1. पुष्कर सिंह धामी हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून कायम राहणार आहेत.
2. प्रमोद सावंत यांची गोव्यातील भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली आहे.
3. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी दुसरी इंडिया ऑस्ट्रेलिया व्हर्च्युअल समिट घेतली आहे.
4. जेएनयूच्या माजी प्राध्यापिका जयती घोष यांची संयुक्त राष्ट्राने बहुपक्षीयतेवरील उच्चस्तरीय सल्लागार मंडळात नियुक्ती केली आहे.
5. चीन इस्टर्न एअरलाइन्सचे बोईंग 737 विमान 133 लोक घेऊन गुआंगशी प्रदेशात कोसळले ह्या दूरघटनेत कोणीही वाचलेले नाही
6. 21 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय वन दिन साजरा केला जातो.
7. 21 मार्च रोजी जातीय भेदभाव निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो.
8. 21 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय नौरोज दिवस साजरा केला जातो
9. UNESCO द्वारे २१ मार्च रोजी जागतिक कविता दिन साजरा केला जातो
10. बीएनपी परिबास ओपन टेनिस अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झने अंतिम फेरीत स्पेनच्या राफेल नदालचा पराभव करून पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले.