Advertisement

Current Affairs चालू घडामोडी 3 August 2022

Current Affairs
  1. पंतप्रधान मोदींनी नवी दिल्लीत मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांची भेट घेतली; दोन्ही देशांनी व्यापक पायाभूत संबंधांसाठी सहा करार केले.

2. भारतीय राष्ट्रध्वजाचे डिझायनर पिंगली व्यंकय्या यांची जयंती, 2 ऑगस्ट रोजी साजरी करण्यात आली.

Advertisement

3. लोकसभेने वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972 अंतर्गत संरक्षित प्रजाती वाढवण्यासाठी वन्यजीव (संरक्षण) सुधारणा विधेयक, 2021 मंजूर केले.

Advertisement

4. RBI चा संयुक्त आर्थिक समावेशन निर्देशांक (FI-Index) मार्चमध्ये 56.4 वर पोहोचला.

5. एचडीएफसी बँक परिवर्तनने बागची-पार्थसारथी रुग्णालयाच्या बांधकामासाठी IISc बेंगळुरूशी 107 कोटी रुपयांचा करार केला.

Advertisement

6. टाटा समूहाच्या मालकीची एअर इंडिया (AI) वैमानिकांचे निवृत्तीचे वय 58 वरून 65 पर्यंत वाढवणार.

7. अफगाणिस्तानातील काबूल येथे अमेरिकेने अल कायदाचा म्होरक्या अयमान अल-जवाहिरीला ड्रोन हल्ल्यात ठार केले.

Advertisement

8. बलुचिस्तान प्रांतात पूर मदत मोहिमेवर असलेले पाकिस्तानी लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले, त्यातील सर्व 6 जण ठार.

9. तैवान: यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी तैपेईमध्ये उतरल्या.

10. बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स: पुरुषांच्या सांघिक टेबल टेनिसमध्ये भारताने अंतिम फेरीत सिंगापूरचा ३-१ असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले.

11. बर्मिंगहॅम: राष्ट्रकुल खेळ: भारताने लॉन बाॅल्समध्ये महिला चौकार संघात सुवर्ण जिंकले.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages