All List of Viceroys in India PDF Download:- Tenure of Indian Viceroys- After the uprising of 1857, the power of India came to the British. Meanwhile, the Government of India Act 1858 was passed. In this, provision was made for the Governor General of India as the Viceroy of India. From 1857 till independence, some important viceroys became there and they did some work during their time. In competitive exams, questions are asked about their tenure name and work this topic is very important for almost all competitive exams.
All List of Viceroys in India PDF Download
All List of Viceroys in India PDF Download:- भारतीय व्हॉईसरॉयचा कार्यकाल-1857 च्या उठाव नंतर भारताची सत्ता इंग्रजांकडे आली. याचदरम्यान Government of India Act 1858 पास करण्यात आला आली. यामध्ये Governor General of India as the Viceroy of India ची तरतूद करण्यात आली 1857 पासून ते स्वतंत्र मिळे पर्यंत काही महत्वाचे व्हॉईसरॉय होऊन गेले त्यांनी त्यांच्या काळामध्ये काही कामे केली. स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांचा कार्यकाळ नाव आणि कामे या बद्दल प्रश्न विचारले जातात जवळ जवळ सगळ्याच स्पर्धा परीक्षांसाठी हा टॉपिक खूपच महत्वाचा आहे. आजच्या या पोस्ट मध्ये पाहुयात १८५७ नंतर भारतीय व्हॉईसरॉय आणि कार्य संपूर्ण माहिती.
Read More:- Kal Ani Kalache Prakar PDF Download | काळ आणि काळाचे प्रकाराची संपूर्ण माहिती जाणून घ्या
List of Viceroys of India 1857 ते 1947 पर्यंत | List Of Viceroys In India From 1858 to 1947
क्रमांक. | व्हॉईसरॉय नाव | कार्यकाळ |
१ | Lord Canning (लॉर्ड कॅनिंग) | 1858 – 1862 |
२ | Lord Elgin लॉर्ड एल्गीन | 1862 – 1863 |
३ | Lord Lawrence लॉर्ड लॉरेन्स | 1864 – 1869 |
४ | Lord Mayo लॉर्ड मायो | 1869 – 1872 |
५ | Lord Northbrook लॉर्ड नॉर्थबुक | 1872 – 1876 |
६ | Lord Lytton लॉर्ड लिटन | 1876 – 1880 |
७ | Lord Ripon लॉर्ड रिपन | 1880 – 1884 |
८ | Lord Dufferin लॉर्ड डफरिन | 1884 – 1888 |
९ | Lord Lansdowne लॉर्ड लॅन्डसोम | 1888 – 1894 |
१० | Lord Elgin II लॉर्ड एल्गिन | 1894 – 1899 |
११ | Lord Curzon लॉर्ड कर्झन | 1899 – 1905 |
१२ | Lord Minto II लॉर्ड मिंटो | 1905 – 1910 |
१३ | Lord Hardinge II लॉर्ड हार्डिंग | 1910 – 1916 |
१४ | Lord Chelmsford लॉर्ड चेम्सफोर्ड | 1916 – 1921 |
१५ | Lord Reading लॉर्ड रेड़ीन्ग | 1921 – 1926 |
१६ | Lord Irwin लॉर्ड आयर्विन | 1926 – 1931 |
१७ | Lord Willingdon लॉर्ड वेलिंग्टन | 1931 – 1936 |
१८ | Lord Linlithgow लॉर्ड लिनलिथगो | 1936 – 1944 |
१९ | Lord Wavell लॉर्ड वेव्हेल | 1944 – 1947 |
२० | Lord Mountbatten लॉर्ड माऊंट बॅटन | 1947-1948 |
Viceroys In India From 1858 to 1947 | 1858 ते 1947 पर्यंत भारतात व्हाइसरॉय
1. Lord Canning (लॉर्ड कॅनिंग) | Viceroys in India
- लॉर्ड कॅनिंग हे 1856-1858 गव्हर्नर जनरल होते तर त्या नंतर भारताचे पहिले व्हाईसरॉय झाले.
- त्यांच्या कार्य काळामध्ये झालेले १८५७ चा उठाव त्यांनी मोडून काढला.
- खालसा धोरण रद्द केले.
- १८५६ मध्ये भारतात आय. सी. एस्. परीक्षेची सुरवात त्यांनी केली.
- १८५७ मध्ये मुंबई मद्रास आणि कोलकाता येथे विद्यापीठाची स्थापना केली.
- १८६० मध्ये इंडियन पिनल कोड लागू करण्यात आले.
- १८६१ मध्ये मुंबई मद्रास आणि कोलकाता येथे उच्च न्यायालयांची स्थापना केली.
- १८६१ मध्ये त्यांनी कोलकाता अहमदाबाद लोहमार्ग त्यांनी सुरु केला.
- आग्रा आणि लाहोर येथे स्थानिकांचा दरबार भरवून त्यांच्या सनदा परत केल्या.
2. Lord Elgin – लॉर्ड एल्गिन
- लॉर्ड एल्गिन हे 1862-18583 गव्हर्नर जनरल होते तर त्या नंतर भारताचे दुसरे व्हाईसरॉय झाले.
- वहाबी चळवळ त्यांच्या कारकिर्दीत झाली होती.
3. Lord Lawrence लॉर्ड लॉरेन्स
- Lord Lawrence लॉर्ड लॉरेन्स यांनी १८६४ ते १८६९ पर्यंत व्हाईसरॉय म्हणून काम केले.
- त्यांनी पाटबंधारे खाते सुरु केले.
- शेतकऱ्यांसाठी पंजाब च्या अवध येथे टेनन्सी ऍक्ट पास केले.
- जलसिंचन खात्याची सुरवात केली.
- अफगाणीस्थान बरोबर उत्कृष्ट निष्क्रियता धोरण सुरु केले.
4. Lord Mayo लॉर्ड मायो
- लॉर्ड मायो यांची व्हाईसरॉय ची कारकीर्द १८६९ ते १८७२ दरम्यान होती.
- त्यांना आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक असे म्हंटले जाते कारण त्यांनी १४ डिसेंबर १८७० रोजी आर्थिक विकेंद्रीकरणाचे विधेयक पास केले.
- १८७२ मध्ये लॉर्ड मायो यांनी पहिली जनगणना केली. यांनतर दर दहा वर्षांनी जनगणना केली जाऊ लागली.
5. Lord Northbrook लॉर्ड नॉर्थबुक
- लॉर्ड नॉर्थबुक चा कार्यकाळ १८७२ ते १८७६ या चार वर्षांचा होता,
- त्याच्या काळामध्ये प्रिन्स ऑफ वेल्स भारत भेट दिली होती.
Read More:- भारतीय वृत्तपत्रे आणि संपादकांची संपूर्ण माहिती PDF Download
6. Lord Lytton लॉर्ड लिटन
- लॉर्ड लिटन ची कारकीर्द १८७६ ते १८८० ची आहे.
- लॉर्ड लिटन ने मिठाच्या व्यपारावर जाचक कर लादला होता.
- भारताच्या इतिहासामध्ये लॉर्ड लिटन ला जुलमी लिटन शाही म्हणून ओळखले जाते.
- १८७६ ते १८७६ दरम्यान मोठा दुष्काळ पडला या दुष्काळावर उपाय शोधण्यासाठी रिचर्ड स्ट्रेंची आयोग नेमला.
- १८८३ च्या दुष्काळासाठी दुष्काळ संहिता लागू केले.
- १८७७ मध्ये दिल्ली दरबारामध्ये त्यांनी राणी व्हिक्टोरियास कैसर-ए-हिंद पदवी दिली.
- देशी वृत्तपत्र वर नियंत्रण आणण्यासाठी १८७८ मध्ये देशी वृत्तपत्र कायदा पास केला.
- १८७८ मध्ये भारतीयांसाठी सश्त्रबंदी कायदा अमलात आणला.
- स्टॅट्यूटरी सिव्हिल सर्व्हिसेस ॲक्ट’ संमत करून परीक्षेची कमाल वयोमर्यादा २१ वरून १९ वर्षे केली.
