Advertisement

Current Affairs चालू घडामोडी 26 January 2022

Current Affairs
1. दरवर्षी 26 जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिन ((ICD) साजरा केला जातो.
2. अलीकडेच इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने पाच वर्षांचा Road Map जारी केला आहे. मंत्रालयाने व्हिजन डॉक्युमेंट नावाचे “2026 पर्यंत 300 बिलियन USD शाश्वत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि निर्यात” देखील जारी केले.
3. सरकारने 25 जानेवारी 2022 रोजी मानवी केसांच्या निर्यातीवर निर्बंध लादले.
4. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने 25 जानेवारी, 2022 रोजी, घोषणा केली की, सरकारने पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी (PMC) बँकेचे युनिटी स्मॉल फायनान्स बँक (SFB) सह विलीनीकरणासाठी मसुदा योजना अधिसूचित केली आहे.

5. सरकारने रिओ टिंटोला लिथियम खाणकामाचे परवाने सुमारे दोन महिन्यांच्या विरोधानंतर सर्बिया ने रद्द केले. रिओ टिंटो ही खाण संस्था आहे.
6. सशस्त्र दलांना रशियाकडून 70,000 रायफल्सची पहिली तुकडी मिळाली आहे. भारतात AK 203 असॉल्ट रायफल तयार करण्याच्या मोठ्या कराराचा एक भाग आहे.
7. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी 25 जानेवारी 2022 रोजी सुरक्षा दलाच्या जवानांसाठी 384 शौर्य पुरस्कार आणि इतर लष्करी सन्मान मंजूर केले.
8. 25 जानेवारी 2022 रोजी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने जागतिक आर्थिक दृष्टीकोन प्रसिद्ध केला.
9. तीन आंदोलकांना सुदानच्या सुरक्षा दलांनी नुकतेच ठार केले. यामुळे सुदानमधील अशांतता पुन्हा पेटली आहे. पंतप्रधान अब्दल्ला हमडोक यांनी जानेवारी २०२२ च्या सुरुवातीला राजीनामा दिला.
10. आपला 73 वा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2021 रोजी संपूर्णराष्ट्राने साजरा केला.
Author: Sandesh Shinde
Chief Content Writer, And Digital marketing Strategist. Responsible for developing and executing the company's content strategy. This includes conducting keyword research, writing SEO-optimized content, and managing the content calendar.a strong understanding of SEO principles.
Advertisement