आहे भाग्यवान.”

56. “सोन्याचं मंगळसूत्र सोनारांनी घडवलं, …. रावांचं नाव घेते मैत्रिणींनी अडवलं.”

57. “जीवन म्हणजे, सुख दुःखाचा खेळ,….रावांचे नाव घेते, आहे हळदीकुंकवाची वेळ.”

58. “सोसायटी मध्ये बॅडमिंटन खेळताना, झाली होती सेटिंग,
________ सोबत लग्नाची झाली, माझ्या घरी मीटिंग.

59. “चला सगळे घरी, संपली आमची वरात,
________ रावांच नाव घेऊन, पाऊल टाकते घरात.”

60. “इंद्राच्या नंदनवनात अप्सरा गातात गोड, भाग्याने लाभली….जोड.”

61. “दारात अंगण, अंगणात काढली रांगोळी,….रावांचे नाव घेऊन बांधते मुंडावळी.”

62. “एक दोन तीन चार, ……….. वर आहे, माझे प्रेम फार”

63. “राधे शिवाय कृष्णाला नाही अर्थ, ……..रावां शिवाय माझं सगळ जीवन व्यर्थ

64. “कळी हसून फुल उमलले, मोहरून येईल सुगंध, ………… रावां च्या संगतीत सापडला जीवनाचा आनंद”

Read More:-  All Marathi Grammar – Marathi Vyakaran PDF Download | मराठी व्याकरणाची संपूर्ण सविस्तर माहिती सह

Marathi Ukhane For Male | पुरुषांसाठी मराठी उखाणे

या पोस्ट मध्ये पुरुषांसाठी पटकन घेता येतील आणि लक्षात ठेवता येतील असे गमतीशीर उखाणे दिले आहेत.हे मुलांसाठी असलेले उखाणे तुम्ही Marathi Ukhane For Male PDF स्वरूपात डाउनलोड करू शकतात.

1. “मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट,…………….चे बरोबर बांधली जीवन गाठ.”

2. “निलवर्ण आकाशातुन पडती पावसाच्या सरी, … चे नावं घेतो… च्या घरी.”

3. “सनई चौघडा वाजतो सप्तसुरात, ………… चे नाव घेतो……..च्या घरात.”

4. “अजिंठा वेरूळची शिल्पे आहेत सुंदर, ………..माझी सर्वांपेक्षा सुंदर.”

5. “ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल, ………चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.”

6. “पंच पक्वांनाच्या ताटात वाढले लाडू पेढे, ते नाव घेतांना कशाला हवे आढे वेढे”

7. “निळे पाणी, निळे आकाश, हिरवे हिरवे रान, …..चे नाव घेतो ठेऊन सर्वांचा मान.”

8. “संसार रुपी सागरात पती पत्नीची नौका, …चे नाव घेतो सर्व जण ऐका.”

9. “जगाला सुवास देत उमलली कळी, भाग्याने लाभली मला… प्रेमपुतळी,”

10. “हत्तीच्या अंबारीला मखमली झुल, माझी … नाजुक जसे गुलाबाचे फुल.”

11. “लग्नाचा वाढदिवस करु साजरा, .. तुला आणला मोग-याचा गजरा.”

12. “उभा होतो मळ्यात, नजर गेली खळ्यात, नवनांचा हार … च्या गळ्यात.”

13. “तासगावच्या गणपतीचा गोपुर बांधनारे होते कुशल. … चे नाव घेतो तुमच्या करीता स्पेशल”

14. “निर्सगवार करु पहात आहे आजचा मानव मात, अर्धागिनी म्हणुन … ने दिला माझ्या हातात हात.”

15. “चंद्राचा होता उद्य समुद्रला येते भरती, … दर्शनाने / स्पर्शाने सारे श्रम हरती.”

16. “वेरुळाची शिल्पे आहेत अप्रतिम सुंदर, … आहे माझी सर्वा पेक्षा,”

17. “राधिकेला कृष्ण म्हणे हास राधे हास, मी देतो… ला लाडवाचा / करंजीचा घास,”

18. “जाईच्या वेणीला चांदीची तार, माझी … म्हणजे लाखात सुंदर नार,”

19. “अस्सल सोने चोविस कॅरेट, … अन् माझे झाले आज मॅरेज.”

20. “हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोड़ी, … च्या जीवनात मला आहे गोडी.”

21. “निळे पाणी, निळे डोंगर, हिरवे हिरवे रान, … चे नावघेऊन राखतो सर्वाचा मान.”

22. “आई-वडील, भाऊ बहिणी, जणू गोकूळासारखे घर, … च्या आगमनाने पडली त्या सुखात भर.”

23. “मातीच्या चुली घालतात घरोघर, … झालीस माझी आता चल बरोबर.”

24. “देवळाला खरी शोभा कळसाने येते, … मुळे माझे गृहसौख्य दुनावते.”

25. “ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल, …चे नाव घेतो तुमच्या साठी स्पेशल.”

26. “देवा जवळ करतो मी दत्ताची आरती, … माझ्या जीवनाची सारथी.”

27. “सीतेसारखे चारीत्र्य, रंभेसारखे रुप, … मिळाली आहे मला अनुरुप.”

28. “… माझे पिता … माझी माता, शुभमुहूर्तावर घरी आणली … ही कान्ता.”

29. “चांदीच्या ताटात, रुपया वाजतो खणखण, … चे नव घेऊन सोडतो आता कंकण.”

30. “स्वतंत्र भारताची तिरंगी ध्वजाणे वाढविली शान, …चे नाव घेतो ठेऊन सर्वाचा मान,”

31. “अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रुपाचा, …. ला घास घालतो वरण-भात-तुपाचा.”

32. “नंदनवनीच्या कोकिळा बोलती गोड, … राणी माझा तळहाताचा फोड.”

33. “देवाला भक्त करतो मनोभारे वंदन, … मुळे झाले संसाराने नंदन,”

34. “दही चक्का तुप, … आवडते मला खुप.”

35. “आंथरली सतरंजी त्यावर पांघरली शाल, … रावांच्या जीवनात… राहील खुशाल.”

36. “श्रीकृष्णाने केला पण रुक्मीणीलाच वरीन, … च्या सोबत आदर्श संसार करीन.”

37. “सोन्याची सुंपली, मोत्यांनी गुंफली, … राणी माझी घरकामाता गुंतली.”

38. “टोपलीत टोपली, टोपलीत भाज्या,
………. माझी राणी, मी तिचा राजा.”

39. “प्रेम म्हणजे, दोन मनांना जोडणारा पूल,
…………… च्या बोलक्या डोळ्यांनी, घातली मला भूल.

40. “भाजीत भाजी मेथीची,
………… माझ्या प्रीतीची.

41. “हो-नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे,
………. मुळे मिळाले मला सौख्य आयुष्यभराचे.

42. “भल्या मोठ्या समुद्रात छोटीशी होडी,
………. ची आणि माझी, लाखात एक जोडी.”

43. “मनी माझ्या आहे, सुखी संसाराची आस,
………. तू फक्त, गोड हास.”

44. “समुद्राचे पाणी लागते खूप खारे,
…………. साठी तोडून आणेन मी चंद्र-तारे”

Read More:- Bhartacha Bhugol PDF Download | संपूर्ण भारताच्या भूगोल ची सविस्तर माहिती जाणून घ्या | GEOGRAPHY OF INDIA

Marathi Ukhane PDF Download

:Marathi Ukhane PDF Download आपण या पोस्ट मध्ये आपण महिलांसाठी आणि पुरुषांसाठी उखाणे संपूर्ण माहिती जाणून घ्या संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

Conclusions

Marathi Ukhane PDF Download – आपण ह्या आर्टिकल मध्ये महिलांसाठी आणि पुरुषांसाठी उखाणे ह्यांची संपूर्ण सविस्तर पणे माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना महिलांसाठी आणि पुरुषांसाठी उखाणे माहिती PDF Download, marathi ukhane, marathi ukhane for female, marathi ukhane for male, modern marathi ukhane for female, ukhane marathi for female, ukhane marathi for male, traditional ukhane in marathi for female, ukhane in marathi for female, ukhane in marathi comedy, ukhane in marathi for male अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही PDF Download  करण्यासाठी Marathi Ukhane pdf देत आहोत. तुम्ही आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages