Advertisement

Masuda Samiti Full information In Marathi | भारतीय राज्यघटनेची मसुदा समिती ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Masuda Samiti Full information In Marathi:- The Drafting Committee is one of the most important committees that were set up for the framing of the Constitution. In preparation for competitive exams, questions are asked on many important events in history. The drafting committee is also frequently asked important questions. That is why in today’s post, you can find the full details of the Drafting Committee, and you can also download the details of the Drafting Committee in pdf format from the link given below.

Advertisement

Masuda Samiti Full information In Marathi

Masuda Samiti Full information In Marathi:- मसुदा समिती -राज्यघटना निर्मिती साठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या या पैकीच एक आणि अत्यंत महत्वाची समिती म्हणजे मसुदा समिती होय.स्पर्धा परीक्षांची तयारी करताना इतिहासातील अनेक महत्वाच्या घटनांवर प्रश्न विचारले जातात. मसुदा समिती वर सुद्धा अनेकदा महतवाचे प्रश्न विचारले जैतात.यासाठीच आजच्या या पोस्ट मध्ये आपण मसुदा समिती ची संपूर्ण माहिती पाहुयात,तसेच या मसुदा समितीची माहिती तुम्ही pdf स्वरूपात सुद्धा डाउनलोड करू शकता ज्याची लिंक या खाली देण्यात आलेली आहे.

Advertisement

Read More:- Lekhak Ani Tyanchi Topan Nave PDF Download | लेखक व कवी आणि महत्वाचे साहित्यिक व त्यांची टोपण नावे जाणून घ्या

मसुदा समिती महत्वाची माहिती | Masuda Samiti Information

  • मसुदा समिती ची स्थापना –29 ऑगस्ट 1947 रोजी करण्यात आली होती.
  • या समिती मध्ये एकूण ७ सदस्य होते.
  • तसेच मसुदा समिती चे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर हे होते.
  • मसुदा समिती नेमण्याचे मुख्य उद्दिष्ट हे चर्चेसाठी राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यासाठी मसुदा समितीची स्थापना केली होती.

Read More:- Women’s Law In Marathi | महिलांसाठी आवश्यक कायद्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

मसुदा समिती चे सदस्य | Members Of Masuda Samiti

  • मसुदा चे एकूण ७ सदस्य होते अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी; बी.आर. आंबेडकर, के.एम.मुंशी, मोहम्मद सादुल्ला, बी.एल. मिटर आणि डी.पी. खेतान.

१) डॉ बाबासाहेब आंबेडकर | Dr. Babasaheb Ambedkar

  • डॉ बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समिती ची अध्यक्ष होते त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेश मधील महू येथे झाला.
  • त्यांना भारतीय राज्यघटनेचे जनक मानले जात असे.

२)  एन गोपालस्वामी अयंगर | N. Gopalaswami Ayyangar

  •  एन गोपालस्वामी अयंगर यांचा जन्म 31 मार्च 1882 मध्ये झाला/
  • ते संविधान सभा समितीचे सदस्य, राज्यसभेचे नेते, पहिल्या मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री होते.
  • आयंगर यांनीच कलम 370 अंतर्गत जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा दिला होता.

३) अल्लादि कृष्णस्वामी अय्यर | Alladi krishnaswamy Iyer

  • अल्लादि कृष्णस्वामी अय्यर यांचा जन्म  14 मे, 1883,  मध्ये झाला.
  • ते पेशाने वकील होते आणि भरतोय संविधान समितीचे सदस्य होते त्यांनी भारतीय राज्यघटनेची रचना करण्याची महतवाची भूमिका बजावली.
  • त्यांनी 1944 पर्यंत 1929 मद्रास राज्य ऍडव्होकेट जनरल म्हणून काम केले.

४) सईद अहमद सादुल्ला |

  • सईद अहमद सादुल्ला यांचा जन्म  21 मे, 1885  मध्ये झाला.
  • ते ब्रिटिश काळामध्ये आसामचे पंतप्रधान होते तसेच चे शिक्षण व कृषी मंत्री म्हणून सुद्धा काम पहिले.
Advertisement

Read More:- All Important Panchayati Raj Questions And Answers | पंचायतराज महत्त्वपूर्ण प्रश्न आणि त्यांची उत्तरे

५)  के एम मुन्शी | Kanhaiyalal Maneklal Munshi

  •  के एम मुन्शी यांचा जन्म 30 डिसेंबर 1887 मध्ये झाला ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख कार्यकर्ते होते.
  • घनश्याम व्यास या त्यांच्या लेखणीने प्रसिद्ध ते ओळखले जायचे.
  • मसुदा समिती बरोबरच त्यांनी सल्लागार समिती, मूलभूत हक्कविषयक उपसमिती  अशा समित्यांमध्ये सुद्धा काम केले.

६) एन माधव राव | N. Madhav Rao

  • एन माधव राव हे बी एल मित्तर  यांच्या जागी मसुदा समिती मध्ये आले होते.
  • 1946 च्या सुरुवातीला ते ओरिसामधील रियासत्यांचे घटनात्मक सल्लागार होते. नंतर, जुलै 1947 मध्ये, त्याने ओरिसा राजघराण्यातील मतदार संघात प्रवेश केला.

७)  टी टी कृष्णमाचारी | T. T Krushmachari

  • डी पी खेतन यांच्या मृत्यू मुळे टी टी कृष्णमाचारी यांची नेमणू मसुदा समिती मध्ये करण्यात आली होती.
  • त्यांचा जन्म  26 नोव्हेंबर 1899 मध्ये झाला तसेच 1 9 3 7 मध्ये ते मद्रास विधानसभेचे सदस्य आणि 1 9 4 2 मध्ये केंद्रीय विधानसभेचे सदस्य झाले.
  • त्यांनी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया आणि युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया या वित्तीय संस्थांच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

Read More:- All Western Ghats In Maharashtra PDF Download| महाराष्ट्रातील सर्व प्रमुख घाटांची माहिती जाणून घ्या

मसुदा समितीचे योगदान | Contribution Of Masuda Samiti

  • मसुदा समिती ने राज्यघटने वर पहिला मसुदा सादर केले त्याला First Draft पहिला मसुदा असे म्हंटले जाते.
  • फेब्रुवारी १९४८ ला घटनेचा पहिला मसुदा प्रसिद्ध केला.  मसुद्यावर सूचना पाठविण्यासाठी नागरिकांना आठ महिन्यांचा कालावधी देण्यात आला.
  • त्यानंतर ऑक्टोबर १९४८ ला तो प्रसिद्ध केला. मसुदा समितीनं फक्त १४१ दिवसांत घटनेचा मसुदा तयार केला होता.
  • ४ नोव्हेंबर १९४८  ला Final Draft of Constitution of India अंतिम मसुदा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समितीपुढे मांडला.
  • १५ नोव्हेंबरपासून मसुद्याच्या प्रत्येक कलमांवर चर्चेला सुरवात झाली, जी पुढे १७ ऑक्टोबर १९४९ पर्यंत चालली. याला मसुद्याचं दुसरं वाचन (second reading) म्हटलं गेलं.
  • या दरम्यान ७ हजार ६५३ दुरुस्त्या सुचवण्यात आल्या, तर २ हजार ४७३ दुरुस्त्यांवर प्रत्यक्ष चर्चा झाली. घटनेच्या मसुद्याचं तिसरं आणि शेवटचं वाचन १४ नोव्हेंबर १९४९ रोजी सुरू झालं आणि घटना समितीनं ठरवल्याप्रमाणे घटनेचा मसुदा मंजूर करण्यात यावा, असा ठराव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला.
  • अखेर २६ नोव्हेंबर १९४९ ला हा ठराव मंजूर होऊन घटना (Indian constitution) स्वीकारण्यात आली
  • घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद (Dr. Rajendra Prasad)  यांनी आपली स्वाक्षरी करून त्यावर शिक्कामोर्तब केलं.
  • त्यानंतर दोन महिन्यांनी २५ जानेवारी १९५० ला घटना समितीनं डॉ. राजेंद्र प्रसाद यांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड केली.
  • याच दिवशी घटना समितीच्या सदस्यांनी राज्यघटनेच्या एकूण तीन, ज्यात दोन इंग्रजी आणि एका हिंदी प्रतीचा समावेश होता, त्यावर स्वाक्षऱ्या केल्या.
Advertisement

Read More:- All Important Lakes In India PDF |भारतातील सर्व महत्त्वाची सरोवरांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Masuda Samiti Full Information In Marathi PDF Download

बहुतांश विध्यार्थ्याना मसुदा समिती full information in marathi PDF Download ची माहिती ही PDF स्वरूपात पाहिजे असते. त्यामुळे ही आम्ही PDF स्वरूपात ही माहिती उपलब्ध करून देत आहे. खालील मसुदा समिती full information in marathi वर क्लिक करा.

Conclusion Of Masuda Samiti full information in marathi

मसुदा समिती full information in marathi PDF Download:- आपण या पोस्ट मध्येमसुदा समिती full information in marathiPDF Download वर आधारीत भरती परीक्षे यामध्ये विचारले जाणार महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरांची माहीती सविस्तर पणे बघितली आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

FAQ Frequently Asked Questions For Masuda Samiti full information in marathi

Q1. मसुदा समितीचे जनक कोण आहेत?

Ans:- मसुदा समितीचे जनक हे डॉक्टर बी. आर. आंबेडकर हे होते.


Q2. मसुदा समिती का तयार केली गेली?

Ans:- चर्चेसाठी राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यासाठी मसुदा समितीची स्थापना केली होती.

Q3. मसुदा समितीचे 7 सदस्य कोण आहेत?

Ans:-मसुदा समितीचे सात सदस्य होते: अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी; बी.आर. आंबेडकर, के.एम.मुंशी, मोहम्मद सादुल्ला, बी.एल. मिटर आणि डी.पी. खेतान.

Q4. मसुदा समितीचे उद्दीष्ट काय होते?

Ans:-मसुदा समिती नेमण्याचे मुख्य उद्दिष्ट हे चर्चेसाठी राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यासाठी मसुदा समितीची स्थापना केली होती.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages