All GK Questions In Marathi
GK Questions In Marathi: The competitive exam says that General Knowledge is a topic, and almost all competitive exams have questions based on it. In General Knowledge, questions are asked about almost all topics like current affairs, science, history, sports, politics, and geography. Due to this reason, GK is very difficult for everyone and it becomes impossible to study the syllabus while preparing for it. That’s why today’s post contains 300 possible questions on General Knowledge i.e. GK with answers that are asked in most competitive exams.
GK Questions In Marathi
General Knowledge in Marathi:स्पर्धा परीक्षा म्हंटल कि सामान्य ज्ञान General Knowledge हा टॉपिक असतोच, जवळ जवळ सगळ्याच स्पर्धा परीक्षे मध्ये यावर आधारित प्रश्न असतात. जनरल नॉलेज मध्ये चालू घडामोडी, विज्ञान, इतिहास, खेळ, राजकीय, भूगोल जवळ जवळ सगळ्याच टॉपिक मधून प्रश्न विचारले जातात. या कारणामुळे GK सगळ्यांनाच खूप कठीण जात तसेच याची तयारी करताना सर्व सिलॅबस अभ्यासणे अशक्य होत. या साठीच आजच्या या पोस्ट मध्ये सामान्य ज्ञान म्हणजेच GK वरचे असे 300 संभाव्य प्रश्न उत्तरासहित दिले आलेत जे बहुतेक स्पर्धा परिक्षा मध्ये विचारले जातात.
जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे | GK Questions In Marathi With Answers
1. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कुठे आहे?
(A) मुंबई
(B) सातारा
(C) चंद्रपूर
(D) खोपोली
उत्तर : (D) खोपोली (रायगड )
2. भारताचा सर्वात उंच मीनार कोणती आहे?
(A) चार मीनार
(B) झूलता मीनार
(C) कुतुब मीनार
(D) शहीद मीनार
उत्तर : (C) कुतुब मीनार -73 मीटर
3. सुर्याकडून पृथ्वीवर येणारी ———– टक्के अतिनिल किरणे ओझोनच्या थरामुळे अडविली जातात?
A. 50
B. 99
C. 90
D. 70
उत्तर : (B) 99%
4. जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कुठे आहे?
(A) लंडन
(B) दिल्ली
(C) पॅरिस
(D) जिनेव्हा
उत्तर : (D)जिनेव्हा
5. प्रथम भारतीय अंतराळवीर कोण आहेत?
(A) सुनीता विल्यम्स
(B) कल्पना चावला
(C) राकेश शर्मा
(D) यांपैकी नाही
उत्तर : (C) राकेश शर्मा
6. ध्वनींची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते?
(A) डिग्री
(B) सेल्सिअस
(C) डेसिबल
(D) यांपैकी नाही
उत्तर : (C) डेसिबल
7. महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे?
(A) 800
(B) 480
(C) 1030
(D) 720
उत्तर : (D) 720
8. बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
(A) रायगड
(B) गडचिरोली
(C) सातारा
(D) वर्धा
उत्तर : (D) वर्धा
9. सर्वात कमी लोकसंख्या असणारा केंद्रशासित प्रदेश कोणता ?
(A) लक्षद्वीप
(B) लद्दाख
(C) दादर आणि नगर हवेली
(D) दिव दमण
उत्तर : (A) लक्षद्वीप
10. भारतीय संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाचे स्वरूप कधी स्वीकारली?
(A) 17 जुलै 1947 रोजी
(B) 28 जुलै 1947 रोजी
(C) 22 जुलै 1947 रोजी
(D) 22 जुलै 1948 रोजी
उत्तर : (C) 22 जुलै 1947 रोजी
11. भारतात पवन ऊर्जेचा विकास कधी सुरू झाला?
(A) 1998
(B) 2000
(C) 1990
(D) 1995
उत्तर : (C) 1990
12. पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी काय वापरण्यात येते ?
A. सोडा
B. तुरटी
C. क्लोरीन
D. यांपैकी काहीही नाही
उत्तर : (C) क्लोरीन
13. पाण्याची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरतात?
A. सोनार तंत्रज्ञान
B. सोलार तंत्रज्ञान
C. सुपरसॉनीक तंत्रज्ञान
D. अल्ट्रासॉनिक तंत्रज्ञान
उत्तर : (A) सोनार तंत्रज्ञान
14.छपाई यंत्राचा शोध केव्हा लागला ?
A. इसवी सन 1450
B. इसवी सन 1800
C. इसवी सन 1970
D. इसवी सन 1870
उत्तर : (A) इसवी सन 1450
15. खनिज तेलाचे उत्पादन भारतात सर्वप्रथम कुठे सुरू झाले?
(A) अंकलेश्वर
(B) नहारकटियात
(C) डिग्बोई
(D) यापैकी नाही
उत्तर : (C) डिग्बोई
16,भारतातील सर्वात मोठे काजू उत्पादन करणारे राज्य कोणते आहे?
(A) महाराष्ट्र
(B) केरळ
(C) गुजरात
(D) कर्नाटक
उत्तर : (B) केरळ
17.जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?
(A) आसाम
(B) उत्तराखंड
(C) उत्तर प्रदेश
(D) महाराष्ट्र
उत्तर : (B) उत्तराखंड
18.भारताचे कोणते राज्य नेपाळ, भूतान आणि चीन या तीन देशांच्या सीमेवर आहे?
(A) मेघालय
(B) सिक्कीम
(C) पश्चिम बंगाल
(D) अरुणाचल प्रदेश
उत्तर : (B) सिक्कीम
19.भारतातील सगळ्यात मोठा लष्करी सन्मान कोणता ?
(A) महावीर चक्र
(B) परमवीर चक्र
(C) अशोक चक्र
(D) अर्जुन पुरस्कार
उत्तर : (B) परमवीर चक्र
20. मोहिनीअट्टम हा कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) कर्नाटक
(D) मध्य प्रदेश
उत्तर : (A) केरळ
21. भारतातील सर्वात लांब बोगदा कोणता आहे?
(A) जवाहर बोगदा
(B) रोहतांग बोगदा
(C) अटल रोड बोगदा
(D) कामशेत बोगदा
उत्तर : (C) अटल रोड बोगदा
22.राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम’ कोणी लिहले आहे?
A. बंकिमचंद्र चटर्जी
B. रवींद्रनाथ टागोर
C. अरबिंदो घोष
D. शरतचंद्र चट्टोपाध्याय
उत्तर : A. बंकिमचंद्र चटर्जी
23.भारतीय चलनावरील नोटेवर किती भाषा लिहलेल्या असतात?
A. 20
B. 13
C. 15
D. 17
उत्तर : D. 17
24.संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते?
(A) लोकसभा
(B) राज्यसभा
(C) विधानसभा
(D) मंत्री परिषद
उत्तर : (B) राज्यसभा
25. मोदीजींनी नोटाबंदीची घोषणा कधी केली?
(A) 11 जानेवारी 2016
(B) 23 मे 2018
(C) 8 नोव्हेंबर 2016
(D) 23ऑगस्ट 2013
उत्तर : (C) 8 नोव्हेंबर 2016
General Knowledge Question in Marathi | सामान्य ज्ञानाचे प्रश्न आणि उत्तर
26.1906 च्या राष्ट्रीय सभेच्या कोलकाता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
(A) ऍलन हृयुम
(B) दादाभाई नौराजी
(C) सुरेंद्रनाथ बॅनर्जी
(D) व्योमेशचंद्र बॅनर्जी
उत्तर : (B) दादाभाई नौराजी
27. ‘जागतिक रेडिओ दिवस’ केव्हा साजरा केला जातो?
(A) 14 फेब्रुवारी
(B) 15 फेब्रुवारी
(C) 17 फेब्रुवारी
(D) 13 फेब्रुवारी
उत्तर : (D) 13 फेब्रुवारी
28. सर्वात कठीण वस्तू कोणती ?
(A) शिसे
(B) लोखंड
(C) अॅल्युमिनिअम
(D) हिरा
उत्तर : (D) हिरा
29. ‘पेस मेकर’ हे……….. चा त्रास होणाऱ्या रुग्णाकरिता वापरतात.
(A) मूत्रपिंड
(B) किडणी
(C) हृदयाचा
(D) मेंदूचा
उत्तर : (C) हृदयाचा
30. हृदयरोगासाठी उपयुक्त असे सफोला खाद्यतेल कोणत्या पिकापासून तयार केले जाते.
(A) एरंड
(B) करडई
(C) सूर्यफूल
(D) भूईमूग
उत्तर : (B) करडई
31. कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते?
(A) ग्रॅफाईट
(B) स्टील
(C) दगडी कोळसा
(D) हिरा
उत्तर : (D) हिरा
32. धुण्याचा सोडा या संयुगामधील रासायनिक पदार्थ कोणता ?
(A) कॅल्शियम कार्बोनेट
(B) सोडीयम कार्बोनेट
(C) सोडीयम क्लोराईट
(D) पोटॅशियम क्लोराईट
उत्तर : (B) सोडीयम कार्बोनेट
33. हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायु घटक असतो ?
(A) ऑक्सिजन
(B) नायट्रोजन
(C) मिथेन
(D) हेलियम
उत्तर : (D) हेलियम
34. कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते?
(A) Co
(B) Ca
(C) Cu
(D) Cl
उत्तर : (C) Cu
35. सोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा कोणती ?
(A) Ge
(B) Au
(C) Mg
(D) Hq
उत्तर : (B) Au
36. विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला?
(A) एडिसन
(B) जेम्स वॅट
(C) राईट बंधू
(D) गॅलिलीओ
उत्तर : (C) राईट बंधू
37. भुकंपमापक यंत्राला शास्त्रीय नाव काय आहे ?
(A) स्पॅरोग्राफ
(B) ग्राफोमीटर
(C) रेडिओ मायक्रोमीटर
(D) सिस्मोग्राफ
उत्तर : (D) सिस्मोग्राफ
38. एड्स हा रोग कशामुळे होतो?
(A) विषाणू
(B) जीवाणू
(C) परोपजीवी
(D) फंगस
उत्तर : (A) विषाणू
39. श्वसनासाठी कोणत्या अवयवाची आवश्यकता असते ?
(A) हृदय
(B) फुफ्फुस
(C) किडणी
(D) लिव्हर (यकृत)
उत्तर : (B) फुफ्फुस
40. हाडांच्या निकोप वाढी साठी खालीलपैकी कोणत्या व्हिटॅमिनची आवश्यकता असते ?
(A) व्हिटॅमिन ए
(B) व्हिटॅमिन डी
(C) व्हिटॅमिन बी
(D) व्हिटॅमिन सी
उत्तर : (B) व्हिटॅमिन डी
41. ‘गॉयटर’ हा रोग कशाच्या कमतरतेमुळे होते ?
(A) सोडीयम
(B) पोटॅशियम
(C) आयोडीन
(D) कॅल्शीयम
उत्तर : (C) आयोडीन
42. प्रकाश संश्लेषणासाठी (photosynthesis) खालीलपैकी कोणता पदार्थ आवश्यक आहे?
(A) हिमोग्लोबीन
(B) क्लोरोफिल
(C) मिलॅनिन
(D) बिलीरुबीन
उत्तर : (B) क्लोरोफिल
43. पेनिसिलीयम हे कशाचे उदाहरण आहे?
(A) जिवाणू (बॅक्टेरिया)
(B) बुरशी (फंगस)
(C) परोपजीवी (पॅरासाईट)
(D) विषाणू (व्हायरस)
उत्तर : (B) बुरशी (फंगस)
44. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला भेटतात?
(A) उत्तर प्रदेश
(B) तामिळ नाडू
(C) केरळ
(D) कर्नाटक
उत्तर : (D) कर्नाटक
45. असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो?
(A) बेडूक
(B) सरडा
(C) साप
(D) पाल
उत्तर : (B) सरडा
46. मौर्य समाजाची स्थापना कोणी केली होती?
(A) अशोक
(B) चंद्रगुप्त
(C) बिंदुसागर
(D) यांपैकी कोणीही नाही
उत्तर : (B) चंद्रगुप्त
47. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो ?
(A) रिकेट्स
(B) डायबेटीस
(C) नाईट ब्लाइंडनेस
(D) स्कव्ही
उत्तर : (B) डायबेटीस
48. निरोगी माणसाचा रक्तदाब सामान्यतः किती असतो ?
(A) 60/100
(B) 80/120
(C) 110/150
(D) 120/160
उत्तर : (B) 80/120
49. खालीलपैकी कोणता रक्तदाब हा उच्च रक्तदाब समजण्यात येतो?
(A) 110-70
(B) 120-80
(C) 140-90 पेक्षा जास्त
(D) यापैकी नाही
उत्तर : (C) 140-90 पेक्षा जास्त
सामान्य ज्ञानाचे प्रश्न | GK Questions In Marathi
50. न्युटन हे बलाचे परिणाम कसे व्यक्त करतात ?
(A) kgm/s
(B) kgm/s2
(C) kgm2/s
(D) kgm2/s2
उत्तर : (B) kgm/s2
51. विजेच्या दिव्यात कोणत्या धातुची तार वापरतात ?
(A) अॅल्युमिनीयम
(B) टंगस्टन
(C) सिल्वर
(D) मँगेनिज
उत्तर : (B) टंगस्टन
52. इलेक्ट्रीक करंट हा कशाचा प्रवाह आहे ?
(A) प्रोटॉन्स
(B) इलेक्ट्रॉन्स
(C) न्यूट्रॉन्स
(D) यापैकी कोणताही नाही
उत्तर : (B) इलेक्ट्रॉन्स
53. वनस्पतीच्या अन्न तयार करणाच्या प्रक्रियेत कोण सहायक म्हणून काम करते?
(A) हरितद्रव्य
(B) पाणी
(C) कार्बंन डायऑक्साइड
(D) ऑक्सीजन
उत्तर : (A) हरितद्रव्य
54. वनस्पती कोणत्या क्रियेने मातीतील क्षारयुक्त पाणी शोषुन घेतात ?
(A) प्रकाश संश्लेषन
(B) रसाकर्षण
(C) सात्मीकरण
(D) उत्सर्जन
उत्तर : (B) रसाकर्षण
55. मादक पदार्थाच्या सेवनाने प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतात ?
(A) मज्जासंस्था
(B) पचनसंस्था
(C) उत्सर्जनसंस्था
(D) रक्तभिसरण संस्था
उत्तर : (A) मज्जासंस्था
56. गावागावातील अंतर कशामध्ये मोजतात ?
(A) सेंटीमीटर
(B) मिलीमीटर
(C) मीटर
(D) किलोमीटर
उत्तर : (D) किलोमीटर
57. जेव्हा आपण एखादी वस्तू उचलतो तेव्हा कोणत्या बलाच्या विरुद्ध बल लावावे लागते?
(A) स्नायुबल
(B) गुरुत्वीयबल
(C) घर्षणबल
(D) चुंबकीबल
उत्तर : (B) गुरुत्वीयबल
58. घर्षणबल हे नेहमी गतीच्या …….. कार्य करते?
(A) विरोधात
(B) दिशेने
(C) समप्रमाणात
(D) निश्चित नाही
उत्तर : (A) विरोधात
59. पाण्याची अधिकतम घनता किती तापमानाला असते ?
(A) 100 डिग्री सेंटीग्रेड
(B) 4 डिग्री सेंटीग्रेड
(C) 0 डिग्री सेंटीग्रेड
(D) – 236 डिग्री सेंटीग्रेड
उत्तर : (B) 4 डिग्री सेंटीग्रेड
60. दुधामधुन ………. अत्यल्प प्रमाणामध्ये मिळते?
(A) कॅल्शिअम
(B) जीवनसत्वे
(C) प्रथिने
(D) लोह
उत्तर : (D) लोह
61. शरीराचे तोल सांभाळण्याचे काम कोणाकडुन केले जाते ?
(A) लहान मेंदु
(B) मोठा मेंदु
(C) चेतातंतु
(D) हृदय
उत्तर : (A) लहान मेंदु
62. खालीलपैकी कोणता पदार्थ शरीरास खनिजद्रव्ये पुरवित नाही ?
(A) दुध
(B) पालेभाज्या
(C) फळभाज्या
(D) साखर
उत्तर : (D) साखर
63. आझोला तसेच निळे हिरवे शेवाळ …………. या पीकासाठी जैविक खत म्हणुन वापरले जाते ?
(A) भात
(B) उस
(C) कापुस
(D)द्राक्ष
उत्तर : (A) भात
64. पेनीसिलीन या औषधाचा जनक …….. आहे ?
(A) ए फ्लेमिंग
(B) लुई पाश्चर
(C) रोनॉल्ड रॉस
(D) डॉ. हॅनसन
उत्तर : (A) ए फ्लेमिंग
65. पाठीच्या कण्यात एकुण ३३ मणके असतात त्यापैकी
(A) 4
(B) 5
(C) 7
(D) 9
उत्तर : (C) 7
66. रडार यंत्रणेत कोणत्या लहरींचा वापर केला जातो ?
(A) विद्युत
(B) ध्वनी
(C) रेडीओ
(D) अल्ट्रा सोनीक
उत्तर : (C) रेडीओ
67. खालीलपैकी कोणते सहजीवनाचे उदाहरण नाही.
(A) आंबा-अमरवेल
(B) वाळवी-ट्रायकोनिफा
(C) मायको-हासा
(D) हायसोबिअम – जीवाणू
उत्तर : (A) आंबा-अमरवेल
68. खालीलपैकी कोणता रोग पाण्याद्वारे पसरत नाही.
(A) कावीळ
(B) कॉलरा (पटकी)
(C) हिवताप
(D) नारू
उत्तर : (C) हिवताप
69. मधुमेह विकारामध्ये ……….. वापर केला जातो.
(A) इंन्शुलीन
(B) इंटरफेरॉन
(C) सुमॅटोस्टॅटीन
(D) एरिथ्रोपायेटीन
उत्तर : (A) इंन्शुलीन
70. चुंबक तुटल्यास तुटल्या जागी ……….. ध्रुव तयार होतात.
(A) सजातीय
(B) विरुद्ध
(C) कोणतेही नाही
(D) चुंबकत्व नष्ट होते
उत्तर : (B) विरुद्ध
71. आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व असते ?
(A) ए
(B) बी
(C) सी
(D) डी
उत्तर : (C) सी
72. ‘हिमोग्लोबीन’ कशाचे वहन करते ?
(A) लोह
(B) ऑक्सिजन
(C) हिम
(D) प्रोटिंन्स
उत्तर : (B) ऑक्सिजन
73. ‘डेसिबल’ ह्या मापाने काय मोजतात?
(A) प्रकाश
(B) समुद्राची खोली
(C) आवाजाची तीव्रता
(D) उष्णता
उत्तर : (C) आवाजाची तीव्रता
74. कांदा कापताना डोळ्यातून पाणी येते. कारण कांद्यातून ……… बाहेर पडतो.
(A) सल्फर
(B) अमोनिया
(C) पोटॅशियम
(D) फॉस्फरस
उत्तर : (A) सल्फर
75. ‘रिश्टर स्केल’ हे खालीलपैकी काय आहे?
(A) भूकंपमापक
(B) दाबमापक
(C) तापमानमापक
(D) यापैकी नाही
उत्तर : (A) भूकंपमापक
पोलिस भरती सामान्य ज्ञानाचे प्रश्न | Police Bharti GK Questions In Marathi
76. ISRO (इस्त्रो) ही संस्था कोणत्या कार्याशी संबंधीत आहे?
(A) सुपर कॉम्प्युटर
(B) अवकाश आयोग
(C) तेल उत्खनन
(D) अणुउर्जा
उत्तर : (B) अवकाश आयोग
77. खालीलपैकी कोणते ………… हे दोन व्यक्तिंचे एकसारखे कधीच नसतात?
(A) डोळे
(B) अंगुलीमुद्रा
(C) रक्तगट
(D) डोळ्यांचा रंग
उत्तर : (B) अंगुलीमुद्रा
78. विद्युतधारा कोणत्या एककात मोजतात?
(A) कँडेला
(B) सकंड
(C) अॅम्पिअर
(D) केल्व्हीन
उत्तर : (C) अॅम्पिअर
79. आरशाचा धूव आणि नाभी यांच्यातील अंतराला ‘नाभीय अंतर’ असे म्हणतात. नाभीय अंतर है वक्रता त्रिज्येच्या …….. असते.
(A) निम्मे
(B) दुप्पट
(C) एक तृतीयांश
(D) तीन पट
उत्तर : (A) निम्मे
79. खालीलपैकी कोणते भारताचे क्षेपणास्त्र नाही ?
(A) त्रिशुल
(B) सागरीका
(C) पिनाक
(D) अजय
उत्तर : (D) अजय
80. शाकाहारी खाद्य पदार्थाच्या पॅकेटवर कोणत्या रंगाचा बिंदु आढळतो ?