7. Lord Ripon लॉर्ड रिपन
- लॉर्ड रिपन यांचा १८८० ते १८८४ दरम्यान चा आहे.
- लॉर्ड लिटन ने लागू केलेला व्हर्नाक्यूलर प्रेस ॲक्ट लॉर्ड रिपन ने बंद केला.
- नागरिक सेवांची वयोमर्यादा १९ वर्षवरून पुन्हा २१ वर्ष केली.
- रमेशचंद्र मित्तर हे भारताचे पहिले न्य्यायधीश बनले लॉर्ड रिपन ने त्यांची उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी नियुक्ती केली.
- ७ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना काम बंदी साठी १८८१ मध्ये फॅक्टरी ॲक्ट संमत केला.
- १८८१ मधेच बडोदा राज्याची पुनर्स्थापना केली.
- १८८२ मध्ये भारतीय शिक्षण आयोग म्हणजेच हंटर कमिशन नेमले.
- १८८३ मध्ये इलबर्ट विधेयक मंजूर केले.
- १८८२ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा केला.
Read More:- All Top Forts Of Maharashtra PDF Download | महाराष्ट्रातील सर्व गडकिल्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या
8. Lord Dufferin लॉर्ड डफरिन | Viceroys in India
- लॉर्ड डफरिन हा भारताचा व्हॉईसरॉय म्हणून १८८४ ते १८८८ पर्यंत कार्यरत होता,
- डफरिन ने १८८६ मध्ये ब्रम्हदेश भारत मध्ये विलीन केला.
- १८८७ मध्ये पंजाब चा कुळकायदा याला संमती दिली.
- त्यांच्या कार्यकाळ मध्ये १८८५ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना झाली.
- तसेच १८८६ मध्ये लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली.
- स्थानिकांना स्वतःचे सेन्य ठेवण्यास परवानगी देण्यासाठी इंपिरिअल सर्व्हिस टुप्स योजना सुरु केली.
9. Lord Lansdowne – लॉर्ड लॅन्सडाउन
- लॉर्ड लॅन्सडाउन हा भारताचा व्हॉईसरॉय म्हणून १८८८ ते १८94 पर्यंत कार्यरत होता,
- 1891 मध्ये आणखी एक कारखाना कायदा लागू करण्यात आला होता.
- 1892 मध्ये भारतीय परिषद अधिनियम झाला
- 1893 मध्ये ड्युरंड कमिशनची स्थापना करण्यात आली होती.
10. Lord Elgin II – – लॉर्ड एल्गिन II
- लॉर्ड एल्गिन II हा भारताचा व्हॉईसरॉय म्हणून 1894 ते 1899 पर्यंत कार्यरत होता,
- रामकृष्ण आणि दामोदर चापेकर या बंधूंनी पहिला ब्रिटिश अधिकारी रँड्सचा खून केला. ब्रिटीशांच्या काळात भारतातील ही पहिलीच राजकीय हत्या होती.
11. Lord Curzon लॉर्ड कर्झन
- लॉर्ड कर्झन चा कार्यकाळ १८९९ ते १९०५ दरम्यान चा होता.
- १८९९ मध्ये कर्झन ने भारतीय चलन कायदा सामंत केला.
- तसेच स्थानिक स्वराज्य संस्था वर नियंत्रण आणण्यासाठी १९०० मध्ये कोलकाता महापालिका विधेयक मंजूर केले.
- १९०१ मध्ये पंजाब लंड एलिनेशन कायदा पास केले.
- १९०० मध्ये दुष्काळ आयोगाची स्थापना केली.
- १६ ऑक्टोबर १९०५ मध्ये बंगालची फाळणी करण्याची अधिकृत घोषणा केली.याची अधिसूचना १९ जुलै १९०५ मध्ये जरी करण्यात आली होती.
- १९०१ मध्ये शिमला येथे शिक्षण परिषद चे आयोजन केले त्याचदरम्यान रॉयल नेव्हीची स्थापना केली.
- १९०४ मध्ये उच्च शिक्षण पद्धतीवर निर्बंध आणण्यासाठी विद्यापीठ कायदा सामंत केला.
- प्रचीन स्मारकानं संरक्षण देण्यासाठी १९०४ मध्ये कायदा संमत केला.
- १९०१ मध्ये ‘इंपिरिअल कॅडेट कोअर ची स्थापना केली.
- लॉर्ड कर्झन च्या काळामध्येच सगळ्यात जास्त रेल्वे मार्गांची निर्मिती झाली.
- १९०४ मध्ये त्याने पहिला सहकारी पतपेढी कायदा सुरु केला.
12. Lord Minto II लॉर्ड मिंटो 2
- लॉर्ड मिंटो २ चा कार्यकाळ १९०५ ते १९१० दरम्यान चा आहे.
- याच्या कार्यकाळ मध्ये बंगालच्या विभाजनाला विरोध करून स्वदेशी आंदोलन करण्यात आले.
- १९०८ वृत्तपत्र अधिनियम सामंत केला.
- १९०७ मध्ये सुरत येथे काँग्रेस चे विभाजन झाले.
- १९०९ चा मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा सगळ्यात जास्त लोकप्रिय आहे.
- १९०६ मध्ये ढाका येथे मुस्लिम लीग ची स्थापना करण्यात आली.
13. Lord Hardinge II लॉर्ड हार्डिंग
- लॉर्ड हार्डिंग चा कार्यकाळ १९१० ते १९१६ दरम्यान चा आहे.
- इंग्लंड चा राजा पंचम जॉर्ज याने १९११ मध्ये बंगाल ची फाळणी रद्द करण्याची घोषणा केली,
- याचदरम्यान भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्ली करण्यात आली.
- १९१५ मध्ये हिंदू महासभेची स्थापना झाली याच दरम्यान सॅनफ्रांसिक्को मध्ये गदर पार्टी अस्तित्वात आली.
14. Lord Chelmsford लॉर्ड चेम्सफोर्ड
- लॉर्ड चेम्सफोर्ड चा कार्यकाळ १९१६ ते १९२१ दरम्यान चा आहे.
- याच दरम्यान म्हणजे १९१६ मध्ये होमरूल लीग ची स्थापना झाली,
- १९१६ मध्ये काँग्रेस च लखनौ अधिवेशन ला सुरवात झाली,
- मार्च १९१९ मधेच इतिहासामधला सगळ्यात मोठा जालियनवाला बाग हत्याकांड घडले.
- १९१९ मध्ये मॉन्टडर्ड सुधारणा पास झाली,
- चंपारण सत्याग्रह १९१७ मध्ये सुरू झाला;
- भारत सरकार कायदा (1919) आणला गेला.
- रौलेट कायदा (1919) किंवा काळे कायदे आणले गेले. देशव्यापी आंदोलने झाली.
15. Lord Reading लॉर्ड रेड़ीन्ग
- Lord Reading लॉर्ड रेड़ीन्ग ह्यांचा कालावधी हा 1921-1926 होता.
- 1922 चौरी चौरा घटना घडली, ज्यामुळे महात्मा गांधींनी 1922 मध्ये असहकार आंदोलन मागे घेतले.
- 1922 मध्ये स्वराज पक्षाची स्थापना झाली.
- 1925 मध्ये काकोरी कट, रेल्वे दरोडा घडले.
16. Lord Irwin लॉर्ड आयर्विन
- लॉर्ड चेम्सफोर्ड चा कार्यकाळ 1926 ते 1931 दरम्यान चा आहे.
- सायमन कमिशन 1927 मध्ये भारतात आले.
- हार्कोर्ट बटलर, भारतीय राज्य आयोग (1927)
- 1928 मध्ये नेहरू रिपोर्ट सादर झाला.
- 1929 मध्ये दीपावली घोषणा.
- काँग्रेसचे लाहोर अधिवेशन जेथे 1929 मध्ये पूर्ण स्वराज ठराव घेण्यात आला होता.
- क्रांतिकारी दांडी मार्च 12 मार्च 1930 ते 6 एप्रिल 1930 पर्यंत होता, त्याच वर्षी सविनय कायदेभंग चळवळ यशस्वीपणे सुरू केली;
- 1930 मध्ये पहिली गोलमेज परिषद झाली.
- 1931 मध्ये गांधी-आयर्विन करार
17. Lord Willingdon लॉर्ड वेलिंग्टन | Viceroys in India
- लॉर्ड वेलिंग्टन चा कार्यकाळ 1931 ते 1936 दरम्यान चा आहे.
- 1932 मध्ये सांप्रदायिक पुरस्काराची स्थापना झाली.
- 1932 मध्ये दुसरी आणि तिसरी गोलमेज परिषद.
- पुणा करार 1932 ने डॉ. बी.आर. आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यातील स्वतंत्र दलित मतदारांच्या प्रश्नावर तोडगा काढला.
- 1935 चा भारत सरकार कायदा.
18. Lord Linlithgow लॉर्ड लिनलिथगो | Viceroys in India
- लॉर्ड लिनलिथगो चा कार्यकाळ 1936 ते 1944 दरम्यान चा आहे.
- 1941 मध्ये इंडियन नॅशनल आर्मीची निर्मिती.
- १९३९ मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाल्यानंतर काँग्रेसच्या मंत्रिपदांचा राजीनामा.
- १९३९ मध्ये त्रिपुरी संकट आणि फॉरवर्ड ब्लॉकची निर्मिती
- 1940 मध्ये मुस्लिम लीगचा लाहोर ठराव (मुस्लिमांसाठी वेगळ्या राज्याची मागणी)
- 1940 ची ऑगस्ट ऑफर
- 1941 मध्ये इंडियन नॅशनल आर्मीची निर्मिती
- 1942 मध्ये क्रिप्स मिशन
- 1942 मध्ये भारत छोडो आंदोलन
19. Lord Wavell लॉर्ड वेव्हेल
- लॉर्ड लिनलिथगो चा कार्यकाळ 1944 ते 1947 दरम्यान चा आहे.
- १९४४ सी. राजगोपालाचारी यांचा सीआर फॉर्म्युला
- 1942 मध्ये वेव्हेल योजना आणि सिमला परिषद.
- 1946 मध्ये कॅबिनेट मिशन
- 1946 मध्ये मुस्लिम लीगने डायरेक्ट अॅक्शन डे जाहीर केला.
- 1947 मध्ये क्लेमेंट अॅटली द्वारे भारतातील ब्रिटिश राजवट संपल्याची घोषणा.
20. Lord Mountbatten लॉर्ड माऊंट बॅटन
- Lord Mountbatten लॉर्ड माऊंट बॅटन चा कार्यकाल 1947 ते 1948 दरम्यान चा आहे.
- 1947 मध्ये जून तिसरी योजना किंवा माउंटबॅटन योजना.
- 1947 मध्ये रेडक्लिफ कमिशन
- १५ ऑगस्ट १९४७ मध्ये भारत स्वातंत्र्य झाला.
- Lord Mountbatten हे भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय होते.
All List of Viceroys in India PDF Download
All List of Viceroys in India PDF Download:- आपण या पोस्ट मध्ये आपण 1857 पासून 1947 पर्यंत च्या भारतीय व्हॉईसरॉय ची कार्यकालाची संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.
Conclusion Of Viceroys in India
Viceroys in India PDF Download :- आपण ह्या आर्टिकल मध्ये सम संख्या आणि त्यांची सविस्तर पणे माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना british viceroys in india, list of viceroys in india, list of british viceroys in india, viceroys in india, viceroys in india from 1858 to 1947, british governor generals and viceroys in india, list of british viceroys in india, british governor generals and viceroys in india pdf अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही All List of Viceroys in India PDF Download करण्यासाठी PDF देत आहोत. तुम्ही Viceroys in India PDF आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.
Related Posts:
- 1857 Cha Uthav PDF Download | 1857 चा उठाव भारत आणि…
- Indian President List 1947 To 2023 |भारतातील सर्व…
- All Kalam In Marathi PDF Download | Kalam 1 To 395 |…
- All Congress Adhiveshan List In Marathi PDF Download…
- List Of All National Parks In India Information PDF Download
- List Of All Airports In India PDF Download