Advertisement

Panchayat Samiti In Marathi PDF Download – पंचायत समितीची संपूर्ण माहिती

Panchayat Samiti In Marathi PDF

Panchayat Samiti In Marathi PDF:- Panchayat Samiti Information Panchayat Raj system is working in the country and each district has Zilla Parishad whereas at taluka level i.e. at group level Panchayat Samiti works and then there is our Gram Panchayat. Panchayat Samiti is both Gram Panchayat and Zilla Parishad. Very important questions are asked based on this in competitive exams, police recruitment, and gram sevak talathi, and in order to prepare in that way it is important to read and study detailed information about gram panchayat, panchayat samiti Zilla parishad as well as ministry. Let’s see the information about rights.

Advertisement

Panchayat Samiti In Marathi PDF Details

Panchayat Samiti In Marathi PDF :-पंचायत समिती माहिती पंचायत राज हि प्रणाली देशा मध्ये कार्यरत आहे आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा परिषद असते तर तालुका स्तरावर म्हणजेच गट स्तरावर पंच्यात समिती काम करते आणि त्यानंतर असते ती आपली ग्रामपंचायत.पंच्यात समिती हि ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद ह्या दोनी मध्ये काम करते.

Advertisement

स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, ग्रामसेवक तलाठी या मध्ये यावर आधारित खूप महत्वाचे प्रश्न विचारले जातात आणि त्या पद्धतीने तयारी करण्यासाठी ग्रामपंचायत ,पंचायत समिती जिल्हा परिषद तसेच मंत्रालय या संबंधी विस्तारित माहिती वाचणे त्याचा अभ्यास करणे महत्वाचं आहे आजच्या या पोस्ट मध्ये आपण पंचायत समिती तिची कार्य ,अधिकार ,या बाबत माहिती पाहुयात.

Read More:- Pandita Ramabai Information In Marathi PDF Download | पंडिता रमाबाई यांच्याबद्दल सर्व माहिती

What is Panchayat Samiti? – पंचायत समिती म्हणजे काय ?

  • पंचायत समिती हि तालुकास्तरावर काम करणारांनी समिती असते ती पंचायतराज प्रणाली प्रमाणे काम करते .
  • महाराष्ट्र मध्ये जिल्हा परिषद आणि पंच्यात समिती अधिनियम १९६१ कलाम ५६ नुसार प्रत्येक गटासाठी( तालुक्यसाठी ) एक पंचायत समिती असते .
  • म्हणजेच लोकसंखेनुसार ७५ हजार ते १ लाख तर एकूण १०० ते १२५ खेड्यांसाठी गट विकास समिती असते.

Panchayat Samiti In Marathi – Work – पंचायत समितीची कामे

Advertisement

पंचायत समितीची ही जिल्हा परिषदे ने सोपवलेल्या कामे करते. त्याशिवाय ते पुढीलप्रमाणे असलेल्या कामे पंचायत समिती व्यक्तिक पणे करू शकते. त्या मध्ये प्रामुख्याने 1. शेतीचे काम 2. पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकासाची कामे 3. मागासवर्गाच्या कल्याणाचे कार्यक्रम – यात पुढील गोष्टींचा समावेश होतो. 4. शिक्षणाची कामे इत्यादि कामे केली जातात.

Read More:- Marathi Mhani With Meaning List PDF Download । मराठीतील सर्व म्हणी आणि त्यांचा अर्थ

पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकासाची कामे

Advertisement

पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकासाची कामे मध्ये सगळे पशूंच्या आणि दुग्ध शाळांच्या संदर्भातील सर्व निर्णय आणि त्यांच्या विकासावर कार्य करते.

  1. सुधारित पैदाशीच्या कोंबड्यांचे वितरण करणे सुधारित पैदाशीच्या मेंढ्यांचे वितरण करणे
  2. पशुवैद्यकीय साहाय्य केंद्रे चालू करणे
  3. गावातील पशुवैद्यकीय पेट्या चालू करणे
  4. तालुका पशुधन सुधारणा संघ वगैरे स्थापन करणे
  5. गुरांची प्रदर्शने मेळावे भरविणे
  6. दुग्धशाळा विकास करणे

इत्यादि सर्व कार्य हे पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकासाची कामामध्ये केले जाते.

शेतीची कामे

शेतीची कामामध्ये सगळे शेतीचे संदर्भातील सर्व निर्णय शेतीचे कामे आणि त्यांच्या विकासावर कार्य करते.

  1. खरीप व रब्बी पिकांच्या मोहिमा करणे.
  2. शेतीची अभिवृद्धी व सुधारणा करणे.
  3. सुधारित कृषिपद्धती व कृती यांचे प्रात्याक्षिक करणे आणि आदर्श कृषिक्षेत्रे स्थापन करणे व ती सुस्थितीत ठेवणे.
  4. सुधारित कृषिअवजारांचा प्रचार करणे.
  5. भातशेतीची प्रकर्षित लागवड करणे.
  6. गोदामे बांधणे व ती सुस्थितीत ठेवणे.
  7. फळे व भाजीपाला यांच्या उत्पादनात वाढ करणे.
  8. रासायनिक खते, शेतीची अवजारे व शेतीसाठी लागणारे लोखंड, पोलाद व सिमेंट यांचे वाटप करणे
  9. पीक स्पर्धा भरवणे.
  10. सुधारीत बी-बियाणांची आयात व त्यांचे वितरण करणे.

हे सर्व कार्य हे शेतीच्या कामामध्ये केले जाते.

वने

  1. कुरण व जळण यांच्या प्रयोजनाकरिता गाव शिवारांच्या विकासासाठी उपाययोजना
  2. गायराने व कुरणे.
  3. वनाचे संरक्षण
  4. वनाचा विकास

इत्यादि सर्व कार्य हे वने मध्ये केले जातात.

समाजकल्याणाची कामे

  1. मागासवर्गाचा आर्थिक विकास – यात पुढील बाबींचा समावेश होतो. शेतीची साधनसामग्री खरेदी करण्यासाठी शेतक-यास (कर्जाच्या व अर्थसहाय्याच्या रूपाने) वित्तीय सहाय्य देणे
  2. विमुक्त जातींना चरखे पुरविणे.
  3. अस्पृश्यता निवारण – यात पुढील बाबींचा समावेश होतो.

मागासवर्गाच्या कल्याणाचे कार्यक्रम

मागासवर्गाच्या कल्याणाचे कार्यक्रमामध्ये सर्व समाजाच्या हिताचे आणि समाजाच्या विकासाचे काम पुढील गोष्टींचा समावेश होतो.

  1. बालवाड्यांची स्थापना करणे व त्या चालविणे करणे.
  2. महिलांच्या व बालकांच्या कल्याणाचे कार्यक्रम व प्रकल्प करणे.
  3. सामाजिक मेळावे भरविणे
  4. मागासवर्गाच्या कल्याणासाठी प्रचारांचे व प्रसिद्धीचे कामे करणे.
  5. मागावर्गीयांसाठी करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करणे.
  6. मागासवर्गासाठी संस्कार केंद्रे, सामुहिक करमणुकीची केंद्रे आणि सामूहिक सभागृहे करणे.
  7. विमुक्त जातींना कपडे पुरविणे औषधे खरेदी करण्यासाठी व्यक्तींना वित्तीय सहाय्य देणे व वैद्यकीय सहाय्य देण्यासाठी स्वेच्छा संस्थाना अनुदाने देणे.
  8. मागास्वर्गियांच्या व्यक्तींसाठी घरांची तरतूद करणे आणि
  9. पिण्याच्या पाण्याच्या विहिरींची तरतूद करणे

इत्यादि कामे हे मागासवर्गाच्या कल्याणाचे कार्यक्रम केले जातात.

शिक्षणाची कामे

शिक्षणाची कामांमध्ये पंचायत समिति ही सर्व प्राथमिक शाळांच्या इमारती बांधणे व त्या सुस्थितीत ठेवणे प्राथमिक शाळांसाठी साधनसामग्री व क्रीडांगणे यांची तरतूद करणे प्राथमिक शाळांचे व्यवस्थापन इत्यादि कामे करते.

Read More :- 1500+ Samanarthi Shabd Marathi PDF Download | मराठी समानार्थी शब्द

Structure – रचना

  • गटविकास अधिकारी हा पंचायत समिती चा सचिव म्हणून काम करतो.
  • पंचायत समिती साठी प्रत्येक २० हजार लोकसंख्येमागे एक सदस्य निवडला जातो.
  • अधिनियमाच्या कलाम ५७ नुसार पंचायत समिती साठी गुप्त मतदान पद्धतीने सदस्यांची निवड केली जाते.

Election – निवडणूक

  • पंचायत समिती साठी प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक घेतली जाते .
  • निवडणुकीसठी महिलाना ५० टक्के राखीव जागा असतात ज्या मध्ये अनु. जाती-जमाती व मागास प्रवर्ग समाविष्ट आहे
  • अनुसूचित जाती-जमातींसाठी त्यांच्या गटातील  एकूण लोकसंख्येशी असलेल्या त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा राखीव असतात.
  • या नंतर सामान्य नागरिक मागास प्रवर्गसाठी २७ टक्के राखीव जागा आहेत.

Read More: –2000+ Virudharthi Shabd In Marathi PDF Download – मराठी विरुद्धार्थी शब्द

Chairman and Deputy Chairman – सभापती आणि उपसभापती

  • पंचायत समिती ची निवडणूक झाल्यानंतर जिल्ह्याधिकारी पहिल्या सभेची अधिसूचना जाहीर करतात .
  • त्या नंतर पहिल्या सभेमध्ये निवडून आणलेल्या सदस्यांपैकी एका सदस्याची सभापती म्हणून निवड केली जाते.
  • तसेच दुसऱ्या सभेमध्ये उपसभापती ची निवड केली जाते .
  • याचवेळी दोंघांना सामान मते असल्यास चिठ्या टाकून त्यांची निवड पूर्ण केली जाते .