(A) लाल
(B) पिवळा
(C) हिरवा
(D) निळा
उत्तर : (C) हिरवा
81. ‘दो बुंद जिंदगी के’ हे कोणत्या आजार प्रतिबंधक जाहिरातीचे घोषवाक्य आहे?
(A) पाणी शुद्धी
(B) पोलीओ
(C) मलेरीया
(D) एड्स
उत्तर : (B) पोलीओ
82. पाण्याचा उत्कलनांक किती असतो ?
(A) -३९ से
(B) १०० से.
(C) ० से
(D) ३५७ से.
उत्तर : (B) १०० से.
83. हवेचा दाब मोजण्यासाठी खालील उपकरण वापरतात ?
(A) मॅनोमीटर
(B) अल्टीमीटर
(C) स्फिगमो मॅनोमीटर
(D) बॅरोमीटर
उत्तर : (D) बॅरोमीटर
84. क्षय रोग (Tuberculosis) हा रोग कशामुळे होतो ?
(A) जिवाणू
(B) विषाणू
(C) कवक
(D) परोपजिवी जंतू
उत्तर :- (A) जिवाणू
85. पाण्याच्या शुद्धीकरणासाठी कोणता रासायनिक मुलद्रव्य वापरले जाते ?
(A) फ्लोरीन
(B) क्लोरीन
(C) आयोडीन
(D) सोडीयम
उत्तर : (B) क्लोरीन
86. गोबर गॅस मध्ये खालील कोणता वायू असतो ?
(A) मिथेन
(B) ईथेन
(C) प्रोपेन
(D) सोडीयम
उत्तर : (A) मिथेन
87. पाचनकार्यात मदत होण्यासाठी जठरात कोणत्या आम्लाचा स्त्राव होतो ?
(A) सल्फ्युरीक अॅसिड
(B) नायट्रीक अॅसीड
(C) हायड्रोक्लोरीक अॅसीड
(D) फ्लोरीक ऑक्साईड
उत्तर : (C) हायड्रोक्लोरीक अॅसीड
88. हसविणारा वायु (Laughing gas) कोणास म्हटले जाते?
(A) नायट्रस ऑक्साईड
(B) सल्फर डाय ऑक्साईड
(C) कार्बनडाय ऑक्साईड
(D) कार्बन मोनॉक्साईड
उत्तर : (B) सल्फर डाय ऑक्साईड
89. आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो ?
(A) गॉयटर (Goitre)
(B) हिमोफिलीया (Haemophilia)
(C) अॅनिमिया (Aneamia)
(D) फ्लोरोसीस (Fluorosis) क्षेपणास्त्र कोणते ?
उत्तर : (A) गॉयटर (Goitre)
90. जमिनीवरून हवेतील लक्षाचा वेध घेवू शकणारे क्षेपणास्त्र कोणते?
(A) अग्नी
(B) पृथ्वी
(C) त्रिशुल
(D) नाग
उत्तर : (C) त्रिशुल
91. शिसे या धातुचा वापर ………. साठी होतो.
(A) भांडी तयार करणे
(B) दारूगोळा तयार करणे
(C) जहाज बांधणी करणे
(D) विद्युत उपकरणे तयार करणे
उत्तर :
92. हत्ती कशाने पाणी पितो ?
(A) सोंडेने
(B) तोंडाने
(C) सोंड व तोंड दोघांनी
(D) यापैकी नाही
उत्तर : (A) सोंडेने
93. कोरडा बर्फ कशाला म्हणतात ?
(A) कोरडा केलेला बर्फ
(B) न विरघळणारा बर्फ
(C) घनस्वरुपातील कार्बन डायऑक्साईड
(D) यापैकी नाही
उत्तर : (C) घनस्वरुपातील कार्बन डायऑक्साईड
94. झाडाचे वय कशावरून ठरवतात ?
(A) झाडाच्या बुंध्याच्या घेरावरून
(B) झाडाच्या बुंध्याच्या आतील वर्तुळांवरून
(C) झाडाच्या उंचीवरून
(D) यापैकी नाही
उत्तर : (B) झाडाच्या बुंध्याच्या आतील वर्तुळांवरून
95. कोणत्या रक्तगट असलेला इसम कोणासही रक्त देवू शकतो ?
(A) ए
(B) ए बी
(C) ओ
(D) यापैकी नाही
उत्तर : (C) ओ
96. आवाजाची गती खालीलपैकी कोणत्या माध्यमामध्ये सर्वात जास्त असते?
(A) घन
(B) द्रव
(C) निर्वात पोकळी
(D) वायु
उत्तर : (A) घन
97. शरीर बांधणीसाठी (Body Building) आवश्यक घटक आहे.
(A) कार्बोहायड्रेटस
(B) प्रोटीन्स / प्रथिने
(C) फॅट्स
(D) यापैकी नाही
उत्तर : (B) प्रोटीन्स / प्रथिने
98. शरीरावरील जखमेचा रक्तस्त्राव थांबविण्याचे काम खालीलपैकी कोणता घटक करतो ?
(A) आर.बी.सी.
(B) प्लेटलेट्स (रक्तबिंबिका)
(C) डब्लु.बी.सी.
(D) यापैकी नाही
उत्तर : (B) प्लेटलेट्स (रक्तबिंबिका)
99. श्वासोच्छवास क्रिये दरम्यान वनस्पतीकडून रात्री कोणता वायु सोडण्यात येतो ?
(A) पाण्याची वाफ
(B) कार्बन डायऑक्साईड
(C) ऑक्सीजन
(D) यापैकी नाही
उत्तर : (B) कार्बन डायऑक्साईड
100. गलगंड हा आजार खालीलपैकी कोणत्या क्षाराच्या अभावामुळे होतो ?
(A) आयोडीन
(B) लोह
(C) फॉस्फरस
(D) कॅल्शियम
उत्तर : (A) आयोडीन
Important GK Questions In Marathi | महत्त्वाचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न
1. काही स्थायुंना उष्णता दिल्यस त्यांचे द्रवरूपात रूपांतर न होता एकदम वायुरूपात रूपांतर होते. यांस ………. असे म्हणतात.
Ans:- संप्लवन
2. निसर्गात ………… इतकी मुलद्रव्ये आढळतात.
Ans:- 92
3. ……… या शास्त्रज्ञाने कॅथोड किरण, अॅनोड किरण, प्रोटॉन व इलेक्ट्रॉन यांचा शोध लावला.
Ans:- सर जे.जे. थॉमसन
4. अणुशक्तिचे जनक ……….. यांना म्हटले जाते.
Ans:- रुदरफोर्ड
5. प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन यांची संख्या म्हणजे……..
Ans:- अणुअंक
6. अणुमधील ‘न्यूट्रॉन’ या कणांचा शोध ……… यांनी लावला.
Ans:- जॉन चॅडविक
7. ………… यांनी पहिली अणुविषयक प्रतिकृती सुचविली.
Ans:- सर जे.जे. थॉमसन
8. प्रोटॉन आणि न्युट्रॉन यांच्या एकूण संख्येला……… असे म्हणतात.
Ans:- अणु वस्तुमानांक
9. भोवरा, पंखा, पवनचक्की इत्यादींचे फिरणे ….. गतीची उदाहरणे आहेत.
Ans:- परिवलन
10. लंबकाच्या घडयाळातील लंबकाची गती किंवा शिवणयंत्रातील सुईची गती यांना…… म्हणतात.
Ans:- कंपनगती
11. अग्नीबाण (रॉकेट) ची गती न्यूटनच्या …………. नियमावर आधारित आहे.
Ans:- तिसऱ्या
12. संवेग, बल, वेग, विस्थापन, त्वरण इत्यादी भौतिक राशी …….. आहेत.
Ans:- सदिश
13. गुरूत्व त्वरणचे सर्वात जास्त मुल्य ध्रुवावर असते तर सर्वात कमी मुल्य …….. असते.
Ans:- विषुववृत्तावर
14. गुरूत्व त्वरणाचे सरासरी मुल्य ………….. मापले जाते.
Ans:- 9.8
15. गतिमान पदार्थाच्या गती ला विरोध करणाऱ्या बलास ………… म्हणतात.
Ans:- घर्षण बल
16. आपली मुळ अवस्था कायम ठेवण्याच्या वस्तुच्या प्रवृत्तीला…..असे म्हणतात.
Ans:- जडत्व
17. वस्तुमान आणि वेग यांच्या गुणाकारास ….. म्हणतात.
Ans:- संवेग
18. एक अश्वशक्ती (Hourse Power) म्हणजे …….
Ans:- 746 वॅट
19. ध्वनीचा वायू, द्रव, व स्थायू या माध्यमापैकी …… या माध्यमात सर्वाधिक वेग असतो.
Ans:- स्थायू
20. नॅचरल गॅस मध्ये मुख्यतः ……….. वायु असाते.
Ans:- मिथेन
21. शृंखला अभिक्रियेचे निंयत्रण करण्यासाठी बोरॉन स्टील किंवा ……….. कांड्यांचा वापर केला जातो.
Ans:- कॅडमिअम
22. ………… यांस ‘रसायनाचा राजा’ असे म्हटले जाते.
Ans:- सल्फ्यूरिक अॅसिड
23. …………. या वायूला ‘हसविणारा वायु’
Ans:- नायट्रस ऑक्साईड (N2O)
24. ………… किरणांचा वेग प्रकाशाच्या वेगाएवढा असतो.
Ans:- गॅमा
25. ……….. या वायुचा सडक्या अंडयासारखा वास असतो.
Ans:- हायड्रोजन सल्फाईट
26. ………… या वायुला ठसका आणणारा वास असतो.
Ans:- सल्फर डायऑक्साईड
27. पारा आणि गॅलिअम हे द्रवरूप धातू असून….. हा एकमेव द्रवरूप अधातू आहे.
Ans:- ब्रोमीन
28. अधातुंना चकाकी नसते तसेच ते विद्युत दुर्वाहक असतात. परंतु चकाकी असणारा व विद्युत वाहकही असणारा एकमेव अधातू…..
Ans:-ग्रॅफाईट
29. सोडियम – बाय – कार्बोनेट म्हणजेच खाण्याचा सोडा होय तर सोडीयम कार्बोनेट म्हणजेच ……. .. होय.
Ans:- धुण्याचा सोडा
30. बंदुकीच्या दारुत ……… या अधातूचा वापर होतो.
Ans:- सल्फर
31. गोबरगॅस सयंत्रातून ………. हा वायू मिळतो.
Ans:- मिथेन
32. स्थायुरूप कार्बनडायऑक्साईडला ……….. असे म्हणतात.
Ans:- शुष्क / कोरडा बर्फ
33. सर्व साधारण परिस्थितीत ………………. हा द्रव्यस्थितीत असणारा धातू आहे.
Ans:- पारा
34. ………… चा अपवाद सोडता सर्व अणुंच्या केंद्रकामध्ये न्यूट्रॉन असतात.
Ans:- हायड्रोजन
35. ………….व्यक्त करण्यासाठी डाल्टन हे एकक वापरतात.
Ans:- अणुवस्तूमान
36. बलाचे एम.के.एस. मधील एकक……. आहे.
Ans:- न्यूटन
37. कार्याचे एम.के.एस. मधील एकक………. आहे.
Ans:- ज्युल
38. वारंवारतेचे एकक ……… हे आहे.
Ans:- हर्टझ
39. ………….. सेल्सिअसला पाण्याची घनता महत्तम असते.
Ans:- ४ अंश
40. अल्बर्ट आइनस्टाइन या ………….. देशाच्या शास्त्रज्ञाने १९०५ साली अणुयुगाचा पाया रचला.
Ans:- जर्मन
41. प्रतिजीवसृष्टी निर्माण करण्याची क्षमता ………. तंत्रामुळे शक्य झाले.
Ans:- क्लोनिंग
42. अवकाशात मानव जिंवत राहू शकतो हे ……….. यांच्या यशस्वी अवकाश यात्रेनी सिद्ध केली.
Ans:- युरी गागारिन
43. सतिश धवन अवकाश संशोधन केंद्र ……… या ठिकाणी आहे.
Ans:- श्रीहरिकोटा (आंध्र प्रदेश)
44. ……….. साली नील आर्मस्ट्रॉंग हा चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला माणूस ठरला.
Ans:- १९६९
45. प्रत्येक दिवशी चंद्रोदय आदल्या दिवसापेक्षा सुमारे …………. उशीरा होतो.
Ans:- ५० मिनिटे
46. हॅले चा धूमकेतू ……….. वर्षांनी एकदा दिसतो.
Ans:- 66
47. भारताचा पहिला उपग्रह ………. हा १९ एप्रिल १९७५ रोजी आवकाशात सोडण्यात आला.
Ans:- आर्यभटट्
48. महाराष्ट्रात ……….. येथे अणुऊर्जा प्रकल्प आहे.
Ans:- तारापूर
49. शुद्ध सोने ………….. कॅरेटचे असते.
Ans:- २४
महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी | Maharashra General knowledge Questions
50. आधुनिक आवर्तसारणी ……… ह्यावर आधारीत आहे.
Ans:- मुलद्रव्यांचे अणुअंक
51. विभवंतराचे एस. आय. एकक ……. हे आहे
Ans:- व्होल्ट
52. मानवी रक्ताचे एकूण ………. गट पडतात.
Ans:- ४
53. विद्युत उर्जा व चुंबकत्व यांच्यामधील संबंध सर्वप्रथम ……….. यांनी शोधून काढला.
Ans:- ओरस्टेड
54. ……….. पासून मिळणारी ऊर्जा प्रदुषणरहित असते.
Ans:- सौरघट
55. सर्व इंधनात ………. चे कॅलरी मुल्य सर्वात अधिक असते.
Ans:- हायड्रोजन
56. स्पॉट हे ………… ऊर्जा स्त्रोत आहे.
Ans:- भूगर्भ औष्मिक
57. द्राक्षामधील आर्द्रता शोषणासाठी ………… वापरतात.
Ans:- सौर शुष्कक
58. एल.पी.जी. मध्ये ………. हे घटक असतात.
Ans:- ब्युटेन व आयसोब्युटेन
59. ध्वनीच्या तीव्रतेचे एकक ………. हे आहे.
Ans:- डेसीबल
60. ध्वनीचे प्रसारण …………. मधून होत नाही.
Ans:- निर्वात प्रदेश
61. ध्वनी ऊर्जेचे प्रसारण ………….. तरंगामार्फत होते.
Ans:- अनु
62. थंड प्रदेशातील जलचर प्राणी व वनस्पती …………. यामुळे सुरक्षित राहतात.
Ans:- पाण्याचे असंगत आचरण
63. रडार या यंत्रात चा ………. वापर केलेला असतो.
Ans:- रेडीओ लहरी
64. …………. पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक असते.
Ans:- पाणी
65. क्ष-किरण म्हणजे ………….. आहेत.
Ans:- विद्युत चुंबकीय लहरी
66. जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रुपांतर होत असताना ऊर्जा निर्माण होते. या अभिक्रियेस ………. म्हणतात.
Ans:- केंद्रकीय विखंडीकरण
67. केंद्रकीय विखंडन किंवा संमिलनात ………. या मुळे ऊर्जा निर्माण होते.
Ans:- वस्तुमानाचे ऊर्जेत रुपांतर
68. क्ष-किरणांचा शोध ………… या शास्त्रज्ञाने लावला.
Ans:- रॉन्टजेन
69. किपचे उपकरण ………… तयार करण्यासाठी वापरतात.
Ans:- हायड्रोजन सल्फाईड
70. अग्निशामक साधनामध्ये ………….. या वायुचा वापर केलेला असतो.
Ans:- कार्बन डायऑक्साईड
71. ………… हा कॅल्शिअम कार्बोनेटचा प्रकार आहे.
Ans:- संगमरवर
72. …………… पासून प्लॅस्टर ऑफ पॅरीस बनवितात.
Ans:- जिप्सम
73. फेरस सल्फेटला …………. असे म्हणतात.
Ans:- ग्रीन व्हिट्रीऑल
74. तुरटीचा वापर ……….. साठी करतात.
Ans:- रक्त प्रवाह थांबविणे
75. अवयव ……… पासून बनतात.
Ans:- उती
76. प्रथिने ही ………. ची बहुवारिके आहेत.
Ans:- अमिनो आम्ले
77. …………….. या मुलद्रव्याशिवाय इतर सर्व मुलद्रव्यांच्या अणुकेंद्रकात न्यूट्रॉन्स असतात.
Ans:- हायड्रोजन
78. प्रसाधनगृहाच्या स्वच्छतेसाठी …………… आम्ल वापरतात.
Ans:- हायड्रोक्लोरीक
79. प्राचीन खगोल अभ्यासकांनी ………… नक्षत्रांची कल्पना केली आहे.
Ans:- २७
80. आधुनिक जैव तंत्रज्ञान ……… च्या पातळीवर कार्य करते.
Ans:- रेणु
81. शून्य या अंकाचा शोध …………. या भारतीय शास्त्रज्ञाने लावला.
Ans:- वराहमिहीर
82. पृथ्वी, त्रिशुल, व अग्री या क्षेपणास्त्रांच्या निर्मितीचे श्रेय ………… यांच्याकडे जाते.
Ans:- डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम
83. बल्बच्या दिव्यात ……….. ची तार असते.
Ans:- टंगस्टन
84. ………….. हा सर्वात हलका वायू आहे.
Ans:- हायड्रोजन
85. पाण्याचा द्रवणांक (गोठणाक) शुन्य अंश से. असतो. तर उत्कलनांक ……… असते.
Ans:- १०० अंश से.
86. पाऱ्याचा द्रवणांक वजा एकोणचाळीस अंश सेल्सीअस असतो तर उत्कलनांक ……
Ans:- ३५७ अंश से.
87. उकळत्या पाण्याचे तापमान ……. असते.
Ans:- १०० अंश से.
88. भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी …………. हे उपकरण वापरतात.
Ans:- सिस्मोग्राफ
89. केवळ प्रथिनांच्या अभावामुळे होणाऱ्या रोगास …… म्हणतात.
Ans:- सुजवटी
90. ऊर्जा, प्रथिने तसेच इतर पोषणतत्व यांच्या सतत अभावामुळे…. हा रोग होतो.
Ans:- सुकटी
91. लोहाच्या अभावामुळे ……….. हा रोग होतो.
Ans:- पंडूरोग/रक्तक्षय (अॅनेमिया)
92. आयोडिनच्या कमतरतेमुळे ……….. हा रोग होतो.
Ans:- गलगंड (गॉयटर)
93. कोवळ्या सुर्यप्रकाशात …….. ची निर्मिती त्वचेखाली होते.
Ans:- जीवनसत्व ‘ड’
94. दुधाच्या पाश्चरायझेशन प्रक्रियेत ……… चा नाश होतो.
Ans:- जीवनसत्व ‘ब’
95. रक्त गोठण्यासाठी ……. जीवनसत्त्व आवश्यक असते.
Ans:- के
96. जीवनसत्व ………………… चे संश्लेषण आपल्या शरीरात त्वचेखाली होऊ शकते.
Ans:- ड
97. ………. ही जीवनसत्वे मेद-द्राव्य असतात.
Ans:- अ आणि ड
98. ……….. ही जीवनसत्वे जल-द्राव्य असतात.
Ans:- ब आणि क
99. मानवात गुणसुत्रांच्या ……….. जोडया असतात.
Ans:- २३
100. मुलीचा जन्म ……… या गुणसुत्रांमुळे होतो.
Ans:- एक्स-एक्स
महाराष्ट्रातील कृषि विद्यापीठे | Agricultural Universities In Maharashtra
विद्यापीठाचे नाव | स्थापना | मुख्यालय |
महात्मा फुले कृषी विद्यापीठ | १९६८ | राहुरी (जि. अहमदनगर) |
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ | १९६९ | अकोला |
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ | १९७२ | दापोली (जि. रत्नागिरी) |
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ | १९७२ | परभणी |
महाराष्ट्रातील विद्यापीठे | Universities in Maharashtra Gk Question
विद्यापीठे नाव | स्थापना | मुख्यालय |
मुंबई विद्यापीठ | १८५७ | मुंबई |
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ | १९२३ | नागपूर |
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ | १९४९ | पुणे |
एस.एन.डी.टी. विद्यापीठ | १९१६ | मुंबई |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ | १९५८ | संभाजी नगर (औरंगाबाद) |
शिवाजी विद्यापीठ | १९६२ | कोल्हापूर |
संत गाडगेबाबा विद्यापीठ | १९८३ | अमरावती |
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ | १९२१ | पुणे |
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ | १९८९ | नाशिक |
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ | १९९० | जळगाव |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ | १९८९ | लोणेर (जि. रायगड) |
स्वामी रामानंद तिर्थ विद्यापीठ | १९९४ | नांदेड |
छत्रपती शिवाजी क्रीडा विद्यापीठ | १९९६ | बालेवाडी (पुणे) |
म. गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ | १९९६ | वर्धा |
श्री संत कालिदास संस्कृत विद्यापीठ | १९९७ | रामटेक (जि. नागपूर) |
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ | १९९८ | नाशिक |
संत विद्यापीठ | १९९८ | पैठण |
महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ | २००० | नागपूर |
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ | २००४ | सोलापूर |
गोंडवाना विद्यापीठ | २०११ | गडचिरोली |
अरविंद मुक्त कृषी विद्यापीठ | २०१३ | नागपूर |
इतर माहिती | Other Information
- राज्यातील सर्व विद्यापीठांचे पदसिद्ध कुलपती हे राज्यपाल असतात.
- मुंबई विद्यापीठाचे पहिले कुलगुरू – सर जॉन विल्सन.
- मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय किंवा महाराष्ट्रीय कुलगुरू – के.टी. तेलंग.
- महर्षी कर्वे यांनी १९१६ रोजी स्त्रीयांसाठी स्वतंत्र अशा महिला विद्यापीठाची स्थापना केली. पण १९५१ मध्ये या विद्यापीठास ‘विद्यापीठ’ हा दर्जा मिळाला.
- १४ जानेवारी १९९४ रोजी मराठवाडा विद्यापीठास डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले.
- राज्य शासनाने मुंबईमध्ये राज्यातील पहिले समुह विद्यापीठ ‘डॉ. होमी भाभा समुह विद्यापीठ’ या नावाने सुरु केले आहे.
- सन २०१३ मध्ये परभणी मराठा कृषीविद्यापीठास वसंतराव नाईक यांचे नाव दिले.
- सन २०१४ मध्ये पुणे विद्यापीठास सावित्रीबाई फुले यांचे नाव दिले.
- महाराष्ट्रातील राष्ट्रीय विधी विद्यापीठे नागपूर, औरंगाबाद, मुंबई येथे स्थापन.
- केवळ एकाच जिल्ह्यासाठी स्थापन झालेले विद्यापीठ – सोलापूर विद्यापीठ
Read More: All Best Marathi Bodh Katha PDF Download | मराठी बोध कथा त्यांच्या तात्पर्य सह पीडीएफ डाउनलोड करा
महाराष्ट्रातील पहिले | First in Maharashtra Gk Question
महाराष्ट्रातील पहिले संस्था/ कार्य/ आणि इतर काही | नावे |
मराठी भाषेचे आद्यकवी | मुकुंदराज |
मुंबई इलाक्याचे पहिले गव्हर्नर | माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन |
मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय न्यायाधीश | नानाभाई हरिदास |
मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री | बाळासाहेब खेर |
द्वैभाषिक (महाराष्ट्र-गुजरात) मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री | यशवंतराव चव्हाण |
महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री | यशवंतराव चव्हाण |
महाराष्ट्रातील पहिले राज्यपाल | श्री. प्रकाश |
मुंबई प्रांतीक विधानसभेचे पहिले सभापती | गणेश वासुदेव मावळणकर |
स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे पहिले सभापती | सयाजी लक्ष्मण सिलम |
महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण | गंगापूर (गोदावरी नदी, जि. नाशिक) |
महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ | मुंबई (१८५७) |
महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ | राहुरी (१९६८), जि. अहमदनगर |
महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना (१९१९) | बेलापूर शुगर इंडस्ट्री. हरेगाव, जि. नगर |
महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना (१९४९) | प्रवरानगर (लोणी) जि. अहमदनगर |
महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री शिक्षिका | सावित्रीबाई फुले |
भारतरत्न मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन | धोंडो केशव कर्वे (१९५८) |
ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन | वि. स. खांडेकर |
पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते | पु.ल. देशपांडे (१९९६) |
रॅमन मॅगसेस पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन | विनोबा भावे |
महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर | आनंदीबाई जोशी |
महाराष्ट्रातील पहिल्या महिला आय.पी.एस. अधिकारी | मीरा बोरवणकर |
महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका | मुंबई |
राष्ट्रपती पदक मिळविणारा पहिला मराठी चित्रपट | श्यामची आई |
एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन | श्री. सुरेंद्र चव्हाण |
एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला | कृष्णा पाटील |
महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान | ताडोबा (जि. चंद्रपूर) |
महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य | दाजीपूर (जि. कोल्हापूर) |
राज्यातील पहिले पक्षी अभयारण्य | कर्नाळा (जि. रायगड) |
| महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प | जमसांडे-देवगड (जि. सिंधुदुर्ग) |
महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा | सिंधुदुर्ग |
महाराष्ट्रातील पहिला संपुर्ण साक्षर जिल्हा | सिंधुदुर्ग |
महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष | मकरंद हेरवाडकर |
महाराष्ट्र राज्यात दूधाची भुकटी बनविण्याचा पहिला प्रकल्प | मिरज |
महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र | मुंबई (२ ऑक्टोबर १९७२) |
महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र | मुंबई (१९२७) |
महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र | खोपोली (रायगड) |
महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा | सातारा (१९६१) |
मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक / वृत्तपत्र | दर्पण (१८३२) |
मराठी भाषेतील पहिले मासिक | दिनदर्शक (१८४०) |
मराठी भाषेतील पहिले वर्तमानपत्र | ज्ञानप्रकाश (१९०४) |
महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरांचे गाव | पारपोली (ता. सावंतवाडी) |
महाराष्ट्रातील पहिले पुस्तकांचे गाव | भिलार (ता. महाबळेश्वर) |
महाराष्ट्रातील पहिले मेगा फूड पार्क (मार्च २०१८) | सातारा |
महाराष्ट्रातील पहिला डिजीटल जिल्हा | नागपूर |
महाराष्ट्रातील पहिले वाईल्ड बफेलो (रानम्हैस) अभयारण्य | गडचिरोली |
महाराष्ट्रातील पहिले गिधाड अभयारण्य | रायगड |
मानवी शरीर | Human Body GK Questions In Marathi
Sr.No | प्रश्न | उत्तर |
1. | मानवी शरीरातील छातीच्या बरगड्यांची संख्या | 24 |
2. | मानवी शरीरातील छातीच्या बरगड्यांच्या जोड्या | 12 |
3. | मानवी शरीरातील पाठीच्या मणक्यांची संख्या | 33 |
4. | पाठीच्या कण्यातील ३३ मणक्यांपैकी मानेत असणारे मणके | 7 |
5. | मानवी शरीरातील माकड हाडात असणारे मणके | 4 |
6. | मानवाच्या हृदयाची दर मिनिटास होणारी स्पंदने | 72 |
7. | मानवी शरीरातील स्नायूंची एकूण संख्या | 639 |
8. | मानवाच्या पेशीतील गुणसूत्रांची संख्या | 46 (23जोड्या) |
9. | सर्व सामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब | 120/80 |
10. | मानवी शरीरात एकूण कार्यरत असणाऱ्या इंद्रिय संस्था | 9 |
11. | मानवी शरीरातील रक्त वाहिन्यांची लांबी साधारणतः | 97,000 कि. मी |
12. | मानवी शरीराचे साधारणतः तापमान | 37° सेल्सिअस (98.4 फॅ.) |
13. | मानवी शरीरातील हाडांची एकूण संख्या | 206 |
14. | नवजात बालकांतील हाडांची एकूण संख्या | 270 |
15. | मानवी हृदयाचे वजन साधारणतः | 360 ग्रॅम |
16. | मानवाच्या तोंडात असणारे एकूण दात | ३२ (प्रत्येक जबड्यात 16) |
17. | मानवी शरीरातील रक्ताचे एकूण प्रमाण | 7 ते 8 टक्के |
18. | मानवी शरीरातील अंदाजे रक्त | 5 लीटर |
19. | मानवी शरीरातील पाण्याचे एकूण प्रमाण | 65 टक्के |
20. | मानवी शरीरातील तांबड्या पेशींशी पांढऱ्या पेशींचे प्रमाण | 700:1 |
21. | मानवाच्या मेंदूचे सरासरी वजन | 1300 ते 1400 ग्रॅम |
22. | मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी | यकृत (लिव्हर) |
23. | मानवी शरीराचे तापमान समतोल राखणारी ग्रंथी | हायपोथॅलामस |
24. | मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड | मांडीचे हाड (Femur) |
25. | मानवी शरीरातील सर्वात लहान हाड | स्टेप (कानातील हाड) |
26. | प्रत्येक पायातील हाडांची एकूण संख्या | 30 |
27. | प्रत्येक हातातील हाडांची एकूण संख्या | 30 |
28. | मानवी कवटीमध्ये एकूण हाडांच संख्या | 24 |
29. | मानवी शरीरातील लहान आतड्याची लांबी | सहा ते सव्वा सहा मीटर |
30. | मानवी शरीरातील मोठ्या आतड्याची लांबी | सुमारे दिड मीटर |
महत्त्वाची संयुगे व रासायनिक सुत्रे (रेणू सुत्रे)
सामान्य नाव | रासायनिक नाव | रेणु सूत्रे |
धुण्याचा सोडा (वॉशिंग सोडा) | सोडियम कार्बोनेट | Na2Co3 |
खाण्याचा सोडा (बेकींग पावडर) | सोडियम बाय कार्बोनेट | NaHCO3 |
चुनखडी | कॅल्शियम कार्बोनेट | CaCO3 |
फेरस सल्फेट | ग्रीन व्हिट्री ऑल | FeSo4, 7 H2O |
कॉपर सल्फेट (मोरचूद) | ब्ल्यू व्हिट्रीऑल | CuSO4,5H2O |
तुरटी | पोटॅशियम अल्युमिनीअम सल्फेट | K2, So4, al2, (So4)3, 24 H2O |
मीठ | सोडियम क्लोराईड | NaCl |
पाणी | —- | H2O |
जिप्सम | कॅल्शियम सल्फेट | CaSO4 |
—— | सल्फ्युरिक अॅसिड | H2S4 |
—— | पोटॅशिअम परमँगनेट | KMnO4 |
Read More:- Hindi Barakhadi PDF Download (Chart, Image) | हिन्दी बारहखड़ी की सारी जानकारी पीडीएफ डाउनलोड
विविध शास्त्रीय उपकरणे | Various Scientific instruments
शास्त्रीय नाव (मराठी नाव) | उपकरणांचा उपयोग |
डायॉप्टर | चष्म्याच्या भिंगाची शक्ती मोजणे |
लॅक्टोमीटर (दुग्धतामापी) | दुधाची शुद्धता मोजणे |
स्टेथोस्कोप | हृदयाचे ठोके किंवा स्पंदने मोजणे |
क्युसेक | पाण्याचा प्रवाह मोजणे |
सेस्मोग्राफ (भूकंपनोंदक) | भूकंप लहरींची नोंद घेणे |
कार्डीओग्राफ | हृदयाच्या स्पंदनाचा आलेख दाखविणे |
पायरोमीटर (उच्चतापमापक) | उच्च तापमान मोजणे |
बॅरोमीटर (वायूभारमापक) | हवेचा दाब मोजणे |
थर्मामीटर (तापमापक) | तापमान मोजणे |
हायग्रोमीटर (आर्द्रतामापक) | हवेतील सापेक्ष आर्द्रता मोजणे |
कॅलरीमीटर (उष्मांकमापक) | उष्मांक मोजणे |
हायड्रोमीटर | पाण्यातील आवाजाची तीव्रता मोजणे |
अॅनीमोमीटर (वायूवेगमापक) | वाऱ्याचा वेग आणि दिशा मोजणे |
अॅमीटर | विद्युतप्रवाहाची शक्ती मोजणे |
रेनगेज (पर्जन्यमापक) | पावसाच्या प्रमाणाची मोजणी करणे |
मायक्रोमीटर (सुक्ष्ममापक) | सुक्ष्म आंतरे व कोन मोजणे |
मायक्रोस्कोप (सुक्ष्मदर्शक) | सुक्ष्म वस्तु पाहणे |
टेलिस्कोप (दूरदर्शक) | दुरची वस्तु स्पष्ट व मोठ्या स्वरुपात पाहणे |
गॅल्वानोमीटर | विद्युत प्रवाह मोजणे |
अल्टिमीटर (उंचीमापक) | समुद्र सपाटीपासूनची उंची मोजणे |
फोटोमीटर | प्रकाशाची तीव्रता मोजणे |
पॉलिग्राफ | खोटे बोलणे ओळखणे |
Read More:- Ghanmul PDF Download (Cube Root) | घन और घनमूल की सारी जानकारी
प्रमुख भौतिक राशी व एकके
भौतिक राशी | M.K.S एकक | C.G.S एकक |
बल | न्यूटन (N) | डाईन (Dyne) |
कार्य | ज्यूल | अर्ग |
शक्ती | ज्यूल / सेकंद (वॅट) | अर्ग / सेकंद |
चाल, वेग | मीटर/सेकंद | सेंटीमीटर / सेकंद |
त्वरण | (M/S2) | सेंटीमीटर/सेकंद ± (CM/S2) |
संवेग | किलोग्रॅम मीटर/सेकंद (Kg m/s) | ग्रॅम सेंमी मीटर/सेकंद (g cm/s) |
घनता | किलोग्रॅम/मीटर3 (Kg/m3) | ग्रॅम/सेमी3 (g/cm3) |
Read More:- Directions In Marathi PDF Download | दिशांचे मराठी मध्ये नावे आणि त्याची संपूर्ण माहिती जाणून घ्या
GK Questions In Marathi With Answers PDF Download
ह्या GK Questions In Marathi :- आपण ह्या आर्टिकल मध्ये मराठी दिशा आणि त्यांची सविस्तर पणे माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणाना अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही GK Question PDF Download करण्यासाठी PDF देत आहोत. तुम्ही Direction Names in Marathi PDF Downloadआणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.
Conclusion Of GK Questions In Marathi
आपण या पोस्ट मध्ये आपण सामान्य ज्ञानाची संपूर्ण माहिती मराठीमध्ये ह्यांची संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण gk questions in marathi, gk questions in marathi with answers, gk questions in marathi 2022, police bharti gk questions in marathi, easy gk questions in marathi, gk questions in marathi with answers pdf, police bharti gk, questions in marathi pdf, simple gk questions in marathi हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही कोणतेही भरती साठी ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.