Advertisement

क्रांतिकारक आणि त्यांचे कार्य PDF Download

क्रांतिकारक आणि त्यांचे कार्य PDF Download

Krantikarak Aani Tyanche Karya PDF Download – Many great revolutionary fighters sacrificed their lives in the freedom struggle of the country. Due to his work, his name has become immortal in the history of India. In the competitive exam specific questions are asked about such great revolutionaries and their work. To prepare for this, it is necessary to read and remember important information rather than reading the entire history. This post provides information about such great revolutionaries and their work.

Krantikarak Aani Tyanche Karya PDF Download

Krantikarak Aani Tyanche Karya PDF Download(महान क्रांतिकारक आणि त्यांचे कार्य संपूर्ण माहिती PDF Download) देशाच्या स्वातंत्र्य लढ्या मध्ये अनेक थोर क्रांतिकारक सेनानींनी आपल्या प्राणाची आहुती दिली . त्यांच्या या कार्य मुळे भारताच्या इतिहासामध्ये त्यांचं नाव अजरामर झाली आहेत. अशा थोर क्रांतिकारक आणि त्यांचे कार्य यावर स्पर्धा परीक्षा मध्ये हमखास प्रश्न विचारले जातात. याची तयारी करण्यासाठी संपूर्ण इतिहास वाचून काढण्या पेक्षा महत्वाची माहिती वाचणे आणि लक्षात ठेवणे गरजेच असते. या पोस्ट मध्ये अशीच थोर क्रांतिकारक आणि त्यांचे कार्य या बद्दल माहिती दिली आहे.

क्रांतिकारक आणि त्यांचे कार्य

क्रांतिकारक कार्य
वासुदेव बळवंत फडके १८७९ मध्ये महाराष्ट्र मध्ये ब्रिटिशांविरुद्ध प्रथम सशस्त्र उठावाचे नेत्तृत्व केले . आद्यक्रांतिकारक म्हणून ओळख .
बाबू गेनू १९३० च्या स्वदेशी आंदोलनामध्ये भाग ,मुंबई येथे परदेशी कापडाच्या ट्रक समोर आडवे होऊन होतात्म्य पत्करले .
वि. दा . सावरकर अभिनव भारत समाजची स्थापना आणि नेतृत्व केले ,१९०५ मध्ये परदेशी कापडाची होळी केली .
मदनलाल धिंग्रा कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याचा खून करून फासी स्वीकारली .
भगत सिंग नवंजवान भारत सभा या क्रांतिकारक संघटनाचे नेतृत्व केले ,लाहोर षडयंत्र मध्ये फाशी ची शिक्षा . २३ मार्च हा फाशीचा दिवस शाहिद दिवस म्हणून पाळला जातो . शाहिद-ए-आजम या टोपण नावाने ओळख .
श्यामजी कृष्ण वर्मा इंडिया हाउस या क्रांतिकारी संघटनचे नेतृत्व केले ,
अनंत कान्हेरे अनंत कान्हेरे ह्यांनी जॅक्सनवर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या ,२० मार्च इ.स. १९१० रोजी तिघांनाही फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलीयासाठी
रामप्रसाद बिस्मिल काकोरी कटाचे नेतृत्व केले ,द रिवोल्यूशनरी घोषणा पत्र प्रकाशित केले
रास बिहारी बोस गदर पार्टी क्रांतिकारी संघटनेची स्थापना आणि संस्थपाक म्हणून कार्य .
बटुकेश्वर दत्त केंद्रीय विधान सभा बॉमस्फोट मध्ये शाहिद भगत सिंग यांच्या समवेत सक्रिय सहभाग
चाफेकर बंधू प्लेग कमिशनर रॅंड या अधिकायाची गोळी झाडून हत्या .
मंगल पांडे १८५७ च्या उठावामध्ये सक्रिय सहभाग मंगल पांडेने गायीच्या चरबीत सापडलेले काडतूस चावण्यास नकार दिला होता, परिणामी त्याला अटक करण्यात आली आणि 8 एप्रिल 1857 रोजी फाशी देण्यात आली.
तात्या टोपे  
भारताच्या  पहिल्या स्वातंत्र्ययुद्धातील प्रमुख लष्करी नेते होते 
राणी लक्ष्मीबाई  इ.स. १८५७ च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी सेनानी होत्या. त्यांच्या शौर्याने त्यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून ओळख दिली .
उमाजी नाईक भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील प्रथम आद्यक्रांतिकारक होते.
चंद्रशेखर आझाद  हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (एच.आर.ए.) या क्रांतिकारी संघटनेची हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (एच.एस.आर.ए.) या नवीन नावाखाली पुनर्बांधणी केली
सुभाष चंद्र बोस स्वराज्य पक्ष स्थापन करून कोलकाता महापालिकेची निवडणूक जिंकली ,म्यानमारच्या मांडले तुरुंगामध्ये कारावास .
सेनापती बापट १९२१ ते इ. स. १९२४ या कालखंडात पुणे जिल्हयातील मुळशी पेटा येथील धरणग्रस्त शेतकऱ्यांना जमीन मिळविण्याकरिता सत्याग्रहाचे आंदोलन चालवले,
लाला लजपत राय १९२८ मध्ये भारतातील राजकीय परिस्थितीबद्दल अहवाल देण्यासाठी सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिटिश सरकारने एका आयोगाची स्थापना केली या कमिशन विरोधी लाला लजपत राय यांनी प्रदर्शने केली .

महान भारतीय क्रांतिकारक pdf Download

  • महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ कडून महान भारतीय क्रांतिकारक १७७० ते १९०० नावाचे पुस्तक प्रकाशित केले आहे .
  • या पुस्तकामध्ये क्रांतिकारकांची विस्तृत आणि महतवाची माहिती देण्यात आलेले आहे .
  • खालील डाउनलोड लिंक वरून क्लिक करून तुम्ही ते डाउनलोड करू शकता .

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages