भारतातील प्रमुख नद्या व त्यांच्या उपनद्या:- Major rivers in India, length of tributaries, complete information India is a country is said to be an agricultural country where farming is done for twelve months. The water required for agriculture is taken by the rivers in the rainy season as well as in other seasons. Due to these and many other reasons rivers are very important.
While studying for the competitive exam, rivers are asked questions based on their origin, length and tributary of the ocean.
भारतातील प्रमुख नद्या, उपनदया लांबी संपूर्ण माहिती भारत आहे देश शेती प्रधान देश आहे असे म्ह्टले जाते जिथे बारा महिने शेती केली जाते . शेती साठी लागणारे पाणी हे पाऊस तसेच इतर ऋतू मध्ये नद्या द्वारे घेतले जाते .या आणि इतर अनेक कारणांमुळे नद्यांना खूप जास्त महत्व दिले जाते. स्पर्धा परीक्षा चा अभ्यास करताना नद्या त्यांचा उगम लांबी उपनद्या कोणत्या सागराला मिळतात यावर आधारित प्रश्न विचारले जातात हे प्रश्न सोपे आणि पटकन मार्क्स देणारे असतात तासाठी फक्त नद्यांची माहिति एकदा वाचन करणे आवश्यक असते आजच्या पोस्ट मध्येभारतातील प्रमुख नद्या, उपनदया लांबी संपूर्ण माहिती दिली आहे.
भारतातील प्रमुख नद्या, उपनदया लांबी संपूर्ण माहिती
1. चंबळ
चंबळ ही नदी यमुनेची उपनदी आहे. चंबळ ह्या नदी चा उगम हा मध्य प्रदेश जानापाव येथे विंध्य पर्वतातमधून होतो. ह्या नदीची लांबी 960km आहे. ही नदी उत्तर प्रदेशांतून, मध्य प्रदेश, राजस्थान ह्या राज्यांमधून वाहते.
उगम :- मध्य प्रदेश
लांबी :-९६० किमी
उपनद्या :- 1. क्षिप्रा 2. पार्वती 3. बागरी 4. चामला 5. सिवाना 6. ब्राह्मणी 7. कराल
2. सतलज
सतलज नदी चा उगम राकस सरोवर मधून होतो ,ह्या नदीची लांबी 1360KM असून बियास हि तिची उपनदी आहे तर सतलज नदी पुढे सिंधु नदिस मिळते .
उगम :-राकस सरोवर
लांबी :-1360 किमी
उपनद्या :- 1. बियास
3.गंगा
गंगा नदी चा उगम गंगोत्री या हिमनदीमधून आहे गंगा नदीची लांबी 2510किमी असून ती भारत आणि बांगलादेश या २ देशांमधून वाहते आणि शेवटची बंगालच्या उपसागरास मिळते गंगा नंदीच्या उपनद्या यमुना, गोमती, शोण या आहेत .
उगम :-गंगोत्री
लांबी :-2510 किमी
उपनद्या :- 1.यमुना,2. गोमती, 3. शोण
Read More:- महाराष्ट्रातील जिल्हे आणि तालुके PDF Download
4. यमुना
यमुना नदीचा उगम हा यमुनोत्री हिमनदीपासून होतो. यमुना ज्याला जमुना देखील म्हणतात. ही गंगेची विसर्जनानुसार दुसरी सर्वात मोठी उपनदी आणि भारतातील सर्वात लांब उपनदी आहे. उत्तराखंडमधील खालच्या हिमालयातील बंदरपंच शिखरांच्या नैऋत्य उतारावर ६,३८७ मीटर (२०,९५५ फूट) उंचीवर असलेल्या यमुनोत्री हिमनदीपासून उगम पावलेली. ती एकूण १,३७६ किलोमीटर (८५५ मैल) लांबीचा प्रवास करते. आणि त्याची ३२६ किलोमीटर लांबीची प्रणाली आहे. (१४१,३९९ चौरस मैल), संपूर्ण गंगा खोऱ्यापैकी ४०.२%. हे त्रिवेणी संगम, अलाहाबाद येथे गंगेत विलीन होते.
उगम :- यमुनोत्री
लांबी :-१,३७६ किमी
उपनद्या :–
• डावीकडे:- हिंडन, हनुमान गंगा, सासुर खडेरी
• उजवेकडे:- टन, गिरी, बघाईन, चंबळ, बेतवा, सिंध, केन
5. गोमती
गौमाता नदी हि गंगा नदी ची प्रमुख उपनदी असून ती उत्तर प्रदेश या राज्यातून वाहते या नदीचा उगम पिलिभीत जवळ होतो .लांबी एकूण 960 कि॰मी असून पुढे हि नदी गाजीपूर जिल्याच्या सैदापूर जवळ गंगा नदी मध्ये मिळते .
उगम :- उगम पिलिभीत
लांबी :-९६० किमी
उपनद्या :– सई,कठना,,सरायन,छोहा,सुखेता
6. घाघ्रा
घागरा नदी हि तिब्बत नेपाळ आणि भारत या देशांमधून वाहते हि गंगा नदी ची प्रमुख उपनदी आहे .घागरा का वस्त्रावरूनच या नदीला घागरा हे नाव पडले आहे .नेपाळ मध्ये घागरा नदी ला कर्नाली असे नाव आहे .नदी ची लांबी ९१२ किमी आहे .
उगम :- गंगोत्रीच्या पूर्वेस
लांबी :-९१२ किमी
उपनद्या :– शारदा, राप्ती
7. गंडक नदी
गंडकी नदी नेपाळ आणि बिहार मधून वाहते नेपाळ मध्ये या नदीला सालीग्रामी सालग्रामी ,नारायणी आणि सप्तगंडकी अशी नावे आहेत .या नदीवर बिहार सरकारची विकास कामे प्रोजेक्ट हाती घेतले आहेत .नदीचा उगम मध्य हिमालय (नेपाळ मध्ये होतो .
उगम :- मध्य हिमालय (नेपाळ)
लांबी :-६७५ किमी
उपनद्या :– त्रिशूला
8. दामोदर नदी
दामोदर नदी हि पश्चिम बंगाल आणि झारखंड ह्या राज्यामधून वाहते . या नदीवर दामोदर घाटी जलविद्युत प्रोजेक्ट सुरु करण्यात आला आहे .या अगोदर नदी मध्ये अचानक पूर यायचे त्या मुले नदीला बंगाल चा अभिशाप असे सुद्धा बोलले जायचे नदी पुढे हुगळी नदीस जाऊन मिळते ..
उगम :- तोरी (छोटा नागपूर पठार)
लांबी :-541 किमी
उपनद्या :– गोमिया, कोनार, बाराकर
9. ब्रम्हपुत्रा नदी :
ब्रम्हपुत्रा नदी भारत ,बंग्लासदेश आणि तिबेट या ३ देशांमधून वाहते नदीचा उगम हिमालयाच्या उत्तरेस तिबेट मधल्या मानसरोवर झील जवळ होतो .या नंतर हि भारत अरुणाचल प्रदेश मधून पुढे बांगलादेश मध्ये जाऊन बंगाल च्या खाडीस जाऊन मिळते .सगळ्या नद्यांची नावे स्त्रीलिंग असतात पण ब्रह्मपुत्रा नदी याला अपवाद आहे .
उगम :- मानस सरोवराजवळ (तिबेट)
लांबी :-2900 किमी
उपनद्या :– मानस, चंपावती, दिबांग
10. सिंधू नदी :
सिंधू नदी हि आशिया खंडामधील सगळ्यात मोठ्या नद्यांपैकी एक मानली जाते .हि नदी भारत पाकिस्तान ,चीन या देशांमधून वाहते .शेवटी हि नदी अरबी समुद्रास जाऊन मिळते .सिंधू नदी पाकिस्तान मधली सगळ्यात मोठी नदी आणि राष्ट्रीय नदी आहे .
उगम :- मानस सरोवराजवळ (तिबेट)
लांबी :-2900 किमी
उपनद्या :– झेलम, चिनाब, रावी, सतलज, बियास
11.झेलम नदी :
झेलम नदी उत्तर भारत मधून वाहणारी नदी आहे या नदीचा उगम वैरी नाग नामी नगर मध्ये होतो ,पुढे झेलम नदी सिंधू नदीस मिळते .
उगम :- वैरीनाग
लांबी :-725 किमी
उपनद्या :– पुंछ, किशनगंगा
Read More:- List Of Forts In Maharashtra In Marathi PDF Download 2022
12.रावी नदी
रावी नदीला ऋग्वेद काळामध्ये परुष्णी असे नाव आहे तर तिला लहौर नदी असा सुद्धा बोलले जाते .पुढे हि नदी पाकिस्तान मध्ये सिंधू नदीस मिळते आणि अरब सागरास मिळते .
उगम :- कुलू टेकडयामध्ये (हिमाचल प्रदेश)
लांबी :-720 किमी
उपनद्या :– दीग
13.नर्मदा
नर्मदा नदीला रेवा असे सुद्धा म्हंटले जाते .नर्मदा नदी भारताची तिसरी सर्वात मोठी नदी आहे .मध्य भारतामधून वाहणारी हि नदी मध्य प्रदेश ची लाईफ लाईन म्हणून सुद्धा ओळखली जाते .हि नदी पुढे अरबी समृद्ध मध्ये खांबात च्या आखात जवळ मिळते .
उगम :- अमरकंटक (एम.पी)
लांबी :-1310 किमी
उपनद्या :– तवा
14.तापी
तापी नदीचा उगम मध्य प्रदेश मधील बैतुल जिल्ह्याच्या मुल्ताई मध्ये होतो पुढे हि नदी महाराष्ट्रे खान्देश आणि गुजरात मधून अरबी समुद्रास खांबात च्या आखातामध्ये मिळते .याच नदी वर सुरत बंदर स्थित आहे .
उगम :- मुलताई टेकडयामध्ये (म.प्रदेश)
लांबी :-702 किमी
उपनद्या :– पूर्णा, गिरणा, पांझरा
15.साबरमती
साबरमती नदी चा उगम राजस्थान मधील उदयपूर जिल्याच्या अरावली पर्वतरांगे मध्ये होतो .राजस्थान मधून गुजरात मध्ये वाहून हि नदी अरबी समुद्र मध्ये खांबात च्या आखातामध्ये मिळते .साबरमती हि नदी देशाच्या प्रमुख नद्यांपैकी एक असून गुजरात ची सगळ्यात महत्वाची नदी आहे .साबरमती नदी वरच गुजरात राज्याचे जलविद्युत प्रकल्प चालू आहे .
उगम :- अरवली पर्वत
लांबी :-415 किमी
उपनद्या :– हायमती, माझम, मेखो
16.महानदी
महानदी छत्तीसगड आणि ओरिसा ची सगळ्यात मोठी नदी असून रायपूर मधील धमतरी जिल्याच्या सहावा पर्वत श्रेणी मधून उगम पावते .शेवटी हि नदी पश्चिम बंगाल च्या खाडी मध्ये समुद्रास मिळते .
उगम :- सिहाव (छत्तीसगड)
लांबी :-858 किमी
उपनद्या :– सेवनाथ, ओंग, तेल
17.गोदावरी
गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्र मधील त्रयंबकेश्वर नाशिक येथे होतो .मोठी नदी असल्या मुले या नदीला दक्षिण गंगा असे सुद्धा बोलले जाते .शेवटी हि नदी राजहमुंद्री शहराजवळ बंगाल च्या खाडीस जाऊन मिळते .नदीचा पाट मोठा असून उपनद्या हि खूप आहे .
उगम :- त्र्यंबकेश्वर
लांबी :-1498 किमी
उपनद्या :– सिंदफणा, दूधना, पैनगंगा, प्राणहीता, वर्धा, मांजरा, वैनगंगा, इंद्रावती
Read More:- Marathi Books And Authors List PDF- मराठी लेखक आणि त्यांची पुस्तके
18.कृष्णा नदी
कृष्ण नदी चा उगम पश्चिम घाटामध्ये महाबळेश्वर मधून होतो हि नदी महाराष्ट्र ,कर्नाटक .तेलंगणा ,आंध्र प्रदेश मधून बंगाल च्या खाडीमध्ये मिळते .या नदीवर सगळ्यात जास्त वीज निर्मिती केली जाते .
उगम :- महाबळेश्वर
लांबी :-1280 किमी
उपनद्या :–
•कोयना, वारणा, भीमा, वेन्ना, पंचगंगा, तुंगभद्रा
19.भीमा
भीमा मधील महाराष्ट मध्ये पुणे जिल्ह्यातील भीमा शंकर येथे उगम पावते .सोलापूर जिल्यामधील पंढरपूर येथे याच नदीला चंद्रभागा असे म्हंटले या नदी मध्ये स्नान करणार पवित्र मानले जाते .हि नदी पुढे वाहत जाऊन कर्नाटक मध्य कृष्ण नदीला मिळते .भीमा नदीवर एकूण २२ धरणे आहेत .भीमा नदी हि एक अशी नदी आहे जिच्या काठावर सगळ्यात जास्त मंदिरे तीर्थक्षेत्र आहेत .
उगम :-भीमाशंकर
लांबी :-867 किमी
उपनद्या :– इंद्रायणी, मुळा-मुठा, घोड, निरा, सिना, मान
20.कावेरी
कावेरी नदी कर्नाटक आणि उत्तर तामिळनाडू या २ राज्यामधून वाहते या नदीचा उगम ब्रह्मगिरी पर्वत मध्ये होऊन पुढे हि नदी बंगालच्या खाडीस जाऊन मिळते .कावेरी नदी च्या किनारी तिरुचिरापल्ली हे तीर्थ स्थान आहे आणि शहर आहे .या नदीच्या पाण्यासाठी तामिळनाडू आणि कर्नाटक मध्ये वाद आहे ज्याला कावेरी जल विवाद असे बोलले जाते .
उगम :-ब्रम्हगिरी (कर्नाटक)
लांबी :-760 किमी
उपनद्या :– भवानी, सुवर्णवती, कर्नावती
Read More:- महाराष्ट्र मधील महत्वाची धरणे आणि त्यांचे जिल्हे PDF Download 2022
21.तुंगभ्रद्रा
तुंगभद्रा नदी हि नदी कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या २ राज्यामधून वाहते आणि पुढे कृष्ण नदीस मिळते .तुंग भद्रा नदी चा जन्म तुंगा आणि भद्रा या २ नद्या मिळून झाला आहे .
उगम :-गंगामूळ (कर्नाटक)
लांबी :-640 किमी
उपनद्या :– वेदावती, हरिद्रा, वरद
भारतातील प्रमुख नद्या, उपनद्या PDF Download
अनेक विध्यार्थींना भारतातील प्रमुख नद्या, उपनद्या संपूर्ण माहिती PDF Download स्वरूपात पाहिजे असते. त्यामुळे आम्ही भारतातील प्रमुख नद्या, उपनद्या संपूर्ण माहिती PDF Download सविस्तर माहिती खालीलप्रमाणे देत आहोत.
FAQ For भारतातील प्रमुख नद्या, उपनद्या संपूर्ण माहिती PDF Download
भारत मधील सर्वात लांब नदी गंगा नदी आहे जिची लांबी २५१० किमी आहे .
सर्वात मोठी नदी म्हणून ब्रह्मपुत्रा हि नदी ओळखली जाते .
दक्षिण भारत मध्ये गोदावरी हि सर्वात मोठी नदी आहे .
सर्वात रुंद नदी म्हणून सुद्धा ब्रम्हपुत्रा नदी ओळखली जाते .