Functions of Chairman – सभापती ची कार्य

  • पंच्यात समिती चा सभापती ह्या प्रमाणे त्यांना समिती ची सभा बोलवणे व विषय मांडणे तसेच सभेचा अध्यक्ष पद भूषवणे हि कामे करावी लागतात .
  • तसेच तालुक्यामध्ये समिती तसेच जिल्हा परिषदेकडून सुरु करण्यात आलेल्या कामाची देखरेख पाहणी सभापतीस करावी लागते .
  • सभापती हा पंचायत समिती च्या कोणत्याही अधिकाऱ्याकडून कामाचा अहवाल हिशेब आणि कागदपत्रे तपासू शकतो .
  • सभापती पंचायत समिती ची मालमत्ता आणि हिशेब वेळोवेळो तपासू शकतो .
  • समिती कडून मंजूर झालेले ठराव तसेच निर्णयाची अंबलबजावणी करणे तसेच शासनाकडून आलेल्या आदेशानुसार काम पार पाडणे .

Read More:- Vasudev Balwant Phadke Information In Marathi PDF Download। वासुदेव बळवंत फडके बद्दल सर्व माहिती

Tenure – कार्यकाल

  • पंच्यात समिती चा कार्यकाल ५ वर्षाचा असतो दर ५ वर्षांनी निवडणूक घेतल्या जातात तसेच राज्यशासन पंचायत समिती चा कार्यकाल कमी जास्त करू शकते .
  • याचवेळी सभापती आणि उपासभती यांचा कार्यकाळ अडीच वर्षाचा असतो.

Remuneration of members -सदस्यांचे मानधन

  • पंचायत समिती मध्ये निवडून आलेल्या प्रत्येक सदस्याला मानधन दिले जाते .
  • सभापती साठी महिना रु. १०,०००/- तर उपसभापतीस महिना  रु. ८,०००/- मानधन भत्ता दिला जातो .

Motion Of No Confidence- अविश्वास ठराव

  • पंचायत समिती ची निवडणूक झाल्यानंतर पहिल्या ६ महिन्यांमध्ये अविश्वास ठराव मांडला जाऊ शकत नाही .
  • तसेच अविश्वास ठराव एकदा फेटाळला गेल्यानंतर पूर्ण १ वर्ष तो पुन्हा मांडला जाऊ शकत नाही .
  • यानंतर अधिनियमातील कलम ७२ नुसार पंचायत समितीच्या सभेस उपस्थित राहणाऱ्या व मतदानाचा अधिकार असणाऱ्या सदस्यांपैकी एक तृतीयांश सदस्यांनी मागणी केल्यास सभापती-उपसभापती यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मांडता येतो.
  • या ठरावाची जिल्हाधिकारी यांच्याकडून खास सभा घेतली जाते आणि सभेमध्ये २/३ सदस्यांचे बहुमत आवश्यक असते तसे ना झाल्यास अविश्वास ठराव फेटाळला जाऊ शकतो .
  • महिला सदस्य अविश्वास ठरावा साठी तीन चतुर्थांश बहुमत आवश्यक असते .

Resignation – राजीनामा

  • पंच्यात समिती मध्ये राजीनामा द्यययाचा झाल्यास सभापती त्यांचा राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षांकडे देतात .
  • तसेच उपसभापती त्यांचा राजीनामा हा सभापती यांच्याकडे देऊ शकतात .

Panchayat Samiti In Marathi PDF Download

Panchayat Samiti In Marathi PDF Download :- बहुतेक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना पंचायत समिती ची माहिती पीडीएफ मध्ये डाउनलोड करू शकतात. खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

Conclusion For Panchayat Samiti in Marathi

Conclusion:- आपण ह्या आर्टिकल मध्ये बघितले की पंचायत समिति ही कसे काम करते, त्या मध्ये घडणाऱ्या विविध घटकां बद्दल ची सर्व माहिती आपण जाणून घेतली आहे. ह्या आर्टिकल मध्ये Panchayat Samiti In Marathi, Panchayat Samiti In Marathi PDF, पंचायत समितीची कामे, पंचायत समिती सदस्य मानधन, पंचायत समिती निवडणूक इत्यादि बघितले आहे.

Frequently Asked Question Panchayat Samiti in Marathi PDF


पंचायत समिती सदस्य संख्या महाराष्ट्र
किती आहे ?

पंच्यात समिती सदस्य संख्या ठरवण्याचा अधिकार राज्यास शासनास असतो नियमाप्रमाणे ती कमीत कमी १५ तर जास्तीत जास्त २५ असू शकते .

पंचायत समिती सदस्य पात्रता काय आहे ?

पंचायत समिती सदस्य हा भारतीय नागरिक असून त्याची वयाची २१ वर्ष पूर्ण असणे आवश्यक .

पंचायत समिती ची कामे काय असतात ?

जिल्हा परिषदेची कामे व विकास कार्यक्रम अंमलात आणणे, देखभाल करणे, देखरेख ठेवणे व प्रशासकीय व्यवस्था करण्याचे काम करील. गटविकास अधिका-याच्या कामावर सर्वसाधारण देखरेख व नियंत्रण ठेवण्याचे काम पंचायत समिती करते .

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages